बुधवार, २४ फेब्रुवारी, २०१०

सचिन ...स्वप्न पूर केलस रे गड्या

लय दिस मनात हुत कि सचिन नि एकदिवसीय सामन्यात २०० कराव्यात कमीत कमी त्या सईद अन्वरच १९४  रेकॉर्ड तरी मोडाव.
२-३ येळा त्यो त्याच्या जवळ बी आला हुता पण काही जमल नव्हत, पण आज त्यो जणू आपल्या शिरपेचात मानाचा अजून एक तुरा घालायसाठी आलाय अस वाटत हुत.
आन बघता बघता गड्याने रेकॉर्ड मोडल कि हो १९४ च आन २०० बी पुऱ्या केल्या तेबी नाबाद .
नादखुळा गणपतीपुळा
च्यामारी सामना बघताना सचिनच्या १५० झाल्यावर मी एका जाग्यावर बसून हुतु अजाबात हाललु   नाय ती आपली मनाची चलबिचल आता याला कुणी अंधश्रद्धा म्हणू द्या नायतर काय बी म्हणू द्या आमासणी कायबी फरक पडत नाय.म्या अस नाय म्हणणार कि म्या एका जाग्यावर बसलू म्हनून त्याच्या २०० रणा  झाल्या ;)
पण लय दिसाच स्वप्न गड्यान पूर केल
सच्याला नाव ठेवणार्यांनी हि खेळी बगावी आन आपल तोंड काळ कराव
जाऊ द्यात चांगल्या टायमाला वंगाळ नाय बोलत

 

या मराठमोळ्या सचिनला २००*(१४७) खेळीबद्दल मानाचा त्रिवार मुजरा !

१८ टिप्पण्या:

  1. अरे वेडा झालोय. नशीब इतका की कधी नाही ते ऑफीसला कंटाळून घरी आलो आणि याची देही याची डोळा द्विशतकाधीश सचिन पाहायला मिळाला.

    उत्तर द्याहटवा
  2. @सिद्धार्थ
    आमचे हाल सुद्धा काही वेगळे नाहीत वेड लागल्यासारखंच झालाय मलाही
    खूप दिवस झाले या दिवसाची वाट पाहत होतो
    धन्यवाद
    सचिन जिंदाबाद !

    उत्तर द्याहटवा
  3. भावा,अगदी मनातल बोललास बघ.
    साला लय बघीतले त्याचे खेळ,येवढच बघायच बाकि होत बघ ते बी पुर्ण केल बघ.

    सचिन चा नादखुळा गणपतीपुळा .

    उत्तर द्याहटवा
  4. @चैतन्य
    धन्यवाद भावा

    @canvas
    खरच रे खूप वाट पहावी लागली या दिवसाची पण हा दिवस सचिन आणणारच असा विश्वास मात्र होता
    फक्त आता संघाने हा सामना जिंकून देऊन याचा शेवट गोड करावा :)

    उत्तर द्याहटवा
  5. बस, अमला पडला. खिड आपलीच आहे. सर होतच तोफांची सलामी द्या.

    उत्तर द्याहटवा
  6. @canvas
    होय मालक
    तोफा तयार आहेत तुम्ही फक्त इशारा करा ;)

    उत्तर द्याहटवा
  7. सचिनचे मनःपूर्वक आभार!
    विक्रमा- ब्येस लिवलयस रे मर्दा!
    -vishal dixit

    उत्तर द्याहटवा
  8. विक्रम राजे आज शब्द नाही आहेत इतका आनंद झालाय. . .कामाचा सगळा थकवा गेलाय. . . लय भारी वाटताय बगा!!!!

    उत्तर द्याहटवा
  9. @विशाल
    थांकू थांकू भावा

    @मनमौजी
    आमचीही परिस्थिती काही वेगळी नाही बर का
    एकदम झाक वाटतंय बर का :)

    उत्तर द्याहटवा
  10. अरे वेडा झालोय.. नाचावसं वाटतंय.. आयुष्य सार्थक झालं..

    आणि ति अंधश्रद्धा वगैरे काही नाही. त्याला अंधश्रद्धा म्हणणं ही अंधश्रद्धा आहे.

    उत्तर द्याहटवा
  11. आज भन्नाटच खेळला तो...विशीच्या पोरांना सुद्धा हेवा वाटावा असे खेळतो, म्हणजे केवळ बॅटिंगच नाही तर फिल्डींग देखिल... प्रथमच आज जवळपास पुर्ण ऑफिस कॅफेटेरिया मध्ये जमा झालं होतं, त्याच्या १८० पासुनच्या प्रत्येक धावेवर टाळ्यांचा कडकडाट होत होता.... मस्त मज्जा आली...

    उत्तर द्याहटवा
  12. @हेरंब
    खरच सार्थक झाल आज ज्याने आज हि खेळी पहिली तो भाग्यवान ठरला :)

    @आनंद पत्रे
    च्यामारी आमचीही तशीच हालत होती
    त्याच्या १५० नंतर एकाही कस्टमर मी दिला नाही हा हा

    उत्तर द्याहटवा
  13. @प्रितेश
    हो आणि अजून शतकांच शतक हि जवळ आल आहेच कि ;)

    उत्तर द्याहटवा
  14. Mazya dolyatun anadashru vahu lagale tyache twishatak zalyavar..Punha ekada Marathi Manus top var..Sachinache manapasun abhar....God bless my Little master!
    N.B. : England madhe mazya officemadhil goryanchi bolati bandh keli...aaj pasun te mazyabarobar SRT ya subjectvar chukunsudha debate karanar nahit...Jay Maharashtra..

    उत्तर द्याहटवा
  15. दिल गार्डन गार्डन हो गया :) सचिन हा एकच परत असा कोणी होणा शक्यच नाही ...

    उत्तर द्याहटवा