जगाला वेड लावणाऱ्या फुटबॉल विश्वकपाची सुरवात उद्यापासून होत आहे
या उत्सवाची मी गेली चार वर्ष आतुरतेने वाट पाहत होतो..तसे पाहण्यास गेले तर हा विश्वकप पाहण्याची माझी हि तिसरी वेळ या आधीचे दोन विश्वकप आम्ही मित्रांनी रात्री जागून मस्ती करत पहिले आहेत.फुटबॉल विश्वकप पाहण्याच्या जो आनंद आहे तो दुसर्या कशातच नाही अगदी क्रिकेट विश्वकपापेक्षा मला याची जास्त नशा आहे.
यावेळी फुटबॉल विश्वकप प्रथमच आफ्रिकेत होत आहे.सहा खंडातून ३२ सर्वोत्तम संघ यावेळी सामील होत आहेत आणि ते जगाला वेड लावण्यास सज्ज झाले आहेत.
विश्वकप कोण घेऊन जाणार याची उस्तुकता असली तरी यातील प्रत्येक सामना डोळ्याचे पारणे फेडणारा असणार आहे.ब्राझील,आर्जेन्टिना,इटली,स्पेन,जर्मनी,इंग्लंड,फ्रांस,पोर्तुगाल इ. संघातील फुटबॉलपटूचा खेळ पाहण्यासाठी जगभरातील फुटबॉलप्रेमी टीव्हीसमोर नजरा लाऊन बसणार आहेत.प्रत्येकाचे डावपेच आणि खेळण्याची शैली भिन्न असलीतरी आकर्षक असणार आहे.आफ्रिकन फुटबॉलपटूची खेळण्याची पद्धत,राहणीमान अगदीच अलग असते तसेच गोल केल्यानंतर त्यांच्या स्टाइलमध्ये केलेला नाच तर पाहण्यासारखाच असतो एकदम हटके...
फुटबॉल विश्वकप कोण घेऊन जाणार याची जेवढी उस्तुकता असते तेवढीच उस्तुकता 'गोल्डन बूट' चा मानकरी कोण ठरणार याबद्दल फुटबॉलप्रेमीना असते सर्वात जास्त गोल करणाऱ्या फुटबॉलपटू या पुरस्काराचा मानकरी ठरतो.काका,मेस्सी,रुनी,रोनाल्डो यासारखे स्टार खेळाडू या पुरस्काराच्या स्पर्धेत असलेतरी कोणीतरी अनपेक्षित खेळाडूच या पुरस्काराचा मानकरी होतो हा आतापर्यंतचा अनुभव आहे.त्यामुळेच या पुरस्काराबद्दल लोकांच्यात खूप उस्तुकता असते.१९३० पासून 'गोल्डन बूट' हा पुरस्कार देण्यास सुरवात झाली आहे.यावेळी कोणी स्टार खेळाडू हा पुरस्कार पटकावतोय कि एखादा अनेपक्षित खेळाडू याचा मान मिळवतोय हे थोड्याच दिवसात कळून येईल.
तर चला तयार होऊयात यंदाच्या ३२ संघातील ७३६ खेळाडू महिनाभर चालणाऱ्या फुटबॉलच्या कुंभमेळ्यासाठी 'याची देही याची डोळा' पाहण्यासाठी ....
मी सुद्धा पाहणार या वेळी... मजा येईलच...
उत्तर द्याहटवाविक्रम, टिव्हीचा ताबा तूला मिळेल ना? नविन लग्न झालेलं आहे म्हणुन विचारतोय ? ;-)
@आनंद
उत्तर द्याहटवाहा हा
नवीन टीव्ही घेत आहे रूममध्ये खास फुटबॉल विश्वकपसाठी ;)
बाकी जोरदार घमासान होणार आहे यावेळी हे नक्की
तुझा आवडता संघ कोणता रे ????
ह्या दिवसाची तर वाट बघतोय गेले किती दिवस, खरच ह्या खेळाची रंगत काही औरच....आणि हल्लीच तुझ लग्न झाला म्हणून गायब होती की काय स्वारी? :)
उत्तर द्याहटवाअभिनंदन आणि शुभेच्छा..
@suhas
उत्तर द्याहटवाहो रे जरा त्याच कामात व्यस्त होतो
धन्यवाद