रविवार, २२ ऑगस्ट, २०१०

एका दादा कोंडकेची नितांत गरज आहे

गेल्या काही दिवसापासून मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणात दाखवले जात नाहीत याबद्दल गदारोळ चालू आहे.हा विषय सेनेपासून मनसे आणि मुख्यमंत्र्यापासून मंत्र्यापर्यंत सर्वांच्या दरबारी हजरी लावून आला. मुद्दा भावनिक बनल्याने त्यावर तश्याच प्रतिक्रिया येऊ लागल्या परंतु या विषयावर मराठी निर्मात्यांनी स्वता आत्मचिंतन करायची गरज आहे असे मला वाटते.आपण प्रेक्षकांना योग्य दर्जाचे चित्रपट पुरवतो का ? आपण चित्रपट तयार करण्याबरोबर त्याच्या योग्य मार्केटिंगकडे लक्ष देतो का ? कारण आजचा जमाना मार्केटींगचा आहे. मुळात मराठी चित्रपट लोकांपर्यंत पोहचायला हवा आणि त्यांना आवडायला हवा तरच हा प्रश्न सुटणार आहे.
 नवीन मराठी चित्रपट कधी तयार आणि प्रदर्शित  होतो हे त्या निर्मात्याला आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांनाच माहिती असावे असे कधी कधी वाटते काही अपवाद आहेत पण ते बोटावर मोजण्यासारखे. एकतर मराठी चित्रपटांमध्ये   व्यावसायिकतेचा  आणि मार्केटींगचा पूर्णपणे अभाव असतो  हे मागे एकदा महेंद्रकाकांनी आपल्या लेखात नोंदवले होतेच. मल्टीप्लेक्समध्ये मराठी चित्रपट पुरेश्या प्रमाणत दाखवले जावेत हि अपेक्षा रास्त असली तरी ते दाखवले गेले तरी चित्रपटासाठी प्रेक्षक कोण पुरवणार हा प्रश्न अनुत्तरीत राहतो कि ती जबाबदारीहि कोणा संघटनेने  किंवा सरकारने घ्यावी अशी अपेक्षा मराठी निर्मात्यांची आहे? ५ - १० प्रेक्षकांच्या जोरावर कोणता मल्टीप्लेक्सवाला किंवा थेटरवाला चित्रपट दाखवणार आहे ? यातून त्या खेळाच्या विजेचे बिल तरी वसूल होते का ? चित्रपट त्या दर्जाचा असेलतर तो राज्याच्या सीमा ओलांडूनही यश संपादन करू शकतो हे दक्षिणात्य चित्रपटांनी दाखवून दिले आहे. आजही इंद्र,शिवाजी द बॉस,मास इत्यादी असे कितीतरी दक्षिणात्य चित्रपट विविध वाहिन्यांवर टीआरपी खेचताना दिसून येतात अशी वेळ मराठी चित्रपटांवर का येत नाही ? कि वाहिन्यांनीही मराठी चित्रपट भाषांतरित करून दाखवावेत यासाठी कोणी आंदोलन करावे अशी मराठी निर्मात्यांची अपेक्षा राहील ?
 सगळेच मराठी चित्रपट निष्कृष्ट दर्जाचे असतात असे माझे मत नाही परंतु सगळेच चित्रपट नटरंग,मी शिवाजीराजे बोलतोय,श्वास अशा चित्रपटासारखे  नसतात त्यामुळे असे उत्कृष्ट चित्रपट तयार होत राहिले तर प्रेक्षक आपोआप पाहतात आणि मल्टीप्लेक्सवाले ते दाखवतातहि. प्रदर्शनानंतर २ दिवसहि तग धरू शकणार नाहीत असे चित्रपट बनवले गेलेतर कोण दाखवणार ?
 काही वर्षापूर्वी अशीच परिस्थिती मराठी चित्रपटांवर आली होती त्यावेळची  दादा कोंडके यांनी कोंडी फोडली होती.रडारडीत अडकलेल्या मराठी चित्रपटात त्यांनी वेगळी जाण आणली होती त्यानाही सुरवातीला संघर्ष करावा लागला परंतु प्रत्येकवेळी नाही त्यांनतर त्यांना आणि त्यांच्या निर्मात्यांना कधीच रडण्याची वेळ आली नाही. दादांचे चित्रपट २०-२५ आठवडे चित्रपटगृहात राहणार असाच नियमच बनून गेला होता आणि त्यांचे चित्रपट दाखवण्यासाठी थेटरमालक स्पर्धा करू लागले होते. त्यामुळे चांगले चित्रपट असतील तर कोणत्याही मल्टीप्लेक्स मालकांना जबरदस्ती करण्याची वेळ येणार नाही.शेवटी मालक धंदा करत असतो त्याला कोणत्याही प्रांतवाद व भाषावाद  यात पडायचे नसते चांगला चित्रपट आणि भरपूर प्रेक्षक द्या मालक चित्रपट निर्मात्यांच्या मागे लागतील.
 प्रेक्षकांचा प्रतिसाद असल्यास कोणत्याही वेळी मराठी चित्रपट दाखवले जातील. त्यामुळे आता मराठी चित्रपटसृष्टीला चांगल्या चित्रपटांची आणि  अशाच एका दादा कोंडकेची नितांत गरज आहे.

जय हिंद
जय महाराष्ट्र

१३ टिप्पण्या:

  1. शिवसेनेचा कृतिसह पाठिंबा असल्यानेच दादा कोंडके यांचे चित्रपट पडदा पाहू शकले.

    उत्तर द्याहटवा
  2. विक्रम भाउ...तुमच्याशी सहमत आहोत...

    मराठी मधे उत्तम दिग्दर्शक,लेखक, अभिनेते इ.इ. सर्व आहेत तरी पण दर्जेदार चित्रपट का होत नाहीत??

    चौकट तोडुन नवीन काही तरी देण्याचा धोका स्वीकारला जात नाही....तेच तेच विषय खुपदा हाताळले जातात...फ़क्त अनुदानासाठी निर्मिती होते. :(

    उत्तर द्याहटवा
  3. @अनामित
    दादांना बाळासाहेबांनी मदत केली आहे हे मान्य परंतु त्यानंतर त्यांना कोणाच्याच मदतीची गरज भासली नाही चित्रपटासाठी हेच तर मला म्हणायचे आहे
    त्यानंतर त्यांनी स्वताच्या हिमतीवर चित्रपट यशस्वी करून दाखवले
    अशीच अपेक्षा आताच्या चित्रपटांकडून आहे
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. @ मनमौजी
    बरोबर मराठी दिग्दर्शक आणि निर्माते यांनी एक चौकट तयार केली आहे ते त्याचा बाहेर येण्यास तयार नाहीत
    तेच तेच रडके चित्रपट नाहीतर तो केविलवाणी जोक करण्याची पद्धत वीट आलाय लोकांना अशा गोष्टींचा
    मराठी प्रेक्षक रसिक आहे उत्तम द्या तुम्हाला भरभरून प्रतिसाद नक्कीच मिळेल :)

    उत्तर द्याहटवा
  5. सहमत... उगाच जबरदस्ती करण्यात काहीच अर्थ नाही..

    उत्तर द्याहटवा
  6. कड्डक... १६ आणे खरं. मराठी चित्रपटांचा दर्जा सुधारला तरच ते तगतील.

    उत्तर द्याहटवा
  7. योग्य आहे मराठी चित्रपट चागले निर्माण झाले पाहिजे मराठी प्रेक्षक नक्कीच मिळतील

    उत्तर द्याहटवा