सोमवार, १२ एप्रिल, २०१०

'बबन नाव्ही तंगाट'

Lazy Drinker - Borracho huevónशीर्षक वाचून हादरलात का ? एवढे हादरण्याची गरज नाही सांगतो सगळे इस्कटून ;)
काही लोकांना 'तंगाट' या शब्दाचा अर्थ माहिती असावा परंतु कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी तंगाट म्हणजे 'दारूपिऊन टल्ली झालेला' हा जरा गावाकडचा शब्द आहे तो सर्वाना माहितीचा असेल असे नाही असो
तर काय झाले सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत मुलांच्या परीक्षा  हि संपत आल्या आहेत आणि परीक्षा  झाल्या रे झाल्या कि मामाच्या गावाला जायचे हे आमचे एकमेव ध्येय असायचे याची आठवण झाली आणि काही जुन्या आठवणी ताज्या झाल्या. लहानपणी मी जेंव्हा मामाच्या गावाला जायचो तेंव्हा (उन्हाळ्याच्या सुट्टीत सहसा) त्यावेळी आमचे प्रताप माहिती असल्याने(तसे प्रत्येकजन लहानपणी प्रतापीच असतो म्हणा ) मामा आम्हाला आजोबांच्या आदेशाने पहिल्यांदा केस कापण्यासाठी बबनच्या केशकर्तनालयात  घेऊन जायचा. केस कमी करू या नावाखाली आमचा 'चमनगोटा ' केलेला असायचा.परंतु असे केल्याने आपल्याला पाण्यात खेळण्यापासून कोणी अडवणार नाही असले विचार आमच्या त्या सुपीक डोक्यात यायचे आणि आम्ही मनोमन खुश ह्वायचो.
 तर हा बबन याला पूर्ण गाव 'बबन नाव्ही' म्हणून ओळखायचा.  तसा हा गावातला एकदम फेमस माणूस बर का.जसे कोणतेही कुशल कारागीर  किंवा कलाकार वल्ही असतात तसाच हा सुद्धा होता हे सांगायची गरज नाही.बबन आमच्या मामाच्या घरचा 'फिक्स' नाव्ही होता.तो  पणजोबापासून नातवंडापर्यंत सार्वांचे डोके हलके करायचा.फक्त आमचे पणजोबा आणि आजोबा यांच्यासाठी त्याला घरी यावे लागायचे.आजकाल मामा त्यांच्याकडे केस कापायचा नाही कारण बबनचा मुलगा जरा 'फ्याशनेबल' केस कापत असल्याने ते आता त्याचे गिर्हाईक झाले होते.तसेही बबनच्या  दुकानात पैसे द्यावे लागत नव्हते वर्षाला धान्याची ठरलेली पोती दिली कि वर्षभर सण सोडून काही द्यावे लागायचे नाही.
 बबनचा आपल्यावर लय जीव  बर का. बीबीचा (आईचे टोपण नाव ) पोरगा आलाय हे समजल्यावर (आम्ही आलोय हे त्यांना पहिल्याच दिवशी त्यांच्या दुकानातील उपस्थितीवरून समजायचे) माझ्यासाठी लेमन गोळ्या त्याही मुठभरून ह्या ठरलेल्या असायच्या. आजोबा आणि पणजोबांची सेवा (केस,दाढी) करण्यासाठी आठवड्यात २ वेळा बबन घरी आला कि आमच्या बरोबर खूप खेळणार यात वाद नाही.
परंतु एकदा संध्याकाळ झाली आणि दुकान बंद केले कि बबनचे रूपच बदलायचे.रात्री ८ वाजले कि यांचे पाय गुत्त्याकडे वळलेच  आणि एकदा बबन तंगाट झाला कि याच्या वाटेला येणाऱ्या प्रत्येकालाच शिव्याच्या लाखोल्या वाहिल्या जायच्या. बबनची वस्ती मामाच्या वस्तीच्या पुढे असल्याने त्याचे रात्रीचे रूप रोज पाहण्याचा योग मला यायचा.रात्री कुत्र्यांचा भुंकण्याचा आवाज वाढला आणि त्याच्या बरोबर 'बबन नाव्ही तंगाट' अशी आरोळी ऐकू आली कि समजायचे बबन आला. ती बबनची स्टाइल होती. बबन हा त्याचा ज्याच्यावर राग आहे किंवा कोणाशी त्याचे बिनसले असेल त्याची काही वाईट गोष्ट झालेली असेल किंवा काही घडलेले असेल या गोष्टीचा उल्लेख करून त्याची आरोळी पूर्ण करायचा. तुम्हाला उदाहरण देऊन सांगतो म्हणजे लक्षात येईल.समजा कोणाची सायकल चोरीला  गेली तर याची आरोळी'संजय पाटलाची सायकल चोरीला गेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट' (लगेच समजायचे संजय पाटलाचे आणि बबन  याचे काहीतरी बिनसले आहे)अशी अनेक विविध वाक्य आम्हाला ऐकायला मिळायची.'........ म्हैस मेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट' '....... बायको पळून गेली,तरीबी बबन नाव्ही तंगाट'
तर एकून काय ' बबन नाव्ही तंगाट' हे त्याच वाक्य ठरलेले असायचे.
पण एवढे तंगाट होऊन हि आम्ही आलेलो आहोत हे तो विसरायचा नाही, त्याचा घरी जायचा रस्ता मामाच्या दारातून जात असल्याने मामाचे घर आले कि त्याची पावले घराकडे वळायची.दारात आला कि बाहेर असेल त्याला 'बीबीचा पोरगा कुठय' हा पहिला प्रश्न ठरलेला.बबन दारू पिऊन आलाय त्यामुळे आम्हाला घरातील माणसे घराच्या बाहेर पडू द्यायची नाहीत.(बालमनावर वाईट परिणाम नको म्हणून)
परंतु बबन मला जोरात हाका मारायला लागायचा.आणि आम्ही सगळ्यांचे हाथ सोडवून पळत बबन जवळ जाऊन उभा असायचो.कारण आम्हाला माहिती असायचे आमच्या लेमन गोळ्या आलेल्या आहेत.बबन मला उचलून घेणार आणि खिशातून मुठभरून लेमन गोळ्या आमच्या हातावर ठेवणारच.मला खाली ठेवता ठेवता बबनची आरोळी यायचीच 'बीबीचा पोरगा आलाय,तरीबी बबन नाव्ही तंगाट'
मला खाली ठेऊन बबन परत फिरला कि वळून माझ्याकडे बघायचा आणि फक्त बबन नाव्ही ???? एवढच म्हणायचा आणि मी जोर देऊन 'बबन नाव्ही तंगाट' अस म्हणायचो आणि घरात पळून जायचो .यावर  बबन हसायचा आणि त्याच्या ओरोळ्या ऐकत आम्ही झोपी जायचो.
 दुसर्या दिवशी सकाळी बबन  घरी चहा प्यायला हजर असायचा एकदम नॉर्मल, शांतपणे बोलणारा हा बबन पाहिला कि रात्रीचा तो बबन कोण होता असा प्रश्न पडावा.परत त्याचा दिनक्रम सुरु ह्वायचा रात्र झाली कि परत बबनच्या आरोळ्या ऐकू  यायच्या.
' बबन नाव्ही तंगाट' हे वाक्य माझ्या मनात घर करून बसले हे मात्र खर.आताही कोणी जवळचा मित्र पार्टीमध्ये थोडी जास्त झाली आणि बडबड करू लागला कि माझ्या मनात येते ' बबन नाव्ही तंगाट' किंवा कधी कधी मी बोलूनही जातो असे.काही लोकाच्या ते लक्षात येत नाही परंतु जवळच्या  सर्व मित्रांना हा किस्सा माहित असल्याने त्यांच्या लगेच लक्षात येते आणि तेही त्या टल्ली झालेल्या मित्राकडे बघून जोरात म्हणतात ' बबन नाव्ही तंगाट' आणि जोरात हसतात.

(टीप-ब्लॉग सुरु केल्यापासून स्वताबद्दलचा एकाही अनुभव लिहिला नव्हता  हा पहिलाच प्रयत्न )
Reblog this post [with Zemanta]

३१ टिप्पण्या:

  1. मस्तच रे.. एकदम झकासच........ तंगाट :)

    उत्तर द्याहटवा
  2. बबन नाव्ही तंगाट' Zakkaaaaazssssssssssssssssssssssssssssssssssssssss

    उत्तर द्याहटवा
  3. @ भुंगा
    दादा खूप दिवसातून अभिप्राय नोंदवला तुम्ही बरे वाटले खूप
    असेच प्रेम राहूद्यात
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. @ आशिष आणि सागर
    धन्यवाद मित्रहो
    एकदम झकास माणूस होता राव बबन
    नसताच तंगाट हा हा

    उत्तर द्याहटवा
  5. @ Binary बंड्या @ अभिषेक @माधव @ THE प्रोफेट

    मित्रानो तुम्ही प्रथमच माझ्या ब्लॉगवर प्रतिक्रिया दिली आहे असे मला वाटले
    तुम्हाला हि पोस्त आवडली याचा मला आनंदच आहे
    असेच प्रेम राहूद्यात
    तुमच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  6. @ आनंद
    आयला लेखसुद्धा तंगाट का राव
    बाकी तुमच्या मित्रातील कोणी तल्ली झालाच तर तुलाही या बबनची नक्कीच आठवण येणार बघ

    उत्तर द्याहटवा
  7. बबन नाव्ही ???? ..........
    'बबन नाव्ही ........... तंगाट' !!

    विक्रमा, काढ आता माझ्या मुठभर लेमन गोळ्या.. ;-)

    सुस्साट झालाय लेख !!

    उत्तर द्याहटवा
  8. वाहव्वा... हे तंगाटच्या ऐवजी सारखं तट्टांग असं वाचतोय मी... पण नविन शब्द मिळाला कि राव.. चला आता तो पण फेमस करु... ब्येसच लिवलय...

    उत्तर द्याहटवा
  9. @ हेरंब
    'मुठभर लेमन गोळ्या बबन पे उधार रह्या '

    माझ्यातील वाटा हवा असेलतर देतो तुला भेट एकदा ;)

    उत्तर द्याहटवा
  10. @ सौरभ
    तंगाटच्या ऐवजी सारखं तट्टांग काय पोस्ट वाचता वाचता 'तंगाट' झाला होतास का हा हा
    बाकी शब्द फेमस होण्यासारखा आहे करा सुरवात :)

    उत्तर द्याहटवा
  11. Vikram chan athavan lihali ahes.ani Baban changalach rangavala ahes...Ajun kahi ashach athavani asatil tar jaur liha vachayala anand vatel..Chan jamale ahe Agadi Tanga Palati Ghoda farar....

    उत्तर द्याहटवा
  12. वाह... तंगाट झालो म्या बी..लय झ्याक झालीय पोस्ट

    उत्तर द्याहटवा
  13. अरे लय भारी ....मस्त झालाय...आमच्या गावात असाच एक नमूना होता सतत तंगाट असायचा. . .अन् त्याच फेमस वाक्य असायच " आपण कोणाच खात नाय, आपण कोणाची पीत नाय,. . .वाघ आहे...वाघ आहे. . .वाघ".....शरद पवारांपासुन ते ठाकरे पर्यंत सगळे याचे मित्र अस तो समजायचा ....मग गाडी एकदा टल्ली झाली की सुसाट सुटायची. . .अगदी भन्नाट किस्से सांगायचा !!!

    उत्तर द्याहटवा
  14. @ पव्या
    लय दिसातून प्रतिक्रिया दिली राव
    कुठ गायब हायस सायबा ?

    आणि हो नक्कीच बाकी अनुभव हि लिहण्याचे प्रयत्न करेल जसे जमेल तसे
    बाकी टांगा पलटी,घोडे फरार हा हा
    एकदम भारी बर का
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  15. @ सुहास
    हा हा धन्यवाद साहेब
    असेच तंगाट राहू नका ;)

    उत्तर द्याहटवा
  16. @ मनमौजी
    अरे असे वल्ही सगळीकडेच बघायला भेटतात थोड्याफार फरकाने
    बाकी असा एक वल्ही इथे गावातही आहे जमले तर त्याच्याबद्दल हि लिहतोच
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  17. अरे मस्त. नवीन शब्द मिळाला. बबन नाव्ही तंगाट!!! पोस्ट पण तंगाट.

    एकदा माझ्या मित्र ३१ डिसेंबर तंगाट होऊन घरी गेला. घरच्यांनी झाडायला सुरूवात केली तर तंगाट म्हणतो कसा "आज नवीन वर्ष आहे म्हणून पियालो ना? रोज रोज पितो काय? दिमाग खराब करू नका नायतर रोज पिऊन येन." घरच्यांची वाचा बसली होती.

    उत्तर द्याहटवा
  18. @ सिद्धार्थ
    नवीन शब्दाचा वापर सुरु करा आता ;)
    बाकी मित्र अजूनही फक्त नवीन वर्ष साजरे करण्यासाठीच घेतो का ????

    उत्तर द्याहटवा
  19. भारीच रे... आपल्याला बी ही पोश्ट तंगाटच वाटली.. मजा आली वाचतान्ना!!! आजून आसेच काही प्रसंग शेअर करीत रहा... पहिल्याच प्रयत्नात तू सगळ्यांना तंगाटच करून सोडलंय भावा!!

    उत्तर द्याहटवा
  20. He lihayachya aadhi baban nhavi chi parvangi ghetli ka naytar baban nhavi bolel bibijichya porane royalty dilinaay phirbhi babban nhavi tangaat...

    उत्तर द्याहटवा
  21. Kaay vikram rao tumhi hi maharashtrat rahun maharashtra sathi ladhnarya netyansathi tumchaya tondi he udgar! Kontyahi netya baddal boltana tyacha purnpane khulasa karun dyava mhanje shankana jaga urnar nahi mag te konihi asot (Shivsena,Manse athva congress)tumhi mhanta ki ya foto baddal tyani swatach khulasa dyava mag tumhi post kontya aadhare takalit agodar yacha khulasa kara

    KA UGACH TIME PASS MHANUN

    उत्तर द्याहटवा
  22. Mastach, Ekdam Zaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaaakas

    Pan ho ha lekh lihaychya aadhi tyachi parvangi ghetlit ka? Nahitar tumchya navane hi aarolya aaiku yetil, Hahahahhahahhhhhaaaaaaaaaaaaaaa

    उत्तर द्याहटवा