रविवार, ३ एप्रिल, २०११

याच क्षणाची तर वाट पाहत होतो ...

काल श्रीलंकेला हरवून आपण क्रिकेटमधील विश्वविजेतेपद मिळवले. आपला त्याच्यावर हक्क होताच अजून किती दिवस वाट पहायची होती ? सचिन सारखा महान खेळाडू संघात असूनहि आपल्याला हे मागील ६ विश्वकप मालिकांमध्ये साध्य करता आले नव्हते.तसेच सचिनच्याही मनात याची सल होतीच. या मालिकेपूर्वी धोनी बोललाही होताच कि 'सचिनसाठी आम्हाला हा कप जिंकायचाच आहे' आणि मालिकावीराचा पुरस्कार मिळवल्यावर युवी सुद्धा म्हणाला कि 'माझी सर्व कामगिरी हि सचीनसाठीच होती'.
 भारतीय संघातील प्रत्येक खेळाडू आणि तमाम क्रिकेटप्रेमीना सचिनच्या  कारकिर्दीत विश्वकप जिंकलेला पहायचा होता.तसे या लंकेमुळेच  हे स्वप्न १९९६ मध्ये भंगले होते आणि आता त्याची परतफेड करण्याची वेळ आली होती व ती जुनी देणी 'सुत'समेत वापस केलीही. अंतिम सामना जिंकल्यावरचा देशाचा आणि सचिनचा जल्लोष पाहता  'याच क्षणाची तर वाट पाहत होतो' हे तर त्यांना सांगायचे नाही न असे वाटून गेले.
  विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते आपल्या खेळाडूंच्या चेहऱ्यावरून दिसून येत होते. युवीला आणि भज्जीला त्यांचे अश्रू रोखता आले नाहीत सचिनचा आनंद गगनात मावत नव्हता जणू 'यासाठीच केला होता सर्व अटहास' असेच त्याला भासवायचे  होते.
 १९८३ चा विश्वकप जिंकलेला मी पाहिलेले नाही परंतु विश्वविजेते होण्याचा आनंद काय असतो ते मी काल अनुभवले आहे त्या क्षणाचा  आनंद घेतला आहे आणि मी त्या इतिहासातील सोनेरी पान  होणारया    क्षणाचा भाग्यवंत साक्षीदार आहे :)
त्यामुळे  मला याचा अभिमान असेल - ' I was alive when India lifted the world cup २०११'.
(काही छायाचित्रे )
 

६ टिप्पण्या:

  1. हो ना यार, कसली अमुल्य भेट दिली आहे की आनंदाने नाचावसं वाटत. खुप खुप मस्त वाटतंय रे..शब्द नाहीत तो आनंद व्यक्त करायला.

    भारतीय संघाचे खुप खुप अभिंदन...

    उत्तर द्याहटवा
  2. आनंदाश्रू शेअर केलेत या टीमबरोबर. हा क्षण कधीच विसरता येणार नाही.

    उत्तर द्याहटवा
  3. समाधानाचे आणि १००% तृप्तीचे क्षण क्वचित अनुभवायला मिळतात. सचिनच्या हाती विश्वकप पाहिला तो क्षण असाच दुर्मिळ. संपूर्ण समाधान आणि तृप्तीचा.

    उत्तर द्याहटवा