आंतरजाल हे खरच एक अदभूत दुनिया आहे याचा वापर आपण कसा करतो यावर याचे परिणाम अवलंबून असतात.येथील ओर्कुट,फेसबुक अशी संकेतस्थळे हि एक आभासी दुनिया आहे हे आंतजालावर वावरणारी कोणतीही व्यक्ती मान्य करेल.परंतु काही लोक या आभसी दुनियेच्या आहारी जातात हेही तितकेच खरे आहे.आजच्या जमान्यात आंतरजालाचा वापर हा भरपूर प्रमाणात होत असताना दिसून येते.दैनंदिन व्यवहारातच नाही तर मनोरंजन म्हणून हि याचा वापर खूप वाढला आहे.याचा जास्त वापर करण्यात आपले तरुण सर्वात पुढे आहेत असे दिसून येते.
तरुण वयातील मुले मुली हि ओर्कुट,फेसबुक अशा संकेतस्थळावर अक्षरशा पडीक असतात.यामागे नवीन गोष्टीचे आकर्षण,मनोरंजन अशा बाबी असल्या तरी त्याचा त्यांच्या मनावर आणि विचार करण्याच्या पद्धतीवर खोलवर परिणाम होत असतो.आंतरजाल हे माहितीचे भांडार आहे त्याच्या साह्याने आपण आपल्या ज्ञानात भर घालू शकतो हे हि मुले विसरून गेली आहेत.
हा विषय लिहिण्यामागचे कारण म्हणजे मी ओर्कुट हे खूप दिवसापासून वापरत आहे तेथील चर्चेत हि हिरहिरीने भाग घ्यायचो माहितीची देवाण घेवाण होत होती,शाब्दिक चकमक हि होत होती.खूप नवीन मित्र-मैत्रिणी भेटल्या काही चांगल्या काही वाईट . परंतु तेथील होणारया चर्चेतून,भांडणातून असे दिसून आले कि ते आपल्या जीवनावर,मनावर खूप परिणाम करते आणि आपल्या रोजच्या वागण्यात,बोलण्यात खूप बदल घडून येतो.
कोणी काही म्हंटले तरी आपण जे अशा संकेतस्थळावर मत मांडत असतो किंवा जेवढ्या त्वेषाने बोलत असतो तसे आपण खरया जीवनात बोलत व वागत नसतो.अशा ठिकाणी आपण फक्त तसा आभास तयार करत असतो कारण आपल्या पुढे दुसरी खरी व्यक्ती नसते किंवा ज्यांच्या समोर आपण हे बोलत असतो त्यांचा आपल्या खरया जीवनाशी काहीही संबंध नसतो.
परंतु काही लोक (सहसा तरुण मुले-मुली) अशा गोष्टी खूपच गंभीरपणे घेतात ते 'ओर्कुट म्हणजेच जीवन' या तत्वाने वागू लागतात असे दिसून आले आहे.तेथील होणारया चर्चा,भांडणे,गप्पा हेच त्यांचे जीवन बनून जाते ते अशा संकेतस्थळावर उपस्थित नसले तरी मनाने ते तिथेच असतात त्याचाच विचार त्यांच्या मनात सतत असतो.आपण कोणीतरी मोठे किंवा वेगळे आहोत,विचारवंत आहोत असा आभास करण्याच्या मागे ते लागतात आणि त्यातच ते हरवून जातात.
या आभासी दुनियेत प्रत्येकजण आपली एक प्रतिमा तयार करायच्या मागे लागलेला असतो तो तसाच खरया जीवनात असेल असे सांगता येत नसले तरी काही कालावधी नंतर आपण त्या प्रतिमेप्रमाणेच आहोत असे त्याला वाटू लागते परंतु खरी परिस्थिती तशी नसते आणि ती समोर आली कि त्याला धक्का बसतो.
आपण हि अशा गोष्टी अनुभवल्या असतील आपली कुवत किंवा तेवढी बुद्धिमत्ता नसलेली काही लोक काय काय गोष्टींवर आपले मत मांडत असतात किंवा एखाद्याला सल्ला,उपदेश देत असतात असे का होते ?
कारण ती माणसे स्वताला तेवढ्या क्षमतेची समजायला लागेलेली असतात इथे बसून ओबामा ने काय केले पाहिजे ,बुश कुठे चुकला किंवा त्यांनी काय केले पाहिजे अशा गोष्टींवर मत नोंदवणारे स्वता आपण कुठे आणि किती चुकत आहोत याकडे डोळे झाक करत असतात आणि हे सर्वांच्या बाबतीच खरे आहे अगदी माझ्याबाबतही :)
खरया आयुष्यात आपणाला जे काही बोलता येत नाही किंवा जसे वागता येत नाही परंतु तशी खूप इच्छा असते अशा गोष्टींची पूर्तता हि आभासी दुनिया करते.
ओर्कुटलाच विश्व मानणारे मी पहिले आहेत त्यातून त्यांच्या आयुष्यात खूप चढ उतार होताना पहिले आहेत
कितीही काही बोललो तरी आपण जे इथे मत मांडतो ते आपल्या मनात कुठेतरी घर करून बसलेले असते आणि जगात वावरताना त्या गोष्टींचा प्रभाव आपल्या वागण्यात,बोलण्यात दिसतो
येथील गोष्टी किती वैयक्तिक घ्यायच्या हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे परंतु त्याने तुमच्या सामान्य जीवनावर खोलवर परिणाम होत असतो हे अनुभव आल्याशिवाय लोकांना फक्त सांगून पटत नाही
येथे खूप चांगल्या गोष्टी वाचायला भेटत असतात कोणती माहिती योग्य आणि आपल्याला योग्य दिशा देणारी आहे हे स्वताच ठरवावे लागते येथील मित्र फक्त तुम्हाला सल्ला देऊ शकतात तो ऐकायचा कि नाही हा शेवटी आपला वैयक्तिक प्रश्न असतो
आभासी जगात जगताना आपणाल जसे हवे आहे तसे जगता येते परंतु तसेच खऱ्या आयुष्यात जगता येत नाही आणि असे झाले कि मनाला खूप त्रास होतो आणि चीड चीड होते
त्यामुळे आपण जसे आहोत आपला स्वभाव जसा आहे तसा इथे मांडत राहावे त्यामुळे त्याचे काय परिणाम भावी आयुष्यात होऊ शकतात ते येथील चर्चेने आणि मैत्रीने समजू शकते
शेवटी कस जगायचा हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे
फक्त एक आहे आपण इथे आभास निर्माण करून स्वताला फसवत असतो
या आभासी दुनयेचे व्यसन हो व्यसनच कधी लागते हे समजतच नाही आणि माणूस यात वाहून जातो वेळीच यावर उपाय नाही केला गेला तर आपल्या वैयक्तिक आयुष्याला यामुळे हानी पोहचू शकते.
१००% सहमत रे!
उत्तर द्याहटवा@ आनंद
उत्तर द्याहटवाधन्यवाद
याला चांगल आणि वाईट अश्या दोन्ही बाजू आहेत...ते आपल्यावर अवलंबुन आहे आपण कसा उपयोग करायचा तो. आभासी दुनियेत तुम्हाला खूप सार शिकायला मिळत. खूप सारी चांगली लोक भेटतात , नकळत मैत्री पण होऊन जाते. आपण ज्यांना कधीच भेटलो नाही अश्या मित्रांचा सल्ला मिळतो खूप चांगल शेअरिंग होत.शेवटी आपणच विचार करून वागायच!!!
उत्तर द्याहटवाएक चुलतमित्र (मित्राचा मित्र) आहे. तो फेसबुकवर ’फार्मव्हिले’ नावाचा गेम खेळतो. स्वतःच्या लग्नात म्हणत होता की सुट्टीवर येताना सोयाबीन पेरुन आलोय. आवरा...!!!
उत्तर द्याहटवा@ मनमौजी
उत्तर द्याहटवाया आभासी दुनियेचे खूप चांगले फायदे आहेत हे कोण नाकारत आहे ?
परंतु खर जीवन सोडून या आभसी दुनियेतच जगणारे जे आहेत त्यांच्याबद्दल काय ?
खाली पंक्याने एक उदाहरण दिलेच आहे
बाकी मलाही खूप चांगले मित्र आणि मार्गदर्शन मिळाले आहे या दुनियेत :)
धन्यवाद
@ पंक्या
उत्तर द्याहटवासोयाबीन पेरुन आलोय. आवरा...!!!
हा हा हा पोट धरून हसलो रे
खरच कहर आहे
फेसबुकवरील ते खेळ अक्षरश वेड लावतात लोकांना
बाकी त्या चुलत मित्राचा संसार कसा चालला आहे ????
माझ्या एका मित्राची आणि त्याच्या बायकोची पैज लागायची की दिवसभरात कोणाला जास्त scraps येतात, कोणाचे एकूण scraps जास्त, कोणाची फ्रेंडलिस्ट मोठी.
उत्तर द्याहटवाएकूण सगळा कठीण प्रकार आहे.
सहमत....मागे यावरच लिहाला होता..बिईंग सोशल..
उत्तर द्याहटवाशब्दांशब्द पटला म्हणून मी पण सगळे अकाउंटचे एक्सट्रा फीचर्स गेम्स, अपलिकेशन्स सगळा सगळा बंद केलय कधीच...
अगदी बरोबर आहे. आभासी दुनिया कधी तुम्हाला टेकओव्हर करते तेच समजत नाही.
उत्तर द्याहटवालेख अतिशय उत्कृष्ट झाला आहे. मला वाटतं की आपली मतं एक्स्र्पेस करायला ब्लॉग हे जास्त योग्य माध्यम ठरतं. कमीत कमी ब्लॉग वर भेटणारे लोकं आभासी नसतात, तर खरे खुरे असतात.
सोशल साईटवर वय लपवून , किंवा स्वतःबद्दलची खरी माहिती लपवून गाईचे कातडे पांघरलेले लांडगे पण खूप आहेत- त्यावर तर एक वेगळं पोस्ट होऊ शकतं. कालच एक लेख वाचला सुरेश चिपळूणकरांच्या साईट वर लव्ह जेहाद, तो आठवला..
माझ्या वागण्यावरून तर तुला या पोस्टची कल्पना आली नाही ना..? कारण मी पण नेटवरच पडलेलो असतो कधीपण..! ;)
उत्तर द्याहटवाविक्रम,
उत्तर द्याहटवाएकूण एक वाक्य पटल तुझ्या पोस्टमधलं. ऑरकुट, फेसबुक खुपच मायावी आणि खोटेपणाचे आहे. फार्मविले गेमने तर सगळ्यांना एव्हढे वेड लावले की शेवटी ऑफिसने फ़ेसबुक साईटच ब्लॉक केली.
@ हेरंब
उत्तर द्याहटवाकाय सांगतोयस
एकंदर अवघड प्रकरण आहे राव
@ सुहास
उत्तर द्याहटवामी हि आता ओर्कुट फार कमी केले आहे
पहिला पडीक असायचो तिथे
धन्यवाद
@ महेंद्र काका
उत्तर द्याहटवाहो खरे आहे अशा संकेतस्थळावर खूप लोक फेक असतात आणि फक्त दिखावा करतात
यातून भावनिक माध्यमातून लोकांची फसवणूक हि केली जाते खूप प्रमाणात
ब्लोग एक उत्तम मध्यम आहे हे मान्य
बाकी मी हि चिपळूणकरांचा परंतु आपली लोक त्या गोष्टीबद्दल गंभीर नाहीत असे मला वाटते,तो एक गंभीर विषय आहे त्याबद्दल तुम्ही का काही लिहित नाही ????
@ विशल्या
उत्तर द्याहटवानाही रे,ओर्कुट वरच याबाबत चर्चा सुरु होती त्यावरून हा विषय आला
परंतु तूच नाही तर काही प्रमाणात माझ्याबाबत हे खरे आहे ;)
धन्यवाद
@ सोनाली
उत्तर द्याहटवामला फेसबुक वरील गेम कधीच आकर्षित करू शकल्या नाहीत परंतु त्यांचे किस्से ऐकून आहेच ;)
लोक अक्षरश वाहवत जातात या गोष्टीत त्यांच्या ते लक्षात नाही येत लवकर
धन्यवाद
karch kuph chan
उत्तर द्याहटवा@sandeep
उत्तर द्याहटवाधन्यवाद