गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

वागळेचा पंचनामा

निखील वागळे हे पत्रकारीकेतील नाव तसं प्रसिद्ध म्हणा किंवा 'कृप्रसिध्द' झालेले दशक झाले.ते हि त्यांच्या शिवराळ शैलीमुळे आणि आता प्रकाशझोतात आले ते लोकमत वाहिनीवरील आणि त्यांच्यावरील शिवसेनेने केलेल्या हल्ल्यामुळे.नेहमीप्रमाणे वाद ओढवून घेतल्यावर निखील वागळे यांना दोन थपडा बसल्या.१०-१२ काचा,८-१० संगणक फुटले आणि 'इस्लाम खतरे में' या स्टाइलने वागळे यांनी 'अविष्कार स्वातंत्र्य खतरे में' असा फतवा काढला.ताबोडतोब 'स्टार माझा' पासून सकाळपर्यंत तमाम खुळे बुळे त्यांच्या भोवती जमा झाले.यात लोकभारतीचे कपिल पाटील आणि लोकमत समूहाचे मालक विजय दर्डा हि अग्रणी होते याचे जरा आश्चर्य वाटते त्याला कारणही तसेचआहे .
आता हेच पहा वागळे यांचे स्वताचे 'महानगर' हे वृतपत्र होते त्याला आता गाशा गुंडळावा लागला हे सोडून द्या परंतु त्यात २५ ऑक्टोंबर १९९६ च्या एका लेखात लोकमत समूह आणि दर्डा यांच्यासारख्या वृतपत्र मालक वा प्रसारमाध्यमांच्या मालकांविषयी मुक्ताफळे उधळली होती.ती वागळे यांच्या आजच्या चाकरीला शोभत नसली तरी दर्डा यांना अपमानास्पद नक्कीच होती.
त्यातील काही भाग असा कि 'उद्योगपती ,राजकारणी,व्यापारी,दारुवाले,पैसेवाले अशी माणसे वाममार्गाने मिळवलेल्या पैश्याने वृतपत्र चालवून प्रतिष्ठा आणि सत्ता मिळवण्याचा प्रयत्न करतात.वृत्तपत्राच्या जोरावर सरकारी अधिकार्यांना दाबण्याचे आणि आपले गैरव्यवहार झाकण्याचे काम करत आहेत.हजोरे रुपये पगाराच्या नोकर्या पत्रकारांना द्यायच्या.त्यांना गाड्या पुरवायच्या आणि छानछोकीच्या आयुष्याची सवय लावायची,असा प्रकार हि मंडळी करतात.पत्रकार अचानक मिळालेल्या अशा सुखाने खुश होतो आणि आपले लेखनस्वातंत्र्य गमावून बसतो.त्याचा राजकीय दलालीसाठी वापर होऊ लागते.आपण कोणासाठी काम करतो आपला कशासाठी वापर होत आहे हे पत्रकारांना भान राहत नाही.वृतपत्र सृष्टीत येणारा हा भ्रष्ट पैसा वेळीच रोखला नाही तर आपल्या सगळ्या स्वातंत्र्यावर बळी जाण्याची पाळी पत्रकारांवर येईल.याचा फटका छोट्या वृत्तपत्रांना बसून ती मोठ्या समूहाच्या पत्रकारांच्या हातात जातील.म्हणून वृतपत्र स्वछच पैशावर कशी उभी राहतील याचा विचार झाला पाहिजे.' हा त्यातील काही भाग आहे.तेरा वर्षापूर्वी लिहिलेले वागळे यांना आठवते कि नाही हे माहिती नाही कारण यातील अनेक दोष त्यांच्यात आलेले आहेत.आपले छोटे वृतपत्र मोठ्या व्याप्याराला विकून त्यांनी एका बड्या वृतपत्र समूहाची चाकरी आता पत्करली आहे.त्यांनी काही 'साधी राहणी उच्च विचारसरणी' त्यांनी स्वीकारली नाही.हजारो नाहीतर लाखो रुपये पगार घेऊन वागळे आता दर्डा समूहाच्या चाकरीत रुजू आहेत. तेरा वर्षापूर्वी ज्या लोकमत समूहासारख्या समूहावर शरसंधान करणारे वागळे त्याच समूहाच्या चाकरीत आहेत,पण त्याच्याकडे प्रामाणिकपणाचा लवलेशही नाही.मग ते व त्यांच्यासाठी हुतात्मा चौकात जमा झालेले कोण आहेत ? ते सर्व वाग्लेंच्या भाषेत 'अचानक धनप्राप्ती झालेले आणि आपले लेखन स्वातंत्र्य गमावून बसलेले' नाहीत का? ते 'कोणासाठी काम करतात,कशासाठी वापरले जातात' याचे भानही त्यांना नाही. मग अशा लेखन स्वातंत्र्य गमावून बसलेल्या लोकांनी आपल्या लेखन स्वातंत्र्यावर हल्ला झाल्याच्या ओरडा करणे ढोंग नाही का? स्वातंत्र्यावर हल्ला होण्यासाठी आधी त्यांना स्वातंत्र्य आहे का याचा विचार ह्वावा.ज्यांना स्वातंत्र्य नाही त्यांच्या स्वातंत्र्यावर कसला हो हल्ला? तेरा वर्षापूर्वीचा वागळे खरा कि आजचा गुलाम्गीरीताला वागळे खरा? आता कपिल पाटील हे वागळे यांचे जुने 'महानगर'मधील सहकारी पत्रकार आणि सध्याचे लोकभारतीचे आमदार नंतर त्यांनी महानगर सोडले किंवा वागळे यांनी काढले देव जाने.पण यांनी सुद्धा १३ वर्षापूर्वी त्याच वागळेची गौरवगाथा खालच्या स्तरावर जाऊन लिहिली होती.कपिल पाटील यांनी १९९६ साली 'आज दिनाक'या दैनिकात अबीर गुलाल या सदरात वागळे चा पंचनामा केला होता. निखील वागळे च्या 'तोंडाला तोंड लावणे म्हणजे स्वतःला एडस लावून घेणे. म्हणून वागळेच्या तोंडाला कोणी लागत नाही'अशी सुरवात त्यांनी केली होती.यांनी बाकी भागात वागळे च्या वागणुकीचा पंचनामा केला होता. मग १३ वर्षापूर्वी जे लिहिले ते खरे कि आज ज्याची पाठराखण ते करीत आहेत ते खरे?
आता वागळे यांना हि साथ देणारी मंडळी किती खरी ????
वागळेवर आता जो हल्ला झाला तो सचिन प्रकरणावरून, वागळे म्हणतात'सचिन तेंडूलकरवर लिहिले गेलेले आक्षेपार्ह्य होते.सचिन हा महान खेळाडू असून,त्याच्यावर टीका करणे म्हणजे साक्षात सूर्यावर थुंकणे आहे.' म्हणजे सूर्यावर थुंकण्याचा अधिकार सामना ला नाही असे त्यांचा अट्टाहास होता. मात्र सूर्य किंवा आणखी कुणावरही चुळा भरून थुंकण्याचा विशेषाधिकार त्यांना मिळाला आहे असा त्यांचा समज आहे.कारण आजवर पत्रकारिता करताना त्यांनी खूप लोकांवरथून्कीच काय चुळा भरल्या आहेत.केवळ बाळासाहेब नव्हेत तर पु.ल.देशपांडे,कुसुमाग्रज,विजय तेंडूलकर,वसंत बापट,गोविंदराव तळवलकर अशी लांबलचक यादी आहे. कुठल्या राज्यघटनेने त्यांना या थोर व्यक्तींवर थुंकण्याचा अधिकार दिला आहे?
आज किती लोकांना निखील वागळे यांना मारायला नको होते असे वाटते? किती जणांना याचे दुख झाले?
मनसे आमदारांनी आझमीला मारले त्याचा जेवढा आंनद लोकांना झाला तेवढाच आनंद वागळे ला मारल्यावर लोकांना झाला असे मला वाटते. ती सामान्य माणसांचीच भावना होती.
आपण म्हणजे सत्य,आपणच एकटे पवित्र्य,आपण एकटेच सुजाण पत्रकार अशा आविर्भावात वागळे फिरत असतात.
वागळे खरच 'पत्रकार' वाटतात का????
दोन दशकात एकट्या वागळे नामक पत्रकारावरच पुन्हा पुन्हा हल्ले का झाले याचा विचार ह्वावा.वागळे यांनी स्वतः भोवती एक हौतात्म्याचे व परखड पत्रकारितेचे थोतांड उभे केले आहे.त्याला मुठभर पत्रकार आणि प्रसिद्धीला हपापलेले पक्ष व नेते जरूर फसतील,पण सामान्य वाचक व जनता कधीच फसली नाही व फसणार नाही.
वाद ओढवून घेणे हि वागळे यांची जुनी सवय आहे.आपली व आपल्या वृत्तपत्राची प्रसिद्धी खप कमी झाला कि ते मुद्दाम वाद ओढवून घेतात.आताही त्यांची वृत्तवाहिनी तीन नंबर वर आहे ती त्यांना एक वर न्यायची आहे.
वृतपत्र किंवा प्रसार माध्यमाचा आडोसा घेऊन कुरापती काढायच्या,बदनामीच्या मोहिमा राबवायच्या आणि त्यात जखमी होणारा चिडून अंगावर आला कि मग 'पत्रकारितेवर हल्ला'अशी बोंब ठोकायची हि पांढरपेशी बदमाषी नाही का?
एक क्रिया घडल्याने त्याची प्रतिक्रिया उमटते.हल्ला करणारे प्रतिक्रिया देत असतात त्यावेळी त्याच्यापेक्षा जास्त जबाबदारी क्रिया करणार्यावर नाही का? कि हातात पत्रकारितेचे शस्त्र घेऊन कोणाचीही कशीही बदनामी करत सुटायचे?
अधिकाराबरोबर जबाबदारी हि येत असते.जबाबदारी विसरली कि मग अधिकाराचे पवित्र्य संपते.बिनबुडाच्या बदनामी करणाऱ्या बातम्या किंवा लेख,चर्चा अविष्कार स्वातंत्र्याला अप्रत्यक्षपणे संदर्भहीन करतात.तुमचे स्वातंत्र्य माझ्या नाकाच्या फुटभर अलीकडे संपते,असे दुसर्याला वाटत असते.जेंव्हा तुमच्या स्वातंत्र्याचा धक्का माझ्या नाकाला लागतो तेंव्हा माझे प्रतिकाराचे स्वातंत्र्य आपोआपच कार्यरत होत असते.यासंबंधातले व अस्तव वेळीच ओळखले नाही,तर वागळे सारख्या पत्रकारांना रस्त्यावर फिरणे अशक्य होईल.
वागळे जसे 'वागले' तसे मिळाले.
जय हिंद
जय महाराष्ट्र
(वरील लेखातील काही मुद्दे तोरसेकारांच्या लेखातील आहेत.)

५ टिप्पण्या:

 1. पत्रकारीतेतल माझ सा. ज्ञान जरा कमी आहे, मात्र मस्त पोस्ट आहे. अगदी परखड लिहिलय!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. साधारण वागळे यांची वागणूक पाहिली तरी त्यांचा अंदाज येतो असो
  धन्यवाद

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. आयला त्या वागळेला बघितलं की थोबाडित मारायची इच्छा होते माझी.. का ते माहिती नाही. बहुतेक त्याचा चेहेराच तसा आहे.. पंचिंग बॅग सारखा.. म्हणुन असेल..
  पण लेख मस्त झालाय. आता त्याने जर दर्डाची चड्डी उतरवली, तर ठिक आहे नं... काय फरक पडतो? नंगेसे खुदा भी डरे. म्हणतात..!

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. nikhil vagle patrakar kami ani rajkarni jast vatat shivsenevar tyncha kay rag te kalat nahi akrmk shivsena jalhi tar mhnych akrman kel chutharych an smjdarpana dhkvla ki mhnych hasu jal. baki tumcha lekh spasht vatla

  प्रत्युत्तर द्याहटवा