मंगळवार, १ फेब्रुवारी, २०११

हा 'उत्सव' चूक कि बरोबर ?

काही दिवसापूर्वी २६ जानेवारीला A WEDNESDAY हा चित्रपट  परत पाहण्याचा  योग आला थोडासा 'डोंबिवली फास्ट' धाटणीचा  हा सुद्धा, सामान्य माणूस सरकारी यंत्रणेला वैतागल्यावर काय करू शकतो किंवा त्याच्या  भावना काय असू  शकतात याची  उत्तम पद्धतीने मांडणी केलेले हे दोन चित्रपट. परंतु असे खरच होऊ शकते का ? किंवा सामान्य माणूस या पातळीवर उतरू शकतो का ? सामान्य माणसाने असे  काही केलेतर योग्य होईल का ? असे प्रश्न मनामध्ये  येत होते.
 आणि अचानक एक ब्रेकिंग न्यूज  आली आरुषीचे वडील राजेश तलवार यांच्यावर न्यायालय परिसरात एका माथेफिरूने धारदार  शस्त्राने डोक्यावर वार केले. सुरवातीला वाटले कोणीतरी माथेफिरूच असावा परंतु त्याचे नाव ऐकल्यावर ते ओळखीचे वाटले 'उत्सव शर्मा ' हाच तो ज्याने  या अगोदर असेच कृत्य केले होते. हरयाणाचा  माजी पोलिस महासंचालक एसपीएस राठोड चंडीगढ न्यायालयातून बाहेर येत असतानाच असाच  त्याच्यावर चाकूने हल्ला केला होता. याचा अर्थ हे त्याने जाणून बुजून केले होते.त्याने असे का केले असावे या दोन्ही केसशी त्याचा दुराय्न्वे हि संबंध नाही मग त्याने असे पाऊल का उचलावे ? कोण हा उत्सव शर्मा ?

अहमदाबादच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डिझाईन या संस्थेत अॅनिमेशन फिल्म डिझाईनचा विद्याथी असलेला उत्सव शर्मा हा एक हुशार विद्यार्थी आहे. त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल नाहीत. हा फक्त तो भावनिक  आहे. परंतु आपल्या देशात एवढ भावनिक राहून चालत का हो ? पण त्याला त्याची जाण नसावी अजून शिकत आहे ना त्यामुळेच. रुचिका प्रकरणावर तो एक डॉक्युमेंटरी बनवत होता त्यावेळी तो या केस शी जोडला गेला. रुचिका गिरहोत्रा या १४ वर्षांच्या मुलीचा विनयभंग करून तिच्या आत्महत्येला कारणीभूत झालेल्या आणि तिच्या कुटुंबीयांचा मानसिक व शारीरिक छळ करून त्यांना राहते घर सोडण्यास भाग पाडणाऱ्या राठोडचा १९ वर्षांनीही न्याय झालेला नाही. पोलिस यंत्रणेत उच्चपदावर असलेल्या राठोडला वाचविण्यासाठी अख्खी व्यवस्था कशी कामाला लागली होती. न्यायालय त्याला शिक्षा देण्यास असमर्थ ठरत होते हे पाहूनच उत्सवने त्याच्यावर हल्ला केला होता.
 असाच काही  प्रकार आरुषी-हेमराज खून प्रकरणात झाला आहे. राजेश तलवार यांच्यावर स्वताच्या मुलीच्या खुनाचा आरोप आहे परंतु पुराव्या अभावी हि केस उभी राहू शकत नाही असे कारण देऊन सीबीआय ने क्लोजर रिपोर्ट सादर केला आहे.आणि राजेश तलवारची सुटका करण्यात आली आहे.सीबीआयलाही गुन्हा सिद्ध करता येत नाही आणि न्यायालयाला पुरावे हवे आहेत.ज्याच्याकडे पैसा,ताकत,सत्ता आहे तो काहीही करू शकतो आणि सुटू शकतो हे यावरून दिसून येते.
 मग न्याय कुठे आहे आणि सामान्य माणसाला तो कसा मिळणार ? कि पैसेवाले लोकशाहीची चेष्टा करत राहणार आणि सामान्य माणूस फक्त पाहत राहणार ?
 या अशाच घटनांमुळे आपल्या मनात हि चीड निर्माण होते आणि उस्तव सारखे लोक त्या रागाला अशाप्रकारे वाट मोकळी करून देतात त्याची पद्धत चुकीची जरूर असेल परंतु त्या सर्वसामान्य माणसाच्या भावना आहेत असे तुम्हाला वाटत नाही का ? जश्या त्या वरील २ चित्रपटात दाखवण्यात आल्या आहेत.
 तलवार यांच्या हल्ल्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर पश्चाताप नव्हता  पत्रकारांना तो म्हणाला 'मी भावनाप्रधान आहे.त्यामुळे या हल्ल्याबद्दल मला जराही पश्चाताप होत नाही.तुम्ही सर्वजण सध्या आजूबाजूला काय चालले आहे हे पाहतच आहात.आरुषी खुनाबद्दलही सर्वाना चांगलेच माहिती आहे.मात्र पुरावे नाहीत त्यामुळे इथे न्याय मिळणार नाही.सीबीआय  ने क्लोजर रिपोर्ट दिला आहे त्यामुळे पुढे काहीच होणार नाही.न्याय आपल्या मार्गाने जातो आणि आपण सर्वजण केवळ पाहत बसतो !या केसमध्ये तलवार चुकीचा आहे.रुचिका सारखीच हि केस हि अनेक वर्ष चालेल.मात्र हाती काहीच लागणार नाही. '
 उत्सव माथेफिरू आहे मानसिक रुग्ण आहे फक्त असे सांगून या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही त्याने असे का केले,त्याच्यावर अशी वेळ का आली याचाही विचार होण्याची गरज आहे.आज अनेक गुन्हे करूनही कितीतरी लोक उथळ माथ्याने समाजात फिरत आहेत.त्यामुळे सर्वसामान्य माणसाचा न्यायपालीकेवरील विश्वास कमी होत चालला आहे.सीबीआय सारख्या संस्थाही लाचार होत आहेत.त्यामुळे न्यायालयात अन्याय झालेल्याला न्याय मिळतो कि त्याच्यावर अजून अन्याय होतो असा प्रश्न पडायला लागला आहे.
 रोजच्या अशा घटनांमुळे  सामान्य माणसाचे मन मरून गेले आहे त्यांना याचे आता काहीच वाटत नाही आणि ज्याला काही वाटते तो असा 'उस्तव' बनतो.
मलातरी हा उस्तव चूक वाटत नाही तुम्हीच तुमच्या मनाला विचार आणि ठरवा हा 'उत्सव' चूक कि बरोबर.

२० टिप्पण्या:

  1. लोकं हातात न्याय घेणारच जर वारंवार अन्याय होत असेल तर.. इजिप्तसारखं..

    उत्तर द्याहटवा
  2. अजिबात चूक नाही.. असे अजून अजून उत्सव निर्माण व्हायला हवेत राज्यक्रांतीसाठी.

    उत्तर द्याहटवा
  3. उत्सव बरोबरच आहे पण त्याच्या बरोबर असण्याने काही होऊ शकतं का हा खरा प्रश्न आहे...

    उत्तर द्याहटवा
  4. @ आशिष
    धन्यवाद मलाही तो चुकीचा वाटत नाही फक्त अशी वेळ प्रत्येक नागरिकावर येऊ नये नाहीतर परिस्थिती अवघड आहे :(

    उत्तर द्याहटवा
  5. @ हेरंब आणि आनंद
    असे प्रत्येक नागरिकाने करायचे ठरवले तर देशात अराजकता पसरेल त्यामुळे अशी वेळच येऊ नये अशी आशा करूयात

    उत्तर द्याहटवा
  6. @ अपर्णा
    या घटनेमुळे ती बंद केस जरी सुरु झाली आणि दोषींना शिक्षा मिळाली तर उत्सव च्या कृत्याचे चीज झाले असे म्हणता येईल.

    उत्तर द्याहटवा
  7. विक्रम एक शांत वादळ म्हणाले...

    @ हेरंब आणि आनंद
    असे प्रत्येक नागरिकाने करायचे ठरवले तर देशात अराजकता पसरेल त्यामुळे अशी वेळच येऊ नये अशी आशा करूयात

    IF EACH CITIZEN feels to act like this then it won't be a chaos BUT IT SHALL BE REFORM IN SYSTEM

    उत्तर द्याहटवा
  8. हुतात्मा होऊन परिस्थितीवर मात करता येत नाही. त्यासाठी सामान्य मार्गदेखील उपयुक्त ठरतात.

    उत्तर द्याहटवा
  9. मी ह्या पोस्टला तीनचार वेळा भेट दिली. मला अजून नाही मिळालेलं उत्तर कि उत्सवने जे केले ते चूक कि बरोबर.
    किंवा, खरं तर इथे बरोबर आणि चूक हा प्रश्नच नाही आहे. इथे मला नक्की काय हवे आहे आणि मी काय केले तर अगदी पूर्ण स्वरूपात नाही तरी निदान मी माझ्या इप्सिताच्या थोडा तरी जवळ जाणार आहे...हा विचार महत्वाचा आहे. आततायीपण कारून हौतात्म्य मिळवता नक्कीच येईल परंतु, त्यातून देशाचे नक्की भले होणार आहे काय? कि त्या उलट मी काही चळवळ केली, रस्त्यावर समान विचारधारेचे मनुष्यबळ एकत्र करून काही विरोध दर्शवला...तर त्यात आपण एक पाया घालून दिला, समाजाला विचार करण्यास प्रवृत्त केले...असे तरी होऊ शकेल. अर्थात, ह्यात खूप कालावधी जाऊ शकतो, हेही मला मान्य आहे. परंतु तरीही...

    ...असे मला वाटते.

    उत्तर द्याहटवा
  10. मलातरी हा चूकीचा वाटत नाही आहे, पण मार्ग चुकीचा आहे असे काहीजण म्हणत आहेत. पण अशी अवस्थेला एकदा तरूण येणे म्हणजे ही आपल्या न्यायव्यवस्थेत कुठेतरी गंभीर चूक घडत आहे यांचे लक्षण आहे.... एका ठिणगी ने वणवा पेटतो.. देव करो तो वणवा पेटायच्या आत सरकारला थोडीतरी बुध्दी येवो !

    उत्तर द्याहटवा
  11. मार्ग चुकीचा असेल पण त्याला कारणीभूत हीच सिस्टम आहे...आपल्याकडे असे केल्याशिवाय पर्याय नाही आता. इजिप्तकडून काही शिकाव म्हणतो आपल्या भारतीय लोकांनी...
    उत्सव चुकीचा नाहीच...

    उत्तर द्याहटवा
  12. @राजीव
    प्रथम ब्लॉगवर आपले स्वागत :)
    उत्सव ने कायदा हातात घेतला आहे हे विसरून चालणार नाही हे एक प्राथमिक उदाहरण म्हणून ठीक आहे परंतु प्रत्येकानेच असे वागायचे ठरले ठरवले तर अराजकता माजणारच परंतु ती अन्याय विरुद्धची असेल आणि त्याला आपली न्यायव्यवस्था जबाबदार असेल. धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा
  13. @ शरयू
    कशा प्रकारचे सामान्य मार्ग तेही सांगाल का ?

    उत्तर द्याहटवा
  14. @ अनघा
    मी हि सुरवातीला असाच द्विधा मनस्थितीत होतो उत्सवचे कृत्य सुरवातीला चूक वाटले परत परत विचार केला त्याची मानसिकता परिस्थिती काय असेल याचा विचार केला आणि तो त्याच्या ठिकाणी बरोबर वाटला परंतु प्रत्येकाने हाच मार्ग वापरू नये असेही वाटले ... असो धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल :)

    उत्तर द्याहटवा
  15. @ राज
    आपल स्वागत
    तुम्ही म्हणत आहात त्यात तथ्य आहे हे आपल्या न्यायव्यवस्थेचे अपयश आणि लोकशाहीची शोकांतिका आहे.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  16. @ सुझे
    हो हि आपल्याच व्यवस्थेची चूक आहे त्यामुळे असे घडत आहे परंतु भारतीय नागरिक यातून काही शिकतील असे वाटत नाही :(

    उत्तर द्याहटवा
  17. ह्म्म, काय चुक आणि काय बरोबर....?
    मुळात कोणी असे वागायला प्रवृत्त होतो हिच आपल्या कायदा आणि व्यवस्थेची शोकांतिका आहे. ते चुक की बरोबर हा नंतरचा मुद्दा झाला.

    उत्तर द्याहटवा
  18. Ho to उत्सव Nakkicha barobar aahe. Rajkarni Panane He lok Khatale Jast Vel Chalavtata. aatta pan kasab Cha khatla ha pan nikali lagto ki nahi te kahi mahit nahi. pan ajun उत्सव tayar honyaaadhi khatlyacha nikaal lava manav.nahitar tyala jaavae kara aani ghari basva manav.

    उत्तर द्याहटवा