सोमवार, ८ मार्च, २०१०

एक वनवासी- सिंधुताई सपकाळ

सिंधूताई सपकाळ हे नाव आपण कधीना कधी ऐकलेच असेल.समाजाला काहीतरी चांगल देण्याची,त्यांना वळण लावण्याची ताकद असणारे अनेक  प्रतिभावंत मराठी मातीत आहेत.प्रश्न आहे तो फक्त त्यांच्या कार्याची दखल घेण्याचा.आपल्या कार्याचा ठसा जनमाणसावर उमटवणाऱ्या व्यक्तीमध्ये सिंधुताई सपकाळ यांचे नाव अग्रक्रमंकाने आणि आदराने घेतले जाते.समाजाने धूडकारलेल्या, स्वकीयांच्या प्रेमाला पारख्या झालेल्या असंख्य निराधारांना आपल्या मायेच्या स्पर्शाने,प्रेमाने आपलास करणाऱ्या सिंधुताई सपकाळ या मातेची कहाणी कोणालाही थक्क करणारी आहे.वैयक्तिक आयुष्यातील दुखाचे डोंगर दूर सारत दुसर्यांसाठी आयुष्य वेचणाऱ्या सिंधूताईचा जीवनपट खरच प्रेरणादाई आहे.
अनाथ मुलाच्या प्रेमात कसर राहू नये म्हणून पोटच्या मुलीला दुसर्या अनाथआश्रमात ठेवणाऱ्या सिंधूताई सपकाळ यांचा जीवनपट आता चित्रपट रुपात येत आहे.सचिन आणि बिंदिया खानविलकर यांनी 'मी सिंधूताई सपकाळ' या चित्रपटाच्या निर्मितीला सुरवात केली आहे. या चित्रपटात ताईच्या जीवनातील  सर्व घटनांचा,चढ- उताराचा समावेश करण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. जसे लग्नामुळे मधेच सोडावे लागलेले शिक्षण,थंडीपासून रक्षण करण्यासाठी घेतलेल्या चितेच्या आगीचा शेक आणि पोटाची भूक भागविण्यासाठी अंत्यसंस्काराच्या वेळी आणण्यात येणाऱ्या पिंडाचा भात खाण्यापासून ते अमेरिकेतील आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून आपले विचार मांडणाऱ्या सिंधूताईची रोमांचित करणारी जीवनयात्रा.या चित्रपटाची कथा सिंधूताईच्या 'मी वनवासी' या पुस्तकावर आधारलेली  आहे.
हा चित्रपट एक जागतिक दर्जाचा ह्वावा अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.या चित्रपटाद्वारे सिंधूताई जनमाणसापर्यंत पोहचतील अशी आशा करूयात.

सिंधूताईना प्रत्यक्ष भेटण्याचा योग फार कमी आला.लहान असताना आमच्या गावात सिंधूताईचा कार्यक्रम होता त्यावेळी त्यांना ऐकण्याचा योग आला होता.बोलताना त्या लोकांना आपलेसे कधी करून घेतात हेच लक्षात येत नाही.आपली अनाथ मुलांसाठीची तग मग मांडताना त्या आजही कवितांचा   आधार घेतात.गदिमा,बहीणाबाई,सुरेश भटांच्या कविता त्यांच्या तोंडून ऐकताना ऐकणारा तल्लीन झाला नाहीतर नवलच!

सगळ बोलून झाल कि माई लोकांसमोर आपली झोळी फैलावतात आणि अनाथांसाठी काहीतरी मदत करा अशी साद घालतात.'१७० हून अधिक पुरस्कार मिळाले,पण ते पुरस्कार खाऊन पोट भरत नाही' म्हणून त्यांना लोकांसमोर हात पसरावे लागतात.आश्रमातील सात-आठशे मुलांच्या खर्चाची तजवीज करताना त्यांची दमछाक होते.'गाना नाही तो खाना नही,भाषण नही तो राशन नही' असे म्हणत आपल्या मुलांना २ वेळच जेवण मिळव म्हणून त्या आजही महाराष्ट्रभर हिंडत असतात.त्यांची हि परवड कधी संपणार परमेश्वरालाच माहिती.

आम्ही ओर्कुट वरील एका समूहातील काही सभासदांनी मिळून काहीतरी सामाजिक कार्य करण्याच्या उद्देशाने एक मोहीम राबविली होती. त्यानुसार एका जबाबदार सभासदाने बँकेत खाते काढून त्या खात्यावर  ज्याची इच्छा आहे त्या सभासदाने आपल्या परिस्थितीनुसार काही रक्कम जमा करायची( ऑन लाईन). असे आम्ही एकून १९१५० रुपये जमा करून ते दापोडीतील मालनताई तुळवेंच्या अनाथाश्रमाला  दिले होते.तेवढाच आपला खारीचा वाटा. हि मोहीम आम्ही यशस्वी करून दाखवली तेही कोणी एकमेकाला न भेटता. असेच आपण सर्व मराठी ब्लॉगर  मिळून सिंधुताई साठी काही करू शकतो का ? जास्त नाही एकाने  ५००-१००० जरी जमा केले तरी चालतील तेही नाही  जमले तरी १००-२०० तरी देऊ शकतोच कि. बघा पटतंय का ते प्रतिसाद द्या प्रत्यक्षात  आणू आपण हे, मी वाट पाहत आहे.


कोणाला जरी सरळ आश्रमात जाऊन मदद करायची असेल तरी ते तसे करू शकतात.पुण्यापासून जवळ आहे.

आश्रमाचा पत्ता:
सन्मती बाल निकेतन
बेल्हेकर वस्ती, मंगल एंटरप्रायजेस शेजारी,
वसंतदादा साखर कारखान्याजवळ, मांजरी बु.,
पुने - ४१२ ३०७

सिंधुताईचा  पत्ता -
सन्मती बाल निकेतन संस्था,
मिनाक्षी बिल्डींग, दुसरा मजला, विहार चौक,
तुपे आळी, हडपसर,
पुणे - २८
फोन नं - ०२० - २६८७०४०३

३१ टिप्पण्या:

  1. प्रत्युत्तरे
    1. Ji katha mai sobat gadali ahe sem majya sobat pan tech zaly ahe manus marun gelay mulga sasu sasryanhi geun getla bolu det nahi bgu det nahi mi

      हटवा
  2. खरंच महान आहेत या सिंधुताई. बरेच लेख वाचले आहेत त्यांच्याबद्दल !! तुही खूप छान लिहिलं आहेस. सगळे ब्लॉगर्स मिळून मदत करण्याची कल्पना आवडली. माझी तयारी आहे.

    उत्तर द्याहटवा
  3. @ आनंद @शुद्ध मराठी
    धन्यवाद प्रतिक्रियेबद्दल

    उत्तर द्याहटवा
  4. @ हेरंब
    मी हि खूप वाचले आहे माईबद्दल आणि त्यांच्याबद्दल आदर हि आहे खूप
    पण आपण सर्व मिळून त्यांना छोटीशी का होईना मदत करू शकतो असे मला वाटले म्हणूनच मी ते मत मांडले आहे
    आपण त्याला प्रतिसाद दिलात याबद्दल धन्यवाद
    परंतु आपण दोघेच मिळून काही करू शकत नाही आपणाला बाकीच्या मित्राचीही मदत घ्यावी लागेल तुम्ही तुमच्या परीने प्रयत्न करा मी माझ्या परीने करतो
    बघू किती लोक तयार होतात ते
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  5. मस्त लिहीलेयेत हो विक्रम! मलाही मदत करा नं ब्लॉग सुरू करायला.

    उत्तर द्याहटवा
  6. विक्रम, माहिती छान आहे, आणि माझी तयारी देखील आहे...

    उत्तर द्याहटवा
  7. @ प्रज्ञा
    तुम्हाला काही सांगावे लागेल असे मला वाटत नाही
    तरीही blogger.com var जाऊन तुम्ही तुमचा नवीन ब्लॉग सुरु करू शकता
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  8. @ आनंद
    धन्यवाद साहेब
    आपल्या सारख्या कमीत कमी ८-१० लोकांनी तयारी दाखवली तर आपण बरयापैकी मदत गोळा करू शकतो
    पाहू अजून कोण तयार होतंय ते

    उत्तर द्याहटवा
  9. ह्या लेखाबद्दल खुप खुप धन्यवाद. सध्यातरी मी मदतीसाठी असमर्थ आहे म्हणून खेद वाटतो. पण ह्याची नोंद मी करुन ठेवली आहे. जेव्हा शक्य होईल तेव्हा नक्कीच मदत करेन.

    उत्तर द्याहटवा
  10. साधारण चार-पाच मी सिंधूताईंना खूप जवळून बघितलं आहे, त्यांच्याशी बोललोही आहे. त्यांच्या हडपसर येथल्या संस्थेतल्या मुलांना भेटायला, गप्पा मारायला आणि फराळ वाटायला दिवाळीच्या थोडं आधी गेलो होतो. आणि योगायोगाने त्या तिथून जवळच असलेल्या त्यांच्या ऑफिसमधे असल्याची सुवार्ता आली, आम्ही तिथे असतानाच. मग परवानगी घेउन लगेच भेटायला गेलो. त्यांना घाई होती. दहा मिनिटे तिथेच ऑफिसमधे गप्पा मारल्या आणि आम्ही गेलो. फार छान, आपुलकीने बोलतात. संस्थेला मदत केल्याबद्दल खूप विनयाने आभार मानले होते त्यांनी आमचे.

    उत्तर द्याहटवा
  11. BHAGYASHRI BHOPALE,ICHALKARANJI HIGH SCHOOL ICHALKARANJI.१५ फेब्रुवारी, २०१२ रोजी ७:१० PM

    namaste! me tumchyabaddal khup wachale aahe. khare sangayacha tar tumchyabaddal he saare wachalyawar mala tumhala bhetanyachi faar icchya hoti. aaz aamhala shalet uddya tumhi aamhala bhetnaar aahat he sangitlyawar mala swapnaat aahot ki kay ase watu lagle. karan, aamhala sangitla ki tya yumchyashi 1taas bolnaar aahet agdi mansokta. udya tumhala pratyakshyat bhetnaar aslyane me khup excite aahe. udyache chaar kadhi wajtaat ase jhale aahe. me khup nahi na bolale? khup bolala asen tar sorry. OK!BYE. SEE YOU TOMORROW.

    उत्तर द्याहटवा
  12. khupc changali kalpna ahe maina ani tyanca ashrmatil mulana madat karnyaci ... majhyakadun hoil tevhdi me madat karin .... aj kal ashi manse bhetnc mushkil ahe...... maina majha salam ahe...

    उत्तर द्याहटवा
  13. mi amardip pawar, mi aaj eka marathi vahinivar, mi sindhutai sapkal ha jeevan patavar aadharit cinema baghitla, cinema rhudayala sparsha karnara ahe.... mi yapurvi shindhu tai baddal vachale, aikle hote aaj cinema baghun ase vatle tain barobar samorasamor basun gappa martoy... cinema baghun ase vatle ki ha cinema sarva shadet dakhavla tar?

    उत्तर द्याहटवा
  14. mi madat karnes tayar aahe amhi sarva samajik karya karte ani mitrani ase tharavle ahe ki madat fheri kadhavi shiksanadhikaryana nivedan deun shada, clg.madhe mi sindhu tai sapkal ha cinema dakhaun nidhi jama karava, samajatil dan shur nagrikan kadun vargani jama karavi june nave kapde, shaiksanik samagri, jeevanavashak vastu etc.jama karun sansthela pathavave ase tharavle aahe tari sarvanna maze bhavnik avahan patat asel tar krupya 15, shital colony, sakri road, dhule, pin_424001 maharasra ya pattavar samparka karava dhanyavad mo__91456554

    उत्तर द्याहटवा
  15. माईंनी अनाथ मुलं वाढवली, त्यांच्या अनाथपणाची जाणीव न होऊ देता त्यांना वाढवलं, मोठं केलं, शिक्षण दिलं, जगण्याची प्रेरणा दिली. पण सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे माईंनी त्या मुलांना या समाजात मानाचं स्थान मिळवून दिलं. ‘निराश्रित’, ‘बेवारस’ असा शिक्का त्यांच्यावर बसू दिला नाही. या मुलांनाही त्याची जाण आहे. आपल्याला जे प्रेम मिळालं, तेच इतरांनाही मिळावं, म्हणून त्यांची धडपड सुरू असते. ‘देवा, आम्हांला हसायला शिकव. परंतु आम्ही कधी रडलो होतो, याचा विसर पडू देऊ नकोस’, हे माईंनी त्यांना शिकवलं आहे.

    मित्र-मैत्रिणीनो माईच्या या कार्याला नक्की मदत करा…..एकदा ममता बाल सदन भेट दयाचं…!!!!

    उत्तर द्याहटवा
  16. खरच आई आम्हा भारीयांना तुमचा अभिमान आहे एक दिवस तुमच्या संस्थेला नक्की भेट देईल.

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. Mala pan ekda kharch bhetaych hot thumala majya manat je ahe te deshil sangaych hot pan aata konala bhetun sangu he mai Maj pan thumcya sarkhrch zal ahe ho

      हटवा
  17. आपल्या मुलांसाठी सगळं काही सहन करण्याची ताकद फक्त एका आई मध्ये असु शकते.आणि सिंधुताई हे अनाथांच

    उत्तर द्याहटवा
  18. वनवासी हे आत्मचरित्र कुठे मिळेल

    8698786854

    उत्तर द्याहटवा