बुधवार, २६ ऑगस्ट, २००९

असा मी... तसा मी...

मी खून केला - असा आरोप तुम्ही करू शकाल. माझी समजूत कमी पडली - असेही म्हणू शकाल. आपण सर्व कधीकधी दुबळे असतो. पण खोटेपणाने, आव आणून वागणे - हा गुन्हा मी कधीच केला नाही...... मी गर्दीत असतो पण तरीही एकाकी असतो . मी मित्रांच्या गराड्यात रमतो .पण तरीही मला एकटा रहायला आवडत. मी खुप बोलतो पण तरीही मला गप्प बसून रहायला आवडत. मला आजुबाजुला माणस लागतात,पण तरीही मी माणसाना टाळतो . मला हसायला खुप आवडत,पण तरीही डोळ्यातून पाणी काढायला मी निम्मित शोधत असतो. माझ जीवनावर प्रेम आहे आणि तरीही मी चोरून मृत्यूची वाट पाहतो.

»» नमस्कार, आपल्या सर्वांचे इथे मनपूर्वक स्वागत! हा ब्लॉग प्रपंच एवढ्यासाठीच कि आपण कधी कधी असे काहीतरी वाचतो जे मनाचा ठाव घेऊन जाते, विचार करावयाला लावते स्वताकडे या जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलवण्यास भाग पाडते असे काही मी वाचलेले आपल्यासारख्या वाचकांसाठी उपलब्ध करून द्यावे म्हणूनच तसेच कधी काही सुचले आणि लिहावे असे वाटले तर ते आपल्यासमोर मांडण्याचा आणि आपला अभिप्राय जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यासाठी!
जय हिंद, जय महाराष्ट्र!

 

»» माझ्याशी संपर्क साधण्यासाठी vikramghatge81@gmail.com येथे मला मेल करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा