रविवार, १३ सप्टेंबर, २००९

मिरजेचे कारस्थान कोणाचे तुम्हीच ठरावा


कोणतीही दंगल वा धार्मिक तणाव झाला कि लगेच याच्यामागे राजकारण आहे किंवा निवडणुकीचे कारण सांगितले जाते
पण हे कितपत खरे आहे ?
प्रत्येक दंगल हि निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केली जाते असे मला तरी वाटत नाही
काल परवा जेंव्हा मिरजमध्ये दंगा झाला त्यावेळीही राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनीही असेच वक्तव्य केले कि यामागे षड्यंत्र आहे.
आता एक सांगा कि हे अशोकराव राज्याचे मुख्यमंत्री कधी व कसे झाले ?
A large Ganesha murti from a Ganesh Chaturthi ...
२६ नोव्हेबर ला जेंव्हा पाकी जिहादी अतिरेक्यांनी समुद्रमार्गे येऊन मुंबईवर हल्ला केला आणि ४ दिवस लोकांना वेढीस धरले.
त्यात आपल्या महत्वाच्या पोलिसांसहित जवळ जवळ २०० लोकांचे प्राण गेले.
सर्वत्र मृतूचा तांडव चालू होता आणि मुंबईकर जीव मुठीत धरून सैरावैरा पळत होते.
एवढे बळी घेऊन हि त्यावेळचे मुख्यमंत्री विलासराव आपल्या प्रिय पुत्र रितेशला सत्त्या फ्रेम रामगोपाल वर्माला याच्याबरोबर घेऊन ताज च्या पाहणीस घेऊन गेले जसे काही कोणत्या तरी प्रेक्षणीय स्थळाला भेट द्यायला गेले असावे.
आणि यांनतर वादंग होऊन त्यांना पदाचा राजीनामा द्यावा लागला होता
परंतु या मुळेच अशोकरावांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती
मग आता प्रश्न असा पडतो कि हे षड्यंत्र कि कारस्थान होते.
ज्या जोशाने दंगल झाल्यावर मुख्यमंत्री यामागे कारस्थान आहे असे म्हणतात त्याच नियमाने त्यांचे मुख्यमंत्री पद हि एक कारस्थान तर कशावरून नाही ?
त्यांनी विलासरावांचे पद बळकावण्यासाठी हे षड्यंत्र केले असावे का कारण त्याचा फायदा त्यांनाच झाला आहे असे दिसून येते .
विधानसभेच्या काही जागा बळकावण्यासाठी जर विरोधी पक्ष जातीय दंगली भडकवत असतील तर त्याच राज्याचे मुख्यमंत्री पद बळकावण्यासाठी हे कारस्थान केले असावे नाही का ?
कारण जे नियम ते अशोकराव लावत आहेत त्यातून त्यांचे मुख्यमंत्री पद हि सुटत नाही.
मुंबईवर हल्ला करून विलासरावांचे मुख्यमंत्री पद बळकावण्याचे कारस्थान होते का ?
तर तसे नाही
तसेच मिरज दंगलीमागे काही कारस्थानच आहे हा त्यांचा युक्तिवाद बरोबर नाही किंवा हास्यास्पद आहे असे वाटते.
अशा दंगलिनी कधी एकत्र हिंदू मते मिळवता येत नाहीत, असे असते तर मुंबई हल्ल्यानंतर मुंबईतच भाजप सेनेचा लोकसभा निवडणुकीत दारूण पराभव झाला नसता तेथे जर हिरव्या जिहादी हल्ल्यानंतर मतदारांनी युतीला मते दिली नाहीत तर मिरजच्या दंगलीने किती मतदारसंघात प्रभाव पडणार आहे ?
हिंदू मते त्यामुळे युतीला मिळतील यासाठी युतीने दंगलीचे कारस्थान रचले हा आरोप बिनबुडाचा आहे.
पण अशा दंगलीमुळे एकगठ्ठा मुस्लीम मते हि युतीविरुद्ध नक्की जातात असे दिसून आले आहे.
एवढेच कशाला २००० मध्ये आघाडी शासन असताना शिवसेनाप्रमुखांना अटक करण्याचे नाटक केले होते त्याला हि राजकीय कारस्थानच म्हणावे लागेल कारण त्यानंतर छगणरावांचा मुस्लीम बहुल भेंडी बाजारमध्ये तलवार देऊन सत्कार करण्यात आला होता आणि वर्षभरात समाजवादी मधील आमदार राष्ट्रवादीमध्ये आले होते आणि त्यानंतरच मुंबई महापालिकेत त्यांच्या नगरसेवकांची संख्या १८ -१९ झाली आहे.
असे राजकारण अजून युतीला जमले नाही.
याआधीही मिरज, सांगली, इचलकरंजी येथे दंगली झाल्या आहेत पण तेथे युतीला यश मिळाल्याचे ऐकवत नाही त्यामुळे मतांसाठी त्यांनी कारस्थान रचल्याचे पुरावे नाहीत.
उलट निवडणुकींच्या आधी बाबरी,दंगली,गुजरात आणि हिंदुत्व यांचा पाढा वाचून वातावरण तापवण्याचे काम काही पक्ष करताना दिसतात आणि असे वातावरण तापवल्यावर मुस्लीम एकगठ्ठा मते अशा पक्षांना मिळताना दिसतात.
आता ज्या भागात हा प्रकार झाला आहे त्या भागात मागील लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा धुव्वा उडालेला दिसतो तेंव्हाचे झालेले नुकसान मुस्लीम एकगठ्ठा मताने भरून काढण्यासाठी हे मिरज पेटवण्याचे कारस्थान तर असू नये ना ?
कारण दंगली नंतर हिंदू एकगठ्ठा मतदान करतात असे अजून तरी दिसून आले नाही पण मुस्लीम एकगठ्ठा युतीच्या विरोधात मतदान करतात असे दिसून आले आहे
मग हे मिरजेचे कारस्थान कोणाचे असू शकते तुम्हीच ठरावा ...
(वरील मुद्दे तोरसेकर यांच्या लेखातील आहेत )
वंदे मातरम
Enhanced by Zemanta

२ टिप्पण्या:

  1. जे विश्लेषण केलेय ते या घटकेला पटतय पण खरंच असे असेल का? असा प्रश्न हि पडतोय.काय खरं काय खोटं ते त्यामागे कार्यरत मेंदूलाच ठाऊक.

    प्रत्युत्तर द्याहटवा