महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज ३८० वी जयंती . तसे पाहण्यास गेलेतर १९ फेब्रुवारीला तारखेनुसार किंवा शासकीय शिवजयंती नुकतीच झाली परंतु त्याचा शासनालाच विसर पडला होता ते जाऊ द्यात. आम्ही दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करतो ती म्हणजे फाल्गुन कृष्ण तृतीयेला, जसे आम्ही आमचे हिंदू सण,उत्सव साजरे करतो तसे. शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवतच आहेत आणि राहतील असो ...
हिंदू धर्म व हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असताना लहानवयात 'स्वराज्य व स्वधर्म' याची पुनर्स्थापना करण्याची प्रतिज्ञा शिवरायांनी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.शिवरायांचे कार्य समस्त देशाला प्रेरणा देणारे आहे.परंतु खरच हिंदुस्तानातील लोकांनी विशेषता तरुणानी महाराजांकडून प्रेरणा घेतली का ?
ज्या शिवाजी महाराजांनी मुठभर तरुणांना हाताशी घेऊन इस्लामी राजवट नेस्तनाबूत केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती कोणत्या बळावर याचा विचार केला पाहिजे.हाताशी अपुरे संख्याबळ,अपुरी शस्त्रसामुग्री ,अपुरा पैसा असताना बलाढ्य असणार्या मुघलांचा मुकाबला केला.आपला गनिमी कावा,कल्पक डावपेच,निर्भयता याच बरोबर हिंदू धर्माचे बळ आणि तेज मोघालाना दाखवले.
हे बळ त्यांना कुलदैवत आई जगदंब तुळजाभवानी यांच्या कृपेने आणि माता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आले होते.कुलदेवतेची उपासना आणि आईचे मार्गदर्शन हि एक मोठी शक्ती आहे हे महाराजांनी जाणले होते परंतु आपण हे आता विसरलो आहोत.
आजच्या तरुणांसमोर योग्य मार्गदर्शन नसल्याने तरुण पिढी वैयक्तिक स्वार्थात गुंतलेली दिसत आहे.करियर च्या नावाखाली झटपट पैसा मिळवणे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात सध्याची तरुण पिढी रममाण आहे. आपल्या राष्ट्रात घडत असलेल्या गैरकृत्याविरुद्ध विचार व कृती करण्याची तसदी घेणारे तरुण सध्या दुर्मिळ झाले आहेत.
तसेच सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आत्मबळाचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे त्यामुळे तरुण आत्महत्यासारख्या दृष्टचक्रात ओढले जात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणासारखा राष्ट्राभिमान आणि धर्मभिमान सध्याच्या तरुणात दिसत नाही.कारण आजची निधर्मी बोलली जाणारी शिक्षणपद्धती आणि पाश्च्यात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे नवीन पिढी बुद्धीने हुशार;परंतु मानाने दुबळी व स्वार्थी बनली आहे.
देशातील तरुणानी आपली मानसिकता आणि कृतीत अमुलाग्र बदल घडवून आणायची गरज आहे.शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या राष्ट्रपुरशांचे आदर्श तरुणांसमोर हवेत.परंतु आजच्या तरुण पिधेचे आदर्श हे अभिनेते,खेळाडू यांच्यापर्यंत सीमित झाले आहेत. हे आदर्श योग्य आहेत का ?
हे चुकीचे आदर्श आपल्याला शेजारील शत्रूराष्ट्राशी,अतिरेक्यांशी लढण्याचे बळ देणार आहेत का ? अशा चुकीच्या आदर्शामुळे जम्मू काश्मीर चा भाग गिळंकृत करणारा देशात स्पोट घडवणारा पाकिस्तान,पूर्व भारताकडे वक्रदृष्टीने पाहणारा चीन आणि घुसखोरी करणारा बांगलादेश यांच्यापासून सध्याचे तरुण अनभिज्ञ राहत आहेत.
त्यामुळे तरुणांना योग्य आदर्श दाखवण्याची जबाबदारी पालकांचीही आहे.
तरुणांनी आपल्यातील सुप्त सामर्थ्य जाणण्याची गरज आहे तसे केल्यानेच शिवाजी महाराज बालवयात बलाढ्य शत्रूचे आव्हान पेलू शकले. माता जिजाऊ यांनी त्यांच्यासमोर भगवान श्रीकृष्ण,प्रभू श्रीराम यांच्यासारखे आदर्श ठेवले होते आणि धर्मनिष्ठेचे बाळकडू पाजले होते.आजच्या तरुणांनीही आपले शिवतेज जागृत केले पाहिजे आपले आध्यात्मिक बळ वाढीवले पाहिजे. आपल्या सण-उत्सवाचे पावित्र्य थाळू न देता सह्स्त्रानुसार साजरे करायला हवेत.आपल्यातील मानसिक दुर्बलता कमी करून राष्ट्राचे नेतृत्व तरुणांनी करण्याची गरज आहे.
आजच्या तरुणांमध्ये राष्ट्र घडवण्याचे व चालवण्याची क्षमता आहे.पण इच्छाशक्तीचा अभाव आणि सातत्याने चुकीचे आदर्श यामुळे तरुण आपले सुप्त सामर्थ्य हरवून बसले आहेत.
छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार,त्यातून मिळणारी प्रेरणा व तेज फक्त तरुणानंच नाह्वेतर समस्त देशाला जगण्याचा अधिकार मिळवून देऊ शकते.जो आमचा जगण्याचा अधिकार हे राष्ट्रद्रोही व पाकडे अतिरेकी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आजच्या शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्याप्रमाणे कृती करण्याचा निश्चय करूयात आणि एक सामर्थ्यशाली हिंदुस्तान बनवण्याचा निश्चय करूयात.
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी...
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतिवंत
'जाणता राजा '
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !