मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०१०

Marathi History: दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते

Marathi History: दादाजी कोंडदेव हे सामान्य चाकर नव्हते: "daसंशोधन आणि अभ्यासशुन्य असलेल्या संभाजी ब्रिगेडने सभ्यतेचा निच्चांक गाठत छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुरुवातीच्या जीवनात एक अत्यंत महत्त्वाची असामी असणार्‍या दादाजी कोंडदेवांना एक सामान्य चाकर म्हणुन संबोधले आणि त्यांना दादोजी म्हणण्याऐवजी दादु असे निर्लज्जपणे म्हणतात. शिवाजी महाराजही त्यांना दादाजी म्हणत. पण संभाजी ब्रिगेड मजाल पहा ! यातून संभाजी ब्रिगेडच्या व्यक्तीमत्वाच्या निच्चांकाची स्पष्टोक्ती होते.
खाली अस्सल पत्रांचे ४ नमूने दिले आहेत. या पत्रांच्या मूळ प्रती भारत इतिहास संशोधक मंडळ, १३२१ सदाशिवपेठ, भरतनाटयमंदीरा शेजारी, पुणे – ४११०३०. दुरध्वनी – (०२०) २४४७२५८१ येथे जतन करून ठेवल्या आहेत. बोरी केंद्रामधील शिवाजी महाराजांच्या पत्राच्या अस्सल प्रती संभाजी ब्रिगेडच्या गुंडांनी जशा जाळून टाकल्या होत्या तसे पुन्हा होऊ नये म्हणुन या पत्रांची मायक्रोफिल्मींग करून ठेवण्यात आली आहे.
अ] (खालील पत्रात दादाजी कोंडदेव हे कोंढाण्याचे सुभेदार होते हे अगदी स्पष्ट होते. त्याच बरोबर एखद्याचे इनाम सरदेशमुखीस दिले आणि पर्यायी त्यास अन्यत्र इनाम देण्याबद्दल उल्लेख आहे. असा इनाम देण्याचा अधिकार तर सरसेनापतीलासुद्धा नव्हता. मग या अधिकारावरून आणि निर्णयावरून दादाजी कोंडदेवांचे स्थान किती मोठे होते हे निर्विवाद स्पष्ट होते. अर्थात, ईर्षाळू संभाजी ब्रिगेडच्या खोटया व बिनबूडाच्या आरोपाप्रमाणे ते सामान्य चाकर नव्हते).

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.१०९, पत्र क्र. ५०७
इ.स.१६४५ डिसें.११
शके १५६७ पौष शु.२
सुहूर १०४६ जिल्काद २
खं.१६ ले.२०

अज दि. दादाजी कोंडदेऊ सुभेदार कोंडाणा
बाबाजी जुंझारराऊ देशमुख तर्फ कानदखोरे
तुझे अंतुरली येथील इनाम सरदेशमुखीस दिल्हे. त्याबद्दल तुला दापोडा येथे इनाम देण्याविषयी लिहीलें आहे.


ब] (खालील पत्रात सुभेदार या उल्लेखासोबत त्यांचा प्रशासकीय निर्णय घेण्याचा अधिकार स्पष्ट होतो).

शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.१११, पत्र क्र. ५१३
इ.स.१६४६ एप्रिल.२
शके १५६८ चैत्र व.१२
सुहूर १०४६ सफर २५
सा.ले.८२
वाटपत्र
दादाजी कोंडदेव _________________ महादाजी गोसावी
आपले भांबोरे वगैरे ७ गाव (कुळकर्ण व ज्योतिष) तुम्हास दिधले.

क] (हे खुर्दखत तर स्वयं छत्रपती शिवाजी महराजांनी पाठवले आहे. दादाजींचा उल्लेख स्वत: शिवाजी महाराज सुभेदार दादाजी असा करतात. त्याच सुभेदारांना संभाजी ब्रिगेडच्या म्होरक्यांकडून दिशाभूल केले गेलेली निर्बुद्ध दादू असा उल्लेख करतात. हा तर थेट महाराजांचाच अपमान आहे. त्याच बरोबर दादाजी हे काही सामान्य चाकर नव्हते हे ही या पत्रातून सिद्ध होते. हे अस्सल शिवाजी महाराजांच पत्र असल्याने यालाही खोटे कसे म्हणाचे या करीता ब्रिगेडी डोक्यांची घालमेल उडणार आहे).


शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.१.
पान.११६, पत्र क्र. ५३४
इ.स.१६४७ आक्टो.१५
शके १५६९ आश्विन व.१२
सुहूर १०४८ रम २६
खं.२० ले.२३७

खुर्दखत
मुद्रा व सिक्का ‘प्रतिपच्चंद्र’
अजर.रा. सिवाजी राजे ------ कार. त॥ कडेपठार प॥ पुणे.........
दरीविले गणेशभट बिन मल्लारीभट भगत मोरया हुजूर ...... ....... जे आपणास इनाम जमीन चावर निमे ú॥ú दरसवाद मौजे मोरगौ त॥ म॥ देखील नख्तयाती व महसूल ब॥ फर्मान हुमायूनु व खुर्दखत वजीरानि कारकिर्दी दर कारकिर्दी व ब॥ खुर्दखत माहाराज साहेबु व सनद सुभा त॥ सालगुदस्ता सन सबा चालिले आहे. साल म॥ कारणे दादाजी कोंडदेऊ सुभेदार यासी देवाज्ञा जाली. म्हणउनु माहाली कारकूनु ताज्या खुर्दखताचा उजूर करिताति. दरींबाब सरंजाम होए मालूम जाले. गणेशभट बिन मलारीभट भगवत मोरया यासि इनाम जमीन ...... कारकिर्दी दरकारकिर्दी चालिले असेल तेणेप्रमणे मनासि आणउनु दुमाले करणे. दरहरसाल............ तालीक............. मोर्तब सुदु.


ड]
शिवकालीन पत्रसार संग्रह खंड.२.
पान.३९४, पत्र क्र. १४००
इ.स.१६७१ जून.२६
शके १५९३ ज्येष्ठ व.३०
सुहूर १०७२ सफर २८
त्रै.व.७ पृ.४६

तान्हाजी जनार्दन हवालदार व कारकून त॥ निरथडी प॥ पुणें प्रति राजश्री शिवाजी राजे..... परिंचाचे पाटीलकीसी कान्होजी खराडे नसता कथला करून घर तेथे बांधतात. तरी कथला करू न देणे. वैकुंठवासी साहेबाचे (शहाजीराजे) व दादाजीपंताचे कारकिर्दीस चालिले आहे ते करार आहे. तेणेप्रमाणे चालवणे. नवा कथला करूं न देणे.व परिंच्या कान्होजी खराडे यास घर बाधो न देणे. मोर्तब सुद.
(मर्यादेयं विराजते)

शिवचरित्रसाहित्य – यात असलेले काही संदर्भ.
* ७ ऑक्टोबर १६७५ - मावळचा सुभेदार महादाजी सामराजयाने कर्यात तरफेचा हवालदार महादाजी नरसप्रभू यांना पाठविलेले एक पत्र. यात शिवाजी महाराजांनी महादाजी सामराजांस पाठविलेल्या एक पत्राचा सार आहे..." साहेब (शिवाजी महाराज)कोणाला नवे करु देत नाही, दादोजी
कोंडदेवाच्या कारकीर्दीत चालत आले असेल ते खरे !" असे शिवाजी महाराजांच्या त्या पत्रात म्हटले आहे.

* २३ जुलै १६७१ - पुणे परगण्याच्या कर्‍हेपठार तर्फे वणपुरी. - "मागे दादोजी कोंडदेवे यांचे कारकीर्दीस ऐसे चालिले असेली,राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालेले असेली तेणेप्रमाणे
हाली वर्तवणे, जो न वर्ते त्यास ताकीत करणे"

* १ नोव्हेंबर १६७८ - कान्होरे रुद्र यांस - "मागे दादोजी कोंडदेवे यांचे कारकीर्दीस ऐसे चालिले असेली,राजेश्री साहेबांचे कारकीर्दीस चालेले असेली तेणेप्रमाणे
हाली वर्तवणे, जो न वर्ते त्यास ताकीत करणे"


* दादोजी कोंडदेवांनी बाळ शिवबाचे पहिले लग्न १६-५-१६४० मध्ये लावले असा उल्लेख शिवदिग्विजकार बखरीत येतो.

१० टिप्पण्या:

 1. इतक्या वर्षा नंतर पण आपल्याला ह्याचा पुरावा द्यावा लागतो या सारखी दुर्दैवाची गोष्ट नाही. अजूनही बाजी प्रभू आठवत नाहीत, तर त्यांची जात आठवते. मग त्यांचं स्मारक होऊ नये म्हणून त्यांच्या गावातली सगळी जमीन विकत घेऊन टाकायची, आणि मग आता ही जमीन आमची, इथे स्मारक होऊ देणार नाही असं म्हणायचं..
  उत्तम पोस्ट.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 2. दादोजींची जात दुसरी कुठलीही असती, तरीही हा प्रश्न उद्भवलाच नसता.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 3. as usual nice article vikram bhau....hate brigade
  Regards Jayesh Minde

  प्रत्युत्तर द्याहटवा
 4. छान संकलन ...तुमच्या कार्याला शुभेच्छा

  प्रत्युत्तर द्याहटवा
 5. अप्रतिम... ह्या संभाजी ब्रिगेडच्या विद्रोही हरकतींवर कोणती कारवाई झाली नाही का???

  प्रत्युत्तर द्याहटवा
 6. मला वाटतं संभाजी ब्रिगेड हे सगळ कृत्य परकीय आर्थिक पाठबळ वापरून करत आहे ज्यांना ह्या देशातील श्रद्धा स्थानांना कलंकित करून इथे अस्थिरता निर्माण करायची आहे.

  प्रत्युत्तर द्याहटवा
 7. छान मुद्देसुद लिखान आहे. आनखी ऐतिहसिक दस्तऐवज आसेल तर कृपया पोस्ट करा..

  प्रत्युत्तर द्याहटवा
 8. सुंदर पोस्ट आहे....

  बाकि महेंद्रजींना पुर्ण अनुमोदन....

  >>>>आणखी ऐतिहसिक दस्तऐवज आसेल तर कृपया पोस्ट करा..


  खरचं असली काही माहिती अजून तर नक्की टाक!!

  प्रत्युत्तर द्याहटवा