सोमवार, ११ एप्रिल, २०११

मास्टर माइंड... अरविंद केजरीवाल

जन लोकपाल विधेयकासाठी आण्णा हजारे यांनी जे आंदोलन जंतर मंतर येथे केले त्याला अखेर यश मिळाले त्यामुळे पूर्ण देशात आण्णांचा गाजावाजा सुद्धा झाला परंतु हे सर्व होत असताना एक साध्या वेशातील उत्कृष्ट इंग्लिश आणि हिंदी बोलणारा कार्यकर्ता लक्ष वेधून घेत होता.त्याबद्दल थोडी अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांचे नाव अरविंद केजरीवाल आहे असे समजले तेच ते केजरीवाल ज्यांना २००६ साली सामाजिक कार्यासाठी मैग्सेस पुरस्कार मिळाला आहे.
 अरविंद केजरीवाल यांनी माहितीच्या अधिकारामध्ये खूप मोठे काम केले आहे आणि जन लोकपाल विधेयाकासाठीची व्युव्हरचना सुद्धा त्यांचीच होती त्यांनीच आण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांना या आंदोलनात भाग घ्यायला लावला व आंदोलन दिल्लीमध्ये घेऊन गेले.त्याचा व्हायचा तो परिणाम झाला नाहीतर आण्णांनी महाराष्ट्रामध्ये असे आंदोलन करून पाहिजे असा परिणाम साध्य झाला नसता. केजरीवाल यांच्यामुळेच हे आंदोलन फेसबुक,ट्विटर तसेच सर्वत्र नेटवर पोहचले.सरकार बरोबरील वाटाघाटीतहि केजरीवाल सर्वात पुढे होते एवढेच काय पत्रकार परिषदमध्ये  सुद्धा ते आण्णांना मार्गदर्शन करताना दिसून येत होते.
 केजरीवाल यांच्याबद्दल अजून जाणून घ्यायचा प्रयत्न केल्यावर समजले कि त्यांनी १९८९ साली आईआईटी खडगपूर येथून मेकेनिकलची बीटेक डिग्री घेतली आहे आणि ते मुळचे हिसार हरियाना येथील आहेत.त्यानंतर ते १९९२ मध्ये सिव्हील सर्विसेस मध्ये गेले आणि दिल्लीचे सहायक आयकर आयुक्त झाले.त्यावेळी त्यांचा खरा संबंध सरकारी व्यवस्थेशी आला आणि तेथूनच त्यांचा संघर्ष सुरु झाला.आयकर विभागात चालू असलेल्या गैरकारभाराला आळा घालण्याचा त्यांनी प्रयत्न केला त्यामुळे त्याची बदली करण्यात आली आणि त्यामुळे त्यांचे मन सरकारी नोकरीवरून उठले व ते सामाजिक कार्यात भाग घेऊ लागले त्यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून भ्रष्टाचाराची भरपूर प्रकरणे बाहेर काढली आणि त्याच वेळी त्यांनी लोकपाल विधेयक पास करून घेण्यासाठीचे प्रयत्न चालू केले परंतु सरकार घेऊन येत असलेले लोकपाल विधेयकात खूप त्रुटी आहेत हे लक्षात आल्यावर त्यांनी जन लोकपाल बिलाची मागणी लावून धरली आणि त्याचा मसुदा तयार केला आणि आण्णा आणि समविचारी कार्यकर्त्यांना घेऊन जंतर मंतरवर आंदोलन केले. त्या आंदोलनाला यश मिळाले असून  लवकरच जन लोकपाल विधेयक पास होईल अशी आशा करूयात आणि त्यामुळे देशातील भ्रष्टाचार कमी होऊन भ्रष्टाचारी लोकांना शिक्षा मिळावी हीच इच्छा.
 केजरीवाल यांच्या सारख्या लोकांमुळेच हे आंदोलन एवढे भव्य रूप घेऊ शकले आणि त्याला यश मिळू शकले साधी राहणी आणि उच्च विचार असणारया या सामाजिक कार्यकर्त्याला सलाम !

१३ टिप्पण्या:

 1. chan mahiti milavalis mitra.. mala hi kejariwal yanchya sandarbhat far utsukta hoti.. kharach mastermind ... kejariwal aani vikram bhau tumhi suddha ...

  उत्तर द्याहटवा
 2. @amol Raje dhanyvad abhipray dilyabaddal :)

  malahi kejariwal yanchyabddal utstukta hotich tyamule mi milaleli mahiti share keli aani aamhi kasale ho mastermind :0

  उत्तर द्याहटवा
 3. अरविंद केजरीवाल यांना आपल्यासारख्या सामान्य लोकांची व आपल्या पाठिंब्याची गरज आहे या पोस्ट वरून मी सर्वाना अपील करतो कि आपण सर्वांनी मिळून जसे जमेल तसे योगदान या कार्यात दिले पाहिजे कोणी सरकारी अधिकारी अथवा कोणी राजकीय व्यक्ती आपले, राष्ट्राचे, अथवा इतर कोणाचे शोषण करत असेल तर आपण गप्प बसने महणजे या लोकांच्या वाईट विचारांना एक प्रकारे खतपाणीच घालण्यासारखे आहे, आणि त्यांना खतपाणी घालणे महणजे आपल्या येणाऱ्या पुढील पिढीसाठी आपण काय आदर्श घालून द्य्याचा याचा विचार आपला आपल्यालाच करावा लागणार आहे. या लोकशाही असलेल्या देशात प्रत्याकालाच आपले वेगळे म्हणणे मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे परंतु योग्य व अयोग्य यामध्ये जर फरकच उरला नाही तर आपण कायदे, त्यांना चालवणारे, सरकारे आणि जनतेच्या जीवावर मोठे होणारे आणि त्यांचेच शोषण करणारे हेच जर आपल्या समोरील आदर्श होणार असतील तर आपले मनुष्य जीवन सार्थक होऊ शकणार नाही. आपल्या प्रत्येक छोट्यातल्या छोट्या गोष्टीचा सुधा फरक पडतो महणून आपल्याला जसे जमेल तसे हे आंदोलन आपण चालवले पाहिजे पुढे नेले पाहिजे आणि राष्ट्राच्या निर्मितीमध्ये आपला खारीचा वाट प्रत्याकानेच उचलला पाहिजे तरच राष्ट्र निर्माण होऊ शकेल या लुटारू लोकांनी फक्त एकाच गोष्ट केली ती म्हाणजे या देशातील लोकांना कधी त्यांनी एकत्र जमा होऊ देले नाही. कारण त्यांना माहिती आहे जर का या देशातील लोक एकत्र आले तर मात्र आपले काहीही चालणार नाही खऱ्या अर्थाने त्या वेळी लोकशाही राबवावी लागेल आपली किंमत कमी होईल आणि आपल्याला या जनेतेचे शोषण करण्याची संधी मिळणार नाही, हे त्या राजकारणी लोकांना माहिती आहे आपल्यापेक्षा मोठी शक्ती जर डोके वर काढू लागले तर त्यांना ठेचण्यासाठी हे सदैवे तत्पर असतात, याचे इतिहासात अनेक दाखले मिळतात परंतु हि जाणता जोपर्यंत एक होत नाही तोपर्यंत हे असेच चालणार याला दुसरा पर्याय नाही महणून आपण आपले वर्तमान व भविष्य उज्वल बनवण्यासाठी फक्त पैसा कमावणे व तो आपल्यासाठी व आपल्या पुढील पिढीसाठी साठहून ठेवणे एवढेच पुरेशे नसून आपल्याला एक चांगले राष्ट्र ,चांगली माणसे ,आणि चांगले शेजारी ,सुरक्षित जीवन ,सन्मान,प्रगतीसाठी मदतीचा हात यांची खऱ्या अर्थाने गरज आहे व या सर्वांशिवाय चांगल्या समाजाची रचना होऊ शकत नाही.
  तर उठा जागे व्हा आपले योगदान या कार्यात द्या जसे जमेल तसे जेवढे जमेल तेवढे कारण हा संघर्ष तुमच माझा आपल्या सर्वांचा आहे. एका व्यक्ती विरुद्ध व्यक्तीचा नाही. सत्ते विरुद्ध सत्तेचा नाही. तर वाईट गोष्टीन विरुद्ध चांगल्या गोष्टींचा आहे.
  मोहन गर्जे
  हडपसर पुणे २८

  उत्तर द्याहटवा
 4. KEJRIWAL YANCHYA KARYANE APAN PRABHAVIT ZALO AHOT. APAN PAN YA KARYAT UDI GHYAVI ASE MANAPASUN VATATE pAN GHARACHI PARISTITI ANI JABABDARI YANE MEE PURN PICHUN GELO AHOT. MAZYA SUBHECHYA KEJRIWAL YANCHYA BAROBAR AHET.

  उत्तर द्याहटवा
 5. छान माहितीबद्दल धन्यवाद.
  parth-sarathi.blogspot.in

  उत्तर द्याहटवा