बुधवार, ३ मार्च, २०१०

सध्याचे तरुण शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श घेतील का ?

महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची तिथीनुसार आज ३८० वी जयंती . तसे पाहण्यास गेलेतर १९ फेब्रुवारीला तारखेनुसार किंवा शासकीय शिवजयंती नुकतीच झाली परंतु त्याचा शासनालाच विसर पडला होता ते जाऊ द्यात. आम्ही दरवर्षी तिथीनुसारच शिवजयंती साजरी करतो ती म्हणजे फाल्गुन कृष्ण तृतीयेला, जसे आम्ही आमचे हिंदू  सण,उत्सव  साजरे करतो तसे. शिवाजी महाराज आमच्यासाठी दैवतच आहेत आणि राहतील असो ...
हिंदू धर्म व हिंदूंचे अस्तित्व धोक्यात आले असताना लहानवयात 'स्वराज्य व स्वधर्म' याची पुनर्स्थापना करण्याची प्रतिज्ञा शिवरायांनी घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.शिवरायांचे कार्य समस्त देशाला प्रेरणा देणारे आहे.परंतु खरच हिंदुस्तानातील लोकांनी विशेषता तरुणानी महाराजांकडून प्रेरणा घेतली का ?
ज्या शिवाजी महाराजांनी मुठभर तरुणांना हाताशी घेऊन इस्लामी राजवट नेस्तनाबूत केली आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली ती कोणत्या बळावर याचा विचार केला पाहिजे.हाताशी अपुरे संख्याबळ,अपुरी शस्त्रसामुग्री ,अपुरा पैसा असताना बलाढ्य असणार्या मुघलांचा मुकाबला केला.आपला गनिमी कावा,कल्पक डावपेच,निर्भयता याच बरोबर हिंदू धर्माचे बळ आणि तेज मोघालाना दाखवले.
हे बळ त्यांना कुलदैवत आई जगदंब तुळजाभवानी यांच्या कृपेने आणि माता जिजाऊ यांच्या आशीर्वादाने आले होते.कुलदेवतेची उपासना आणि आईचे मार्गदर्शन हि एक मोठी शक्ती आहे हे महाराजांनी जाणले होते परंतु आपण हे आता विसरलो आहोत.
 आजच्या तरुणांसमोर योग्य मार्गदर्शन नसल्याने तरुण पिढी वैयक्तिक स्वार्थात गुंतलेली दिसत आहे.करियर च्या नावाखाली झटपट पैसा मिळवणे आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमात सध्याची तरुण पिढी रममाण आहे. आपल्या राष्ट्रात घडत असलेल्या गैरकृत्याविरुद्ध विचार व कृती करण्याची तसदी घेणारे तरुण सध्या दुर्मिळ झाले आहेत.
तसेच सध्याच्या जीवघेण्या स्पर्धेच्या युगात आत्मबळाचा अभाव प्रखरतेने जाणवत आहे त्यामुळे तरुण आत्महत्यासारख्या दृष्टचक्रात ओढले जात आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातील तरुणासारखा राष्ट्राभिमान आणि धर्मभिमान सध्याच्या तरुणात दिसत नाही.कारण आजची निधर्मी बोलली जाणारी शिक्षणपद्धती आणि पाश्च्यात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव यामुळे नवीन पिढी बुद्धीने हुशार;परंतु मानाने दुबळी व स्वार्थी बनली आहे.
देशातील तरुणानी आपली मानसिकता आणि कृतीत अमुलाग्र बदल घडवून आणायची गरज आहे.शिवाजी महाराज,स्वातंत्र्यवीर सावरकर,स्वामी विवेकानंद यांच्यासारख्या राष्ट्रपुरशांचे आदर्श तरुणांसमोर हवेत.परंतु आजच्या तरुण पिधेचे आदर्श हे अभिनेते,खेळाडू यांच्यापर्यंत सीमित झाले आहेत. हे आदर्श योग्य आहेत का ?
हे चुकीचे आदर्श आपल्याला शेजारील शत्रूराष्ट्राशी,अतिरेक्यांशी लढण्याचे बळ देणार आहेत का ? अशा चुकीच्या आदर्शामुळे जम्मू काश्मीर चा भाग गिळंकृत करणारा देशात स्पोट घडवणारा पाकिस्तान,पूर्व भारताकडे वक्रदृष्टीने पाहणारा चीन आणि घुसखोरी करणारा बांगलादेश यांच्यापासून सध्याचे तरुण अनभिज्ञ राहत आहेत.
त्यामुळे तरुणांना योग्य आदर्श दाखवण्याची जबाबदारी पालकांचीही आहे.
तरुणांनी आपल्यातील सुप्त सामर्थ्य जाणण्याची गरज आहे तसे केल्यानेच शिवाजी महाराज बालवयात बलाढ्य शत्रूचे आव्हान पेलू शकले. माता जिजाऊ यांनी त्यांच्यासमोर भगवान श्रीकृष्ण,प्रभू श्रीराम यांच्यासारखे आदर्श ठेवले होते आणि धर्मनिष्ठेचे बाळकडू पाजले होते.आजच्या तरुणांनीही आपले शिवतेज जागृत केले पाहिजे आपले आध्यात्मिक बळ वाढीवले पाहिजे. आपल्या सण-उत्सवाचे पावित्र्य थाळू न देता सह्स्त्रानुसार साजरे करायला हवेत.आपल्यातील मानसिक दुर्बलता कमी करून राष्ट्राचे नेतृत्व तरुणांनी करण्याची गरज आहे.
आजच्या तरुणांमध्ये राष्ट्र घडवण्याचे व चालवण्याची क्षमता आहे.पण इच्छाशक्तीचा  अभाव आणि सातत्याने चुकीचे आदर्श यामुळे तरुण आपले सुप्त सामर्थ्य हरवून बसले आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार,त्यातून मिळणारी प्रेरणा व तेज फक्त तरुणानंच नाह्वेतर समस्त देशाला जगण्याचा अधिकार मिळवून देऊ शकते.जो आमचा जगण्याचा अधिकार हे राष्ट्रद्रोही व पाकडे अतिरेकी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
आजच्या शिवजयंतीनिम्मित्त महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन त्याप्रमाणे कृती करण्याचा निश्चय करूयात आणि एक सामर्थ्यशाली हिंदुस्तान बनवण्याचा निश्चय करूयात.


निश्चयाचा महामेरू
बहुत जनांसी आधारू
अखंड स्थितीचा निर्धारु
श्रीमंत योगी...
यशवंत,कीर्तिवंत,
सामर्थ्यवंत,वरदवंत
पुण्यवंत,नीतिवंत
'जाणता राजा '
महाराष्ट्राचे आराध्यदैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३८० व्या जयंतीनिमित्त लक्ष लक्ष भगव्या शुभेच्छा !


१७ टिप्पण्या:

 1. "आजच्या तरुणांमध्ये राष्ट्र घडवण्याचे व चालवण्याची क्षमता आहे.पण इच्छाशक्तीचा अभाव आणि सातत्याने चुकीचे आदर्श यामुळे तरुण आपले सुप्त सामर्थ्य हरवून बसले आहेत.". . . अगदी सहमत आहे. . .खूप छान लिहलय!!!! शिव संस्कार ही काळाची गरज बनली आहे.

  उत्तर द्याहटवा
 2. कालचा रात्रीचा 'शिव जयंती'निमित्त आमच्या राहत्या भागात झालेल्या धांगडधिंग्याचा गोंधळ पाहून मन खंतावले. रात्रभर रस्त्यात हुल्लडबाजी चालू होती. पोलीस कोठेच दिसत नव्हते. मंडळी दारूच्या नशेत घोषणाबाजी करत होती. आणि हे सर्व शिवाजी महाराजांच्या नावावर खपवले जाणार हे तर अजूनच वाईट! शेवटी न राहवून आज माझ्या ब्लॉग वर कथा रूपात ते सारे मांडले. अशी हुल्लडबाजीची प्रवृत्ती दिवसेंदिवस बळावत आहे.

  अरुंधती

  --
  Sing, Dance, Meditate, Celebrate!
  http://iravatik.blogspot.com/

  उत्तर द्याहटवा
 3. I really liked your post.
  देशातील तरुणानी आपली मानसिकता आणि कृतीत अमुलाग्र बदल घडवून आणायची गरज आहे. This really is important.

  I also have expressed my gratefulness to our incredible king through my poem.

  शिवतेज

  शब्दातीत युगपुरुष तू
  शौर्य, सुमेधा अन् मांगल्याचा सूर्य
  या पावन भूमीचा राजा की आत्म्याचा ईश्वर

  समरांगणी पेटल्या सहस्त्र वीर तलवारी
  हर एक सूर्यशक्तीसम तुझ्या प्रज्ञेने तेजाळलेली

  वैराण भूमीवर अनमोल सृष्टी चे व्रत
  अखिल जगी तुझे उदात्त राज्य
  साक्ष आहे शुक्ल पक्षीचा चन्द्र

  आजही गहीवरे प्रत्येक माता
  कधी लाभेल मुक्तीचे पुण्य
  अन् पुत्र तुजसम त्राता


  निश्चल मृतप्राय आज पुन:श्च ही भूमी
  अर्जुन रक्तास हवी तुझ्या प्रेरणेची नवसंजीवनी

  http://vidnyaya-anuja.blogspot.com/

  Anuja Khaire

  उत्तर द्याहटवा
 4. @मनमौजी
  खरच आहे चुकीचे आदर्श आपल्यला जीवनात योग्य दिशा देऊ शकत नाहीत.
  त्यासाठी पालकांनीच लहानपणापासून मुलांना योग्य आदर्शांची ओळख करून द्यायला हवी
  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 5. @अशिष
  धन्यवाद
  तुम्हालाही शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

  उत्तर द्याहटवा
 6. @iravati अरुंधती kulkarni
  खरच हे एक दुख आहे आपले शिवजयंतीच्या किंवा कोणत्याही उत्सवाच्या नावाखाली असली हुल्लडबाजी ह्वायला नको आहे .
  अशावेळी आपणच अशा उत्सवाच्या वेळी एखादा चांगला उपक्रम राबवून योग्य आदर्श घालून द्यायला हवा
  असो धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 7. @अनुजा
  मानसिकता सहज सहजी बदलत नाही असे मला वाटते
  त्यासाठी लहानपणापासूनच मुलांना योग्य आदर्श घालून द्यायला हवेत
  त्यांच्यात इतिहास, वाचन,ऐतिहासिक वास्तूंबद्दलची आवड वाढवली पाहिजे किंवा त्याला प्रोस्ताहन द्यायला हवे
  असो
  'शिवतेज' एकदम मस्त आवडले मला
  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 8. हो अगदि पटले! मुलांना इतिहासाबद्दल अभिमान वाटला पाहीजे आणि त्याचे महत्वही पटले पाहीजे.
  कविते वरील प्रतिक्रिये बद्दल धन्यवाद

  शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

  उत्तर द्याहटवा
 9. @अनुजा
  तुम्हालाही शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

  उत्तर द्याहटवा
 10. खुपच छान लिहिलं आहेस. हिंदवी स्वराज्य संस्थापक 'हिंदू नृसिंह प्रभो शिवाजी राजा' च्या जयंतीनिमित्त अनेक शुभेच्छा !!

  उत्तर द्याहटवा
 11. विक्रम अगदी छान लेख लिहिला आहेस.
  लहानपणा पासूनच प्रत्येक आईने जिजाऊ मां साहेबां सारखे आपल्या मुलावर संस्कार केले तर निश्चितच अनेक शिवाजी महाराज या महाराष्ट्रात नव्हे तर या भारत भूमीत जन्माला येतील...
  सामाजिक विषयात हात घातलास म्हणून तुझे आभार...
  शिवरायांचे संस्कार आजच्या तरुणावर झाले तर नक्कीच भारताला पर्यायाने या महाराष्ट्र भूमीला उज्वल दिवस नक्की आहेत...

  उत्तर द्याहटवा
 12. @ हेरंब
  धन्यवाद

  @अमोल
  आपला अभिप्राय महत्वाचा आहे आमच्यासाठी
  योग्य मार्गदर्शन लहानपणापासूनच लाभल्यास मुलांच्यात खूप बदल घडू शकतो असो
  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 13. शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !

  उत्तर द्याहटवा
 14. प्रत्येक तरूणाची स्वतःची अशी एक मनःस्थिती असते, बहुतेक मराठी तरूणच नव्हे तर इतर परप्रांतिय तरूणांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अतिशय प्रभाव आहे. महाराजांचे तेजच असे होते की, त्यांच्यापुढे कितीही बलाढ्य गनिमी टिकला नाही. त्यांच्या शौर्याचा, चातुर्याचा, रयतेबद्दल असलेल्या कनवाळूपणाचा प्रत्येकालाच अभिमान आहे आणि असायला हवा.

  पण मला एक गोष्ट सांगावी वाटते, आज-काल, म्हणजे गेल्या तीन शतकांपासून, दरवर्षी शिवजयंतीला प्रत्येक नगरात शिवाजी महाराजांची भव्य अशी मिरवणूक निघते. पण आत्ताच्याच काही शिवजयंत्यांना महाराजांची मिरवणूक तर निघते, पण त्यात लावले जाणारे डीजे, अश्लिल पाश्चात्य गाणी, व आवाज-सीमेची कसलिही दक्षता न बाळगता वाढवला जाणारा त्या गाण्यांचा आवाज, नाहक गोर-गरीब लोकांच्या दैनंदिन व्यवसायांवर आणली जाणारी बंदी या सर्व गोष्टी मला खुप बोचतात. महाराजांनी अशी शिकवण कधी दिली असल्याचे मला तरी अजुन कुठे वाचनात आले? काही समाज-कंटक, आपल्या राजनैतिक स्वार्थापायी पैशांची वारेमाप उधळून करून अश्या मिरवणूका काढतात खर्‍या, पण त्याचा सामन्य लोकांना (ज्यांनाही महाराजांबद्दल अतिशय आदर व अभिमान आहेत अशी लोकं) अतोनात त्रास होतो, शिवाय पोलोसांच्या प्रचंड फौजा बोलावल्या जातात, कशासाठी, वरील एका प्रतिक्रियेत इरावतीजींनी सांगितलेल्या प्रसंगांना हाताळण्यासाठीच... जर असे लोक स्वतःला शिवाजी महाराजांना मानणारे म्हणवून घेत असतील, तर त्यांनी महाराजांच्या आत्मचरित्रामधून काय शिकले, का काही शिकलेच नाहीत, देव जाणो...!

  मी सुद्धा एक विद्यार्थी आहे, माझी महाराजांवर आपल्या महाराष्ट्रातील तसेच आपल्या राष्ट्रातील आणि माणुसकी जपणार्‍या जगातील असंख्य लोकांवर माझी श्रद्धा आहे. महाराजांच्या जीवनातील त्यांनी जगलेला क्षणन्-क्षण आजच्या तरूण पिढीला स्वतःच्या दैनंदिन जीवनात घेऊन त्याला समाजपयोगी बनवण्याची नितांत गरज आहे. असो, मी आपल्या संस्कृतीला जाणण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यात आपल्या मराठी संस्कृतीबद्दल तर मला वेड लागेल एवढं साहित्य आपल्या पुराण-आप्तजनांनी आपल्यासाठी सोडले आहे, बघुयात माझ्यासारखे किती तरूण आपल्या मातृभूला जगात मान उंचावण्याची संधी देतात ते..!

  छत्रपती शिवाजी महाराजांसाठी अनुजा जींनी बनवलेलं काव्य अतिशय मधुर आहे. त्यांचे आभार.

  माझ्या सर्व मराठी बांधवांना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा! (माफ करा, माझी ही प्रतिक्रिया जरा खुपच उशिरा येतेय त्यामुळे! ;) )

  तुम्ही लिहिलेला लेख नेहमीप्रमाणे काहीना-काही शिकण्यासारखाच होता, आपलेही मनःपूर्वक आभार!

  विशल्या!

  उत्तर द्याहटवा
 15. @विशाल
  धन्यवाद आपल्या विस्तृत अभिप्रायाबद्दल
  सध्याच्या तरुणांवर महाराजांचा प्रभाव असला तरी ते त्यांच्यापासून प्रेरणा घेतात असे दिसून नाही येत सहसा
  परप्रांतीय तरुणांचे म्हणशील तर खूप तरुण महाराजांना अजून 'लुटारू'म्हणून संबोधताना मी पाहिले आहे म्हणजे त्यांना खरे शिवाजी असू समजलेच नाहीत

  तू म्हणत आहे त्यात काही प्रमाणात तथ्य हि आहे आजकाल शिवजयंती किंवा बाकी सणांच्या नावाखाली धांगडधीन्ग्गा घालण्याचे प्रमाण वाढले आहे परंतु अशा परिस्थितीतही काही लोक चांगले उपक्रम करताना दिसून येतात हेही ध्यानात घेतले पाहिजे.

  तू म्हणत आहेस त्याप्रमाणे महाराजांच्या जीवनातून प्रत्येक तरुणाने प्रेरणा घ्यायचे ठरवले तर आपल्या देशाला उज्ज्वल भवितव्य नक्कीच लाभू शकेल :)

  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 16. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखा हे काम करत आहेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं ... एक बाल स्वयंसेवक म्हणून आणि आता संघाचा जबाबदार अधिकारी म्हणून.

  उत्तर द्याहटवा