गुरुवार, १० सप्टेंबर, २००९

'सुर्यकांत भांडेपाटील ' एक भन्नाट माणूस

'सुर्यकांत भांडेपाटील ' एक असच कधीही न ऐकलेले नाव पण भन्नाट माणूस,
काम काय तर अपहरण झालेल्या लहान मुलांना शोधणे व पोलिसांना मदद करणे आणि यात साथ कोणाची तर बायकोची आणि मित्रपरिवाराची आणि मोबदला काय तर स्वताच्या खिशातील पैसे खर्च करण्यात धन्यता मानणे.

भांडे पाटील यांनी आतापर्यंत कितीतरी अपहरणातील गुन्ह्यांचा छडा लावलाय यामागे आहे त्यांच्या स्वताच्या मुलाच्या अपहरण आणि खुनाची वेदना.

२९ नोव्हेंबर १९९९ रोजी त्यांच्या संकेत नावाच्या साडेतीन वर्षाच्या मुलाचा अपहरण करून खंडणीसाठी खून करण्यात आला
अपहरणकर्त्यांनी त्यांच्याकडून २ वेळा १-१ लाख रुपये घेतले, पण तरीही काही उपयोग झाला नाही.पोलिसांना त्यांचा छडा लावता आला नाही.
अशातच अजून एका अपहरणाची बातमी आली भांडे पाटील स्वता जाऊन त्या मुलाच्या पित्याला जाऊन भेटले.त्यावेळी दोन मुलांच्या अपहरणातील समान दुवे त्यांच्या लक्षात आले त्यांनी स्वता तपास केला आणि त्या २ कुटुंबातील समायिक काम करणाऱ्या सुताराला त्यांनी त्या अपहरण प्रकरणी पकडून दिले .
त्यानंतर भांडे पाटील अपहरणाच्या प्रकरणात स्वता त्वेषाने काम करू लागले.

The DetectiveImage via Wikipedia

The DetectiveImage via Wikipedia



त्यांनी आतापर्यंत ३२ प्रकरणात यशस्वी उकल करून पोलिसांना मदद केली आहे तसेच ७-८ प्रकरणात स्वताच सर्व १००% तपास करून गुन्हेगारांना पकडून पोलिसांकडे दिले आहे .
भांडे पाटील यांचा अर्थार्जनासाठी स्वताचा व्यवसाय आहे. त्यामुळे हे सर्व ते पैस्यासाठी करतात असे काही नाही.
अशा प्रकारचे गुन्हे झालेले जेंव्हा ते वर्तमानपत्रात वाचतात तेंव्हा ते स्वता पत्नीसोबत त्याठिकाणी पोहचतात आणि तपास करण्यास सुरवात करतात.

खाण्यापिण्याचं सोडाच प्रवासखर्च हि ते घेत नाहीत सर्व काही स्वखर्चाने सुरु असते.

तपास केलेल्या सर्व गुन्ह्यांचे शेकडो क्लिप्स चीत्रनासहित त्यांच्याकडे तयार असतात आणि तपासकार्यात मिनिट न मिनिट लिहिलेली डायरी तर पोलीसानासुद्धा चकित करून सोडणारी आहे.

असा हा भन्नाट माणूस प्रसिद्धी पासून कायमच लांब राहिला आहे त्यांच्या कामाची दखल घेऊन शासनाने त्यांचा सन्मान केला पाहिजे असे मला वाटते.

सविस्तर बातमी सामनाच्या 'उत्सव' या पुरवणीत 'भन्नाट माणसे'या सदरात वाचण्यास मिळाली होती.

Reblog this post [with Zemanta]

६ टिप्पण्या:

  1. अरे वा! भन्नाटच आहे हा माणुस! माहितीबद्दल आभार.

    उत्तर द्याहटवा
  2. भन्नाट माणूस अन तेवढेच भन्नाट काम... एकदम वेगळी माहिती मिळाली विक्रम..

    उत्तर द्याहटवा
  3. @medhasakpal
    हो मलाही एकदम भन्नाट वाटला हा माणूस


    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा