शनिवार, २८ ऑगस्ट, २०१०

एक वर्ष झाले सुद्धा ...

मी ब्लॉगिंग सुरु केलं अन् बघता बघता एक वर्ष कसं निघून गेलं हे समजलं
सुद्धा नाही. ब्लॉगला सुरुवात करतांना आपण आपल्या वाचनात आलेले चांगले
लेख फक्त इथे टाकायचे, मग ते कोणत्या वृत्तपत्रातील असो किंवा एखाद्या
संकेतस्थळावरील असो... असे माझे नियोजन होते. तसं मला जास्त अलंकारिक,
कथा वगैरे काही लिहिता येत नसल्याने मी स्वतःचे असे काही लिहू शकेल असे
वाटत नव्हते.

ब्लॉगिंगच्या अगोदर मी ऑर्कुटवर पडीक असायचो आणि तेथील सामाजिक
विषयांवरील धाग्यांवर आपले मत नोंदवायचो, भांडायचो... हे रोजचेच होते.
त्यावेळी ब्लॉग हे काय असते, याचे जास्त ज्ञान मला नव्हते. असाच एकदा एक
प्रोफाईल पाहत असतांना मला त्यात एका ब्लॉगची लिंक दिसली. मी उत्सुकतेने
ती पाहिली आणि मला हा प्रकार चांगला वाटला. आपलाही असाच एक ब्लॉग असावा
असे मनात येऊन गेले आणि मी स्वतःचा ब्लॉग तयार केला. नाव काय द्यावे यावर
डोके चालवण्याचा प्रयत्न केला आणि आपण फक्त सामाजिक विषयांवर, ज्यात बाकी
लोकांना जास्त रस नसतो किंवा एकदा वाचून सोडून द्यायचे असते अशा विषयावर
लिहणार असतांनाही 'जीवनमूल्य' असं उगाच उपदेशात्मक नाव दिलं. त्यानंतर तो
ब्लॉग "मराठी ब्लॉग विश्व"वर लावण्यासाठी मला काय म्हणून कष्ट करावे
लागले, काय सांगू... कारण मला संगणक या गोष्टीतले शून्य म्हणून ज्ञान
होते .कधी व्यवस्थितरित्या हाताळल देखील नव्हता. मी संगणक आणि नेट फक्त
माझ्या शेअर ट्रेडिंग साठी घेतले होते आणि त्या वेळात मी नेटवर भटकत
असायचो, तेवढंच काय ते मला येत होतं. कोणत्याही ब्लॉग धारकाला आपला ब्लॉग
कोणीतरी वाचवा असे वाटत असते, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घ्यायच्या
असतात. त्यासाठी मी माझ्या नवीन पोस्टची लिंक माझ्या ऑर्कुट मित्रांना
मेसेज करायचो, त्यातील काही वाचायचे, काही प्रतिक्रिया द्यायचे, तेवढाच
थोडासा दिलासा...
ब्लॉग सुरु केल्यानंतर मी बाकीचे मराठी ब्लॉगही वाचायला लागलो. मराठी
ब्लॉग विश्ववरून, काही दिवस असे गेल्यानंतर मला विविध ब्लॉगवरील
टेम्प्लेटने भुरळ घातली. आपलाही ब्लॉग असाच सजवलेला असावा असे वाटू लागले
पण त्यातील अक्कल नसल्याने काही करता येत नव्हते आणि तेवढ्यात
भुंग्याने नवीन टेम्प्लेटबद्दल एक पोस्ट टाकली असावी आणि आम्ही त्याला
प्रतिक्रिया देत त्याबद्दल प्रश्न विचारू लागलो पण HTML मधील काहीही
ज्ञान नसल्याने माझ्या ते डोक्यावरून जात होते, मग 'भुंग्या' दादाला
त्रास सहन होईना, आणि त्याने माझा ब्लॉग स्वतःहून सजवून दिला, तेही
त्याच्या बिझी शेड्यूल मधून वेळ काढून आणि मला माझा पहिला ब्लॉग मित्र
मिळाला... त्यानंतर माझ्या पोस्टवरील पहिली प्रतिक्रिया असायची ती
भुंग्या दादाची आणि त्यामुळे मला प्रोत्साहन मिळायचे. मग त्यानंतर ओळख
झाली ती विशल्याची, याने आता आपल्या ब्लॉग ची 'सुरुवात' केलीय की शेवट
केलाय हा प्रश्न आहेच म्हणा, पण याचेही मी खूप डोके खाल्ले आहे आणि आताची
टेम्प्लेट ही याचीच देन आहे. त्यानंतर पंक्याच्या 'भटकंतीने' वेड लावले
याची फोटोग्राफी म्हणजे भन्नाट काम... आपण फिदा आहे त्यावर, रोहनचा तसा
थोडासा परिचय होता ऑर्कुटमुळे पण त्याचे ब्लॉग वाचून आणि महाराजांबद्दलचे
ज्ञान पाहून खरच मानलं या मावळ्याला... एकदम जबरदस्त अभ्यास असणारा
माणूस, त्यात आमच्यासारखाच हुंदडण्यात आनंद मानणारा... महेंद्र काकांच्या
ब्लॉगेस्टिकनंतर त्यांच्या ब्लॉगवर जास्त जाने झाले ते 'काय वाट्टेल ते '
लिहित गेले आणि आम्ही वाचत गेलो अगदी मंत्रमुग्ध होऊन... त्यात त्या
सत्यवानाची 'वटवट' मधेच त्रास द्यायची, कधी हसवायची, तर कधी विचार करायला
लावायची... त्यात त्यांना साथ दिली त्यांच्या बाळराजांनी मग काय त्या
ब्लॉगची बातच कुछ और होऊन गेली. कधी कधी 'माझिया मना'ची साद ऐकू यायची
आणि मी तिकडे जायचो.
कधी खूप उदास झालो कि 'माझ्या गजाल्या' असायच्या. कधी सुवासिक 'मोगरा
फुलला
' की तिकडे भटकून यायचो. तुम्ही त्या 'सौरभ'चा ब्लॉग पहिला आहे का
एकदम जबऱ्या माणूस, पाहिजे तसे कशावरही लिहू शकतो तेही माणसाला खेळवून
ठेवत, त्याच्यात खूप काही आहे असे मला सारखे वाटते. याच्या मित्राची
'बक-बक' सुद्धा मस्त असते.

या ब्लॉगिंगमुळेच ट्विटरकडे ओढलो गेलो. आता तिथेच पडीक असतो दिवसभर...
यातून नवनवीन मित्र मिळाले, खूप काही चांगले वाचयला मिळाले. आजकाल मी
आनंदच्या 'मनात काय आहे' ते पाहत असतो तसेच 'बाबाची भिंत' चढून त्यामागे
काय चालले आहे तेही पाहत असतो. कधी निवांत बसायचे असेल तर सागरचा 'सागर
किनारा
' आहेच की...

याच काळात मला मराठी ब्लॉगर्सच्या "पुणे ब्लॉगर्स स्नेह मेळावा" साठी
जाण्याचा योग आला, परंतु जास्त कोणाशी ओळख नसल्याने फक्त भुंग्या दादाशी
गप्पा मारल्या.. पंक्या आपला फोटो काढून घेण्यात व्यस्त होता. दीपक दादा
दिसायला राक्षसासारखा असला तरी खूप प्रेमळ आहे बरं का...!! ;) तर असे
दिवस चालू आहेत कधी काही सुचले तर लिहित असतो... मी साधारण सामाजिक
विषयांवर सडेतोड लिहिण्याचा प्रयत्न करतो... काही लोकांना आवडतं, काहींना
आवडत नसावे, पण आपले मत व्यक्त करत असतो.

तुम्हासारख्या मराठी ब्लॉगर्सचे आणि वाचकांचे प्रेम मिळाले यात खूप
समाधानी आहे. असेच काही-बाही लिहित राहील, वाचत राहा... चुकलो तर चूक
दाखवत जा. तुमचे प्रेम हेच सर्व काही आहे :)

जय महाराष्ट्र!

४५ टिप्पण्या:

 1. मनातील विचार बेधडकपणे मांडण्यासाठी गेल्या १-२ वर्षात ब्लॉग हा एक उत्तम पर्याय म्हणून समोर आलाय.माणसाने लिहीत जावे, त्याला वाचक कदाचित नसतीलही पण माझे असे स्पष्ट मत आहे कि लिहिल्याने माणूस अंतर्मुख होतो.
  विक्रम चा ब्लॉग म्हणजे माझ्यासाठी आदर्शच.कारण जसा त्याने त्याचा ब्लॉग नीटनेटका ठेवला तसाच आपला पण असावा अशी नेहमी धडपड.
  पण विक्रमराव तुम्ही जबरदस्त लिहिताय, लिहीत रहा...
  तुमच्या लेखांमधील "साल्हेर चा बुलंद किल्ला","उमाजी नाईक" हे लेख विशेष स्मरणात आहेत...
  तुम्हाला शुभेच्छा....

  उत्तर द्याहटवा
 2. अरे वा 'जीवनमुल्य' राव.. बघता बघता एक वर्ष सरलं. :)

  ब्लॉगला वादिहाहाशु !!

  उत्तर द्याहटवा
 3. विक्रम
  आपण आरंभशूर नाही हे तू सिद्ध केले आहेस.

  नेटाने , धैर्याने आणि सामाजिक जाणीवेचा जरासुद्धा न विसर पड़ता "जीवनमूल्य " हा ब्लॉग तू चालवलास त्याबद्दल प्रथम तुझे कौतुक. तुझ्या ब्लॉग चा सुरुवातीपासुनचा मी वाचक आहे. तुझा ब्लॉग दिवसेंदिवस अधिकाधिक दिसायला चांगला आणि अधिकअधिक वाचनीय होत गेला. तुला आणि तुझ्या ब्लॉगला अनेकोत्तम शुभेच्छा.


  -विनायक

  उत्तर द्याहटवा
 4. :D :D :D लौSSSली ह्यॅप्पीवाला बड्डे बावा... (ठप्प...ठप्प...ठप्प... फस्स्स...फस्स्स...फस्स्स) जल्लोष :) :) हे blog listing भारी जमलय.
  and thank you for the appreciation :) (अगदी केळं खाऊन स्माईल, ह्या कानापासून त्या कानापर्यंत)
  तुझा ब्लॉग सदा बहरत राहिल आणि आमच्या मूल्यांमधे भर पडत राहिल ह्याची मला पुर्ण खात्री आहे.
  असंख्य शुभेच्छा... दिलसे :)

  उत्तर द्याहटवा
 5. अरे वाह..एक वर्ष झाला ..
  अभिनंदन, लिहते रहा. खूप शुभेच्छा

  उत्तर द्याहटवा
 6. ब्लॉगला वाढदिवसाबद्दल अभिनंदन आणि पुढील लिखाणासाठी अनेक शुभेच्छा :)

  उत्तर द्याहटवा
 7. माझ्याही ब्लॉग विश्वातल्या सुरुवातीच्या चाचपडण्याच्या काळात तूझी, तुझ्या ब्लॉगची मोलाची साथ लाभली... तुझा ब्लॉग जबरदस्त आहेच आणि आजची पोस्ट अतिशय भन्नाट झाली आहे. वाढदिवसाच्या हार्दीक शुभेच्छा.... असाच लिहित रहा....

  उत्तर द्याहटवा
 8. जबरी. पुढील वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा. अरेच्चा, भटकंती की काय ते इथे पण आहे. धन्यवाद.

  उत्तर द्याहटवा
 9. एक वर्ष कसं सहज निघून गेलं. मनःपुर्वक अभिनंदन.. आणि पुढील लिखाणासठी हार्दीक शुभेच्छा.

  उत्तर द्याहटवा
 10. @ माधव
  तू बोलतोयस ते खरे आहे माणूस खरच अंतर्मुख होतो :)
  आणि ब्लॉग हे मध्यम खरच खूप चांगले आहे
  तुझा ब्लॉग माझ्यापेक्षाही सुंदर आहे रे फक्त तू लिहित रहा

  शुभेच्छाबद्दल धन्यवाद असेच प्रेम राहूद्यात :)

  उत्तर द्याहटवा
 11. @हेरंब
  अरे हो बघता बघता एक वर्ष झालसुद्धा
  धन्स

  उत्तर द्याहटवा
 12. @विनायक काका
  तुमच्यासारख्या थोरामोठ्यांचे आशीर्वाद आहेत दुसर काय

  शुभेच्छाबद्दल धन्यवाद असेच प्रेम राहूद्यात :)

  उत्तर द्याहटवा
 13. @सौरभ
  धन्स भावा
  तू लिहिलेले आपल्याला आवडते बास बाकी तू आवडण्यासारखच लिहतोस म्हणा ;)

  उत्तर द्याहटवा
 14. @सुहास
  अरे हो झाले रे
  तुझ्यासारखे मित्र आहेत ना नवीन नवीन लिहण्यासाठी प्रोस्ताहित करणारे म्हणून चालू आहे सगळ :)

  शुभेच्छाबद्दल धन्यवाद असेच प्रेम राहूद्यात :)

  उत्तर द्याहटवा
 15. @निखल्या
  तुझी प्रतिक्रिया आणि माझ्या ब्लॉगवर :)
  हि माझ्यासाठी आजची सर्वात धक्कादायक आणि आनंदायी गोष्ट आहे
  तू प्रतिक्रिया देऊ शकतोस असे मला स्वप्नातही वाटले नव्हते
  बाकी प्रतिक्रिया दिलीस तीही तुझ्याच हटके स्टाईलनेच ;)

  उत्तर द्याहटवा
 16. @आनंद
  मी ब्लॉगवर काही लिहिले आणि तू त्यावर प्रतिक्रिया दिली नाहीस असे सहसा होत नाही आजकाल
  तुझ्यासारखे प्रेम करणारे लोक मिळालेत म्हणून तर मी इथे आहे :)


  शुभेच्छाबद्दल धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 17. @ पंक्या
  अरे ती भटकंती आहे त्यामुळे ती इथे असणारच कि हाहा
  धन्यवाद रे भटक्या :)

  उत्तर द्याहटवा
 18. @ महेंद्र काका
  तुमच्या सारख्या थोरांचे आशीर्वाद असूद्यात
  शुभेच्छा धन्यवाद असेच प्रेम राहूद्यात :)

  उत्तर द्याहटवा
 19. तुझ्य ब्लॉगसाठी खुप खुप शुभेच्छा............खुप छान लिहितोस्........असेच लिहित रहावेस अशी इच्छा.......

  स्वप्नील

  उत्तर द्याहटवा
 20. ब्लॉगला वाढदिवसाबद्दल अभिनंदन.....
  आज पहिल्यानदा भेट दिली तुमच्या ब्लॉगला....ब्लॉगच टायटल खुप आवडल...ब्लॉग छान आहे...पुढिल लिखानासाठि शुभेच्छा....

  उत्तर द्याहटवा
 21. विक्रम,
  कॉमेंट आज पहिल्यांदाच करतोय, पण तुझा ब्लॉग अनेकदा वाचलाय. ही स्वार्थी आणि प्रामाणिक कबुली आहे ;) .
  अभिनंदन पहिल्या वाढदिवसाबद्दल.
  जीवेत शरदः शतम्! (पवार नव्हे!)
  लिहित राहा.

  उत्तर द्याहटवा
 22. ओय होय विक्रमराव !
  अभिनंदन.
  मस्त लिहीताय.

  उत्तर द्याहटवा
 23. विकी, जीवनमुल्यने एक वर्ष पुर्ण केल्याबद्दल तुझे सगळ्यात पहिले अभिनंदन! लिखाणाच्या बाबतीत जे काही लिहिलेस त्यात तु किती खरा बोलतोस हेच मला कळत नाही. कारण मी ऑर्कुटवर तुला बघत होतो.. तु खरचं चांगला लिहित होतास आणि जीवनमुल्यचे एकूण लिखाण बघून कोणालाही हे माझे म्हणणे नक्कीच पटेल.

  पुढील वर्षासाठी शुभेच्छा!

  उत्तर द्याहटवा
 24. @सुषमा
  आपल स्वागत तुमचा मन माझ हि मस्त आहे बर का
  अशीच भेट देत रहा
  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 25. @अमित
  शुभेच्छा साठी धन्यवाद
  तुमचे मत मला नीटसे समजले नाही जरा विस्तृतपणे सांगू शकता का ?
  काही खोटे किंवा चुकीचे लिहिले असेलतर नजरेस आणून द्यावे
  जय महाराष्ट्र

  उत्तर द्याहटवा
 26. @बाबा
  या आधी सुद्धा तुमची प्रतिक्रिया आम्ही इथे वाचली आहे 'बबन नाव्ही' यावर तुम्ही विसरलात पण आम्ही नाही :)
  बाकी तुम्ही आजकाल भन्नाट सुटला आहात असेच लिहित रहा
  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 27. अभिनंदन मित्रा...
  आत्ता पुन्हा एखादी "तंगाट" पोस्ट टाकून सेलिब्रेशन होऊन जाऊ दे की!!!

  उत्तर द्याहटवा
 28. ब्लॉगच्या वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!
  मस्त लिहितोस रे.. पण आजकाल वाचायला थोडा वेळ लागतो.. च्यायला - लाईफ जरा जास्त "बिजी" झालयं! असो.. तु लिहित रहा- आम्ही सारे आहोतच - वाचायला आणि कमेंटायला!

  लिहिते व्हा!

  उत्तर द्याहटवा
 29. वा!! अभिनंदन. काहि मदत लागल्यास बिन्दास्त पणे आवाज दे.

  उत्तर द्याहटवा
 30. Hi,I recently came across your blog and I have enjoyed reading.Nice blog. I thought I would share my views which may help others.I turned 41 and i have Erectile Dysfunction problem. After reading that INVIGO can cure ED,tried it. I have seen the difference. Its giving very good results and is a permanent solution. I will keep visiting this blog very often.we can reach INVIGO at WWW.invigo.in.

  उत्तर द्याहटवा
 31. अभिनंदन....असाच लिहित रहा...पुढील लिखाणास शुभेच्छा!!

  उत्तर द्याहटवा
 32. अरे तु या ब्लॉगमध्ये लिहिले आहेस की तुला लिहिता येत नव्हते. पण हे खरे नाही तु खुप चांगले आणि विचारपूर्ण लेखन करत होता आणि आहेस. असे मला म्हणायचे होते.

  उत्तर द्याहटवा
 33. थोडा लेटच झालाय पण शुभेच्छा कधीही द्याव्यात... :)
  ब्लॉगच्या वाढदिवसाबद्दल अभिनंदन व अनेक शुभेच्छा!!

  उत्तर द्याहटवा
 34. ब्लॉगच्या वाढदिवसाबद्दल अभिनंदन ....
  ushir jhalay pan aaj pratikriya chaltey mhanun patan lihite...:)
  tujhi background pahili tar khupach kautuk aahe ki tu itka satatya dakhawun blogging kelayas....blogging chi ashi 100 warshe sukhachi jawot...:)

  उत्तर द्याहटवा
 35. अभिनंदन!वाचकांशी थेट संवाद साधण्याची शैली फारच आवडली!लेखन असेच चालू रहावे. शुभेच्छा!!

  उत्तर द्याहटवा
 36. @अमित,भानस,अपर्णा आणि अनुजा

  शुभेच्छासाठी मनपूर्वक धन्यवाद :)

  उत्तर द्याहटवा
 37. खुपच उशिरा पण मनापासुन अभिनंदन....असाच लिहित रहा...पुढील लिखाणासाठी शुभेच्छा...!!!

  उत्तर द्याहटवा
 38. अरे लबाडा
  मुपी वरून जे गायब झालास ते आता मला इथे गवसला आहे.
  अभिनंदन

  उत्तर द्याहटवा