शुक्रवार, ५ मार्च, २०१०

यांचा आक्रोश कोणी ऐकला का ?

काही दिवसापूर्वी पाकिस्तानमध्ये २ शीख बांधवांची हत्या तालिबान्यांनी  केली.त्यांचा शिरच्छेद करून ती मुंडकी गुरुद्वाराला भेट म्हणून पाठवण्यात आली.काही काळापुरती हि बातमी न्यूज वर झळकली आपल्यातील काहींनी वाचली काहींनी नाही वाचली.कोणी २ शब्दात अरे वाईट झाले असे बोललो कोणी तेही नाही बोलले. मरणारे  कुत्र्याच्या मौतीने मेले कोणाला काही दुख नाही.
हिंदुस्तान सरकारने नेहमीप्रमाणे तीव्र  शब्दात या गोष्टीचा निषेध नोंदवला झाले. हा सगळा मला षंढपणा वाटतो.
काय आहे कोणत्याही हिंदूला  हिंदूंच्या हत्तेचे दुख आता होतच नाही असे वाटते.त्यांना आता त्याची सवय झालीय.शीख - हिंदू यांनी इतिहासकाळापासून मुस्लीम धर्मांतेविरुद्ध कायमच  तलवारी उपसल्या आहेत.धर्मासाठी बलिदान दिले आहे.त्याच धर्माचा शिरच्छेद होताना लोकांचे  रक्त उसळत कसे नाही ?
फाळणीनंतर काय झाले मुस्लिमांसाठी 'पाकिस्तान' निर्माण झाले पण 'हिंदून'साठी हिंदुस्तान तयार झाले का ? नाही ...
देश निधर्मी ( सेक्युलर ? ) आहे असे सांगून हिंदुना कायम फसवण्यात  आले आहे. या निधर्मीपणाच्या आडूनच आपले पंतप्रधान या देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे असे बिनदिक्त्तपणे म्हणू शकतात. मग हिंदुनी जायचे कुठे ? आज हिंदू -शीख यांचा पाकिस्तानात शिरच्छेद होत आहे आणि हिंदुस्तानात ते पाकिस्तानी अतिरेक्यांच्या बॉम्बस्फोटात मारत आहेत.म्हणजे दोन्हीकडे मरण हिंदूंचेच .उठसुठ मानवाधिकाराची बांग देणारे पाकिस्तानात दोन हिंदू शिखांची हत्त्या झाल्यावर काय करत होते ? हिंदूंच्या अशा हत्त्या पाकिस्तानात नेहमीच होत असतात आणि त्याचे कोणालाच काही देणेघेणे राहिले नाही.
पण चूक कुणाची ? आपण 'हिंदू' आहोत याचा गर्व किंवा अभिमान हिंदूमध्ये राहिला आहे का ? आजकाल काहीनातर आपण हिंदू आहोत याचीही लाज वाटायला लागली आहे . मग याच्यापेक्षा वेगळे काय घडणार ? हिंदुना हिंदू म्हणून घेण्यात काय कमीपणा आहे हेच समजण्यापलीकडचे  आहे.


 'मुझे अपने को हिंदू कहलाना एक गाली सा लागता है' असे वक्तव्य काही दिवसापूर्वी हिंदीतील प्रसिद्ध लेखक ओमप्रकाश वाल्मिकी यांनी जयपुरात आंतरराष्ट्रीय साहित्य संमेलनात केले होते. वर्तमानपत्रांनी  याला चांगली प्रसिद्धी दिली होती.हिंदू जेंव्हा हिंदूला काही बोलतो तेंव्हा या सो कौल्ड सेक्युलर मिडीयाला खूप मजा वाटते आणि ती त्यांच्यासाठी सर्वात मोठी बातमी बनते.
'मी हिंदू असल्याची मला लाज वाटते' अशाप्रकारचे वक्तव्य काही वर्षापूर्वी केंद्रीय मंत्री टी. आर.बालू यांनी ख्रिश्चनांच्या  एका कार्यक्रमात  केले होते. त्यावेळीही या हिंदूद्वेष्ट्या वर्तमानपत्रांनी त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला होता. विशेस म्हणजे या सर्व वर्तमानपत्रांचे संपादक हे हिंदूच होते.

पाकिस्तान आपला चांगला शेजारी आहे आणि त्याच्याशी आपण चांगलेच वागले पाहिजे असे सांगणारे आणि त्याला पाठींबा देणारे हिंदू  या शीख हत्त्यांचा साधा निषेध करायला तरी  पुढे येतील का ?
नाही कोणी येणार नाही हो
हे असाच चालू राहणार हिंदू मरत राहणार इथे नाहीतर तिथे ......कोणाला काही फरक पडत नाही
(टीप-यातील काही मुद्दे राउत यांच्या लेखातून  घेण्यात आले आहेत )
जय हिंद !
जय महाराष्ट्र !

१६ टिप्पण्या:

  1. असे जर चालू राहिले तर एक दिवस असा येईल कि हिंदू धर्माचे टायाटेनिक जहाज होण्यास वेळ लागणार नाही...

    उत्तर द्याहटवा
  2. विक्रम, Aapale barech lekh mi vachlele aahet...Sunder lihita aapan..pan khara sangayachya zala tar aaplya hakela saad ghalnare khup kami himdu rajile aata..Mala pan yachach dukh hotay...tumachyasarkhich tagmag hotey...pan kay karaycha? Lekh uttam zalay tumacha!

    उत्तर द्याहटवा
  3. दोन पाकिस्तानी शिख लोकांना पाकिस्तानी मुस्लिम लोकांनी मारलं.. ही अशी बातमी कशी काय वाटते वाचायला??
    जर पाकिस्तानने भारतावर हल्ला केला असता, तर हेच पाकिस्तानी नागरीक शिख लोकं भारतियांवर गोळ्या झाडायला मागे पुढे पहाणार नाहीत.
    इराक मधे पण नेमकं हेच झालं. इराकी अमेरिकन जे मरिन्स म्हणुन काम करायचे त्यांनाच इराक मधे पाठवलं गेलं होतं त्यांचा खात्मा करायला.. असो.. विचार करण्यासारखी गोष्ट आहे. अगदी जे मनात आलं ते लिहिलंय इथे..

    उत्तर द्याहटवा
  4. खरच याचा संताप येतोय..
    पण..
    महेंद्र यांनी योग्य मुद्दा उपस्थित केला आहे.
    आता "खरा" धर्मान्धतावाद करायला कोणताही धर्म किंवा कोणताही राष्ट्र सोडला नाही या पृथ्वीवर..

    उत्तर द्याहटवा
  5. @चैतन्य
    आणि ते जहाज दुब्वायला आपलेच काही लोक पुढे असतील असे मला वाटते असो
    धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल

    उत्तर द्याहटवा
  6. @अशिष
    धन्यवाद तुम्ही आमच्यावर लक्ष ठेऊन आहात याबद्दल आम्हाला आनंद आहे.
    माझ्या मतांबद्दल अनुमोदन देणारे किंवा मतांना पाठींबा देणारे कमी असलेतरी काही लोक शिल्लक आहेत हे हि नसे थोडके असे समजून मी चालतो
    नसती तगमग करू नका कमीत कमी स्वतः हिंदू आहोत याची लाज बाळगू नका कारण काही लोकांना आता तशी वाटायला हि लागली आहे हे वरील उदाहरणातून दिसायला हि लागले आहे
    असो
    धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल

    उत्तर द्याहटवा
  7. @ महेंद्र काका
    धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल , आपण जे मनात होत ते लिहाल याबद्दल आभारीच आहे :)
    मी पोस्ट लिहित असताना अशी प्रतिक्रिया येणार हे माझ्या मनात आले होतेच तुम्ही ती अपेक्षा पूर्ण केलीत.
    त्या हत्त्या पाकिस्तानातील सामान्य माणसांनी न करता किंवा त्यांच्यातील वैयक्तिक भांडणातून न होता तालिबान्यांनी घडवून आणल्या आहेत हे लक्षात घ्यावे

    ते लोक शीख-हिंदू आहेत म्हणून जाणूनबुजून त्यांना लक्ष करण्यात आले होते हि महत्वाची गोष्ट तुम्ही लक्षात घेत नाही.
    पाकिस्तानमधील हिंदुना त्यांचे मुलभूत अधिकार हि मिळत नाहीत कारण फक्त ते गैरमुस्लिम आहेत.या आधीही गिरीश कुमार या हिंदू अभियंत्याची हत्या करण्यात आली होती त्यावेळी त्याच्या वडिलांनी काय म्हंटले होते हे लक्षात घ्यावे ते म्हणाले " आम्ही हिंदू आहोत हाच आमचा गुन्हा.पाकिस्तानातील हिंदू अल्पसंख्याकांना कोणीच वाली नाही.कुणीच आमचे ऐकत नाही.आम्हाला सुरक्षा नाही.कायद्याचे संरक्षण नाही.आम्ही हिंदू असल्यानेच आमच्यावर हल्ले होत आहेत.माझ्या मुलाचे अपहरण करून मारावे यामागे दुसरे कोणतेच कारण नाही.तो हिंदू होता हाच त्याचा गुन्हा.आम्ही काय करू?"
    यावर काय म्हणाल ?

    उत्तर द्याहटवा
  8. @ योग
    काकांच्या प्रतिक्रियेला मी वर उत्तर दिलेच आहे
    आपल्या प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  9. There is clear shift in the thought process and going forward, the future generations will grow with lot of likings and dislikings, castism and adjustments... Their mind would be cluttered with N number of divisions, and the world would be divided into smaller sections like USSR had been divided based on languge caste et al... limiting the scope and understanding...

    उत्तर द्याहटवा
  10. ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  11. Dharmavedepana ani Dharmabhiman Lagato Chatrapati Sambhaji Maharajansarakha To Hindunmadhe Nahi...

    उत्तर द्याहटवा
  12. विक्रम
    जेंव्हा विभाजन झालं तेंव्हा हे लोकं तिकडे राहिले.हिंदु म्हणुन त्यांचा कळवळा येतो, पण पाकीस्तानी असल्यामुळे फारशी जवळीक पण वाटत नाही. अर्थात त्यांना मारले गेले याचे मी समर्थन करतो असे नाही- जे झालं ते वाईटच झालं, पण त्या वर आपण काहीच करु शकत नाही.

    भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे. त्यामुळे भारत सरकारने त्या पाकिस्तानी शिख लोकांच्या शिरकाणाविरुध्द काही बोलायचा प्रश्नच उद्भवत नाही. जर साधी नाराजी जरी व्यक्त केली तरी तो त्यांचा अंतर्गत मामला आहे असे उतर मिळेल.

    जगामधे केवळ एकच हिंदु राष्ट्र होतं. दुर्दैवाने ते पण आता राहिलेलं नाही. नेपाळ!! नेपाळ नरेश केवळ एकच हिंदु राजा होता.

    भारत- एक हिंदु राष्ट्र- ची संकल्पनाच जिथे लोकांना पसंत पडत नाही, आणि जेंव्हा याच देशातल्या हिंदुंचे धर्म परिवर्तन केले जाते,आणि सरकार त्यावर काहीच करित नाही, तेंव्हा पाकिस्तान तर दुरची ्गोष्ट आहे ..सरकारने तेवढे जरी ( धर्म परिवर्तन) थांबवले तरी पुरेसे आहे, नाहीतर भारतामधे हिंदुच अल्प संख्यांक होतील. पाकिस्तान तर दुरची गोष्ट राहिली.

    पाकिस्तानात तर आहेतच, पण अफगाणीस्थान मधे पण बरेच सरदार रहातात. पाकिस्तान एक मुस्लिम देश आहे, तेंव्हा त्यांच्या देशात इतर धर्मियांना त्रास देणे अगदी सहाजिक आहे( जरी योग्य नसले तरी). अफगाणीस्थानात जे मारले जातात त्यांना इतकी प्रसिध्दी दिली जात नाही.

    पाकिस्तानात जे हिंदु राहिले, त्यांच्या पुर्वजांचा तिकडे रहाण्याचा निर्णय चुकिचा होता असे समजायची वेळ आलेली आहे आता??

    उत्तर द्याहटवा
  13. @करण, @प्रवीण
    धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल

    उत्तर द्याहटवा
  14. @महेंद्र काका
    ते हिंदू आहेत म्हणून त्यांना मारले जात आहे याचा मला खर तर राग आहे,ते पाकिस्तानी आहेत हे मी मान्य करतो पण त्यांना फक्त ते गैरमुस्लिम आणि आपल्या धर्माचे असल्याने मारले जात आहे
    भारत हा धर्मनिरपेक्ष देश आहे????
    मला याचेच आश्चर्य वाटते जेंव्हा फाळणी झाली त्यामुळे मुस्लिमांसाठी 'पाकिस्तान' मिळाले पण हिंदूंना 'हिंदुस्तान' मिळाले का ? नाही
    त्यांना सो कौल्ड सेक्युलर भारत मिळाला.
    नेपाळ होते पण त्याचाही काही जास्त उपयोग होता असे मला वाटत नाही ते फक्त नावाला हिंदू राष्ट्र होते.
    आजच्या जगात जास्त हिंदू असणारे (नावाला) बलाढ्य राष्ट्र फक्त आपले आहे पण तिथेच हालत बेकार आहे तर बाकीकडे काय लक्ष घालणार ?
    ते तिथे का राहिले हे त्यावेळच्या परिस्थितीवर अवलंबून आहे पण तो निर्णय चुकीचा होता असे त्यांना आता नक्कीच वाटत असावे.

    उत्तर द्याहटवा
  15. If we're of a specific religion, then we must has to be bound ever with it! I also hate secularism! BTW, the post you written is much effective, many people and I, are of similar thinking as of yours!

    Thank you!

    उत्तर द्याहटवा