गुरुवार, २८ जानेवारी, २०१०

खांदेरी... बेटालाच बांधलेली तटबंदी

खांदेरीचा दुर्ग हा काही फार प्रसिद्ध दुर्ग नाह्वे;पण हे बेट मुंबईच्या समोरच असल्याने अतिशय मोक्याचे आहे.इ.स.१६७९ च्या ऑगस्ट महिन्यात शिवाजीमहाराजांनी मायनाक भंडार्याला येथे पाठवून बेटावर किल्ला बांधावयास काढला.या बेटावर वेताळाचे एक मोठे राऊळ आहे.त्याची पूजा केल्याशिवाय कोणीही कोळी नावा मासेमारीसाठी समुद्रात घालत नाहीत.बेटावर एक टेकडी आहे आणि बेटालाच तटबंदी घातली आहे.
Kokan TripImage by शंतनू via Flickr
मायनाक भंडारी तटबंदी बांधत असताना मुंबईच्या इंग्रजांनी ती थांबवण्याचे आटोकाट प्रयत्न केले.कॅप्टन विलियम मिन्चीन,रिचर्ड केग्वीन,जॉन ब्रान्डबरी,फ्रान्सिस थोर्प असे नामांकित सागरी सेनानी खांदेरीवर पाठवून ते बेट मराठ्यांकडून काबीज करण्याचे मोठे प्रयत्न इंग्रजांनी केले.रिव्हेंज आणि हंटर नावाच्या दोन फ्रींगेटेस त्यांनी पाठवल्या होत्या.गेप नावाच्या माणसाकडून काही गुराबा भाड्याने घेऊन त्यावर कशातरी काही तोफा बांधून त्यांनी इंग्रजी आरमार पाठवण्याचा प्रयत्न केला.
मायनाक भंडार्याच्या मदतीला नंतर दौलातखानाचे आरमार आले.आलिबाग-थळच्या किनार्यालगत असलेल्या या आरमाराने इंग्रजी आरमारातल्या त्रुटी हेरल्या!मराठ्यांच्या होड्या थळच्या किनार्यावरून सामानसुमान घेऊन खांदेरी बेटावर निघत.त्यांना प्रतिबंध करण्यासाठी किनारा आणि बेट यामध्ये एक 'ब्लोकेड' उभारण्याचे इंग्रजांनी ठरवले होते;पण त्यांच्या मोठ्या जहाजांना या चेनेलमध्ये ठिय्या देऊन राहण्याचे काम जमले नाही.वाऱ्यामुळे त्यांच्या होड्या किनार्याकडे फेकल्या जात आणि त्या दगडांवर आपटून फुटण्याची भीती असल्याने इंग्रजांना ती जहाजे खोल पाण्यात न्यावी लागली.छोट्या गुराबा त्यांनी आणल्या असता 'डव्ह'नावाच्या त्यांच्या गुराबेवर पाठीमागे तोफ नसल्याने ती त्रुटी हेरून शिवप्रभूंच्या आरमाराने पाठीमागून चक्राकार हल्ला चढवून ती गुराब पकडली आणि त्यावरच्या इंग्रजांना सागरगडावर कैदेत डांबले.
सागराची भरती-ओहोटी,खोल-उथळ पाणी,मतलय,वैगेरेचे ज्ञान मराठ्यांना इंग्रजांपेक्षा जास्त असल्याचे दिसले.मराठ्यांच्या संगमेश्वरी नावाच्या वेगळ्या आराखड्याच्या होड्यांनी या युद्धात कमाल केली.या चिंचोळ्या होड्या रात्री वल्व्ह्त मराठे सामान बेटावर पोहचते करीत.इंग्रजी जहाजे पूर्णपणे वार्यावर अवलंबून असत.खास मराठी बांधणीच्या या होड्यांनी इंग्रजांना आश्चर्यकारकरित्या चकवले.
कॅप्टन विलियमने मुंबईला पाठवलेल्या पत्रात म्हंटले आहे,'या सरपठनार्या मराठी होड्या रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन आम्हाला आश्चर्यकारकरित्या चकवतात.अशा होड्या इंग्रजी आरमारात हव्यात!' काय गमत आहे बघा!खास मराठी बांधणीच्या होड्या त्या दर्यावादी इंग्रजांना हव्या होत्या!
Enhanced by Zemanta

११ टिप्पण्या:

  1. मस्त लेख विक्रांत ...

    शिवरायांकडून २८ नोव्हेंबर १६७० रोजी ३००० फ़ौज सोबत घेउन दुर्गबांधणी संदर्भात खांदेरी बेटाची ३ दिवस पाहणी झाली होती. पुढे लवकरच या ठिकाणी दुर्गबांधणी सुरू झाली ज्यामुळे सिद्दी आणि इंग्रज यांना चांगलीच जरब बसली. कारण
    खांदेरीचा किल्ला सिद्दी आणि इंग्रज ह्यांच्या बरोबर मध्ये उभारला गेला होता. ह्या किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर ओबड-धोबड़ दगडांच्या राशी आढळतात. भरतीच्या लाटा सोडाच पण साध होडक सुद्धा तटबंदीशी लगट करू शकत नाही. शिवाय त्या धारधार दगडांवर कोणी पाय ठेवायची हिम्मत सुद्धा करणार नाही.

    ह्या लढाईवर एक लेख लिहायचा माझा मानस आहे बरेच दिवस. बहुदा तुझ्या लेखामुळे तो उद्युक्त झाला आहे. आभार... :)

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय माहितीपूर्ण लेख आहे. एकदम मस्त झालाय.

    उत्तर द्याहटवा
  3. @रोहन
    तुम्ही नेहमीच महत्वपूर्ण माहिती देत असता

    तुम्ही नवीन लेख लिहण्यास लवकर सुरवात करा आम्ही त्या लढाईचा थरार तुमच्या शब्दातून अनुभवण्यास आतुर आहोत

    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  4. @पंक्या

    धन्यवाद रे भावा
    आपला अभिप्राय आमच्यासाठी अनमोल आहे :)

    उत्तर द्याहटवा
  5. सुंदर लेख आहे, आणि ब्लॉग डिझाईनपण छान आहे.

    उत्तर द्याहटवा
  6. @विक्रम
    धन्यवाद नावकरी
    ब्लॉग डिझाईन एका ब्लॉगर मित्राची कृपा आहे :)

    उत्तर द्याहटवा
  7. मस्त माहीती आहे, मराठी महाजालावर ऐतिहासिक माहितीची अजुन थोडी भर टाकल्याबद्दल शतशः आभार... कीप इट अप..

    - विशल्या!

    उत्तर द्याहटवा
  8. ase tantra peshwe ani shinde yani panpat weli ganga par kartana waparle aste tar aaj marathi itihas vaibhavshali zala asta .

    उत्तर द्याहटवा