शुक्रवार, २८ ऑगस्ट, २००९

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक अष्टपैलू व्यक्तिमत्व होय. त्यांच्या विषयी माझ्या मनात कायमच एक आदराचे स्थान राहिले आहे त्यांच्याबद्दलचे माझे मत येथे व्यक्त करण्याचा प्रयत्न करत आहे
शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट श्री बाळासाहेब ठाकरे एक असे नाव ज्याच्याशिवाय महाराष्ट्राचा इतिहास यापुढे लिहला जाऊ शकत नाही.
गेली ५० वर्ष ते आपल्या वाणीने,लेखणीने आणि कुंचल्याने महाराष्ट्र गाजवत आहेत त्यांची भाषा तर 'ठाकरी भाषा' म्हणुन ओळखली जाते तसे असले तरी एक व्यंगचित्रकार असल्यामुळे त्यांच्या भाषणात मिश्किल्पनाही जाणवतो.

स्वता एक कलावंत असल्यामुळे इतर राजकीय नेत्यांची नक्कल काढतात त्यावेळी श्रोते हास्याच्या कारंज्यात बुडून जातात .
त्यांचे शब्द म्हणजे एक धगधगता निखारा असतो ,त्यांचे राष्ट्रवादी विचार , हिन्दुत्व आणि देश्द्रोह्यांच्या वर केलेला हल्ला वातावरण बदलून टाकतात आणि जनसागर मंत्रमुग्ध होउन जातो
महाराष्ट्राच्या जडणघडणीत बाळासाहेब यांचे योगदान म्हणजे 'माईलस्टोनच'.
कलेपासुन खेळापर्यंत,राजकरणापासून समाजकार्यापर्यंत, अर्थकारण पासून ओद्योगिकीकरणापर्यंत , चित्रकलेपासून नाटक - चित्रपटापर्यंत , साहित्यापसून संस्कृतीपर्यंत ,मराठीपासून हिदुत्वापर्यंत ...एक ही क्षेत्र असे नाही की ज्याला शिवसेनाप्रमुखांचा परिस्पर्ष झालेला नाही.
महाराष्ट्राला बाळासाहेबांचीओळख झाली ती त्यांच्या धडाकेबाज व्यंगचित्रामधून .
लोकांना विचार करायला लावणारी,त्यांच्या मनाचा ठाव घेणारी व्यंगचित्रे बाळासाहेबांनी काढली.या व्यंगचित्रातून ते निडरपने बड्यानचे वाभाडे काढत असत त्यामुळे ती अधिक प्रभावी ठरत होती.
शिवसेनाप्रमुखांचे स्फूर्तीस्थान म्हणजे छत्रपति शिवाजी महाराज.
जुलमी मोगल सत्तेशी टक्कर देऊन शिवाजी महाराजानी हिन्दवी स्वराज्य निर्माण केले.त्याच धर्तीवर जुलमी कांग्रेस राज्यकर्त्यान विरुद्ध संघर्ष करीत बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना करून ३० वर्षात सत्ता खेचून आणली.

एक व्यक्ति स्वताच्या करिश्म्यावर राजकरणातून समाजपरिवर्तनाचे एवढे प्रचंड काम करू शकतो हे त्यानी दाखवून दिले आहे .
शिवरायांचा कर्मयोगी आणि महर्षि विश्व्मित्राचा कर्मठपणा या गुणांचा संगम बाळासाहेबांच्यात पहायला मिळतो .
गर्विष्ट देवदेवतांना आव्हान देऊन विश्वमित्रानी प्रतिस्रुष्टि निर्माण केलि त्याच धर्तीवर दांभिक कांग्रेसला आव्हान देऊन बाळासाहेबांनी शिवसेनेच्या माध्यमातून राजकीय प्रतिस्रुष्टि निर्माण करून शिवरायांचा लढाऊ बाणा वापरून राजकरणातून समाजपरिवर्तनाचे महान कार्य केले आहे.
विश्व्मित्राने नारळ निर्माण केला असे मानले जाते नारळाला वरुण कठोर कठीण कवच आणि आतून गोड़ खोबरे त्यानंतर अमृतासारखे गोड़ पाणी असते.
बाळासाहेबांचे तसेच आहे वरुण कठोर पण आत हळवेपणा. भावनाप्रधान आणि कठोरता याचा संगम विरळच असतो.

राजकारणाच्या पसारयात हाच एक असा नेता आहे ज्याने कधीही आपल्या शिवसैनिकाला दगा दिला नाही.जबाबदारी स्वता स्वीकारली.
'मी असे बोललोच नाही' हे वाक्य बाळासाहेबांनी गेल्या ५० वर्षात कधी काढला नाही
मग ते बाबरी पतन असू दया नाहीतर दुसरे काहीही
बाळासाहेबांनीच महाराष्ट्रातील मराठी माणसाचा आत्मविश्वास जागा केला. म्हणुनच मराठी मध्यमवर्गाला बाळासाहेबांविषयी विशेष प्रेम होत आणि अजुनही आहे .
ज्याच्या हाकेला काही तासातच लाखो लोक जमतील असा एकमेव नेता महाराष्ट्रात आहे आणि तो म्हणजे फक्त शिवसेनाप्रमुख श्री बाळासाहेब ठाकरे.
शिवसेनेच्या माध्यमातून बाळासाहेबांनी गरिबांना राजकारणात मोठी पदे आणि प्रतिष्ठा मिळवून दिली. कांग्रेसी राजकारणात मागे पडलेले किंवा पडले असते अशा बहुजन समाजातील गरिबांच्या मनात बाळासाहेबांनी राजकीय महत्वकांक्षा निर्माण केलि आणि वाढवित नेली .
शिवसेनाप्रमुखांचे आशीर्वाद आणि स्पर्श लाभला तर जीवनाचे सोने होते याची कितीतरी उदाहरणे आज महाराष्ट्रात आहेत.
बाळासाहेबांचे हिन्दुत्व म्हणजे प्रखर राष्ट्रायीत्व हे कधीही लपून राहिलेले नाही. त्यांनी कधीही राष्ट्रवादी मुस्लिमांचा अपमान केला नाही उलट अशाच राष्ट्रवादी मुस्लिमांची देशाला गरज आहे असे सांगितले .
बाळासाहेबांनी ५० वर्षात खुप वादळे निर्माण केलि आणि खुप वादळे झेललीसुद्धा परंतु ते कधीही डगमगले नाहीत
एक सामान्य नागरिक ते शिवसेनाप्रमुख आणि शिवसेनाप्रमुख ते जगभर हिंदूंचे हिंदूहृदयसम्राट अशी झंजावती वाटचाल करीत असताना त्यानी स्वतातिल माणुस कटाक्षाने जपला.

अशा या माझ्या दैवताला आई जगदंब उदंड आयुष्य देवो हीच तिच्या चरणी प्रार्थना
जय हिंद
जय महाराष्ट्र
Enhanced by Zemanta

६ टिप्पण्या:

  1. खूपच छान लेख विक्रम

    जय महाराष्ट्र

    उत्तर द्याहटवा
  2. खुपच छान लेख लिहिलात अत्यंत सुरेख आणि मार्मिक विवेचन केलेस.

    उत्तर द्याहटवा
  3. शिवरायानंतर पूजन करावी अशी हि एकच व्यक्ती आहे ज्यांनी मराठी माणसात हिंदुत्व अबाधित राहण्यासाठी आयुष्य वेचले . खुपच सुंदर लेख आहे .

    उत्तर द्याहटवा