बुधवार, १० फेब्रुवारी, २०१०

एक उपेक्षित आद्यक्रांतिकारक... उमाजी नाईक

हिंदुस्तानच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद  झाली, काही तशाच राहून गेल्या.सन १८५७ च्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले  अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग १४ वर्ष सळो कि पळो करून सोडणारा व  सर्व प्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा  महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर आद्यक्रांतिकारक नरवीर ठरला गेला.तो म्हणजे 'उमाजी नाईक'.
अशा आद्यक्रांतीकाराचा स्मृतिदिन नुकताच ३ फेब्रुवारी रोजी झाला.परंतु  रामोशी-बेरड समाजाशिवाय कोणाच्याच नेहमीप्रमाणे तो लक्षात राहिला नाही.आणि  उमाजी नाईक फक्त रामोशी-बेरड समाजापुरता सीमित राहून गेल्यासारखे वाटू  लागले.
क्रांतीकारांचा आदर आणि त्यांचे स्मरण सर्वच जाती धर्मातील लोकांनी केले  पाहिजे मग ते कोणत्या का जातीचे व धर्माचे असेनात.मग हे उमाजी नाईक असे  उपेक्षित का राहून गेले हे समजेनासे झाले आहे.तसे पाहण्यास गेले तर या  क्रांतीकाराबद्दल आपल्या समाजाला माहितीही   खूप कमी आहे.त्यामुळेच ते  उपेक्षित राहिले असावेत.तर चला थोडेसे जाणून घेऊया या  आद्याक्रांतीकाराबद्दल ....
'मरावे परि क्रांतीरूपे   उरावे' अशी उक्ती आहे.ती आद्याक्रांतीकारक उमाजी  नाईक यांच्याबद्दल तंतोतंत जुळते.ते स्वताच्या कार्याने एक दीपस्तंभ ठरले  आहेत.त्यांचा गौरव करण्यापासून इंग्रज अधिकारीहि स्वताला रोकु शकले  नाहीत.इंग्रज अधिकारी रोबर्ट याने १८२० ला इस्ट इंडिया कंपनीला लिहिताना  म्हंटले आहे,उमजीचा रामोशी समाज इंग्रजांविरुद्ध तिरस्काराने पेटला असून तो  कोणत्या तरी राजकीय बदलाची वाट पाहत आहे.जनता त्यांना मदत करत असून कोणी  सांगावे हा उमाजी राजा होऊन छत्रपती शिवाजीसारखे राज्य स्थापणार नाही?
तर टोस म्हणतो,उमाजीपुढे  छत्रपती शिवरायांचा आदर्श होता.त्याला फाशी दिली  नसती तर तो दुसरा शिवाजी झाला असता.
हे केवळ गौरावौदगार नसून हे सत्य आहे ... जर इंग्रजांनी कुटनीती  आखली नसती  तर कदाचित तेंव्हाच स्वातंत्र्य लाभले असते.
नरवीर उमाजी नाईक यांचा जन्म रामोशी-बेरड समाजात लाक्षिमीबाई  व दादोजी  खोमणे यांच्या पोटी ७ सप्टेंबर १७९१ रोजी पुणे जिल्ह्यातील भिवडी येथे  झाला.उमाजीचे  सर्व कुटुंब पुरंदर किल्ल्याच्या संरक्षणाची जबाबदारी  पार  पाडत  होते.त्यामुळेच त्यांना    नाईक हि पदवी मिळाली.उमाजी जन्मापासूनच  हुशार,चंचल,शरीराने धडधाकट,उंचपुरा,करारी त्यामुळे त्याने पारंपारिक रामोशी  हेरकला लवकरच आत्मसात केली होती.जसा उमाजी मोठा होत गेला तसा त्याने  दादोजी नाईक यांच्याकडून दांडपट्टा ,तलवार,भाते,कुर्हाडी,तीरकामठी ,गोफणी  चालवण्याची कला अवगत केली.या काळात इंग्रजांनी हिंदुस्तानात आपली सत्ता  स्थापन करण्यास सुरवात केली.हळू हळू मराठी मुलुख हि जिंकत पुणे ताब्यात  घेतले.१८०३ मध्ये पुण्यात दुसर्या बाजीराव पेशव्यास स्थानपन्न केले.आणि  त्याने इंग्रजी पाल्य म्हणून काम सुरु केले.सर्वप्रथम त्याने इतर सर्व  किल्ल्याप्रमाणे पुरंदर किल्ल्याचे संरक्षणाचे काम रामोशी समाजाकडून काढू  घेऊन आपल्या मर्जीतील लोकांकडे दिले.त्यामुळे रामोशी समाजावर उपासमारीची  वेळ आली.जनतेवर इंग्रजी आत्त्याचार वाढू लागले.अशा परिस्थतीत करारी उमाजी  बेभान  झाला.छत्रपती शिवरायांना श्रद्धा स्फूर्तीचे स्थान देत त्याने  त्यांचा आदर्श घेऊन स्वताच्या आधीपात्त्याखालील स्वराज्याचा पुकार करत  माझ्या देशावर  परकीयांना राज्य करू देणार नाही, असा पण करत विठुजी  नाईक,कृष्ण नाईक,खुशाबा रामोशी,बाबू सोल्स्कर यांना बरोबर घेऊन कुलदैवत  जेजुरीच्या श्री खंडोबारायला भंडारा उधळत शपथ घेतली व इंग्रजांविरोधात  पहिल्या बंडाची गर्जना केली.
इंग्रज,सावकार,मोठे वतनदार अशा लोकांना  लुटून गोरगरिबांना आर्थिक मदत  करण्यास सुरवात केली.कोणत्याही स्त्रीवर अत्याचार ,अन्याय झाल्यास तर तो  भावासारखा धावून जाऊ लागला.इंग्रजांना त्रास दिल्यामुळे उमजीला १८१८ ला एक  वर्ष तुरुंगवासाची शिक्षा सरकारने दिली.परंतु तो काळ सत्कारणी लावत त्याने  त्याकाळात लिहिणे वाचणे शिकले.आणि सुटल्यानंतर इंग्रजांविरुद्धाच्या  कारवाया आणखी वाढल्या.उमाजी देशासाठी   लढत असल्याने जनताही त्याला साथ देऊ  लागली आणि इंग्रज मेटाकुटिला आले.
उमाजीला   पकडण्यासाठी इंग्रज अधिकारी मोकीन टोस याने सासवड-पुरंदर च्या  मामलेदारास फर्मान सोडले.मामलेदार इंग्रज सैन्य घेऊन पुरंदरच्या  पश्चिमेकडील एका खेड्यात गेला असता तेथे त्यांच्यात आणि उमाजीच्या सैन्यात  तुंबळ युद्ध झाले आणि इंग्रजांना पराभव स्वीकारावा लागला.उमाजीने ५ इंग्रज  सैन्याची मुंडकी कापून मामलेदाराकडे पाठवली.त्यामुळे इंग्रज चांगलेच  धास्तावले.उमाजीचे सैन्य डोंगरात टोळ्या करून राहत असत एका टोळीत जवळ जवळ ५  हजार सैन्य होते.
१८२४ ला उमाजीने भाबुड्री येथील इंग्रज खजिना लुटून तो देवळाच्या  देखभालीसाठी जनतेला वाटला होता.३० नोव्हेंबर १८२७ ला इंग्रजांना त्याने  ठणकावून सांगितले कि,आज हे एक बंड असले तरी असे हजारो बंड सातपुड्यापासून   सह्याद्रीपर्यंत उठतील व तुम्हास जेरीस आणतील,फक्त इशारा देऊन न थांबता  त्याने इंग्रजांना सळो कि पळो करून सोडले.२१ डिसेंबर १८३० ला उमाजीनी आपला  पाठलाग करणाऱ्या इंग्रज अधिकारी बोईड आणि त्याच्या सैन्याला मांढरदेवी  गडावरून बंदुका,गोफणी चालवून घायाळ करून परत पाठवले होते.आणि काहीचे प्राण  घेतले होते.
 १६ फेब्रुवारी १८३१ रोजी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने  प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते,इंग्रजी नोकऱ्या  सोडाव्यात.देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि  इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी.इंग्रजांचे खजिने लुटावेत.इंग्रजांना  शेतसारा,पट्टी देऊ नये.इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार  आहे.त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार  त्यांना शासन  करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला  होता.तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
 या सर्व प्रकारामुळे इंग्रज गडबडले.आणि त्यांनी उमाजीला  पकडण्यासाठी  युक्तीचा वापर केला.मोठे सावकार,वतनदार यांना आमिषे दाखवण्यात आली  उमाजीच्या  सैन्यातील काहीना फितूर करण्यात आले.त्यातच उमाजीने एका स्त्रीचे अपहरण  केले म्हणून हात कलम केलेला काळोजी नाईक इंग्रजांना जाऊन मिळाला.इंग्रजांनी  उमजीची माहिती देणाऱ्यास १० हजार रुपये   आणि चारशे  बिघे जमीन बक्षीस  म्हणून देण्याची घोषणा केली.तसेच नाना चव्हाण हि फितूर झाला आणि त्यांनी  उमाजीची सर्व गुप्त माहिती इंग्रजांना दिली.
१५ डिसेंबर १८३१ रोजी भोर तालुक्यातील उतरोली या गावी रात्री बेसावध असताना  उमाजीला इंग्रजांनी पकडले.त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला चालवण्यात आला.आणि  पुण्यात मामलेदार कचेरीतील एका काळ्या खोलीत ठेवण्यात आले.अशा या खोलीत  उमाजी असताना त्याला पकडणारा इंग्रज अधिकारी मोकीन टोस दररोज महिनाभर  त्याची माहिती घेत होता.त्यानेच उमाजीची सर्व माहिती लिहून ठेवली.
आहा या नरवीर उमाजीस न्यायाधीश जेम्स टेलर याने दोषी ठरवून फाशीची शिक्षा  सुनावली.३ फेब्रुवारी १८३२ ला पुण्याच्या खडकमाळ आळी येथील मामलेदार कचेरीत  वयाच्या ४१ व्या वर्षी देशासाठी सर्वप्रथम नरवीर उमाजी नाईक हसत हसत  फासावर चढला.अशा या उमाजीचे प्रेत इतरांना दहशत बसावे म्हणून कचेरीच्या  बाहेर पिंपळाच्या झाडाला तीन दिवस लटकावून ठेवले होते.उमाजीबरोबर  इंग्रजांनी त्याचे साथीदार खुशाबा नाईक आणि बापू सोळकर यानाही फाशी दिली.
 अशा या धाडसी उमाजीनंतर   तब्बल  १३ वर्षांनी १८४५ ला क्रांतिकारक वासुदेव  बळवंत फडके जन्माला आले.त्यांनी त्यानंतर ३०० रामोशाना बरोबर घेऊन १८७९ साली इंग्रजांविरुद्ध पहिले बंड  केले..त्यावेळीही दौलती रामोशी हा त्या बंडाचा सेनापती होता.
अशा या आद्याक्रांतीकारक नरवीर उमाजी नाईक यांचा आपण विसर न पाडता  त्यांच्या कार्यास आणि स्मृतीस त्रिवार अभिवादन करूयात.

४० टिप्पण्या:

 1. मला नरवीर उमाजी राव नाईक यांच्या बद्दल खुप वाचायचे होते आधीपासुन आता खुप छान माहीती मिळाली ..
  जबरदस्त लेखन एक उपेक्षित योद्ध्याचे जबरदस्त माहीतीपुर्ण लेखन आज वाचालया मिळाले .....इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरात लिहुण ठेवावा असला इतिहास अशा रितीने अजुनही तुझ्या लेखनीतुन समोर यावा..........आणि हे काम निरंतर चालु ठेवावे

  अतुल काजळे

  उत्तर द्याहटवा
  प्रत्युत्तरे
  1. Khup Chaan Ankhin Kahi Lekh Milatil Ka ?........

   हटवा
  2. "जगणारे ते मावळे होते
   जगवणारा तो महाराष्ट्र होता
   पण स्व:च्या कुटुंबाला विसरून
   जनतेकडे मायेने हात फिरवणारा.
   तो "माझा आदयक्रांतिवीर उमाजी नाईक"" होता".
   ... only D.K.GROUP

   हटवा
 2. @अतुल काजळे
  धन्यवाद साहेब
  हा विषय आपल्यात झालेल्या मागील चर्चेमुळेच सुचला
  खरच उमाजींचे कार्य अजून लोकांपर्यंत पोहचलेच नाही :(

  उत्तर द्याहटवा
 3. फितुरीचा शापच आहे आपल्या देशाला.. :( .. या उपेक्षित देशभक्ताला मानाचा मुजरा..

  उत्तर द्याहटवा
 4. @हेरंब
  हो अगदी खरय फितुरीचा शापच आहे
  परंतु असा एका क्रांतिकारक इतिहासातून उपेषित राहतो हेही चांगले नाही
  असो धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 5. धन्यवाद विक्रम साहेब इतिहासास समोर आणल्याबद्दल.....

  उत्तर द्याहटवा
 6. विक्रम भाऊ, नेहमीप्रमाणेच एक जबरदस्त लेख.....परंतु तुमच्या ब्लॉगवर ही माझी पहिलीच प्रतिक्रिया.
  याचे कारणही तसेच.....बरेच असे क्रांतिकारक आहेत कि जे उपेक्षिले जात आहेत. तुम्ही नरवीर उमाजी नाईक यांच्याबद्दल हा जो अप्रतिम लेख लिहिलात त्याबद्दल सर्वप्रथम तुमचे कौतुक.

  इतिहास वाचत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती ही कि...."फितूरी"
  आपलीच मानसे, आपलीच माती तरीही फ़क्त चिरीमिरीसाठी आपलीच मानसे फितूरी करतात.
  इतिहास वाचताना जर-तरचे बरेच विचार येतात पण एक मात्र नक्की कि जर-तरला इतिहासात स्थान नसते.

  असो....

  असेच दर्जेदार लेख लिहित जा. तुमचे शब्दमेघ असेच बरसत राहू देत.
  जय शारदे.

  उत्तर द्याहटवा
 7. @नरेश
  साहेब आपली प्रतिक्रिया म्हणजे शाबासकी आहे आमच्यासाठी
  असो फितुरी हि पहिल्यापासूनच आहे,याने किती जनाचा घात केलाय देव जाने
  प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

  @चैतन्य
  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 8. pun aajparyant aamchya manavar dusara aadya krantikarak thopala gela aahe tyache kay?

  उत्तर द्याहटवा
 9. @अनामित
  क्रांतिकारक हे क्रांतिकारकच असतात सर्वांचाच मान राखला जावा या मताचा मी आहे

  उत्तर द्याहटवा
 10. आद्य थोर क्रांतिकारक उमाजी नाईक यांना मानवंदना...
  इतिहासात याबद्दल धडा होता ..भारतीय स्वातंत्र लढा..
  धन्यवाद विक्रम.. आठवण करून दिल्याबद्दल...

  उत्तर द्याहटवा
 11. भन्नाट ब्लॉग आहे. पहिल्यांदाच भेट देतोय. अप्रतिम माहितीलेख. एक छोटासा प्रश्न. लेखाच्या शेवटी लिहलय कि १८४५ साली क्रांतिवीर बळवंत फडके जन्मले आणि १८५७ ला बंड सुरु केले. १२व्या वर्षापासुनच त्यांचा बंडामधे सहभाग होता?

  उत्तर द्याहटवा
 12. @Saurabh
  त्यांनी १८५७ चा उठाव केला असे मला सांगायचे नव्हते लिहताना काही चूक झाली असेल तर माफी असावी .
  १८५७ च्या उठावाचा त्यांच्या मनावर खोल परिणाम झाला
  त्यांनी आपल्या बंडाचे पहिले निशाण धामारी या गावी २३ फेब्रुवारी, १८७९ रोजी फडकवले.
  परंतु सर्वजण १८५७ च्या उठावाला इंग्रजाविरुद्धाचे पहिले बंड समजतात त्या आधीही असे बंड झाले होते असे सांगण्याचा माझा प्रयत्न आहे.
  (चू. भू.दे.घे.)
  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 13. फारच छान लेख आहे. ही माहिती उपलबध करून तु चांगले काम केले आहेअ. आता हा क्रांतिकारक उपेक्षीत राहणार नाही.

  उत्तर द्याहटवा
 14. स्वतंत्रा आता पर्र्यत भारताचा जितका इतिहास मी वाचला आणि समजला. यात का कोणजाणी क्रन्तिकराना दुयम स्थान दिलगेल आहे. जगाचा कुठलाही देशाचा स्वतंत्राचा इतिहास वाचा तय देशाचा सामान्य नागरिका पासून क्रतिकारी पर्यत सर्वानी रक्तरंजित क्रन्ति करून स्वतंत्र मीळवल मजा मते भारत हा देश कुठलिही रक्तरंजित क्रन्ति होणेस नालायक आहे. उपक्षेत क्रन्तिकराची संख्या खुप आहे

  उत्तर द्याहटवा
 15. vikram- uttam lekh aahe..umaji naik yanna manacha mujraa..
  - vishal dixit

  उत्तर द्याहटवा
 16. khup sundar lekh aahe..............umaji naik he.....shiv chatrapati shivajinche katthar bhakta hote....tyanchi prerna gheun tyanni.......kranti ghadavli..........pan aaj ........hi nalayak rajkarni lokanchya tavditun gor-garib sutat nahit...aaj hi tashyach krantikari......lokanchi garaj ya maharashtrala...pahije aahe

  उत्तर द्याहटवा
 17. khup sundar lekh aahe..............umaji naik he.....shiv chatrapati shivajinche katthar bhakta hote....tyanchi prerna gheun tyanni.......kranti ghadavli..........pan aaj ........hi nalayak rajkarni lokanchya tavditun gor-garib sutat nahit...aaj hi tashyach krantikari......lokanchi garaj ya maharashtrala...pahije aahe.......

  umajinchya jivna varil.....''umaji raje'' he pustak vaach khup chaan aahe......
  -pravain chavan [munna]

  उत्तर द्याहटवा
 18. vachun khoop anand jhala..umaji naik baddal khoop vachayache ahe..lekha baddal dhanyavad.
  ganesh bhandalkar

  उत्तर द्याहटवा
 19. Anand jhala tuhmi khup chan lekhn kelyabdl umaji naikacha. dhanyavad saheb...

  उत्तर द्याहटवा
 20. ha lekh khupach chan ahe jyane karun mla umaji naikan vishai khup jastichi mahiti kalali ji ki mla agodar mahit nvati

  उत्तर द्याहटवा
 21. Very good article @ Umaji raje.....I hope this will inspire young generation @ sacrifice he maid for our home land , taking inspuration frm Chh.Shivaji
  His struggle against British pre & post Anglo - Maratha war is commendable......
  He must be remenbered for his heroic deeds....
  Amit Patil

  उत्तर द्याहटवा
 22. उमाजी उंचपुरे नव्हते ते शिवाजी राजांसारखेच सामान्य शरीरयष्टीचे होते. संदर्भ - उमाजी राजे मुक्काम डोंगर - सदाशिव आठवले

  उत्तर द्याहटवा
 23. Namaskar Vikram Saheb, Thank you so much for this blog. Can I get full details about UMAJI NAIK or any book.

  Nitin Gamre

  उत्तर द्याहटवा
 24. फारच् छान लिखान आहे. मुळात रामोशी समाज हा डोगर दर्यामघ्ये राहणारा आसल्या कारनाने काटक प्राण्यानच्या शिकारी करणारा. त्यामुळे संधी पाहुन आक्रमन हा मुळचा गुण. शिवाजी महाराजाचा गुप्तहेर प्रमुख बिरोजी नाईक याला दरबारात महाराज सोडून कोणी ओळखू शकत नसे त्यामुळे त्याच्या बहुरूपाला विरोध्दी सैनिकही ओळखत नसायचे त्यामूळे शञुची इतमभुत माहिता महाराजाना मिळत असे, त्यामुळे शञुवर विजय मिळवने शक्य होत असे.

  उत्तर द्याहटवा
 25. महाराष्ट्रातच नाही तर संपुर्ण भारतामध्ये इतिहासकारांनी बर्‍याच क्रांतिकारकांनी भारतावर सत्ता काबिज करण्याच्या हेतुने आलेल्या विदेशी आक्रमणांना तोंड दिलेत शहिद झालेत,फासावर लटकवले,तोफेसमोर बांधुन मारले......पण त्यांचा इतिहास हा इंग्रजांच्या गॅजेटमध्ये आहे पण भारतातील इतिहासकारांनी लिहला नाही....हि शोकांतीका आहे........असो आज राजे उमाजी नाईक यांचा ईतिहास पुढे आला .त्यांच्या स्मृतिस विनम्र अभिवादन.....पुढेही आणखी बर्‍याच क्रांतिकारकांचा इतिहास पुढे आणावा लागेल.

  उत्तर द्याहटवा
 26. मला यावर सिनेमा करायचाय ... मी हे लिखाण संदर्भ म्हणून घेत आहे.. कुणाला जर अजून राजांविषयी माहिती असेल तर मला संपर्क करावा
  ९२२४८६३७७
  शंकर औसरे

  उत्तर द्याहटवा