या सर्व बाबींची पडताळणी करण्यासाठी आपण जेंव्हा जीनांच्या कारवायांवर दृष्टीक्षेप टाकतो तेंव्हा जाणवते कि दोष पाकिस्तानच्या संस्थापकामधेच आहे.
आज ज्या पाकिस्तानला आपण पाहत आहोत तो फक्त हिंदुस्तानला तोडूनच बनवलेला नसून खुद्द पाकिस्तानच्या ज्या भागात निवडून आलेली सरकारे होती त्यानाही जीनांनी बरखास्त केले होते.
कैबिनेट मिशन ज्यावेळी हिंदुस्तानमध्ये येणार होते त्यावेळी ज्या प्रदेशात ज्या पक्षाची सत्ता असेल स्वातंत्र्यानंतर त्याच पक्षाकडे ते सत्ता देणार होते.
जीना फक्त मुस्लीम लीगची सत्ता आणू इच्छित होते त्यामुळे त्यांनी एक एक करून आपल्या मिळणाऱ्या भागातील ज्या पक्षाची सत्ता आहे ती एका झटक्यात समाप्त केली होती.
स्वतंत्र होण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये केवळ सिंध आणि बंगाल प्रांतात लीगची सत्ता होती.
Image via Wikipedia
पंजाबमध्ये युनीयनिस्ट पार्टीचे आणि फ्रांटियरमध्ये कॉंग्रेस सरकार होते.बलुचिस्थानमध्ये २७ मार्च १९४७ रोजी जीनांनी भूदल आणि वायुदल पाठवून क्वेटावर ताबा मिळवला होता.बलुचींचे बंड पाक सैन्यांनी मोडून काढले होते.पंजाबमध्ये हि मुस्लीम लीगचे सरकार यावे यासाठी आणि पंजाबचे तत्कालीन पंतप्रधान खिजर हयात खान हटवण्यासाठी जीना आणि त्यांच्या समर्थकांनी हयात खान यांच्या विरुद्ध तीव्र आंदोलन केले होते.
शेवटी खान यांनी राजीनामा दिला होता.
यावरून जीना यांनी जनतेने निवडून दिलेली सरकारे कशी बरखास्त करून लावली दिसून येते.
सीमावर्ती भागात हि अशाचप्रकारे सरकारे उलथून लावण्यात आली होती.त्यावेळी तेथे कॉंग्रेसचे सरकार होते.
खान अब्दुल गफार खान (गांधींचे कट्टर अनुयायी ) यांचे बंधू फ्रांटियरचे पंतप्रधान होते आणि आपले विलीनीकरण लीगमध्ये ह्वावे असे त्यांना वाटत नव्हते.
त्यावेळी सरहद्द गांधी (खान अब्दुल गफार खान) गांधीना म्हणाले होते ' महात्माजी,आम्ही जन्मभर आपल्यासोबत राहिलो आता का आम्हाला लांडग्या समोर टाकत आहात ? हिंदुस्तांमध्ये फ्रांटियरचे विलीनीकरण होत नसेल तर आम्ही आझाद पख्तुनिस्तान करू पण जीना बरोबर जाणार नाही' परंतु गांधीजीनी काही सहकार्य केले नाही.शेवटी फ्रांटियरवर लीगने घाला घातला.
त्यावेळी कॉंग्रेसचे अस मत होते कि हजारो मैल दूर असलेला एखादा भाग हिंदुस्तानचा भाग कसा होऊ शकतो.
सिंध मधेही अशीच परिस्थिती होती तेथील पंतप्रधान अल्लाबक्ष पाक मध्ये जाण्यास तयार नव्हते त्यांना वेगळा सिंधू देश हवा होता.परंतु नेहरू यांनी आझाद यांच्या एक सदस्यीय आयोगाची स्थापना केली. आणि त्यांनी नेहृच्या इशाऱ्यावर केवळ एका पानाचा अहवाल सदर केला.'सिंध जनता सिंधू देश बनवू इच्छित नाही.' नंतर जीनांनी अल्लाबक्ष यांची हत्त्या करवली.
या घटनांवरून असे दिसून येते कि जीना किती हुकुमशहा होते आणि लोकशाहीचे मारेकरी होते.हे त्यांना लोकशाहिवादी म्हणवणाऱ्या नेत्यांनी लक्षात घ्यावे.
आजची पाकिस्तानची परिस्थिती जरी पाहिली तरी असे दिसून येते कि तेथे लोकशाही अशी रुजलीच नाही.
थोड्याफार फरकाने तेथे लष्करशाही येत गेली आहे.
तालिबानी संकट त्यांच्या डोक्यावर सारखे गोंगावत आहे जे त्यांनीच तयार केले आहे
अल् कायदा,लष्कर-ए-तोयबा,जैश-ए-मोहंमद आदी अतिरेकी संघटनांच्या कारवाया अधिकाधिक धाडसी होऊ लागल्या आहेत.
तालिबान्यांचे युद्ध आणि पाकिस्तानात उद्भवलेली राजकीय आणीबाणी यामुळे पाकिस्तानची स्थिती आज खूप दयनीय झाली आहे.
पण दोष पाकिस्तानच्या संस्थापकामधेच आहे त्याला कोण काय करणार.
(वरील लेखातील काही मुद्दे मुज्जफ़र हुसेन यांच्या लेखातील आहेत )
जय हिंद
जय महाराष्ट्र
nice article vikram.....keep it up.but i think now its futile to do analysis on jinnas foolish tatctics........why go away.....even we had one men which was equivalent to jinna....im talking bout the traitor of our nation MAHATMA GANDHI...what he did is not diff frm what jinna did...
उत्तर द्याहटवाविक्रम, अगदी बरोबर लिहालय तुम्ही!!!! दोष पाकिस्तानच्या संस्थापकामधेच होता पण त्याचे परीणाम संपुर्ण जग भोगतय अस वाट्त नाही का??? बाकी लेख छान आहे.
उत्तर द्याहटवा@मनमौजी
उत्तर द्याहटवाधन्यवाद
आपला अभिप्राय असाच कळवत रहा
विक्रम ,
उत्तर द्याहटवासुन्दर आहे लेख. पाकिस्तानातच काय पण कोणत्याही इस्लामी राष्ट्रात लोकशाही का जीव धरु शकत नाही हां विचार करण्या सारखा प्रश्न आहे. आणि ख्रिश्चन बहुल राष्ट्रे जी लोकशाहीची संकल्पना राबवातात ती लैटिन किंवा रोमन सीनेट ची पद्धतच का असते ? आपली संस्कृति दुसर्यावर लादणे याचाच अर्थ "सुसंस्कृत " होणे हाच अर्थ पाश्चात्य देशांचा आहे का ?
लेख आवडला . Keep it Up
farach jeena prem utu alaya sadhya? dya ki sodun..Jeena var lihun kay fayda nay..
उत्तर द्याहटवाजीनांवर केवळ आरोप करुन खरेच प्रश्नांची उत्तरे मिळतील का? आपल्यावर ज्या ब्रिटिशांनी राज्य केलं त्यांचे मत काय होते गांधींबद्दल हे कधी वाचले आहे का? गांधींच्या आधी सावरकरांचे कार्य, त्यांचा प्रभाव किती लोकांवर, अन जगभरात किती क्रांतिकारकांवर होता हा इतिहस आपल्याला माहीत असतो का? गांधींनीही हुकुमशाहीच वापरली.. "मी म्हणेन तीच पूर्वदिशा" हेच सूत्र कायम ठेवले.. आज इतर राष्ट्रांबद्दल बोलण्यापेक्षा आपला इतिहास समजून घेऊन नेमके प्रोब्लेम्स काय आहेत अन कशामुळे आहेत हे समजून घेतले पाहिजे.. अहिंसेच्या खुळचट कल्पनेत, भ्रमात आपण आहोत म्हणून शेजारची राष्ट्र काहीही करतात, अन आपण केवळ बघत राहतो, नाहीतर युनोकडे धावत राहतो..
उत्तर द्याहटवाही परंपरा आहे का आपली? शिवाजी महाराजांचा आदर्श इथे का विसरला जातो.. केवळ जीनांबद्दल योग्य अयोग्य ठरवण्यापेक्षा पण सध्या आपल्या देशाची नेभळत वृत्ती बदलली पाहिजे..
जीनांसारखी लोकं आजही असणारच आहे, पण आता वेळ आहे ती आपल्यातला स्वाभिमानी बाणा दाखवण्याची..
कॉंग्रेसमधले त्यावेळचे अजून एक नेते, अबुल कलाम आझाद.. ह्यांचा इतिहास, ह्यांची वक्तव्यं कुणी वाचली आहेत का?? लोकशाहीचे मारक कॉंग्रेसही पोसत होती हे लक्षात येईल.. त्यांची मतं काय होती हे पण एकदा जरुर पहा.. चीड येते...
उत्तर द्याहटवा@medhatai
उत्तर द्याहटवाआजकाल काही लोकांकडून जीन्हांची बाजू सावरण्याचा जो प्रयत्न होत आहे ते पाहून त्यांच्याबद्दल माहिती द्यावी असे वाटले म्हणून हा लेख प्रपंच होता
मी बाकी लोकांचा काही दोष नाह्वता असे मी नमूद नाही केले
तरीही तुम्ही नमूद केलेल्या गोष्टी नक्कीच तपासून पाहण्याचा प्रयत्न करेन
धन्यवाद
मी हे सगळे एवढ्यासाठी लिहिले की, जीना हे इतिहासातले एक पात्र आहे.. त्यांनी जे काही केले ते बदलता येणार नाही.. अन कुणी त्यांचा उदो उदो केला वा शिव्या घातल्या तरी आपले काही नुकसान नाही.. पण आपल्या देशाचा इतिहास, त्यावेळी कॉंग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या गोष्टी, त्यांचे गुण-अवगुण हे माहीत असणे आज आवश्यक आहे.. अन तेच गुण आजही उधळले जात आहेत ते आपल्या देशात हे समजून घेणं जास्त आवश्यक आहे.. पाकिस्तान हे स्वतंत्र राष्ट्र आता निर्माण झालेलंच आहे.. पण हिंदूस्थानचा पाकिस्तान होतोय, ते थांबवता यावे म्हणून आपला इतिहास शोधावा लागेल, वाचावा लागेल..
उत्तर द्याहटवा@medhatai
उत्तर द्याहटवाअन कुणी त्यांचा उदो उदो केला वा शिव्या घातल्या तरी आपले काही नुकसान नाही.????????????
असे कसे म्हणू शकता तुम्ही
असे केल्याने लोकांची मानसिकता बदलत नाही का ?
आणि परत तुम्ही इतिहास वाचावा लागेल म्हणत आहात त्याच इतिहासातील काही भाग येथे देण्याचा प्रयत्न केला आहे
नक्कीच नाही.. कुणी उदो उदो केला तरी फरक नाही.. ह्या देशात अनाठायी गांधींचा, नेहरुंचाही उदो उदो होतोच ना.. तेही फाळणीला, काश्मीर प्रश्नाला तेवढेच जबाबदार होते ना, त्यावेळी झालेल्या दंगलींनाही जबाबदार होते.. आज त्यांचा उदो उदो करुन काय झाले???
उत्तर द्याहटवाखरा इतिहास कधी ना कधी समोर येणारच.. अन मूठभर लोकांची मानसिकता बदलल्याने फरक नाही पडणार..
पण संपूर्ण देशाची मानसिकता जी बदलली गेलीये ह्या नेहरु घराण्यामुळे त्याचे काय???????
पुन्हा पुन्हा ..... तेच माझा मते पाकिस्तान हा देश नसून ती एक असुरी विचारधारा आहे. जी भारतात इसालामी आक्रमणा पासून चालू होती. भारतीय लोकांनी शिवाजी महाराजांचे आभर मानले पाहिजे. तयन्चा स्वरजा मुळे इसालामी आक्रमण आणि इस्लामीकरण थोपवू शकले . नाहीतर आज जी स्वतःला सेकुलर बोलनारी लोकान आज भारताचा अफगाणिस्तान झालेला दिसला असता. या कॉंग्रेसने देशाच वातोळ केल. आणि आजहि करत आहे. तरीही देशात बहुमताने तय्नच सरकार. ( मी कुठलंय हि राजकीय पार्टीचा नाही ) पण मला भारतीय या मानसिकतेची कीव येते. जीनां सारखा माणसाला काही लोक सेकुलर बोलतात ज्य जीनां मुळे लाखो लोकांचे जीव गेले.
उत्तर द्याहटवा.