गुरुवार, २४ सप्टेंबर, २००९

तरुण पिढी देशाला नवसंजवनी देईल?

भारतीय संविधानाची स्थापना होण्यापूर्वी म्हणजे १९५१ पूर्वी परिस्थिती वेगळी होती त्यावेळी एकसंध भारत निर्माण करणे हेच एकमेव ध्येय होते. संविधानात 'फेडरेशन ऑफ स्टेट' असा शब्द नसून 'युनियन ऑफ स्टेट' असा शब्द वापरण्यात आला आहे.
अमेरिकेमध्ये त्या प्रांताचे आणि राष्ट्राचे असे दुहेरी नागरिकत्व मिळते.आपण असे दुहेरी नागरिकत्व मान्य केले नाही.
आपल्या देशात एखादी व्यक्ती कोठेही राहत असलीतरी ती त्या प्रांताची नह्वे तर देशाची नागरिक असते.
स्वातंत्र्यानंतर भारताने काही प्रमाणत प्रगती जरी केली असलीतरी चित्र फार आशादायी वाटत नाही

ज्यांनी स्वतातंत्र संग्रामात भाग घेतला त्यांनी स्वराज्याचे एक स्वप्न पहिले होते.

natureImage by Per Ola Wiberg (Powi) via Flickr


आपल्या स्वराज्यात वस्तू गरजवंताला मिळतील, जो विकत घेऊ शकतो फक्त त्यालाच मिळणार नाहीत असे त्यांना वाटत होते
पण आज रोग्याला औषधे मिळेलच याची खात्री नाही पण रोग नसला तरी ते पैसेवाल्याला विकत घेता येते.

समाज गरजांवर आधारित राहील असे वाटत होते लालसेवर नाही

विकास आणि आधुनिकतेमुळे गरजा वाढतील, पण त्या कितीही वाढल्या तरी त्याला अंत आहे मर्यादा आहे .भोग लालसेला तर मर्यादाच नाही ती अमर्याद आहे.

संस्कृती २ प्रकारची राहील असे वाटले होते.एक त्यागावर आधारित आणि दुसरी भोगावर आधारित.
पण चंगळवाद आणि भोग लालसा यांनी संस्कृतीच संपवून टाकली आहे

आता भारतीयत्व म्हणजे काय आणि भारतीय संस्कृती कशाला म्हणतात हे ठरवणे हि कठीण झाले आहे.अशा भारताचे स्वप्न स्वतान्त्रासैनिकांनी नक्कीच पहिले नव्हते.

त्यांना वाटले होते सत्ताधार्यांपेक्षा समाजसेवकाची प्रतिष्ठा अधिक राहील असे वाटत होते पण सत्ताकांक्षेने सगळे भ्रम फुटले आहेत
आसाम, काश्मीर,अरुणाचल तुटतो आहे त्याचे तुकडे पडत आहेत अखंडता नेस्तनाबूत होत आहे
खंडित मूर्तीची पूजा करता येत नाही हे हि आपण 'भारतमाता' म्हणताना विसरत आहोत

परंतु निराश होउन कसे चालेल बदल तर करावाच लागेल
या देशात आता फक्त युवाच बदल घडवू शकतात म्हणून या युवाशक्तीवरच आता विश्वास उरला आहे

२ पिढ्यामधील अंतर म्हणजे काय हे सांगताना युनेस्कोच्या संचालकांनी म्हंटले होते ,'आजच्या प्रस्थापित जेष्ठ मंडीळीची अन्याय आणि भ्रष्टतेशी समझोते करून जगण्याची आणि ते सहन करण्याची क्षमता एकीकडे तर नवीन पिढी जी अन्याय आणि भ्रष्टाचार सहन न करता त्याविरुद्ध आवाज उठवू इच्छिते त्यांची अन्याय आणि भ्रष्टाचार सहन न करण्याची क्षमता दुसरीकडे या २ क्षम्तांमधील अंतर म्हणजे पिढ्यांमधील अंतर '

नवीन पिढी देशाला नव संजवनी देयील असे मला वाटते .


Reblog this post [with Zemanta]

१२ टिप्पण्या:

 1. दुर्दैवाने अशी परिस्थिती आज आहे.. पण अजूनही तरुण संस्कृतीचा विचार करत आहेत ही तेवढीच आशादायी गोष्ट आहे... नवी पिढी देशाला नक्कीच नव संजीवनी देईल, पण अंधानुकरण करणारी नाही तर जुन्या नव्यातले चांगले ते घेऊन पुढे जाणारी, संस्कारक्षम अशी...

  उत्तर द्याहटवा
 2. @medhasakpal
  धन्यवाद मेधाताई

  तुम्ही म्हणत आहेत ते अगदी खरे आहे

  आणि नवीन संस्कारक्षम पिढी आजचे चित्र नक्की बदलेल असे मलाही वाटते

  उत्तर द्याहटवा
 3. होईल तुम्ही म्हणता तास नक्की होईल पण थोडाफार समजनाराना आपल्याच सोबतच्या लोकांवर, तरुणांवर watch ठेवावा लागेल. विधायक मूल्यांचे धडे त्यांना द्यावे लागतील [त्यात मी हि आलोच]!

  उत्तर द्याहटवा
 4. @प्रकाश बा. पिंपळे

  हो नक्कीच

  आपल्यासारखे विचार करणारे संस्कारक्षम तरुण जर असतील तर होईलच

  धन्यवाद

  उत्तर द्याहटवा
 5. विक्रम तुमचे विचार स्तुत्य आहेत...

  'असे होईल' हाही खुप भ्रामक आशावाद आहे! तुम्ही लिहीलेले वर्णन सत्यात येईल पण त्या साठी वादळ हवं.. बलिदान हवं.. अखंडतेला जीवन माननारं तरुणाईतलं वेड हवं! घर, संसार, करीअर सगळं काही म्हणजे 'उज्वल भारत' मानणार्‍या माथेफिरूंची गरज आहे... अशा माथेफिरूंनी जर ठरवलं तर मात्र हे स्वप्न सत्य होईल यात दुमत नाही!

  पु.ले.शु.

  -एक माथेफिरू!

  उत्तर द्याहटवा
 6. @nileshsakpal
  माथेफिरू सर्वच जन आहेत

  पण फक्त स्व स्वार्थासाठी

  परंतु काहीजण अशीही आहेत जे स्वार्थ सोडूनही काम कण्यास तयार आहेत

  अशाच तरुणांची गरज आहे

  मी सुरवात स्वतापासून करायची म्हणतोय प्रत्येकाने असाच विचार केला तर बदल नक्की आहे

  असो

  धन्यवाद आपल्या अभिप्रायाबद्दल

  उत्तर द्याहटवा
 7. विक्रम,

  भरपूर शुभेच्छा!!

  माथेफिरु व्हा.. माथेफिरू शोधा..माथेफिरु तयार करा...

  -आपल्या सुरुवातीची वाट पहाणारा

  उत्तर द्याहटवा
 8. @nileshsakpal

  धन्यवाद

  मी सुरवात केलीच आहे समजा

  साथीदारांची वाट पाहत आहे ते आले म्हणजे एक समूहच तयार होईल

  आणि माथेफिरुंच्या समूहाला कोणी आडवा येत नाही असा मजा समज आहे

  निदान चांगले बदल करणाऱ्या तरी

  असो

  उत्तर द्याहटवा
 9. नवी पिढी कमी भ्रष्ट आहे हे मान्य पण ही पिढी खुपच instinct ने काम करते..जे वाटलं ते करुन मोकळी होती. सगळ्या बाजु विचारात घेऊन संघटीतपणे काम करणं ह्या पिढीला जमत नाही.आपण आपलं आपलं बघावं..आपल्या परिने जेव्हा सवड मिळेल तेव्हा काहीतरी छोटंसं समाजकार्य करावं म्हणजे मनाला बोच लागुन राहत नाही आजुबाजुच्या परिस्थितीची.

  उत्तर द्याहटवा
 10. @Shailendra

  धन्यवाद
  तुम्ही बोलत आहत हे काही प्रमाणात मलाही पटत आहे

  परंतु आताची युवा पिढी पहिल्या पिढीपासून नक्कीच वेगळी असून तिला जर बदल हवा असेलतर ती ते घडवू शकते असे मला वाटते

  उत्तर द्याहटवा
 11. वीन पिढी देशाला नव संजवनी देयील असे मला वाटते .

  waah chhaan

  उत्तर द्याहटवा