देवगिरी हा एक अपूर्व दुर्ग आहे.एखादा डोंगर पोखरून एक बेलाग दुर्ग आपल्या मध्ययुगीन शिल्पज्ञानी निर्मिलेला आहे.यादवांची हि एकेकाळची राजधानी खलजी सुलतानांच्या ताब्यात गेली.पुढे १४ व्या शतकाच्या पूर्वार्धात दिल्लीच्या मुहमद्द तुघलकाने तर दिल्लीची राजधानी हलवून ती देवगिरीला आणली.तोपर्यंत या देवदुर्गाचे नामकरण दौलताबाद करण्यात आले होते.पुढे निजामशाहीची राजधानी म्हणून देवगिरी प्रसिद्ध होताच. शिवप्रभूंच्या मातोश्री जिजाबाई यांच्या वडील आणि तीन भावांचे खूनही याच दुर्गात झाले.सभासदाच्या बखरीत शिवप्रभूंच्या मुखी 'पृथ्वीवर दौलताबाद चखोट खरा ..!' असे शब्द आहेत.
देवगिरीचे सारेच न्यारे आहे.दुर्गाचा खंदक हा डोंगराचा उतरता भाग पोखरून काढून केला आहे.तशीच ती अंधारी ! राष्ट्रकुट सत्ताधीशांनी दुर्गावर जाण्यासाठी कातळ पोखरून गोलाकार अंधारी वाट केली आहे. त्या वाटेशिवाय दुर्गावर जाताच येत नाही. त्या गडद अंधाराच्या वाटेने जात असताना चुकून प्रकाश दिसतो; पण त्या प्रकाशाची वाट आपल्याला खंदकात भिरकावून देते.पूर्वी त्या अजस्त्र खंदकात मगरी सोडलेल्या असत.१७५६-५७ मध्ये या दुर्गाचा ताबा मराठ्यांकडे आला होता.
देवगिरी हा मिश्रदुर्ग आहे.म्हणजे दुर्ग जमिनीवरही आहे आणि डोंगरावरही आहे. नुसताच गिरिदुर्ग किंवा फक्त स्थलदुर्ग नव्हे. दुर्गाच्या दोन बाजूला तिहेरी तटबंदी आहे. अंबरकोट,महाकोट आणि कालाकोट अशी त्यांची नावे आहेत. अंबरकोट हे नाव कदाचित निजामशाहीचा वजीर मलिक सर्कमलिक अंबर याच्या नावावरून पडले असावे. तटबंदीत चीनलेले देवालयांचे दगड जागोजाग दिसतात.खंदक,बुरुज,तट,झरोके यांची रेलचेल आहे.मात्र,देवगिरीचे सर्वात अदभुत म्हणजे खंदक आणि अंधारी.काळ्या फत्तराचा ६०-७० मीटर उंचीचा दगड कोरून काढला आहे.खांदकाची रुंदीही चांगली १५-२० मीटर आहे.खंदकावरचा कडा छीन्नी लावून गुळगुळीत केला आहे. सुरुंग लावला असेल का,हा प्रश्न आहेच;पण अंधारीत तर फक्त छीन्नीच्याच खुणा दिसतात
अंधारीच्या वाटेचे प्रवेशद्वार एखाद्या लेणीच्या द्वारासारखेच आहे.त्यावरील कलाकुसर राष्ट्रकुटाच्या लेणीशी साधर्म्य दर्शवते.आत गडद अंधार आहे.मशाली,पलिते घेतल्याखेरीज आतले काहीच दिसत नाही.कसे केले असेल हे काम ? मार्ग वळणाचा आहे. ठोकळमनाने त्याचे तीन भाग पडतात.पहिले भुयार २५ मीटर लांब आणि १० मीटर रुंद आहे.दुसरे १० मीटर लांब आणि तेवढेच रुंद आहे.तिसर्या भागाला मोठी अंधारी म्हणतात.त्यातून ३० मीटरचा कडेलोटहि आहे.मोठ्या अंधारीत जागोजाग १०० खोदीव पायरया आहेत.त्यापुढे लोखंडी तवा पेटवण्याची जागा आहे.हे सारे अपूर्व आहे.देवगिरी डोंगरातून सुमारे ८० लाख टन दगड काढून टाकून दुर्ग बळीवंत करण्यात आला आहे.
देवगिरी...अनेकदा जाणे झालेय इथे... औरंगाबादच्या जवळ हे एक कारण आणि म्हैसमाळला जाताना रस्त्यावर होणारे या किल्ल्याचे दर्शन, एक अत्यंत आवडता किल्ला आहे हा माझा!!
उत्तर द्याहटवाछान माहिती दिलीयेस!!!
'बेलाग' म्हणजे?
उत्तर द्याहटवादेवगिरी मी बघितलाय! खरोखर, तो खंदक त्या काळी किती भयंकर असेल ह्याची कल्पनाच करवत नाही!
चांगली माहिती देतोयस! येत राहू दे!
उत्तर द्याहटवालहानपणी गेलो होतो देवगीरीला, मेंढा तोफ आणि मीनार ही आणखी काही ख़ास वैशिष्ठे नमूद करू इच्छितो. पोस्टने पुन्हा आठवणी जाग्या ज्हाल्या.
उत्तर द्याहटवा@ तन्वी
उत्तर द्याहटवादेवगिरी हा औरंगाबादची शान आहे असे म्हणायला हरकत नाही
धन्यवाद
@ अनघा
उत्तर द्याहटवाबेलाग म्हणजे परिपूर्ण, उत्कृष्ट या अर्थाने इथे घेतले आहे.
धन्यवाद
@ प्रोफेट
उत्तर द्याहटवावेळ मिळेल तसा लिहित राहणार आहे काही महिन्यापूर्वी अशीच माहिती देत होतो परंतु मध्ये खूप मोठा ब्रेक घेतला
आता परत चालू केले आहे पाहू किती जमतेय ते
असेच वाचत रहा आणि प्रतिक्रिया देत रहा
धन्यवाद
@ अनाकलनीय
उत्तर द्याहटवामी फक्त किल्ल्याच्या बांधणीतील आणि त्याच्या रचनेतील विशेषता देण्याचा प्रयत्न करत आहे अजून काही माहिती असेलतर प्रतिक्रियेमध्ये देत जा वाचायला नक्कीच आवडेल
धन्यवाद
विक्रम... खरेतर अनेक भागात लिखाण व्हावे असा हा दुर्ग. ह्यावर अधिक विस्तृतपणे लिखाण व्हावे हि इच्छा... :) मी स्वतः अजून कधीच येथे गेलेलो नाही. पण वाचनातून अख्खा दुर्ग डोळ्यासमोर उभा राहिलेला आहे... :)
उत्तर द्याहटवाविक्रम, अजुन फोटो टाकता आले तर टाक रे. :)
उत्तर द्याहटवाजबरदस्त माहिती दिली आहेस रे.. मस्तच.. खरंच ग्रेट आहे देवगिरीचा किल्ला !!
उत्तर द्याहटवा@ रोहन
उत्तर द्याहटवाआपला प्रतिसाद आमच्यासाठी मौल्यवान आहे
माज्यापेक्षा आपणच याबद्दल जास्त विस्तृत माहिती देऊ शकता
आपण या दुर्गास अजून भेट दिली नाही हे ऐकून खूप आश्चर्य वाटले लवकरात लवकर भेट देऊन एक माहितीपर लेख येऊद्यात :)
@ सौरभ
उत्तर द्याहटवाअरे नाहीयेत अजून फोटो :(
@ हेरंब
उत्तर द्याहटवामाज्याकडे जी माहिती संकलित आहे तीच देण्याचा प्रयत्न करीत आहे
खरच एकदातरी पहावा असा हा दुर्ग आहे :)