सोमवार, १ फेब्रुवारी, २०१०

जीवनात हास्य हे हवच

जगात कुठेही नाही एवढा हास्याचा प्रचंड साठा तुमच्या आमच्या जीवनात आणि सभोवताली असतो;परंतु तो बघण्याची दृष्टी आपणाजवळ नाही ती निर्माण झाल्यास आपले जीवन एकदम बदलून जाईल.
आता हसायला कुणाला आवडत नाही ? पण इथे वेळ कोणाकडे आहे ? चार क्षण निवांत मिळतील तर शपथ.सगळ्यांचेच जीवन धावपळीचे झाले आहे.इथे हसायचे म्हंटले तरी लोकांच्या जीवावर येते काहीना तर हसायचे म्हंटले तर रडायलाच येते!
मानवात जे नाही त्याची भरपाई म्हणून देवाने कल्पनाशक्ती दिली आणि जे आहे ते सुखमय ह्वावे यासाठी विनोदबुद्धी दिली.
जीवनात सदा सुखी व आनंदी असावे असे वाटणे स्वाभाविक आहे परंतु वास्तवात तसे होत नाही आणि वास्तव सुसह्य फक्त 'विनोद'च करू शकतो.कारण हसल्याने निर्भेळ आनंद मिळतो आणि मनाचे आरोग्य उत्तम राहते.ताणतणाव कमी करण्याचे कधीही आणि कुठेही उपयोगी पडेल असे साधन म्हणजे विनोद!
 विनोदाला कोणी बाप नसतो पण ते सर्व औरस असतात.काही विनोद सहजस्फुर्तीचे आणि काही समयसुचकतेचे द्योतक असतात.अगदी एका शब्दानेही हास्याचे फुलोरे उडताना आपण कित्येकदा अनुभवले असेल.किंवा एखाद्या विनोदाला आपण 'क्या टायमिंग है बॉस' अशी कॉम्प्लिमेंट   देऊनहि गेलेलो असेल.
 काल्पनिक विनोद असतात ते अधिकतर प्रचारात असतात आणि ते प्रवाही होऊन जातात मात्र त्यांच्या उपत्तीकाराची काही नोंद राहत नाही. काही विनोद सूचक पण चावट असतात.ते सांगनार्याच्या तोंडापेक्षा ऐकणार्याच्या कानात अधिक फुलतात.
ज्यांना विनोदबुद्धी नाही त्यांच्यात ती उत्पन्न करणे आणि ज्यांच्याकडे थोड्याप्रमाणात  आहे त्याची वाढ करणे असे काम काही विनोदवीर करत असतात.'विनोद' हे अमर असे साहित्य आहे त्यामुळे ते सर्वांच्या मालकीचे आहे.
क्रिकेटमध्ये कितीही चांगला बॉल टाकला व तो खेळपट्टीच्या बाहेर पडला व दिशाहीन पडलातर त्याला वाईड बॉल म्हणतात.त्याचप्रमाणे स्थळ ,काळ व वेळ न पाहता केलेला कोणताही विनोद कितीही चांगला असला तरी दाद मिळवू शकत नाही कारण त्याला '
वाईड जोक' म्हणतात.
काही विनोद सोज्वळ हि असतात तर काही विनोद एखाद्या व्यक्तीच्या व्यंगावर केलेले असतात त्यावर लोक हसले तरी त्याला चांगले विनोद म्हणता येणार नाही.
काही लोकानातर विनोद केलेलेच समजत नाहीत हाही एक मोठा विनोदच आहे म्हणा.विचित्रपणा किंवा विसंगतीमुळे  खूप विनोद होतात आणि अशा विसंगती माणसांच्या जीवनात ठासून भरलेल्या असतात.आजचे जीवन खूपच ताणतणावाचे झाले आहे त्यावर जालीम एकमेव उपाय म्हणजे विनोद.त्याने जीवन  सहज आणि सुंदर बनते.
आयुष्यातील दुखाचे हसून विस्मरण करणे हा खरा विनोदाचा उद्देश आहे.ज्या विनोदात हास्य आणि अश्रू एकत्र येतात तो विनोद म्हणजे 'सर्वश्रेष्ठ विनोद'. हास्यविनोद म्हणजे मोठा मानवधर्म आहे त्यामुळेच तुकाराम महाराजांनी म्हंटले आहे 'मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे साधन'
आपल्या जीवनातील हास्याचा जास्तीत जास्त आनंद मिळावा नियती कुणालाही चुकली नाही आणि चुकनारही नाही.
जिथे जिथे तणाव आहे तिथे विनोदाची गरज आहे.विनोदामुळे रक्ताला उसळी मिळते.नसानसातून वीज सळसळते मेंदू तल्लख बनते आणि शरीर व्यवस्था ठीकठाक बनते. देवाने माणसाला ज्या देणग्या दिल्या आहेत त्यातील हास्य एक मौल्यवान देणगी आहे.
कवी मंगेश पाडगावकर म्हणतात 'या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे!' आणि हे फक्त विनोदामुळेच  शक्य आहे.
अशाच एका विनोदी साहित्याची आवड असणार्या आणि लोकांना हसवण्याचा वसा घेतलेल्या एका विनोद्प्रेमीची (शरद अभंग)लेखमाला सध्या वाचनात येत आहे त्यांना हा लेख भेट देत आहे.
तर लोकहो हसा सौख्यभरे !
Some nice quote's

1) Do Not take life so seriously,you will never get out alive.
2) If people could laugh 15 times a day there would be fewer doctors bills.
3) Get more smileage out of your lives.

२० टिप्पण्या:

  1. खूप छान लेख लिहिला आहेस रे! हल्ली हसायचे पण क्लास असतात. निर्भेळ आनंदच दुर्मिळ झालाय, तर हास्य कुठलं उमलायला चेहे-यावर? विनोद कारूण्यातून निर्माण होतो म्हणतात पण दुस-याच्या करूण प्रसंगावर हसण्याइतकाही वेळ नाही राहिला माणसाकडे. तरीसुद्धा आपल्या आयुष्यातील लहान सहान घटनांमधून आनंद मिळविण्याचा प्रयत्न करत रहावा.

    उत्तर द्याहटवा
  2. हे टेम्पलेट मला आवडलं. keep it simple सारखंच वाटतंय. छान आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. कांचन
    धन्यवाद
    खरच निर्भेळ आनंदच दुर्मिळ झालाय आजकाल लोक आपल काम भल आणि आपण भल एवढेच पाहतात घरी आलेतरी डोक्यात कामाचा विचार
    जीवनाचा आनंद घ्यायची वृत्ती कमी होत चालली आहे लोकांच्यात

    बाकी टेम्पलेट म्हणशील तर हि सर्व 'विशल्या' ची कमाल आहे :)

    उत्तर द्याहटवा
  4. विनोदाची व्याख्या करण्याचा मी पाहिलेला पहिलाच प्रयत्न. दररोजच्या जिवनात विनोद हा आवश्यक आहेच . मी स्वतः चिंटू आणि डिल्बर्ट ला आणि सोबतच गारफिल्ड सब्स्क्राइब केलाय. सकाळी आधी सगळी कार्टून्स पहातो, आणि नंतर काम सुरु करतो..

    उत्तर द्याहटवा
  5. @Mahendra
    काका धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल
    सकाळी आधी सगळी कार्टून्स पहातो, आणि नंतर काम सुरु करतो.. हे एकदम मस्त
    कार्टून्स मलाही खूप भावतात त्यामधील ममितार्थ समजून घ्यायला सर्वांनाच जमते असेही काही नाही बर का
    काहीच्या कार्टून्स डोक्यावरुनही जातात ;)

    उत्तर द्याहटवा
  6. अगदी खरं!
    कामाच्या रगाड्यात हसणे विसरत चाललो आहोत. शाळाकॉलेजात मित्रांसोबत केलेले हास्यविनोद आताही अठवतात. काय दिवस होते ते.

    उत्तर द्याहटवा
  7. @आनंद पत्रे
    शाळाकॉलेजात मित्रांसोबत केलेले हास्यविनोद मीही खूप मिस करतो यार
    काय होते ते दिवस आता आठवले कि मन भरून येते
    जाऊ देत यार ते दिवस परत येणे नाहीत :(

    उत्तर द्याहटवा
  8. विसंगती बरोबरच अतिशयोक्तीतूनही विनोद निर्माण होतो.
    विक्रम, तुम्ही शरद अभंग यांच्या लेखमालेचा उल्लेख केला आहे. मी पहिल्यांदाच ऐकतो आहे हे नाव. ही लेखमाला पुस्तकरुपात आहे की हा ब्लॉग आहे?

    उत्तर द्याहटवा
  9. @सौरभ
    धन्यवाद
    जास्त फेमस असे नाव नसलेतरी त्यांनी लोकांना हसवण्याचा वसा नक्कीच घेतला आहे.
    नाही पुस्तकरूपात किंवा ब्लॉगवर नाही एका वर्तमानपत्रात आहे .

    उत्तर द्याहटवा
  10. येथे मी मात्र लकी दिसतोय जरा... तुम्ही लोकं कामाच्या नांदात हसणं विसरले असाल, पण मी माझी कॉलेज लाईफ एकदम बिनधास्त (पण सावधगिरीने) हसत-खेळत एन्जॉय करतोय... तसं पाहिलं तर हे प्रमाण कमी होतं आजपर्यंत, पण तुम्हां लोकांचे असले रडगाणे ऐकून मला अजुनच हुरूप आलाय.. नंतर तुमच्यासारखा पश्चाताप करत बसण्यात काय फायदा म्हणा...! ;)लेख मस्त जमलाय, पण लेख वाचतांना मला किंचीत पण हसू आलं नाही..! अरे विक्या दादा, काही तरी विसरला वाटतं तू या लेखात टाकायला, हो की नाही??? ;-P
    - विशल्या!

    उत्तर द्याहटवा
  11. काही विनोद सूचक पण चावट असतात.ते सांगनार्याच्या तोंडापेक्षा ऐकणार्याच्या कानात अधिक फुलतात... :D खरय तुझे ...

    ह्या बाबतीत मी फार लकी आहे ... मी जाम हसतो आणि हसवतो सुद्धा. कधीतरी ट्रेकला जाउया नक्की... :)

    उत्तर द्याहटवा
  12. डोंगरशाळेत या, सगळे विनोदाचे प्रकार शिकवू. बाकी लेख उत्तम जमलाय.

    उत्तर द्याहटवा
  13. @विशल्या
    कर कर मजा कर भावा
    अरे एखादा 'विनोद' टाकायला हवा होताच यार यात
    तू टाक रे एखादी पोस्ट हसू दे सगळ्यांना मनसोक्त एकदाचे ;)

    उत्तर द्याहटवा
  14. @रोहन चौधरी ...
    अरे वाह चांगली गोष्ट हास्य जीवनात खूप महत्वाचे आहे हे मी वर नमूद केले आहेच कि ;)

    बाकी ट्रेक चे म्हणताय ते जाऊ कि राव तुमच्या बरोबर ट्रेकला जाण्याचा दिस आमच्यासाठी अनमोल असेल होऊन जाऊनद्यात एकदा :)

    उत्तर द्याहटवा
  15. @पंक्या मास्तर
    कधी घेताय मग शिकवणी ;)
    तुमच्या क्लासला एकदा आमास्नी बी येऊ द्या किहो

    उत्तर द्याहटवा
  16. टाइम्स ऑफ़ इंडियाचं कार्टुनचं पान माझं इतकं आवडीचं होतं की मी ड्मशेराज या खेळात माझ्या कॉलेजमधल्या मित्रांना असं पेपर उघडून उजवीकडचं पान असं खूण करायच्या आधीच त्यांनी ओळखलं की त्यातलं कार्टून करून दाखवणार ते...पण तरी मला कुणीही सांगितलेले विनोद फ़क्त हसण्यापुरताच लक्षात राहतात पुन्हा स्वतःहून सांगण्याची कला नाहीये...

    उत्तर द्याहटवा
  17. @अपर्णा
    माझेही असेच होते मला विनोद फक्त हस्न्यापुरते लक्षात राहतात परंतु परत सांगायला ते लक्षातच राहत नाहीत :(

    उत्तर द्याहटवा
  18. मला माणूस हसला नाही तर निबंध हवा



    उत्तर द्याहटवा
  19. माणुस बोलला नाही तर निबंध दद्यं

    उत्तर द्याहटवा