सोमवार, ४ ऑक्टोबर, २०१०

चाकणचा संग्रामदुर्ग ...रणमंडळाचे चक्रव्यूव्ह

काही वर्षानंतर 'इथे एक किल्ला होता' असे सांगावे लागेल,अशी चाकणच्या संग्रामदुर्गाची स्थिती आहे.आपण किल्ल्यात कधी येतो आणि कधी बाहेर पडतो हे कळेनासे झाले आहे.असे का झाले? आपला इतिहास जतन करावयाच्या जाणीवा बोथट झाल्या आहेत का? आक्रमकांविरुद्ध ज्या दुर्गानीच आपले स्वातंत्र्य आणि अस्मिता जिवंत ठेवली;त्या महाराष्ट्रातील दुर्गांची सद्यस्थिती पाहून यातना होतात.इतिहास जतन करण्याकडे लक्षच नाही.ते असते तर दुर्गांची अशी दारूण अवस्था झालीच नसती.शिवशाहीतील एका पराक्रमाचा साक्षीदार हा चाकणचा दुर्ग आहे.बादशाह औरंगजेबाचा मामा अमीर उल उमरा शायीस्ताखान हा मोठ्ठ्या फौजेनिशी स्वराज्यात आला.या भुईकोट दुर्गाला त्याने वेढा घातला.संग्रामदुर्गात फिरंगोजी नरसाळा नावाचा किल्लेदार होता.त्याने किल्ला लढवण्याची पूर्ण तयारी केली होती.संग्रामदुर्ग म्हणजे काही नामांकित दुर्ग नव्हे.आधीच तो स्थलदुर्ग;पण खांद्काने  वेढलेला.त्यामुळे थोडी बळकटी आलेला.खडकात पाणीही होते,शिवाय दिवस पावसाचे होते.२१ जून १६६० रोजी किल्ल्याला मुघलांचा वेढा पडला.हा वेढा तब्बल ५६ दिवस चालला.तोफा -बंदुकांचा काही उपयोग होत नाही,हे पाहिल्यावर शायीस्ताखानाने भुयार खणून सुरुंग ठासण्याची  आज्ञा केली.ताबडतोब कामाला सुरवात झाली.हे भुयार खंदकाखालून खणण्यात येत होते.आतल्या मराठ्यांना जर या भुयाराची कल्पना आली असती,तर कदाचित खंदकातील पाणी त्यात सोडून सुरुंग नाकाम करता आले असते.३००-३५० लोकांनीशी फिरंगोजी नरसाळ्याने चाकण झुंजवत ठेवला होता.१४ ऑगस्ट १६६० हा दिवस उगवला.मुघलांनी सुरुन्गाला बत्ती दिली.पूर्वेच्या कोपरयाचा बुरुज अस्मानात उडाला.त्यावरचे मराठेही हवेत उडाले.आरोळ्या ठोकत मुघल त्या खिंडाराकडे धावले.फिरांगोजीनीही वाट न पाहता ते खिंडार लढवण्याची तयारी केली.तो पूर्ण दिवस मराठ्यांनी जोमाने लढाई केली.दुसर्या दिवशी राव भावसिन्हामार्फत मराठे किल्ल्याबाहेर आले आणि मुघलांनी चाकणचा संग्रामदुर्ग जिंकला.
 या दुर्गात एक आश्चर्यकारक रचना आहे.झाड-झाडोरा वाढल्यामुळे हि योजना नित पाहता येत नाही.पूर्वेच्या बाजूला आत आल्यानंतर उजव्या बाजूला एक मोठे प्रवेशद्वार लागते.तीच वाट आहे असे समजून कोणी चालू लागला कि,वाट हळू हळू निरुंद होत जाते आणि सरतेशेवटी बंद होते.तटावरच्या लोकांना आत आलेला शत्रू अलगद मारयात सापडतो.अशा रचनेला 'रणमंडळ' म्हणतात.ते चाकणच्या संग्रामदुर्गात आहे.

२२ टिप्पण्या:

  1. विक्रम माहित नव्हतं या दुर्गाच्या दुर्गम अवस्थेविषयी...इतिहास आपण शाळेत शिकतो त्यापुढे जाऊन काय याचं उत्तर कोण देणार काय माहित??

    उत्तर द्याहटवा
  2. मीही हा पाहिलेला आहे...
    इतिहास तज्ञ आणि सरकारने खरच जर लक्ष नाही दिले तर हा दुर्ग इथे होता याचा काहिच पुरावा रहाणार नाही

    उत्तर द्याहटवा
  3. २००६ मध्ये मी चाकणला हा किल्ला पाहण्यासाठी गेलो होतो - गावात बर्‍याच लोकांना विचारले - तर "असा कोणता किल्ला आमच्या पाहण्यात नाही" असंच ऐकायला मिळत होतं. शेवटी एका अजोबांनी रस्ता दाखवला.

    सध्या या किल्ल्याच्या अस्तित्वाचाच प्रश्न आहे. ढासळलेले बुरुज - गावकर्‍यांनीच चोरुन नेलेले दगड - दगडी भिंती पाडुन केलेला रस्ता... अरेरे.. :(

    मी काढलेले काही फोटो = http://picasaweb.google.com/mebhunga/SangramgadChakan#

    उत्तर द्याहटवा
  4. मीही गेलो होतो इथे २००३ मध्ये. किल्ल्याच्या दुर्दशेबद्दल तेव्हा मटा मध्ये एक लेखही लिहीला होता मी. अजुनही परिस्थिती तशीच आहे. :(

    उत्तर द्याहटवा
  5. किती ही कमालीची अनास्था रे सरकारची !!! वाईट वाटतं :(

    बाकी मला ते 'रणमंडळ' आणि ती कल्पनाच प्रचंड प्रचंड आवडली !!!

    उत्तर द्याहटवा
  6. सविस्तर ऐतिहासिक माहिती दिलीत तुम्ही ! भुइकोट किल्ल्यांची दुरावस्था पाहवत नाही.

    उत्तर द्याहटवा
  7. हा किल्ला लकरच नामशेष होणार आहे.....सध्या इतिहास बदलायला निघालेला तथाकथित संशोधकांना हे कस दिसत नाही हेच आश्चर्य वाटत.

    उत्तर द्याहटवा
  8. रणमंडळाची माहिती छानच. बाकी सरकारकडून नक्की कसली अपेक्षा करायचीय हेच अनाकलनीय आहे!

    उत्तर द्याहटवा
  9. काय बोलू रे...वाईट वाटत आपल्याला दिलेला हा ऐतिहासिक ठेवा आपण जपू नाही शकत... :(

    उत्तर द्याहटवा
  10. @अपर्णा
    आपण आपापल्यापरीने गड संवर्धनाचे काम करायला हवे
    आपला ऐतिहासिक ठेवा असा वाचा जाता कामा नये :(

    उत्तर द्याहटवा
  11. @ आ का
    तू तरी पहिला आहेस बाकी लोकानातर तो तिथे आहे याची कल्पना देखील नाही
    बहुतेक सरकारला सुद्धा नसावी :(

    उत्तर द्याहटवा
  12. @भुंगा
    अरे वाह खूप दिवसांनी
    फोटो छान आहेत :)
    परंतु गडाची अवस्था खूपच बिकट झाली आहे
    तुम्ही म्हणता तसे गडाच्या अस्तित्वाचा प्रश्न आहे :(

    उत्तर द्याहटवा
  13. @ विशाल
    आपल स्वागत
    तुमच्या लेखाने सरकारला जग आली नाही असेच दुखाने म्हणावे लागेल :(

    उत्तर द्याहटवा
  14. @ हेरंब
    फक्त सरकारलाच दोष देत बसायचे का हा प्रश्न पडतो कधी कधी मनाला
    बाकी ती 'रणमंडळ' हि कल्पना खरच जबर्या आहे
    आपल्या प्रत्येक गडावर अशाच काहीना काही वेगवेगळ्या रचना आहेत त्याच इथे देण्याचा माझा प्रयत्न आहे :)

    उत्तर द्याहटवा
  15. @ अनाकलनीय
    प्रथम आपले स्वागत :)
    मी माझ्याकडे जी थोडीफार गडकोटाची माहिती आहे ती इथे सर्वांसाठी देण्याचा प्रयत्न करत आहे तुमच्यासारखे याची आवड असणारे येऊन नक्की वाचतात आणि अभिप्राय देतात त्याने अजून हुरूप येतो.
    आज सर्वच किल्ल्यांची अवस्था बिकट झाली आहे असे दुखाने म्हणण्याची वेळ आली आहे :(

    उत्तर द्याहटवा
  16. @ मनमौजी
    तू म्हणत आहेस ते खरे आहे किल्ला नामशेष होण्याच्या गतीवर आहे
    आणि त्याच्याकडे कोणीच लक्ष देत नाहीये :(

    उत्तर द्याहटवा
  17. @ अनघा
    धन्यवाद रणमंडळ हि योजनाच खरच खूप भन्नाट आहे त्याकाळी असा भूलभुलैया सर्वच किल्ल्यांवर असायचा.
    सरकारकडून फार मोठी अपेक्षा नाही फक्त त्यांनी आमची हि ऐतिहासिक धरोहर नीट जतन करावी एवढीच अपेक्षा आहे

    उत्तर द्याहटवा
  18. @ सुहास
    खरच दुख होत रे
    सगळ्याच ऐतिहासिक गोष्टीत अनस्था आली आहे :(

    उत्तर द्याहटवा
  19. >>किती ही कमालीची अनास्था रे सरकारची !!! वाईट वाटतं :(

    बाकी मला ते 'रणमंडळ' आणि ती कल्पनाच प्रचंड प्रचंड आवडली !!! +१००

    उत्तर द्याहटवा
  20. TUMHI SAGLYYANI KALAJI KARU NAKA SAHYADRI PRATISHTHAN TASECH CHAKAN CHE FIRANGOJI NARSALA PRATISHTHAN HALU HALU KILLYACHI DAGDUJI KARAT AAHE JAY SHIVRAAY JAY GADKOT JAY SAHYADRI

    AAPLA PRATIK PANDURANG JADHAV

    उत्तर द्याहटवा