हिंदुस्तानवर जुलमी सत्ता गाजवणाऱ्या ब्रिटीश साम्राज्यावर अलौकिक धैर्याने पहिलावहिला बॉम्ब फेकला.शालेय जीवनातच 'वंदे मातरम' या पवित्र मंत्राने भारावून ज्यांनी स्वातंत्र्य लढ्यात स्वताला झोकून दिले आणि अवघ्या १८ व्या वर्षात हातात 'भगवदगीता' घेऊन ज्यांनी फाशीच्या खांबाला आलिंगन दिले ,त्या वंगवीर खुदिराम बोस यांच्या जयंती निम्मित्त त्यांचे पुण्यस्मरण करूयात.
खुदिराम बोस यांचा जन्म ३ डिसेंबर १८८९ रोजी बंगालमधील मिदनापूर जिल्ह्यातील बहुवैनी या गावी झाला.त्यांच्या वडिलांचे नाव बाबू त्रैलोक्यनाथ बोस व आई लाक्ष्मिप्रीयादेवी.
फेब्रुवारी १९०६ मध्ये मिदनापूर येथे एक औद्योगिक व शेतकरी प्रदर्शन भरले होते.हे प्रदर्शन पाहण्यासाठी आजूबाजूच्या प्रांतातील भरपूर लोक येऊ लागले.बंगालमधील एक क्रांतिकारक सत्येंद्रनाथ यांनी लिहलेल्या 'सोनार बांगला' या जहाल पत्रकाच्या प्रती खुदिराम यांनी या प्रदर्शनात वाटल्या.पोलीस शिपाई त्यांना पकडण्यासाठी धावला.खुदिराम यांनी त्या शिपायाच्या तोंडावर ठोसे मारले आणि शिल्लक राहिलेली पत्रके काखेत मारून ते त्य्नाच्या हातून निसटून गेले.याप्रकरणी राजद्रोहाच्या आरोपावरून सरकारने त्यांच्यावर अभियोग भरला;परंतु खुदिराम त्यातून निर्दोष सुटले!
किंग्जफोर्डला ठार मारण्याच्या कामगिरीसाठी निवड -
मिदनापूर इथे 'युगांतर' या क्रांतिकारकाच्या गुप्त संस्थेच्या माध्यमातून खुदिराम क्रांतिकार्यात ओढले गेले.१९०५ साली लॉर्ड कर्झनने बंगालची फाळणी केली.या फाळणीच्या विरोधात असणार्या अनेकांना त्या वेळचा कोलकात्याच्या म्याजीस्ट्रेट किंग्जफोर्ड याने क्रूर शिक्षा ठोठावल्या होत्या.अन्य प्रकरणात हि त्याने हिंदी क्रांतिकारांना खूप छळले होते. याच सुमारास किंग्जफोर्डला बढती मिळून तो मुझ्झफरपूर येथे सत्र न्यायाधीश म्हणून कामावर रुजू झाला.सरतेशेवटी 'युगांतर' समितीच्या एका गुप्त बैठकीत किंग्जफोर्डलाच ठार मारायचे ठरले.यासाठी खुदिराम व प्रफुल्लकुमार चाकी यांची निवड करण्यात आली.
खुदिराम यांना एक बॉम्ब आणि रिव्हॉल्वर देण्यात आले.प्रफुल्लकुमार यानाही एक रिव्हॉल्वर देण्यात आले.मुझ्झफरपुरला आल्यावर या दोघांनी किंग्जफोर्डच्या बंगल्याची टेहळणी केली.त्यांनी त्याची चारचाकी व तिच्या घोड्याचा रंग पाहून घेतला.खुदिराम तर त्याच्या कार्यालयात जाऊन त्याला नीट पाहूनही आला!
३० एप्रिल १९०८ रोजी हे दोघे नियोजित कामगिरीसाठी बाहेर पडले आणि किंग्जफोर्ड च्या बंगल्याबाहेर घोडागाडीतून त्याच्या येण्याची वाट पाहू लागले.बंगल्यावर टेहळणीसाठी असलेल्या २ गुप्त अनुचारानी त्यांना हटकले,पण त्यांना योग्य ती उत्तरे देऊन ते तेथेच थांबले.
हिंदुस्तानातील पहिल्या बॉम्बचा स्फोट-
रात्री साडेआठच्या सुमारास क्लबकडून किंग्जफोर्डच्या गाडीशी साम्य असणारी गाडी दिसताच खुदिराम गाडीमागून धावू लागले.रस्त्यावर खूपच अंधार पडला होता.गाडी किंग्जफोर्डच्या बंगल्यासमोर येताच त्यांनी दोन्ही हातानी बॉम्ब वर उचलला व नेम धरून पुढील चारचाकीवर जोराने आदळला. हिंदुस्तानातील या पहिल्या बॉम्बस्फोटाचा आवाज त्या रात्री तीन मैलापर्यंत ऐकू गेला आणि काही दिवसातच त्याचा आवाज इंग्लंड, युरोपलाही ऐकू गेला!
खुदिराम यांनी किंग्जफोर्ड ची गाडी समजून बॉम्ब टाकला होता.पण त्या दिवशी तो थोड्या उशिराने क्लबबाहेर पडल्यामुळे वाचला.दैवयोगाने गाड्यांच्या साधर्म्यामुळे दोन युरोपियन स्त्रियांना आपले प्राण गमवावे लागले! रातोरात खुदिराम व प्रफुल्लकुमार दोघेही २४ मैलावरील वैनी रेल्वेस्थानकापर्यंत अनवाणी धावत गेले.
दुसर्या दिवशी संशयावरून प्रफुल्लकुमार चाकींना पोलीस पकडण्यासाठी गेले तेंव्हा त्यनी स्वतावर गोळी झाडून घेतली व प्राणार्पण केले.खुदिराम यांना पोलिसांनी अटक केली.या ताकेचा शेवट ठरलेलाच होता.
११ ऑगस्ट १९०८ रोजी भगवदगीता हातात घेऊन खुदिराम धैर्याने व आनानदी वृतीने फाशी गेले!
किंग्जफोर्ड ने घाबरून नोकरी सोडली आणि ज्या क्रांतीकारकांना त्याने छळले त्यांच्या भीतीने तो लवकरच मरण पावला! त्याचे नावनिशानही उरले नाही.
खुदिराम मात्र मरूनही अमर झाले !
(साभार-स्थानिक वर्तमानपत्र )
Very nice article. Salute to Freedom fighter Khudiram Bose
उत्तर द्याहटवाkrantikarkana maza namskar... mahiti dilya baddal aabhari....
उत्तर द्याहटवाani halli sarkar aplyach lokanna golya ghalatay
उत्तर द्याहटवा