काल रात्री जेवण करून नेहमीप्रमाणे नेटवर होतो. ओर्कुटवर होतो, माझा आवडता समूह 'मुक्तपीठ' यावर टाइमपास करत बसलो होतो.
बसल्या बसल्या समूहातील धागे चाळत होतो आणि रात्री एका सभासदाने एक नवीन धागा सुरु केलेला दिसला.
धाग्याचे शीर्षक होते 'MNS hoarding forgets non-Marathi heroes' आणि मला थोडे आश्चर्य वाटले आणि थोडा धक्का हि बसला.(http://news.rediff.com/report/2009/nov/26/anniversary-26-11-mns-hoarding-forgets-non-marathi-heroes.htm)बसल्या बसल्या समूहातील धागे चाळत होतो आणि रात्री एका सभासदाने एक नवीन धागा सुरु केलेला दिसला.
ती बातमी रेडीफ संकेतस्थळावरील होती त्यात असे नमूद केले होते कि मनसे कार्यकर्त्यांनी २६/११ तील शहिदांच्या श्रद्धांजलीसाठी जे पोस्टर्स लावले होते त्यात फक्त मराठी असणार्या शहीदांचीच छायाचित्रे लावण्यात आली होती अमराठी शहिदांची नाही. हे वाचून आणि पाहून मला खरच धक्काच बसला.
जे देशासाठी आपल्या मुंबई,महाराष्ट्रासाठी हुतात्मा झाले ते मराठी-अमराठी कसे धरू शकतात ?
शहीद उन्नीकृष्णन आणि बिश्त हे स्वर्गातून म्हणत असतील यासाठीच केले होते का बलिदान ?कि स्वर्गात सर्व मराठी शहिदांची छाती या गोष्टीने गर्वाने फुलली असेल ?
हि गोष्ट ज्या कोणी कार्यकर्त्याने केली असेल त्यामुळे तळपायाची आग मस्तकात जाते तसेच त्याच्या बुद्धीची कीव येते.
यामध्ये त्या पक्षाचा दोष नसेल असे समजून जरी चाललो तरी अशा गोष्टी घडू नयेत याकडे त्यांनी लक्ष द्यायला हवे आणि अशा कार्यकर्त्यांना समज द्यायला हवी.
निदान अशा ठिकाणी तरी मराठी अमराठी हा वाद आणू नये.जेव्हा देशाचा प्रश्न येतो तेव्हा अश्या सगळ्या बाजूला ठेवून पहिला विचार देशाचा व्हायला हवा ..................देशासाठी शहीद होणारा प्रत्येक वीर हा प्रथम भारतीय असतो ..तो कुठल्याही धर्म जात किंवा प्रांताचा नसतो !!!!
जय हिंद
जय महाराष्ट्र
राज ठाकरेला भैय्या आणि भारतीय ह्यात फरक करता आला नाही की आपण गरजेपुरते भारतीय आणि इतरवेळी अमराठी असा स्वार्थी विचार करतो आहोत?
उत्तर द्याहटवा