शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

'मोक्का' की राजकीय मोका ?

करकरे यांनी 'आपल्याला या जबाबदारीतून मुक्त करा' असे शेवटच्या दिवसात गृहमंत्र्यांना म्हंटले होते असे ऐकून आहे.
ते असे का म्हंटले असावे यावर खूप काथ्याकुट झाला कारण त्यांनी मालेगाव स्फोट प्रकरणी काही हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांना अटक केली होती आणि त्यांच्यावर मोक्का लावला होता.याला काही हिंदुत्ववदि नेत्यांनी, संघटनांनी आणि जनमाणसांनी प्रखर विरोध केला होता.
आणि त्यानंतर दुसरयाच दिवशी त्यांनी मुंबई हल्ल्यात त्यांनी हौतात्म्य पत्करले.
त्यामुळे त्यांच्या 'जबाबदारीतून मुक्त करा' या वाक्याला खूप महत्व प्राप्त झाले होते
त्यांच्यावर नक्की कशाचा दबाव होता हे नक्की समजू शकले नाही करकरे असते तर ते नक्की याबाबत सांगू शकले असते
काही दिवसापूर्वी मालेगाव स्फोटातील आरोपींना 'मोक्का' तून 'मोक्का' न्यायालयाने मोकळे केले आणि त्यांच्यावरील 'मोक्का' रद्द करावा असा आदेश दिला.
तेन्ह्वा हा प्रश्न पडला कि एवढी मोठी जबाबदारी स्वीकारणाऱ्या करकरे यांना कोणाला मोक्का लावावा हे समजत नसावे का ?
कि 'मोक्का' चा गैरवापर कोणाच्या दबावात करण्यात आला असावा ?
अखेरच्या क्षणी करकरे नक्की कोणाच्या दबावाखाली होते ?
आणि त्यामुळे ते 'मला या जबाबदारीतून मुक्त करा' असे म्हणत असावे ?
मालेगाव स्फोटातील आरोपींना 'मोक्का' लागत नाही हे करकरे यांना नक्की ठाउक असणार म्हणून तर त्यांनी तो खटला हा नाशिक न्यायालयात सुरवातीला चालवला असावा.
तपास पूर्ण झाला आहे असेही त्यांनी मध्ये नमूद केले होते पुरावे हि सादर करण्यात आले होते.
आणि गंभीर आरोपांचा खटला असल्याने आणि पुराव्यासहित खटला चालवला गेला असता तर आरोपींना जामीन मिळणेही शक्य झाले नसते आणि आरोपींना कठोर शिक्षा हि देता आली असती.
मग अचानक करकरे आणि मंडळी आरोपींना 'मोक्का' लावण्याकडे का वळली असा प्रश्न पडतो आणि
मोक्का लावल्यानंतरच करकरे यांनी दडपण असल्याची तक्रार का करावी असाही प्रश्न पडतो
याचे उत्तर फक्त आता करकरे देउ शकले असते पण तरीही आजची परिस्थिती पाहता आणि न्यायालयाचा आदेश पाहता काही गोष्टी स्पष्ट होताना दिसतात.
आरोपींवरील 'मोक्का' रद्द करताना न्यायालयाने जी कारणे दिली आहेत त्यात नमूद केले गेले आहे कि,
मोक्का लावण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्याचा या प्रकरणात अभाव दिसून येतो.
गुन्हेगारी पुरावे ,कारस्थानाचे पुरावे ,आरोपींचा एकमेकांशी संबंध आणि संपर्क आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी यावर 'मोक्का' लावला जातो परंतु या प्रकरणातील आरोपींबाबत या सर्व गोष्टीत त्रुटी आहेत.
मग हे अनुभवी करकरे यांना माहित नसावे का ?
त्यांना ठावूक असावे म्हणून तर त्यांनी हा खटला सुरवातीपासून नाशिक न्यायालयात चालवला असावा
मग त्यांच्यावर आरोपींना 'मोक्का' लावावा याचे दडपण आणले गेले होते का ?
कारण त्यावेळी लोकसभेचे वारे वाहू लागले होते आणि या प्रकरणाचा राजकीय लाभ उठवण्यासाठी हा खटाटोप करण्यात आला असावा का ?
या प्रकरणातील आरोपींना मोक्का लावल्याने मुस्लिमांची एक गठ्ठा मते आपल्याला मिळतील अशी गणिते आखली गेली असावी का ?
हा 'राजकीय मोका' साधण्यासाठी पोलिसांवर दबाव आणण्यात आला असावा का ?
आणि हेच करकरे यांना आवडले नसावे आणि त्यांनी गृहमंत्र्यांना 'मला या जबाबदारीतून मुक्त करा' असे सांगितले नसावे का?
दहशतवाद करणारे फक्त मुस्लीम नसून बाकी धर्माचे लोकही असे करतात हे दाखवून देण्यासाठी या प्रकरणाचा राजकीय वापर मोक्का लावून कशावरून आला नसावा ?
कारण त्या अगोदर काही दिवस पवार यांनी पक्षीय शिबिरात दहशतवाद एकाच धर्मातील लोकांना अटक करणे योग्य नाही असे सांगितले होते आणि त्यानंतरच मालेगाव प्रकरण पेटू लागले आणि हिंदू हि दहशतवादी आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न कशावरून गेला गेला नसावा असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही
त्यामुळे सरकारने वरच्या न्यायालयात अपील करत बसण्यापेक्षा पोलिसांना आपले काम करू द्यावे उगाच त्यात हस्तक्षेप करू नये असे वाटते
जे काही खरे आहे ते लवकरच लोकांच्या समोर अईल अशी आशा आहे.
येथील मुद्दे तोरसेकर यांच्या लेखातून घेण्यात आले आहेत.
जय हिंद
जय महाराष्ट्र

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा