शनिवार, ५ सप्टेंबर, २००९

गरज कशाची अंधश्रद्धा निर्मुलन कायदा कि प्रबोधनाची ????

अंधश्रद्धा निर्मुलन कायद्याबाबत वेगवेगळे आक्षेप घेतले जातात हे आतापर्यंत दिसून आले आहे आणि त्याला समितीने वेळो वेळी उत्तर देण्याचा प्रयत्न हि केला आहे
या कायद्यातील काही गोष्टी स्पष्ट करण्यात आल्या नाहीत किंवा त्याच्या व्याख्या अधोरेखित करण्यात आल्या नाहीत उदाहणार्थ

'चमत्कार '
आता याची व्याख्या काय ते सांगितले नाही मग 'साई बाबा ' हे चमत्कार करत होते असे त्यांचे भक्त मानतात किंवा ते चमत्कार करत होते म्हणून त्यांना भक्त मानतात असे म्हणा हव तर मग ते अशा वेळी ते कायद्याच्या कचाट्यात येणार का ?
आणि असे झाले तर ते 'अंधश्रद्धेला' नाहीतर 'श्रद्धेला' आह्वान असेल

किंवा आपल्या काही धर्मग्रंथांमध्ये काही बाबी चमत्कार म्हणून नोदावल्या गेल्या आहेत

The Law album coverImage via Wikipedia

आणि त्याच्यावरच आपल्या धर्मिक संस्था अवलंबून आहेत मग त्यावर हि गदा येणार का ?
किंवा जोतिष शास्त्राबद्दल यांची भूमिका काय का तेही गुन्हा ठरणार का ?
असे झाले तरपुन्हा ते 'अंधश्रद्धेला' नाहीतर 'श्रद्धेला' आह्वान असेल

आणि जर कोणी हवेतून उदी, मौल्यवान वस्तू काढून दाखवणे ,मंतरलेले पाणी देऊन आजार बरे करणे असे करत असेलतर तो गुन्हा ठरू शकतो हे मान्य केलेतर त्याला प्रतिबंध करणारा कायदा आता अस्तित्वात नाही का ? तर आहे
उदाहरणार्थ: इंडियन पीनल कोडची अनेक कलमे उपयुक्त ठरू शकतात. भूतबाधा उतरवण्यासाठी जर कोणाला दोरखंडाने बांधले गेले तर आयपीसीच्या ३१९-३२९ कलमांचा वापर करता येईल. इजा केली गेली तर ३२०वे कलम, जीवितालाच धोका उद्भवला तर ३३६वे कलम, दैवी कोपाची भीती घालून एखाद्याला विशिष्ट विधी करण्याची सक्ती करण्यास ५०८वे कलम, सरकारी नोकराने असे प्रकार करण्याविरोधात ४९७वे कलम, फसवणुकीसाठी ४१७वे कलम अशी कलमे अस्तित्वात आहेत त्यांचा वापर करता येऊ शकेल.

किंवा यातच काही बदल करून हा कायदा अजून कडक करता अयू शकत नाही का ?

आता हे बघा
धामिर्क अध्यात्मिक प्रथांच्या नावाखाली दुष्ट प्रथा राबवणे हा या कायद्याच्या १० ११- कलमानुसार गुन्हा आहे. पण १३व्या कलमानुसार हानी पोहोचवणाऱ्या धामिर्क कृत्यांना वगळण्यात आले आहे.

'हानी पोहोचवणाऱ्या' म्हणजे नक्की काय ? आणि हे कोण ठरवणार ?

नरबळीची घटना घडली तर त्यासाठी ३०२ चे कलम आहे. फसवणुकीचा गुन्हा घडला तर ४२० चे कलम आहे. मग वेगळ्या कायद्याची आवश्यकता कशासाठी? फारतर आहे त्याच कायद्यात दुरुस्ती करता येईल.

या विधेयकात अंधविश्वास, आन्ध्श्राधा अज्ञान या संज्ञा, कुठचीही नेमकी व्याख्या करता वापरल्या आहेत.
तसेच तसेच प्रथा रूढी यातील फरक कुठेही स्पष्ट केलेला नाही.

अधिनियम १३ नुसार ''व्यक्तीला मानसिक, शारीरिक वा आथिर्क बाधा पोहोचणाऱ्या धामिर्क विधी कृत्यांना या अधिनियमातील कोणतीही गोष्ट लागू होणार नाही'', असे सांगणारे हे कलम बाधा पोहोचते की नाही हे ठरविण्याचा अधिकार कोणाचा हे सांगत नाहि

'आदी शक्ती असल्याचे भासवून अथवा आदी शक्ती असल्याचा आभास निर्माण करून' या उल्लेखातून विधेयक अशा शक्तींचे अस्तित्व मानते की नाकारते? ते नाकारण्याचा काही लोकांना अधिकार असेल तर ते मानणाऱ्यांचा अधिकारही मान्य करावा लागेल.


श्रद्धा आणि अंधश्रद्धा यात बर्याच ठिकाणी गोंधळ उडतो

श्रद्धा हि एखाद्या माणसावर असू शकते , देवावर किंवा कामावर सुधा असू शकते किंवा प्रयत्न करूनही एखादी गोष्ट साध्य नाहि झाली तर येणाऱ्या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्या श्रद्धेचा उपयोग होवू शकतो

श्रद्धा आणि अंधश्रद्धा यामध्ये खूप पुसट रेषा असते श्रद्धा हि एक मर्यादा सोडून पुढे गेली कि ती अंधश्रद्धा बनते परंतु ती रेषा कोण ठरवणार ?
किंवा माझी श्रद्धा दुसर्या कोणाला अंधश्रद्धा वाटू शकते वा एखाद्याची अंधश्रद्धा मला श्रद्धा भासू शकते मग हे कोण ठरवणार कि श्रद्धा कि अंधश्रद्धा

त्यासाठी श्रद्धेमधील अंधश्रद्धा दूर करण्याची आवशकता आहे आणि ती प्रबोधन करून शक्य आहे नाकी कायदा करून

माणसाच्या सुखाच्या , जीवन जगण्याच्या किंवा राहण्याच्या कल्पना वेगवेगळ्या असतात त्यात समिती हस्तक्षेप कशी काय करणार ?

आकाशात चमकणाऱ्या विजेला घाबरून गुहेत पळणारा माणूस आज हस्तस्पर्शाने बटण दाबून विजेला आमंत्रित करतो किंवा तिची कार्यक्षमता संपवतो.
वीज हा आता चमत्कार उरलेला नाही, म्हणजेच ज्ञानाने माणसाच्या मनातील अज्ञानावर विजेचा झोत टाकल्यामुळेच तेथील अज्ञानाचा अंधकार नाहीसा झाला.
हेच तत्त्व एकुणात लक्षात घेतले तर जनमानसाचे शिक्षण आणि प्रशक्षण अव्याहत चालू ठेवणे आणि वैज्ञानिक सूत्रांचा जीवनातील पडताळा अधिक सहजतेने होईल यासाठी आवश्यक असलेले तंत्र विकसित करून त्याला माणसाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे, म्हणजेच अंधश्रद्धा निर्मूलन आहे.

यातील मुद्दे वेळवेगळ्या लेखातून घेतले आहेत
विक्रम
Reblog this post [with Zemanta]

९ टिप्पण्या:

  1. बरेच मुद्देसुद लिहिलयं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा हा विषय गंभीरच आहे. "श्रद्धा हि एक मर्यादा सोडून पुढे गेली कि ती अंधश्रद्धा बनते! " अगदी महत्चाचं तितकंच खरं! पटलं!!

    उत्तर द्याहटवा
  2. लिंक देण्यासाठी हे पेज पहा. आपण ज्या पध्दतीने "मराठी ब्लॉग्ज" चे विजेट लावले आहे, त्याच प्रमाणे HTML गॅजेट मध्ये हया पेजवर दिलेला कोड पेस्ट करा.

    उत्तर द्याहटवा
  3. अंधश्ाद्धेला आळा घालण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या महाराष्ट्र जादूटोणा, दुष्ट व अघोरी प्रथा निर्मूलन कायद्याच्या मसुद्यावर अनेक प्रकारचे आक्षेप घेण्यात येतात. वास्तविक हा मसुदा संयुक्त चिकित्सा समितीत चचेर्ला आला असता या आक्षेपांबाबत विचारविनिमय झाला आहे. महाराष्ट्र अंधश्ाद्धा निर्मूलन समितीच्या प्रतिनिधींनी वेळोवेळी स्पष्टीकरणेही दिलेली आहेत. तरीही वारंवार हे मुद्दे उपस्थित केले जात आहेत. त्यातले काही मुद्दे दोन्ही बाजूंनी...

    * या कायद्यातल्या व्याख्या संदिग्ध आहेत. उदाहरणार्थ 'चमत्कार' या शब्दाची व्याख्या घेतली तर मग साईबाबांसारख्या थोर अवतारांचीही गणना त्यात करावी लागेल. पर्यायाने हे अंधश्ाद्धेला नव्हे तर श्ाद्धेलाच आव्हान ठरेल आणि भक्ती करणे हाच गुन्हा ठरेल.

    * यावर स्पष्टीकरण असे: कायद्यातल्या तरतुदीनुसार हातचलाखी करून चमत्काराचा आव आणणे आणि असे चमत्कार करून त्यायोगे पैसे कमावणे हा गुन्हा ठरतो. साईबाबांसारखे कलंदर आणि परोपकारी व्यक्तिमत्व या व्याख्येत बसत नाही.

    * मग सत्यसाईबाबांचे काय? बरेचसे राजकारणी व उच्चपदस्थ त्यांचे भक्त आहेत...

    * याचे स्पष्टीकरण सोेपे आहे: हवेतून उदी, मौल्यवान घड्याळे काढून दाखवणे, किमती नजराणे स्वीकारणे, मंतरलेले पाणी देऊन आजार बरे करण्याची ग्वाही देणे असे व्यवहार असतील तर ते उघडपणे वैद्यकशास्त्राच्या क्षेत्रात ढवळाढवळ करणारे तसेच चमत्कारांच्या माध्यमातून दव्यार्जन करणारे असल्याचे सिद्ध झाले तर सत्यसाईबाबा किंवा तत्सम कोणीही कारवाईच्या चौकटीत येऊ शकतील.

    * हिंदू जनजागरण समितीच्या मते अंधश्ाद्धा निर्मूलनासाठी वेगळा कायदा करण्याची गरजच नाही. आता आहेत त्या तरतुदींनुसारही कारवाई होऊ शकते. उदाहरणार्थ: इंडियन पीनल कोडची अनेक कलमे उपयुक्त ठरू शकतात. भूतबाधा उतरवण्यासाठी जर कोणाला दोरखंडाने बांधले गेले तर आयपीसीच्या ३१९-३२९ कलमांचा वापर करता येईल. इजा केली गेली तर ३२०वे कलम, जीवितालाच धोका उद्भवला तर ३३६वे कलम, दैवी कोपाची भीती घालून एखाद्याला विशिष्ट विधी करण्याची सक्ती करण्यास ५०८वे कलम, सरकारी नोकराने असे प्रकार करण्याविरोधात ४९७वे कलम, फसवणुकीसाठी ४१७वे कलम अशी कलमे अस्तित्वात आहेत व त्यांचा वापर करता येऊ शकेल.

    * महाराष्ट्र अंधश्ाद्धा निर्मूलन समितीच्या मते आयपीसीची कलमे उपयुक्त असली तरी त्याखाली दाखल होणारे गुन्हे अदखलपात्र आहेत. अशा प्रकारच्या गुन्ह्यांची तीव्रता बरेचदा खूपच असल्याने परिणामकारक कारवाई होण्यासाठी नव्या कायद्यात त्यांचे स्वरूप दखलपात्र गुन्हे असणार आहे. कारवाईच्या बडग्यातून सुटण्याच्या पळवाटा उपलब्ध असल्या की गैरकृत्यांना पायबंद बसणे अवघड असते. नव्या कायद्यात जुन्या पळवाटा तर बुजवण्यात आल्या आहेतच, परंतु नव्यानेही काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

    * केवळ अंधश्ाद्धांना खतपाणी घालणारी कृत्येच नव्हेत तर त्यांना बढावा देणारे साहित्य व जाहिरातीही या कायद्याच्या कक्षेत येणार आहेत. याकडे लक्ष वेधून या कायद्याला विरोध असणारे विचारतात की मग हिंदू, जैन, बौद्ध धर्माशी संबंधित असलेल्या तंत्रशास्त्रावरच्या पुस्तकांवरही बंदी येणार का?

    * या विचारणेवरही भरपूर चर्चा झाली आहे. सामान्य माणसाच्या पिळवणुकीला कारणीभूत ठरणाऱ्या काळ्या विद्येचा प्रचार किंवा त्याचा वापर करणे हा गुन्हा असल्याचे हा नियोजित कायदा मानतो असे स्पष्ट करण्यात आले आहे.

    * जरी या कायद्याचा हेतू प्रामाणिक व चांगला असला तरी त्याचा अवाका फार मोठा करून ठेवल्याने त्यातली स्पष्टता कमी झाली असून त्याची अमलबजावणी करणे अवघड ठरणार आहे. उदाहरणार्थ: धामिर्क व अध्यात्मिक प्रथांच्या नावाखाली दुष्ट प्रथा राबवणे हा या कायद्याच्या १० व ११- अ कलमानुसार गुन्हा आहे. पण १३व्या कलमानुसार हानी न पोहोचवणाऱ्या धामिर्क कृत्यांना वगळण्यात आले आहे.

    * हा मुद्दा तारतम्याचा आणि नैसगिर्क न्यायाच्या तत्वाशी जोडला गेलेला आहे. उदाहरणार्थ: महाराष्ट्र व कर्नाटक सीमा भागातल्या धामिर्कतेच्या नावाखाली चालणाऱ्या देवदासी प्रथेला आळा घालणे हा या कायद्याच्या कक्षेत जरूर येणारा विषय आहे. त्याचवेळी विविध देवता, ग्रामदैवतांचे ऊरूस, मेळावे, पंढरपूरच्या वारीसारखे उपक्रम यात येण्याचा प्रश्ान्च उद्भवत नाही. अर्थात याच जत्रा अथवा मेळाव्यांत पशुबळी वा अघोरी प्रथा कोणी अमलात आणत असेल तर ते कायद्याच्या कक्षेत येऊ शकते.

    उत्तर द्याहटवा
  4. या कायद्याचे नाव अंधश्रद्धा निर्मुलन कायदा नसुन जादुटोणा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा असे आहे !

    या कायद्यात देव, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा हे शब्दही नाहीत. हा कायदा उघडपणे शोषण करणा-या जादूटोणा, भुत, भानामती, चेटुक, डाकीण अशा बाबींच्या विरोधात आहे हे उघड आहे !

    उत्तर द्याहटवा
  5. Youth Wins...
    धन्यवाद साहेब अभिप्राय दिल्याबद्दल

    आपण म्हणता ते जरी खरे असेल तर आताच्याच कायद्यात बदल करून ते कायदे अजून व्यापक आणि कठोर बनवता येऊ शकत नाहीत का ?
    या कायद्यात देव, धर्म, श्रद्धा, अंधश्रद्धा हे शब्दही नाहीत असे तुम्ही म्हणता परंतु यात ज्या विषयी मुद्दे किंवा कायदे आहेत ते याच्याशी संबंधित नाहीत का ?
    हे शब्द न वापरून फक्त पळवाट काढण्याचा प्रयत्न केला गेला नाही का ?

    उत्तर द्याहटवा
  6. vikram agdi barobar lihile aahes ani he youth wings mhanje dusare tisare koni nasun dabholkarach aahet tyana koni vicharat nahi. shyam manav suddha hadtud kartat ase mi aaikale aahe.

    tyamule yanche kahi khare nahi ani jar yana ase vatate tar tyani muusalman bakre kaaptat tyaveli kuthe jate yanchi undhsraddha nirmulan samiti

    jau de

    yanche kahi honar nahi

    tu asech chan lihit raha

    उत्तर द्याहटवा
  7. हिंदू जनजागरण समितीच्या मते.... aho hindu Janajagruti Samiti ase naav aahe tumhala(youth wins)(ANIS) samitiche naav tari nit liha tumhala naavach lihita yet nahi tar tumhi tya kaydyat kiti gondhal ghatala asel dev jane

    उत्तर द्याहटवा
  8. vijay n Sanskar

    धन्यवाद आपण आपला अभिप्राय दिला याबद्दल

    उत्तर द्याहटवा