गुरुवार, २६ नोव्हेंबर, २००९

सेक्युलर अंधश्रद्धेचे बळी


१९९३ साली
मुंबईत खूप महत्वाच्या ठिकाणी तेरा बॉम्बस्फोट झाले होते.त्या खटल्याचा निकाल दुसरे बॉम्बस्फोट होईपर्यंत लागला नव्हता.आणि त्यात त्या आरोपींचे वकील म्हणून प्रसिद्ध कायदेपंडित नितीन प्रधान यांनी काम पहिले होते.
मुंबईकरांचा जीव घेणार्यांचा बचाव करत आहेत म्हणून त्यांना त्यावेळी शिवसेना वैगेरे काही संघटनांचा प्रखर विरोध पत्करावा लागला होता;पण सर्व मुस्लीम दहशतवादी नसतात यावर गाढ श्रद्धा असल्याने प्रधानांनी त्या खटल्यातील मुस्लीम आरोपींचे वकीलपत्र घेतले होते.
जिहादी दहशतवादाला धर्म नसतो हि त्यांची श्रद्धा होती.त्यामुळेच हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध पत्करून त्यांनी आरोपींचा बचाव मांडला होता आणि तोही थोडीथोडके दिवस नाही तर तब्बल १२ वर्ष ;पण २००६ जुलैच्या रेल्वे स्फोटमालिकेने नितीन प्रधान यांना धक्काच बसला.दहशतवादाला धर्म नसतो हि सेक्युलर श्रद्धा हि प्रत्यक्षात अंधश्रद्धा असल्याचा त्यांना साक्षात्कार २००६ मधील स्फोटाने झाला.मात्र त्यानंतरही त्यांनी आपल्या अंधश्रद्धेला चिटकून राहण्याचा वैचारिक मूर्खपणा त्यांनी केला नाही.जिहाद

Defeating JihadImage via Wikipedia

मागील धार्मिक प्रेरणा डोळसपणे स्वीकारून दहशतवादाला धर्म असतो हे सत्य ठणकावून सांगण्याचे धाडस त्यांनी केले होते.
२००६ च्या स्फोटानंतर त्यांनी ते सत्य ओरडून सांगितले आणि तात्काळ १९९३ च्या स्फोटातील मुस्लीम आरोपींचे वकीलपत्र सोडले होते.त्यावेळी रेडीफ वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत प्रधान म्हणाले होते'मला ठामपणे आता असे वाटते कि,या सर्व दहशतवादी कारवाया,हे सर्व बॉम्बस्फोट अगदी निश्चितपणे हिंदूंच्या विरुद्धच आहेत.हे घडवून आणनार्याना केवळ हिंदूनाच मारायचे होते.जास्तीत जास्त हिंदूंची हत्या करायची आहे आणि त्यासाठीच हे चालले आहे.' प्रधान हे व्यवसायाने वकील असल्याने कायद्याच्या चौकटीत काय बोलतो याचे भान त्यांना नक्कीच असणार.बाकीच्या किती जनात हे सत्य स्वीकारण्याची हिम्मत आहे?किती विद्वान शहाणे आपल्या सेक्युलर अंधश्रद्धेतून बाहेर पडू शकले आहेत?
जिहाद,दहशतवाद यांना धर्म नसतो हि जाणीवपूर्वक राजकीय भामट्यांनी निर्माण केलेली अंधश्रद्धा आहे.असाध्य रोगांविषयी जुन्या काळात जशा अंधश्रद्धा जोपासल्या जायच्या आणि त्याचा परिणाम म्हणून हजारो निष्पाप लोक रोगाला बळी पडायचे;तसेच आज सेक्युलरिझम नावाखाली जोपासल्या जाणारया अंधश्रद्धेचे जिहाद नावाचा रोग हजारो निष्पाप लोकांचा बळी घेत आहे.
मात्र तरीही राजकीय शहाणे आणि त्याच तत्वज्ञानाची पोपटपंची करणारे भोंदू 'दहशतवादाला धर्म नसतो'असली सेक्युलर अंधश्रद्धा आपल्या माथी मारत असतात.
गतवर्षी २६ नोव्हेंबर २००८ ला कराचीहून आलेल्या आणि १० जीहादिनी त्याच अंधश्रद्धेच्या गोळ्या घालून चिंध्या केल्या.२६ नोव्हेंबरला बळी बदलेला प्रत्येक निरपराध त्या अंधश्रद्धेचाच बळी नव्हताका?
नितीन प्रधान जे वर्षापूर्वी टाहो फोडून सांगत होते त्याचा विचार सरकारने का केला नाही?
प्रधान कोणी हिंदुत्ववादी नेता नाही.त्यांनी प्रत्यक्ष जिहादी कारस्थानातील आरोपींचा तब्बल १२ वर्ष ठामपणे बचाव केला होता.त्यांच्यावर कोणीही मुस्लीम विरोधक म्हणून आरोप करू शकणार नाही.असा माणूस जेंव्हा अनुभवाने सांगतो कि या घातपात्यांना फक्त हिंदुना किंवा बिगर मुस्लिमांनाच जीवानिशी मारायचे आहे;तेंव्हा याची गंभीर दखल सरकारने घ्यायला नको होती का?
जिहाद आणि दहशतवाद यांचा बंदोबस्त करताना किंवा त्यासाठी योजना आखताना ती हिंसा करण्याचे हेतू,उद्दिष्ट प्रेरणा नाकारून उपाय योजने शक्य आहे का?मुल आजार किंवा त्याची कहरी करणे नाकारून उपाय शोधणे शक्य नसते.
तोयबाचा प्रमुख हाफिज सईद किंवा लादेन देखील जोरजोराने ओरडून आपण धर्मयुद्ध करतो असेच सांगत असतात.२६ नोव्हेम्बरचेहल्लेखोर हि'आम्ही इस्लामचे लढवय्ये आहोत,अल्ल्हाची सेना आहोत'असे ओरडत होते.मग त्यांना धर्म नाही असे सांगणे फसवणूक नाही का?
कधी कधी असे वाटते कि सेक्युरीलीझम हे दहशतवादाचे दाखवायचे दात आहेत आणि जिहाद चावायचे दात आहेत.सेक्युरीलीझमच जिहादचे आश्रयस्थान बनला आहे तर आपली सुरक्षा कोण करणार?
जिहादचा बंदोबस्त करण्याआधी या सेक्युरीलीझम च्या अंधश्रद्धेचा बंदोबस्त आपणाला करावा लागणार आहे.

आज २६ नोव्हेंबरच्या हुतात्म्यांना श्रद्धांजली अर्पण करताना आपण सेक्युरीलीझम या जिहादच्या आश्रयदात्याला लगाम वेसन घालण्याचा संकल्प करू.

जय हिंद
जय महाराष्ट्र
Reblog this post [with Zemanta]

१५ टिप्पण्या:

 1. विक्रमभाऊ,
  अगदी अभ्यासपुर्वक लिहिलय असं जाणवतंय. मनाचा आग-परखड अशीच तेवत राहु दे..! जय महाराष्ट्र!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. @sonal n Anonymous

  धन्यवाद
  असेच काहीतरी परखड देण्याचा नेहमी प्रयत्न करत राहीन

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. The word secular in our constitution is redundant. We should not put so many adjectives behind "India" before well understanding them. "Democratic Republic of India" is sufficient.
  At the time of partition, places where muslim league was in power was considered to be muslim majority which need not be true. There was no census at all. How can Sindh have 60-70% muslims and its neighbour Gujarat have 90% Hindus? In pre-partition elections, did people vote on religious lines? It was presumed so. Moreover, there were only two categories of voters - muslims and secular (hindus and muslims). How can that be? It should be hindus and muslims or hindus, muslims and secular. The country was divided on one basis and the constitution of one part (India) was framed on altogether different and ridiculous (secular) basis.
  But that was Ok in 1947 to some extent. First because hindus are inherently secular. The religion itself is secular. Secondly because the 99.99999% muslims that live in India have accepted peaceful co-existence with other religions.
  But in 2009, it is appearing that secularism is being redefined. Vikram is right in saying that terrorists intend to cause damange to Hindus and Jews. This is pure religious war. We should not blame ordinary peace loving muslims, but to say that the terrorists are not muslims is factually incorrect. The administration and the politicians dont have guts to call a spade a spade.
  The basic reason why the word secular should be removed from description of our state is that if we conduct a survey tommorrow and ask every citizen "secular first or muslim first?" or "secular first or hindu first?" , very few ,say 5% (Barakha Datt, Rajdeep Sardesai, Arundhati Roy and the ilk), seculars would be found in this country. People of this country are reasonably secular and secularism should not be forced on them constitutionally especially when it is not well-defined and well-understood, well-gone down and more importantly because it is used a political tool at the cost national integrity.Just pluck the word from there and don't preach it.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. अत्यंत उत्तम आणि मुद्देसुद लिखाण विक्रम असेच लिहित रहा आणि या देशातल्या सुस्त मंद पण अत्यंत स्वार्थी तथाकथित सेक्युलर लोकांना विचार करायला भाग पाडत रहा

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. सेक्युरीलीझमचा वापर भारतीय राजकारणात मुस्लीम व दलित समाजाला खेळवन्य साठी केला जातो. एका अर्थी सेक्युरीलीझम म्हणजे या लोकांना कॉंग्रेसने दाखवलेला गाजर आहे. स्वताला सेक्युर समजणारनि ८०चा दशकात डोळे बंद करून शिखांचा हत्या होऊ दिल्य. तेव्हा गांधीगीरी आठवली नाही...
  मित्रनो......... जगातला कोणताही देश स्वताचा सुरक्षेचा बाबतीत सेक्युरीलीझम सारखी गोष्ट बाजूला सरुन देशसुरक्षेचा पहिला विचार करतो . ( उदा. शीत युदाथ अमरीकन सरकारने K.G.B.(रूसी गुप्तः हेर संगठना) च जाळ तोडण्यसाठी C.I.A. (अमरीकन गुप्तः हेर संगठना) ला विशेष अधिकार देले.यात K.G.B चा सेल्स्ना मारूनटाकनायचे आदेश होते. ) आणि भारतात गुप्तः हेर संगठना आहे की नाही याची शंका येते . सेक्युरीलीझमचा नावा खाली कॉंग्रेस सरकार देशांचा सुरक्षेचा बाबतीत खेळत आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा