शुक्रवार, १६ ऑक्टोबर, २००९

दिपावली

वसुबारस (आश्विन वद्य द्वादशी / गोवत्सद्वादशी)
वसुबारस ह्याचा अर्थ-वसु म्हणजे द्रव्य (धन) त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी. या दिवसाला गोवत्स द्वादशी असेही म्हणतात.या दिवशी गाईची पाडसासह संध्याकाळी पूजा करतात. घरांत लक्ष्मीचे आगमन व्हावे या हेतूनेही या दिवशी सवत्स धेनूची पूजा करण्याची पद्धत आहे.ज्यांच्याकडे घरी गुरे, वासरे आहेत त्यांच्याकडे ह्यादिवशी पुरणावरणाचा स्वयंपाक करतात. घरातील सवाष्ण बायका गाईच्या पायावर पाणी घालतात.नंतर हळद-कुंकू, फुले, अक्षता वाहून र्चांयाच्या फुलांची माळ त्यांच्या गळ्यात घालतात.निरांजनाने ऒवाळून केळीच्या पानावर पुरणपोळी वगैरे पदार्थ वाढून गाईला खाऊ घालतात. ह्या दिवसापासून अंगणात रांगोळी काढण्यास सुरूवात करतात. पुष्कळ स्त्रियांचा ह्या दिवशी उपवास असतो. ह्या दिवशी गहू, मूग खात नाहीत.स्त्रिया बाजरीची भाकरी गवारीच्या शगाची भाजी खाऊन उपवास सोडतात. आपल्या मुला-बाळांना चांगले आरोग्य मिळावे सुख लाभावे म्हणून ही पूजा करतात.

wishing you all a happy & prosperous diwali...Image by ayashok photography via Flickr

धनत्रयोदशी (आश्विन वद्य त्रयोदशी)
धनाची पूजा करणे हा या सणामागील हेतू आहे. व्यापारी, दुकानदार लोक ह्या दिवशी या दिवशी पाटावर लक्ष्मीची मूर्ती, वह्या, धंद्याची हत्यारे, सोने, नाणे ह्यांची पूजा करतात. शेतकयांच्या दृष्टीने नवीन आलेले धान्य हेच त्यांचे धन असते. त्यामुळे ते नवीन धान्याची पूजा करतात. त्यावेळी धने गूळ ह्यांचा नैवेद्य दाखवतात.ह्या सुमारास झेंडू शेवंतीची फुले मुबलकप्रमाणावर उपलब्ध असल्यामुळे पूजेला झेंडू शेवंतीची फुले वापरतात. या दिवसापासून दारांत आकाशकंदील पणत्या लावण्यास सुरूवात करतात. व्यापारी वर्गात हा दिवस फार मोठा उत्साहाने साजरा करतात. वैद्य लोक ह्या दिवशी धन्वंतरीची पूजा करतात.नरक चतुर्दशी (आश्विन वद्य चतुर्दशी)
आश्विन वद्य चतुर्दशी या दिवशी नरकासूर नावाच्या राक्षसाचा श्रीकृष्णाने संहार केला म्हणून या दिवसाला नरक चतुर्दशी असे नाव पडले. ह्या दिवशी सूर्योदयापूर्वी सर्वजण स्नान करतात.स्नानाच्या वेळी उटणे, सुवासिक तेल, सुगंधी साबण वापरतात. सूर्योदयापूर्वीच्या ह्या स्नानाला अभ्यंगस्नान असे म्हणतात. ह्या दिवशी जो कोणी अभ्यंगस्नान करणार नाही तो नरकात जातो अशी समजूत आहे. स्नानानंतर मुले फटाके उडवतात. या दिवशी पहाटेच पणत्या लावतात. सर्वत्र समृद्धी व्हावी याकरितां अशा पणत्या लावण्याची प्रथा आहे. या दिवशी सणाच्या दिवशी करतात तसा स्वयंपाक करून देवाला नैवेद्य दाखवतात.लक्ष्मीपूजन (आश्विन वद्य अमावास्या)
या दिवशी बळी पाताळात गाडला गेला, सर्व देवतांची सुटका झाली लक्ष्मीचे वर्चस्व अबाधित झाले याची आठवण म्हणून यादिवशी लक्ष्मीपूजन करतात. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रूपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. हा दिवस व्यापारी लोक फार उत्साहात साजरा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरूवात करतात.पाडवा (कार्तिक शुद्ध प्रतिपदा / बलिप्रतिपदा)
बळीराजाची दानशूरता पाहून वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते. पाडवा हा साडेतीन मुहूर्तांपैकी हा एक मुहूर्त आहे. आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने व्यापारी लोक दिवाळीतील पाडवा ही नववर्षाची सुरुवात मानतात. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाचा प्रारंभ करतात.व्यापारी लोकांच्या जमा-खर्चाच्या कीर्द खतावणीच्या नवीन वह्या ह्या दिवशी सुरू होतोत. कीर्द खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. घरोघरी सायंकाळी पाटाभोवती रांगोळी काढून पत्नी पतीला औक्षण करते पती पत्नीला ऒवाळणी घालतो. नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. ह्यालाच दिवाळसण म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर करतात.


भाऊबीज (कार्तिक शुद्ध द्वितीया / यमद्वितीया)
या दिवशी यमराजाची बहीण यमुना हिने आपल्या भावाला म्हणजेच यमराजाला अगत्यपूर्वक जेवायला बोलावले होते अशी पौराणिक कथा आहे. म्हणून भाऊबीज हा सण साजरा केला जातो. भाऊ बहिणीकडून ऒवाळून घेतो. भाऊ तिला प्रेमाचे प्रतिक म्हणून काहीतरी भेटवस्तू किंवा पैसे देतो. जर काही कारणाने बहिणीला कोणी भाऊ भेटलाच नाही तर ती चंद्राला भाऊ समजून ऒवाळते. भावा-बहिणीने एकमेकांची आठवण ठेवावी, विचारपूस करावी, एकमेकांवर प्रेम करावे यासाठी हा सण साजरा करतात.

Diwali Deep.Image via Wikipedia


हि दिपावली
घेवुन येवो तुमच्यासाठी,

सुख शांति, समृध्दीची,
लक्ष उधळण दिव्यांची!!

Reblog this post [with Zemanta]

गुरुवार, ८ ऑक्टोबर, २००९

मत कोणाला आणि कशासाठी ?

मतदान करण्यापूर्वी नक्की वाचाच
तुम्ही एखाद्या पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले तर तो खरच तुमचे प्रतिनिधित्व करतो का ?
तुमचे जे मत आहे ते त्याने वेळोवेळी विधानसभेत मांडले तर त्याला लोकशाही म्हणता येईल परंतु तसे घडत नाही कारण
तो निवडून येईपर्यंत उमेदवार असतो निवडून आल्यानंतर तो पक्षाचा असतो किंवा त्याच्यावर पक्षाची हुकुमत चालते.
पक्षाची जी भूमिका वा ध्येयधोरणे आहेत ती त्याला राबवावी लागतात नाहीतर त्याच्यावर पक्षशिस्तीचा बडगा उगारला जातो.
समजा त्याला असे वाटले कि पक्षाची भूमिका निवडून दिलेल्या जनतेच्या भूमिकेच्या विसंगत आहे तरी तो विधानसभेत त्याविरुद्ध बोलू शकत नाही किंवा मतदान करू शकत नाही कारण असे केल्याने त्याच्यावर पक्षांतर कायद्याखाली कारवाई होऊ शकते आणि

I Voted Today!Image by Enrico Fuente via Flickr

त्याची निवड रद्द होऊ शकते.कारण तुम्ही ज्याला निवडून देता त्याच्यावर आता पक्षाचा हक्क असतो त्यामुळे अशाप्रकारे लोकप्रतिनिधी निवडून दिलेल्या जनतेच्या विरुद्ध भरपूरवेळा भूमिका घेतात.
निवडणूक आली कि आपण मतदानाचे कर्तव्य निभावतो आणि ५ वर्षासाठी आपल्यावर कोणी व कसे राज्य करायचे हे ठरवतो.
आता राज्यात विधानसभेची निवडणूक येत आहे आणि आपण मतदानाला सामोरे जाणार आहोत.
त्यावेळी आपण २ कामे करत असतो एक आपला प्रतिनिधी आपण विधानसभेत पाठवत असतो.तसेच एका पक्षाला वा ठराविक राजकीय धोरणांना पाठींबा देत असतो.

मग अशावेळी आपले लोकशाहीतले नक्की स्थान काय ?
आपण मतदान करतो ते कोणाला आणि कशासाठी ?
यासाठी अशावेळी आपण स्वताचे मत काय आहे याचा विचार केला पाहिजे .
आपण मतदान कशाच्या आधारावर करतो हे महत्वाचे आहे जसे
१]राज्याच्या कारभाराचे मूल्यमापन करून पक्षाला
२]विभागाला उपयोगी ठरेल अशा उमेदवाराला
३]धर्म वा जातीच्या आधारावर
४]कि एखाद्या भावनिक मुद्द्याच्या आधारावर
जर डोळसपणे मतदान केले तर आपले हितसंबंध आणि भावना जपणारे लोकप्रतिनिधी निवडून देता येऊ शकतात कारण मिरजे मध्ये जो प्रकार झाला त्यावेळी तेथील जनतेच्या भावना वेगळ्या होत्या आणि अशावेळी त्या परिसरातले मंत्री आपल्या पक्षाला जास्त जागा मिळाव्यात म्हणून मुंबई दिल्लीत काथ्याकुट करत बसले होते जनतेच्या भावना तेथील एकाही लोकप्रतिनिधीला समजल्या नाहीत.

आजकाल प्रत्येक पक्षावर मताचे राजकारण केल्याचे आरोप होत असतात.
अल्पसंख्याकांचे लांगुनचालन केले जाते असाही आरोप होत असतो परंतु आसे का घडते ?

मुस्लीम मत कमी प्रमाणात असताना हि त्यांचेच लाड का केले जातात आणि हिंदू बहुसंख्य असतानाही त्यांच्या भावनांना केराची टोपली का दाखवली जाते याचा विचार केला पाहिजे.
मतदान करण्यापूर्वी आपले मत बनवायला हवे कुठल्या निकषावर वा मुद्द्यावर आपण मत देणार आहोत हे ठरायला हवे.
हिंदुत्ववादी शिक्का असल्याने युतीला मुस्लीम मते कधीच मिळत नाहीत त्यामुळे ती 'एकगठ्ठा' मते झाली आहेत आणि त्यासाठीच सर्व धर्मनिरपेक्ष पक्ष हिंदुत्वावर बोलून मुस्लिमांना चुचकारत असतात.
मुस्लीम समाज हि हिंदुत्व विरोधाला प्राधान्य देऊनच एकगठ्ठा मतदान करत असतो.म्हणजे
आधी मुस्लिमांचे मत तयार असते आणि नंतरच त्यांचे मतदान होते.
त्यामुळेच मुस्लीम बहुल भागात प्रत्येक पक्षाचा उमेदवार हा मुस्लिमच असतो.
मत हे असे प्राधाण्यातून येत असते.

विकासाची योजना,रस्ते,दवाखाना,पाणी,वीज,जीवनावश्यक गोष्टी इत्यादी मुद्दे प्रत्येक पक्षाच्या कार्यक्रमात असतातच कि परंतु कठीण प्रसंगी राजकारणी कोणाला झुकते माप देतात यावर मुस्लीम मते बनवली जातात.
त्याचा प्रभाव मिरज- मालेगाव भागात दिसून येतो.
त्यामुळे मतदान करण्यापूर्वी मतदाराने आपले मत बनवले पाहिजे आपण आपल्या जातीला,धर्माला,ओळखीला,विकासाला,हितसंबंधाला कशाला प्राधान्य देणार हे ठरवले पाहिजे मगच आपले मत तयार होत असते.
कोणत्याही मतदार 'समूहाचा' पक्षाच्या धोरणावर आणि उमेदवार ठरवण्यावर परिणाम होत असतो आपण तसे मत बनवतो का ?
याचा विचार प्रत्येकाने करावा.
आपण एकगठ्ठा मतदानाचा विचार करत नाही तिथेच आपल्या मतच पराभव झालेला असतो भले आपण मत दिलेला उमेदवार निवडून येईल परंतु कठीण प्रसंगात मिराजेसारख्या घटनेवेळी आपला लोकप्रतिनिधी आपल्या रक्षणासाठी उभा राहील याची खात्री देता येणार नाही.

त्यामुळे आता मतदाराने मतदान करण्यापूर्वी आपले मत कोणाला वा कशासाठी याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे म्हणजेच लोकशाही यशस्वी होईल.
नाहीतर अल्पमत हे बहुमतावर आणि अल्पसंख्यांक बहुसंख्याकांवर हवी होत राहील वा कुरघोडी करत राहील आणि मग ती लोकशाही नसेल.

जय हिंद
जय महाराष्ट्र
Reblog this post [with Zemanta]

सोमवार, ५ ऑक्टोबर, २००९

जीना हे लोकशाही सरकारचे मारेकरी !

पाकिस्तानमध्ये लोकशाही का टिकत नाही ? तेथे थोड्या थोड्या कालावधीने लष्करी हुकुमशहा का येतात ?
या सर्व बाबींची पडताळणी करण्यासाठी आपण जेंव्हा जीनांच्या कारवायांवर दृष्टीक्षेप टाकतो तेंव्हा जाणवते कि दोष पाकिस्तानच्या संस्थापकामधेच आहे.
आज ज्या पाकिस्तानला आपण पाहत आहोत तो फक्त हिंदुस्तानला तोडूनच बनवलेला नसून खुद्द पाकिस्तानच्या ज्या भागात निवडून आलेली सरकारे होती त्यानाही जीनांनी बरखास्त केले होते.
कैबिनेट मिशन ज्यावेळी हिंदुस्तानमध्ये येणार होते त्यावेळी ज्या प्रदेशात ज्या पक्षाची सत्ता असेल स्वातंत्र्यानंतर त्याच पक्षाकडे ते सत्ता देणार होते.
जीना फक्त मुस्लीम लीगची सत्ता आणू इच्छित होते त्यामुळे त्यांनी एक एक करून आपल्या मिळणाऱ्या भागातील ज्या पक्षाची सत्ता आहे ती एका झटक्यात समाप्त केली होती.
स्वतंत्र होण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये केवळ सिंध आणि बंगाल प्रांतात लीगची सत्ता होती.
Reply to the Welcome addressImage via Wikipedia
पंजाबमध्ये युनीयनिस्ट पार्टीचे आणि फ्रांटियरमध्ये कॉंग्रेस सरकार होते.बलुचिस्थानमध्ये २७ मार्च १९४७ रोजी जीनांनी भूदल आणि वायुदल पाठवून क्वेटावर ताबा मिळवला होता.बलुचींचे बंड पाक सैन्यांनी मोडून काढले होते.
पंजाबमध्ये हि मुस्लीम लीगचे सरकार यावे यासाठी आणि पंजाबचे तत्कालीन पंतप्रधान खिजर हयात खान हटवण्यासाठी जीना आणि त्यांच्या समर्थकांनी हयात खान यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले होते.
शेवटी खान यांनी राजीनामा दिला होता.
यावरून जीना यांनी जनतेने निवडून दिलेली सरकारे कशी बरखास्त करून लावली दिसून येते.
सीमावर्ती भागात हि अशाचप्रकारे सरकारे उलथून लावण्यात आली होती.त्यावेळी तेथे कॉंग्रेसचे सरकार होते.
खान अब्दुल गफार खान (गांधींचे कट्टर अनुयायी ) यांचे बंधू फ्रांटियरचे पंतप्रधान होते आणि आपले विलीनीकरण लीगमध्ये ह्वावे असे त्यांना वाटत नव्हते.
त्यावेळी सरहद्द गांधी (खान अब्दुल गफार खान) गांधीना म्हणाले होते ' महात्माजी,आम्ही जन्मभर आपल्यासोबत राहिलो आता का आम्हाला लांडग्या समोर टाकत आहात ? हिंदुस्तांमध्ये फ्रांटियरचे विलीनीकरण होत नसेल तर आम्ही आझाद पख्तुनिस्तान करू पण जीना बरोबर जाणार नाही' परंतु गांधीजीनी काही सहकार्य केले नाही.शेवटी फ्रांटियरवर लीगने घाला घातला.
त्यावेळी कॉंग्रेसचे अस मत होते कि हजारो मैल दूर असलेला एखादा भाग हिंदुस्तानचा भाग कसा होऊ शकतो.
सिंध मधेही अशीच परिस्थिती होती तेथील पंतप्रधान अल्लाबक्ष पाक मध्ये जाण्यास तयार नव्हते त्यांना वेगळा सिंधू देश हवा होता.परंतु नेहरू यांनी आझाद यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली. आणि त्यांनी नेहृच्या इशाऱ्यावर केवळ एका पानाचा अहवाल सदर केला.'सिंध जनता सिंधू देश बनवू इच्छित नाही.' नंतर जीनांनी अल्लाबक्ष यांची हत्त्या करवली.
या घटनांवरून असे दिसून येते कि जीना किती हुकुमशहा होते आणि लोकशाहीचे मारेकरी होते.हे त्यांना लोकशाहिवादी म्हणवणाऱ्या नेत्यांनी लक्षात घ्यावे.
आजची पाकिस्तानची परिस्थिती जरी पाहिली तरी असे दिसून येते कि तेथे लोकशाही अशी रुजलीच नाही.
थोड्याफार फरकाने तेथे लष्करशाही येत गेली आहे.
तालिबानी संकट त्यांच्या डोक्यावर सारखे गोंगावत आहे जे त्यांनीच तयार केले आहे
अल् कायदा,लष्कर-ए-तोयबा,जैश-ए-मोहंमद आदी अतिरेकी संघटनांच्या कारवाया अधिकाधिक धाडसी होऊ लागल्या आहेत.
तालिबान्यांचे युद्ध आणि पाकिस्तानात उद्भवलेली राजकीय आणीबाणी यामुळे पाकिस्तानची स्थिती आज खूप दयनीय झाली आहे.
पण दोष पाकिस्तानच्या संस्थापकामधेच आहे त्याला कोण काय करणार.
(वरील लेखातील काही मुद्दे मुज्जफ़र हुसेन यांच्या लेखातील आहेत )
जय हिंद
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta

गुरुवार, १ ऑक्टोबर, २००९

जिना - फाळणीचे प्यादे आणि वजीरही

हिंदू - मुस्लीम दोन धार्मिक समूह नसून ती वेगवेगळी सांस्कृतिक राष्ट्रे आहेत आणि ती नाईलाजाने एकत्र राहत आहे हे ब्रिटीशांनी जाणले होते आणि या दोघांचे एकत्रीकरण त्यांच्या सत्तेला धोकादायक ठरू शकते म्हणून त्यांनी धर्माच्या आधारावर द्विराष्ट्र सिद्धांत मांडण्यास सुरवात केली होती.
१९०५ चा बंगाल फाळणीचा प्रयोग हा त्याचाच भाग होता आणि पाकिस्तान निर्मितीची बीजे त्यावेळीच पेरली गेली होती आणि त्यानंतर १९०६ साली 'मुस्लीम लीग' ची स्थापना होऊन त्याचा पाया रचला गेला होता.
देशाच्या फाळणीला फक्त ब्रिटीश जबाबदार नसून त्याकाळच्या राजकीय नेत्यांची सत्तेची महत्वकांक्षा हि जबाबदार होत्या.
हिंदुस्तानला तोडणारे जरी ब्रिटीश असले तरी त्या प्रक्रियेचे दलाल केवळ आणि केवळ लीगी मुस्लीम आणि त्यांचे नेते जीना होते.
खिलाफत चळवळीनंतर ज्या घटना घडल्या आणि १९३४ साली लंडनच्या रिट्झ हॉटेलमध्ये मुस्लीम नबाब आणि सामंतांची जी बैठक झाली त्यात पाकिस्तानचे नाव समोर आले.तेथे जीना हि उपस्थित होते.त्या
Quaid-e-Azam Muhammad Ali JinnahImage by Asif . Ali via Flickr
नंतरच्या परिस्थितीला कोण जबाबदार होते ?
याचा जर कोणी प्रामाणिक विचार केला तर ते जीना यांनाच दोषी मानतील.
१९३५ पर्यंत जीना स्वताच धार्मिक तत्वावर द्विराष्ट्र संकल्पनेची थट्टा करत होते.जीना कधीही इस्लामप्रेमी आध्यात्मिक मुसलमान नव्हते त्यांच्यावर पाश्चिमात्य संस्कृतीचा पगडा जास्त होता त्यांनी धार्मिक शिक्षण घेतले नाही धार्मिक रीतीरिवाज पाळले नाहीत.ते दारू पीत डुकराचे मांस हि खात असत.धर्माला राजकारणापासून वेगळे ठेवले पाहिजे असे त्यांचे विचार होते.
१९३५ पर्यंत जीना स्वताला प्रथम देशाचे नागरिक आणि नंतर मुस्लीम समजत होते.मग त्यांच्यात अचानक असा बदल का झाला कि त्यांनी मुस्लीम लीगचे नेतृत्व स्वीकारून द्विराष्ट्र सिद्धांताचा घोष लावला.आणि 'पाकिस्तान' चे निर्माते झाले.
अहमपणा हा जीनाचा मूळ स्वभाव होता आणि ते १९३६ पासून कट्टर मुस्लिमांचे नेतृत्व स्वीकारून जोरात फाळणीच्या कामाला लागले.
१९४० साली त्यांनी पाकिस्तान निर्मितीसाठी हिंसक पाऊले उचलली.१९३६ ते १९४७ या काळात जीना हेच मुस्लीम लीगच्या केंद्रस्थानी होते आणि तेच पाकिस्तानचे जनक होते.
ब्रिटीश सरकारने जिनांना हिंदुस्तान फाळणीची 'सुपारी' दिली असे म्हंटले तरी चालेल.जीनांनी तत्कालीन ब्रिटीश सत्ताधार्यांची इच्छा पुरी केली होती.
सुपारी घेऊनच जीनांनी फाळणी केली असे म्हणायचे कारण कि तसे दस्ताऐवज ब्रिटीश लायब्ररीत आजही पाहण्यास मिळतात.
एखाद्या देशाला स्वतंत्र करायचे असेल तर जाता जाता त्याचे विभाजन करायचे हि ब्रिटीशांची जुनी पद्धत होती.
अमेरिकेला स्वातंत्र्य देताना केंनेडाची निर्मिती त्यांना लाभदायक ठरली यानंतर ज्या ज्या ठिकाणी ते गेले तेथे त्यांनी विभाजनाचा फोरमुला वापरला.
अरब प्राय्द्विपाचे अनेक तुकडे केले हिंदुस्तानचे विभाजन करणे त्यांच्यासाठी सोपेच होते.
हिंदुस्तान विभाजनाचे काम एक उच्चशिक्षित,इंग्रजी भाषेचा जाणकार आणि आधुनिक विचारसरणीचा हा माणूस( जीना ) करू शकतो हे ब्रिटीशानी हेरले होते.त्यासाठी त्यांना भरपूर आर्थिक पाठबळ हि दिले होते.
ब्रिटीश लायब्ररीतील हे दस्तऐवज ६० वर्षानंतर जनतेसाठी खुले करण्यात आले आहेत.त्यात हि धक्कादायक माहिती समोर आली आहे.
हिंदुस्तानच्या फाळणीसाठी जीना यांना १९३५ पासून दरवर्षी ३० लाख रुपये गुप्तपणे देत होते!
या रकमेचे मूल्यमापन आजच्या पैस्यात केले तर ती रक्कम ९० कोटी रुपये होते!
१२ वर्षात जीनांनी ब्रिटीशांकडून किती रुपये उखाळले असतील याचा हिशोब न केलेलाच बरा.
यामुळेच १९३५ नंतर जीना यांचा गांधी आणि ब्रिटीश यांच्याकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला गेला असावा.
काही लोक जिनांना पंतप्रधान पदात रस नव्हता असे सांगण्याचा पर्यंत करतात असे होते तर जिनांना पदाची लालसा नव्हती तर पाकिस्तान निर्मिती नंतर स्वताच गव्हर्नर जनरल का बनले ?
कि पाकिस्तान मध्ये त्यासाठी कोणीही लायक नाही असे जीना समजत होते ?
पाकिस्तानची निर्मिती कोणी केली,याचे उत्तर जीना 'मी आणि माझ्या टाईपरायटरने!' असे द्यायचे.
जीना हे ब्रिटीशानच्या कुटील नीतीतून उत्पन्न झालेले एक पात्र आहे आणि पाकिस्तान हे त्यांच्या कुटील नीतीचे यश आहे.
जय हिंद
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta