शनिवार, २४ जुलै, २०१०

क्षमस्व महाराज क्षमस्व....

होय महाराज, आम्हाला उदार  अंतकरणाने  माफ करा; कारण आम्ही कोडगे आणि लाजलज्जा कोळून प्यायलेले बेशरम मराठी लोक आहोत.आम्ही अत्यंत निर्ढावलेले नालायक भारतीय आहोत.आम्हाला तुमचे कर्तुत्व पुढे चालीवता आले नाही;पण तुमच्या त्या महान कर्तबगारीचा सन्मान व प्रतिष्ठा राखणेसुद्धा अशक्य झाले आहे.आम्ही इतके आत्मकेंद्री आणि svarthane गडबडून गेलो आहोत,कि आमचा पूर्वज,आमचे दैवत असलेल्या तुमच्यावर कोणीही गरळ ओकावी इतके आजाराक तुमच्या या हिंदुस्तानात आज माजले आहे.तुम्ही ज्याचा कोथळा बाहेर काढलात त्या अफझलखानाच्या प्रतिष्ठेला या देशात आज धक्का लागू शकत नाही;पण महाराज आपली प्रतिष्ठा पायदळी तुडविण्याचा मुलभूत अधिकार कोणालाही असू शकतो;कारण तुमचे नाव आता स्वाभिमानाशी ,कर्तव्याशी जोडले नसून स्वार्थासाठी ते चलनी नाणे झाले आहे.कुणासाठी तुम्ही मराठा जातीचे तर कुणासाठी तुम्ही कुणबी असता.कुणासाठी मराठी तर कोणासाठी हिंदू असता.या देशाचा उदगाता  म्हणून तुमची कोणाला ओळख राहिलेली नसावी.नाही तर लेनच्या अधिकारासाठी कोर्टात धावणारे इथे कशाला निपजले असते? मराठा म्हणून सत्तेवर हक्क सांगणारे किंवा शिवाजीवर अधिकार सांगणारे आज आम्हाला न्यायालयाचा सन्मान राखण्याचा सल्ला देत आहेत.महाराष्ट्रात शिवाजीबद्दल अभिमान बाळगणे अथवा त्या राजाच्या अवमानाने प्रक्षुब्ध होणे आक्षेपार्ह ठरिवले जात आहे.त्यावर न्यायालयाची मान्यता मिळवली जात आहे.त्या आम्हा मराठ्यांना वा मराठी माणसाना तुमचे नाव घेण्याचा अधिकार तरी उरतो काय ? महाराष्ट्र हे मराठी भाषिक राज्य आहे आणि त्यात मराठीचा अभिमान बाळगणे गुन्हा आहे.महाराष्ट्र शिवरायांचा आहे आणि तिथे त्या राष्ट्रपुरुषाचा अवमान ,अप्रीतीष्ठेला विरोध करणे हा अपराध झालेला आहे.मग महाराज, आम्ही कुठल्या तोंडाने तुमचे नाव घ्यायचे ? तुमचा  जयजयकर तरी करायचा अधिकार आम्हाला उरतो काय ?
 पन्नास साठ वर्षात या देशाची वैचारिक व बौद्धिक घसरगुंडी किती झाली असावी ? जे आदर्श आणि अभिमानाच्या खुणा आहेत त्यांचाच गर्व बाळगणे आता गुन्हा झाला आहे.कोणीही यावे आणि आमच्या अभिमानाला,स्वाभिमानाला लाथ मारावी इतकी स्वातंत्र्याची गटारगंगा दुथडी भरून वाहू लागली आहे.ज्या अभिमानाने या देशाला पारतंत्र्यातून मुक्त केले तीच प्रेरणा आज कवडीमोल झाली आहे.कुठली तरी कंपनी विमानतळाचे पुननिर्माण करते आणि तिथला शिवरायांचा पुतळा अडगळ हलवावी त्याप्रमाणे इतरत्र उचलून नेण्याचे मनसुबे रचते.कुणी अमेरिकन शहाणा इतिहासाचा अभ्यास करायला येतो आणि आमच्या दैवतावर चिखलफेक करून निघून जातो.तुमच्या पराक्रमाचे चित्र फलकावर लावले तर त्याच्यावरही आमचेच राज्यकर्ते bandi घालतात.त्या अफझलखानाच्या प्रतिष्ठेची कायद्याला च्न्ता आहे.शिवरायांची बदनामी करणार्याच्या अविष्कार स्वातंत्र्याला इथे कायद्याचे संरक्षण आहे;पण ते स्वातंत्र्य कोठून आले.कोणामुळे आले,कुठल्या प्रेरणेने मिळू शकले,याचेही स्मरण कुणाला उरलेले नाही.त्याच स्वातंत्र्याने अविष्कार स्वातंत्र्य राज्य घटनेत समाविष्ट होऊ शकले.आज तेच अविष्कार स्वातंत्र्य वापरून कशावर घाला घातला जातो आहे? शिवराय या नावाच्या एका ज्वलंत राष्ट्रीय प्रेरणेवर हल्ला झाला आहे.ती प्रेरणा मारली गेली,निष्प्रभ झाली तर स्वातंत्र्याला ग्लानी यायला वेळ लागणार नाही.तसे झाले तर मग कुणाला अविष्कार स्वातंत्र्यहि उपभोगता येणार नाही;कारण राष्ट्रीय स्वातंत्र्याला बाधा आणणारे स्वातंत्र्य घातक असते. शिवरायांची बदनामी हा केवळ मराठी -मराठ्यांचा विषय नसून भारतीय स्वातंत्र्याची उपजत प्रेरणा आहे.तिच्यावर हल्ला राष्ट्रविघातक ठरल्याशिवाय राहणार नाही.
  जेम्स लेनचे हे पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर शिवसेना, संभाजी ब्रिगेड यासारख्या संघटनांनी हुल्लड माजवली होती.म्हणून  त्यांच्यापुरता विषय नाही,तो फक्त महाराष्ट्राचा विषय नाही,कारण साडेतीनशे वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी नावाचा झंझावात उभा राहिला तो महाराष्ट्राला मुक्त करण्यापुरता नव्हता.त्याने अटकेपार झेंडे लावले.तंजावर पासून दिल्लीपर्यंत धडक मारली.त्यामुळेच आज हिंदू किंवा भारतीय म्हणवणारे सन्मानाने जगू शकत आहेत.तेंव्हा शिवाजी या शब्दाशी प्रत्येक भारतीयाचा आत्मसन्मान जोडलेला आहे.तो कायद्याचा किंवा न्यायालयाचा विषय नाही.सरकारने असल्या पुस्तकावर बंदी घालायलाच नको होती.आम्हा भारतीयांच्या भावनाच इतक्या तीव्र हव्यात,कि असे पुस्तक छापण्याची व विकण्याची कोणाला हिम्मत होता कामा नये.ज्यांनी चार वर्षापूर्वी याप्रकरणी रस्त्यावर उतरण्याचे धाडस केले त्यांनी एक अतिशय गंभीर चूक केली होती.सरकारने त्यावर बंदी घालण्याची अपेक्षा चूक होती आणि न्यायालाने ती चूक ठरवली आहे.लोकांच्या भावना व श्रद्धा हा सरकार व कायद्याचा विषय नसतो आणि असता कामा नये.तो सामान्य माणसाने स्वताच निकालात काढायला हवा.आम्हा शिवप्रेमी,शिवभक्तांच्या भावना इतक्या प्रखर हव्यात ,कि कुणा पुस्तकाच्या दुकानदार,विक्रेत्याला असे पुस्तक जवळ बाळगण्याची भीती वाटायला हवी.हे सत्य शिवप्रेमी म्हणून मिरवणारे विसरून गेले.तिथेच सगळी गफलत  झाली आहे.शिवरायांनी दिल्लीश्वराकडे न्याय मागितला नव्हता.त्यांनी न्याय मिळवला होता.आपली ताकद अशी सिद्ध केली ,कि अन्याय करू पाहणार्याची हिम्मत खचली होती.शिवाजी या नावाबद्दल,व्यक्ती व कर्तुवाबद्दल आस्था असलेले ती ताकद दाखवणार आहेत काय ?तरच त्यांना व आम्हा भारतीयांना शिवरायांचे नाव घेण्याचा अधिकार असेल.तो अधिकार आपण सिद्ध करणार काय ????
 जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली गेली त्यानंतर  ४-५ दिवस त्यावर चर्चा झाल्या, निषेध व्यक्त करण्याचा कार्यक्रम झाला परत सर्व शांत सर्वजण  आपापल्या कामात दंग झालेआहेत परंतु हा तोरसेकरांचा  लेख माझ्या मनाला  अस्वस्थ करून गेला आहे.मी फक्त एवढेच म्हणू शकेल क्षमस्व महाराज क्षमस्व.

१४ टिप्पण्या:

 1. असले अभिव्यक्तिस्वातंत्र्य खड्ड्यात गाडून टाका.
  गेल्या रविवारीच मी या पुस्तकाची एक निषेधसभा एका चौकात पाहिली, एका मुस्लिम संस्थेने आयोजित केलेली. याचाच अर्थ युगपुरुषांचा कुठलाही धर्म नसतो.

  उत्तर द्याहटवा
 2. इच्छाशक्ती आपली कमी पडते कुठे तरी...खुपच कोडगे झालो आहोत आपण...आपल्या हातात काहीच नाही...पांढरपेशी म्हणवत असल्याने आपण ना रस्त्यावर येऊ शकत तसेच बुद्धीजीवी असल्याने ना असले मराठी अस्मितेवर होणारे बलात्कार पाहू शकत...खूप त्रास होतो हे सगळे पाहिल्यावर...

  उत्तर द्याहटवा
 3. .लोकांच्या भावना व श्रद्धा हा सरकार व कायद्याचा विषय नसतो आणि असता कामा नये.तो सामान्य माणसाने स्वताच निकालात काढायला हवा.आम्हा शिवप्रेमी,शिवभक्तांच्या भावना इतक्या प्रखर हव्यात ,कि कुणा पुस्तकाच्या दुकानदार,विक्रेत्याला असे पुस्तक जवळ बाळगण्याची भीती वाटायला हवी.
  =======

  या भीतीहूनही मोठी भावना हवी. या देशातल्या प्रत्येकाला जर नीतिमात्तेची , स्वाभिमानाची , आदर्शाची चाड असायला हवी. शिवाभक्तांची भीती वाटण्यापेक्षा स्वत:च्या मनाची लाज वाटली पाहिजे आणि प्रत्येकाने ह्या पुस्तकावर स्वयंघोषित बहिष्कार घातला पाहिजे. चौकाचौकात शिवाप्रतापाची- अफजल वधाची पोस्टर्स लावली पाहिजेत.

  उत्तर द्याहटवा
 4. @pankaj
  बिनबुडाचे आरोप करायचे,लिहायचे आणि त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटली की अभिव्यक्ती स्वातंत्र्याची ब्रह्महत्या झाल्याचा कांगावा करायचा. हि आजची रीतच आहे

  उत्तर द्याहटवा
 5. @माधव
  अगदी खरे बोललास पांढरपेशे होऊन आपण कोणतीही प्रतिक्रिया द्यायला भीत आहोत तसेच आपल्यालाही अशा गोष्टीनीची सवय झाली आहे आहे काही फरक पडताना दिसत नाही
  आणि हेच अशा गोष्टी करणार्यांचे यश आहे.

  उत्तर द्याहटवा
 6. @विनायकजी अगदी खर बोललात आपण
  परंतु सामान्य माणूस आजकाल भावनाशुन्य झाला आहे त्याला काय करणार ?

  उत्तर द्याहटवा
 7. शिवरायांचे चारित्र्यच एवढे शुद्ध व पवित्र आहे की, त्यांच्यावर गालबोट लावणारा किंवा त्यांना कमी लेखणारा अतिशय त्रास सहन करीत वर गेला किंवा जगला, इतिहासही असेच सांगतो... बाकी तुझ्या लेखातील एकन्-एक शब्द खरा आहे... सर्वात पहिले तर जे अशा गोष्टींबद्दल कांगावा करतात, स्वतः त्यांना इतिहासाची बाराखडीसुद्धा माहित नसते.. शेवटी तू म्हणल्याप्रमाणे अनेकांनी (ज्यात मीसुद्धा होतो) निषेध व्यक्त केला होता, अन नंतर सर्वजण (ज्यात मीसुद्धा आहेच) शांत झाले, फलित मात्र काहीच नाही... मी १ टक्का सुद्धा गांधीवादी (षंढ, छक्का असले वाक्यप्रयोग जरा विचित्र वाटतात, म्हणून त्याला पर्यायी पण लोकप्रिय झालेला शब्द मी वापरला) नसलो तरी तसा असल्याचाच हा पुरावा आहे... त्यामुळे या लेखातील तुझ्या प्रत्येक गोष्टीचे गांभिर्याने विचार-मंथन करुन माझ्यात काही बदल करण्याचे मी ठरवले आहे... आपल्या कुठल्याच राष्ट्रपुरुषाची प्रतिमा मलीन होणार नाही व कोणाला तसे करुसुद्धा देणार नाही, ही मी दररोज नित्य-नियमाने शपथ घेत जाईन... असो... तुझा लेख इतरांन देखील योग्य मार्गदर्शनपर ठरेल, ही आशा व्यक्त करतो!

  उत्तर द्याहटवा
 8. @विशाल
  धन्यवाद विशाल तू म्हणतोयस तसेच सर्वांनी शपथ घेऊन वागायचे ठरवले तर या मातीत कोणत्याही म्हपुर्षाची मानहानी होणार नाही
  वरील लेख माझ्या वाचनात आला होता तो इथे दिला आहे

  उत्तर द्याहटवा
 9. विक्रम चुक आपली आहे ..कोणी एक जेम्स लेन अमेरिकेतुन येतो अन महाराजांवर पुस्तक लिहितो ..म्हणजे ही व्यक्ती बाहेरील आहे आणि त्याला मिळालेल्या साधनांचाह वापरु करुन त्याने हे पुस्तल लिहिलेले असेल ना ..त्याला खराब माहीती मिळालेली त्यावरुन त्याने पुस्तकात सदर खराब वाक्ये लिहिलीत ..याचा कोणी का विचार करत नाहीत ?
  मला वाटतय की यात जास्त दोष जेम्स लेन पेक्षा त्याला माहीती देणार्यांचाच आहे ..तो तर अमेरिकन आहे त्याला माहीती देणारे तर स्वकीयच आहेत ना ?

  उत्तर द्याहटवा
 10. पातीचे कोडे मारावेत तसा लेख आहे... खुप आवडला आणि खुप चांगला धडापण मिळाला...

  उत्तर द्याहटवा
 11. फार परखड मात्र 'स्व'ची जाणीव करुन देणारं लिखाण!

  उत्तर द्याहटवा
 12. @अतुल
  हो तू म्हणत आहेस त्यात तथ्य आहे परंतु या लेखातून हेच सांगायचे आहे कि आपल्या भावनाच एवढ्या तीव्र हव्या आहेत कि असे कोणी कोणाला बोलायची,सांगायची आणि लिहायची हिम्मतच झाली नाही पाहिजे.

  उत्तर द्याहटवा
 13. एखाद्या टुकार पुस्तकी वाक्याने अपमान होईल इतके राजे छोटे नाहीत ... दुसरे कोणीही उठून त्यांना नीचे दाखवावे इतकेही ते छोटे नाहीत...

  मुळात त्यांचा अपमान कोणी करूच शकत नाही इतक्या थोर आणि उत्तुंग पदावर ते पोचलेले आहेत...

  उत्तर द्याहटवा