सोमवार, ३१ ऑगस्ट, २००९

'महाराष्ट्राचा सुवर्णमहोस्तव' साजरा करण्याचा हक्क कॉंग्रेस सरकारला आहे का ?

महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीत कॉंग्रेस पक्षाचा काहीही त्याग नाही.महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीच्या चळवळी याला साक्ष आहेत.
कॉंग्रेस सत्तेत असल्याने आपणच या राज्याच्या निर्मितीचे,जडणघडणीचे संस्थापक आहोत अश्या पद्धतीने सुवर्णमहोस्तव कार्यक्रम करत आहेत. मुंबईसहित महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीला कॉंग्रेस पक्षाचा आणि श्रेष्ठींचा पूर्णपणे विरोध होता.महाराष्ट्रातील त्या वेळचे सर्व मराठी दिग्गज नेते या चळवलीच्या विरोधात होते हे सत्य आहे .
आज विरोध करणारीच कॉंग्रेस हि 'आयत्या बिळावर नागोबा ' ठरलेली आहे असे आपणाला वाटत नाही का ?
खरच या काँग्रेसी सरकारला 'महाराष्ट्राचा सुवर्णमहोस्तव' साजरा करण्याचा हक्क आहे का ?
Divisions of MaharashtraImage via Wikipedia
१९४६ साली बेळगाव येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी असलेल्या साहित्यिक माडखोलकरांनी 'सारा मराठी प्रदेश एकत्र आणायला हवा ' असा जागर केल्यानंतर मराठी राज्याच्या निर्मितीसाठी प्रयत्न सुरु झाले
'संयुक्त महाराष्ट्र परिषद ' या सर्व पक्षीय संस्थेची स्थापना सुद्धा झाली सुरवातीला कॉंग्रेस पक्ष हि यात सामील झाला मात्र नेहरू आणि केंद्र सरकारने विरोधी भूमिका घेताच काँग्रेसी नेत्यांनी आपली भूमिका बदलली.
कणाहीन काँग्रेसी मराठी नेत्यांना दिल्लीपुढे शेपूट घालण्याची परंपरा तिथपासूनच सुरु झाली आणि ती अजूनही चालूच आहे
संयुक्त महाराष्ट्र परिषेदेला त्यावेळी शंकरराव देव आणि भाऊसाहेब हिरे यांनी पाठींबा दिला होता दिल्लीच्या दबावाला बळी पडता पण त्याकाळचे
कॉंग्रेसचे तरुण नेते यशवंतराव चव्हाण यांनी डिसेम्बर १९५५ ला सातारा जिल्हा कॉंग्रेस समितीच्या बैठकीत
'नेहरू निष्ठा आणि महाराष्ट्र निष्ठा यापैकी नेहरू निष्ठा आपण जास्त पसंद करू ' असे जाहीर केले म्हणजेच
'महाराष्ट्रापेक्षा नेहरू मोठे आहेत '
आणि संयुक्त महाराष्ट्राच्या या लढ्यातून कॉंग्रेसला वेगळे ठेवण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्रीयांना पाहिजे असेलतर त्यांचा प्रांत त्यांना मिळेल पण मुंबईचा त्यात अंतर्भाव होणार नाही असे १९४९ साली नेहरू,पटेल आणि पत्त्भी या कॉंग्रेस नेत्यांनी नोंदवले होते.
मुंबई महाराष्ट्रात घालू नका अशी भूमिका गांधीजीनी सुद्धा त्यावेळी मांडली होती.
एकूणच महाराष्ट्र राज्य हवे असेलतर मुंबईचा नाद सोडा असाच पुनर्रचना समितीचा आग्रह होता
मुंबई हि महाराष्ट्राची आहे ,मराठी माणसाची आहे हि कल्पनाच गांधी, नेहरू,पटेल यांना मान्य नव्हती आणि
तीच भूमिका सर्व अमराठी मुंबईमधील स्थायीकांची होती आणि त्याला साथ दिली ती का पाटील यांच्यासारख्या अनेक मराठीद्रोही काँग्रेसी नेत्यांनी
मुंबई स्वतंत्र ठेवण्याचा निर्णय १६ जानेवारी १९५६ रोजी नेहरू यांनी आकाशवाणीवरून जाहीर केला आणि त्याच रात्री मुंबईत भडका उडाला.
मुंबईसहित संयुक्त महाराष्ट्र या बाबत कॉंग्रेस ने हात झटकले होते मराठी जनतेचा द्रोह करत नेहरूंपुढे गुडघे टेकले होते
आणि अशा या आणीबाणीच्या काळी सर्व पक्ष्याच्या कार्यकर्त्यांनी एकत्र एवून 'संयुक्त महाराष्ट्र समिती ' स्थापन केली
आणि एस जोशी यांच्याकडे त्याची सूत्रे दिली.
त्यानंतर सर्व महाराष्ट्रभर सत्याग्रह सुरु झाला आणि त्यात मोरारजी ,हिरे ,चव्हाण आणि का पाटील यांच्या काँग्रेसी सरकारने १०५ जणाचे बळी घेतले.
सारा महाराष्ट्र या आंदोलनाने पेटला होता एस जोशी,गोरे ,आचार्य अत्रे ,श्रीपाद डांगे,प्रबोधनकार ठाकरे ,नाना पाटील यांच्या बरोबरच भंडारे ,बी सी कांबळे हे रिपब्लिकन नेते हि आंदोलनात अग्रभागी होते
सारा दलित समाज सुधा या आंदोलनात उतरला होता
शाहीर अमर शेख ,शाहीर गह्वान्कार,,शाहीर आण्णाभाऊ साठे यांचे पोवाडे आणि
बाळासाहेब ठाकरे यांची व्यंगचित्रे काँग्रेसी नेत्यांची लक्तरे काढीत होती.
आचार्य अत्रे 'मराठा ' दैनिकातून कॉंग्रेसची हजामत करत रान पेटवत होते
१९५५ ते १९६० या काळात केंद्र सरकार आणि कॉंग्रेसच्या विरोधात महाराष्ट्र पेटून उठला होता
तेंव्हा हे कॉंग्रेस नेते नेहरूंच्या धोतराच्या सोग्याखाली लपून बसले होते
संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उग्र आंदोलनानंतर कॉंग्रेस चे दिल्लीतील सरकार आणि नेहरूंनी मुंबईसहित महाराष्ट्र देण्याची तयारी दाखवली ती ही उद्दात भावनेने नाही.
महाराष्ट्रातील जनता कॉंग्रेसच्या विरोधात जात आहे याची जाणीव झाल्यावरच
महाराष्ट्रातील कॉंग्रेसची सत्ता जाईल या भीतीपोटीच मे १९६० रोजी मुंबईसहित महाराष्ट्राची घोषणा केली गेली
त्यातही बेळगावसहित सीमा भाग ,गुजरात सीमेवरील डांग आणि उंबरगाव या भागांचा बळी घेवूनच
महाराष्ट्र तोडून मोडून देण्यात आला
या महाराष्ट्र स्थापनेच्या लढाइत कॉंग्रेस पक्षाचा तिळमात्र सहभाग नव्हता.
ज्यांनी लढाई लढली आणि जिंकली त्या एकाही नेत्याला महाराष्ट्र निर्मितीच्या सोहळ्याचे साधे आमंत्रण हि देण्यात आले नाही
संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि यश हे असे आहे.
लढाई संयुक्त महाराष्ट्र समितीने आणि मराठी जनतेने लढवली आणि सत्ता वं यशाचे फुकटचे श्रेय कॉंग्रेस ने घेतले म्हणून आचार्य अत्रे म्हणायचे 'लढणे को हम ,खाणे को तुम '
कॉंग्रेसला कधीच 'महाराष्ट्रीय ' असावे असे वाटले नाही
त्यामुळेच शरद पवारांसारख्या मराठा नेता आगतिक आणि लाचार भावनेने सी लिंकचे नाव 'राजीव गांधी' ठेवायला लावतो आणि त्यासाठी भूमिपुत्राचे लेबल लावतो.
मग यापूर्वीच्या मराठी भूमिपुत्रांच्या आंदोलनाला पवारांचा विरोध का असतो ?
सोनिया गांधी मालेगावात एवून परप्रांतीयांना सवरक्षण देण्यात येइल असे बोलून जातात मग इथे भूमिपुत्रांचा वाली कोण ?
अशा या कॉंग्रेस पक्षाला आणि त्याच्या सरकारला महाराष्ट्राचा सुवर्णमहोस्तव साजरा करण्याचा अजिबात अधिकार नाही असे मला वाटते
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta

1 टिप्पणी: