शुक्रवार, १९ मार्च, २०१०

हे काय राजसाहेब तुम्ही सुद्धा ????

'कोणत्याही समाजापुढे लांगूलचालन करणार नाही , निवडणुका आल्या म्हणून ' टोप्या ' घालणार नाही '
असे राजसाहेब तुम्हीच शिवाजी पार्कच्या सभेत निक्षून सांगितले होते ना ????


मग हे काय आहे ?



कशासाठी एवढी लाचारी ?
मतांसाठीच  ना ?





 परंतु तेंव्हा आम्ही समजून घेतले होते , परंतु तुम्ही आता आमच्या भावनाशीच
खेळायला लागलात याला माफी कशी आणि का ????


बोले तैसा चाले असा एकच नेता हे आता जनतेपासून लपून राहिले नाही हिंदूदृदयसम्राट बाळासाहेब
ठाकरे 


लोकानो विचार करा आणि सावध व्हा
जो आज मतांसाठी स्वतः 'टोपी' घालू शकतो तो उद्या तुम्हालाहि 'टोपी' घालू शकतो.

(by Mail )



२६ टिप्पण्या:

  1. बेशक मंदीर मस्जिद तोडो ह्या बॉबी मधिल कव्वाली नुसार वागायचे असेल तर अगोदर हे करणे आवश्यक आहे असे प्रामाणिकपणे वाटते... लहान तोंडी मोठा घास वाटल्यास क्षमस्व...!

    उत्तर द्याहटवा
  2. यावर माझी एकच प्रतिक्रिया आहे -

    'लाचारीचा हिरवा टिळा कपाळी लावणाऱ्याला स्वाभिमानाचा भगवा कधीच पेलणार नाही '

    उत्तर द्याहटवा
  3. बाळासाहेबांनी त्याची ईश्वरनिश्चित अधुदृष्टी दुरुस्त केली कालच ह्यावर आपले मत अवश्य कळवावे...
    तेही परकीय तंत्रज्ञान वापरून...!

    उत्तर द्याहटवा
  4. शिरीष
    कुठला संबंध कुठे लावताय काही समजतंय का ?

    उत्तर द्याहटवा
  5. जर उद्धवला गादीवर बसविले आहे तर त्यांना दृष्टीची काय गरज?

    त्याचे कान शाबूत आहेत की...

    उत्तर द्याहटवा
  6. राज ठाकरेची हि लाचारी आहे ती फक्त मतांसाठी ..आणि जे राज समर्थक आहेत त्यांचा नक्कीच विश्वास बसणार नाही ..पण हे सत्य आहे ...आणि राहिला प्रश्न माननीय बाळासाहेबांचा आणि उद्धव साहेबांचा ते कधीच अशा गोष्टी करणार नाहीत आज खूप चांगला वाटतंय कि बाळासाहेबांनी घेतलेला निर्णय हा योग्य होता......उद्धव साहेब ह्यांची तुलना राज बरोबर होऊ शकत नाही ते एक असामान्य व्यक्तिमत्व आहे हे ज्यांना माहित त्यांनाच माहित........वा राज ठाकरे चांगली काम करताय ....

    उत्तर द्याहटवा
  7. खरच राज साहेबां कडून हे अपेक्षिक नव्हत ...
    झेंडा चित्रपट बघितल्यावर हा चित्रपट आहे राज साहेब असे असूच शकत नाहीत म्हणून स्वताची समाजावणूक करत होतो
    पण पण सर्व मातीत मिसळवलत राज साहेबांनी .....
    जय महाराष्ट्र.....!!!

    उत्तर द्याहटवा
  8. मनसेवाल्यांना मुस्लिमांना बघून खुप मज्जा येतेय. त्यांना वाटतेय मनसे वाढतेय आणि मुर्खासारखे म्हणतात की हे मराठी मुस्लिम आहेत, मागे राज सुद्धा असेच बोलला होता की महाराष्ट्रातील मुसलमान हे सुसंस्कृत आहेत, पण हे सत्य नाही. मुस्लिमांना धर्मापेक्षा कुठलीही गोष्ट मोठी नसते, आणि कधीही भाषेसाठी वाद मुस्लिम घालत बसणार नाहीत,, की हा भैय्या मुस्लिम आणि हा मराठि मुस्लिम! याचा फक्त बळी जातोय तो हिंदू आणि हिंदूच!! मराठी माणसाने दिलेल्या पाठिंब्यावर पैशाचा खेळ मांडला आणि करोडो रुपये कॉंग्रेसकडून घेतले ते फक्त शिवसेनेचे मराठी उमेदवार पाडण्यासाठीच ना!

    उत्तर द्याहटवा
  9. विक्रम , माझं असा प्रामाणिक मत आहे की तुम्ही ह्या फोटोचा चुकीचा अर्थ काढताय। मनसे च्या ध्येय आणि धोरणान मधे सर्व समाज घटकानां एकत्रित घेउन महाराष्ट्राचा विकास करायचं नक्की केलेलं आहे । राज साहेब असले फोटो क़िवा लांगुलचालन टाळतात हे सगळ्यानांच माहित आहे । तेव्हा ह्या फोटो मधून स्वताला अभिप्रेत असलेला अर्थ काढ़णं माझ्या मते चुकीचं आहे ।

    http://mi-maharashtracha-maharashtra-maza.blogspot.com/

    उत्तर द्याहटवा
  10. अपेक्षीत असल्यामुळे आश्चर्य वाटले नाही..

    उत्तर द्याहटवा
  11. एक साध्या फोटोवरून इतका वाद घालन्यापेक्षा त्यामागची खरी परिस्थिति कई होती हे सुद्धा अभ्यासपूर्वक समझुन घ्या अणि मग अशी बेताल विधाने करा. मनसे स्थापनेच्या पहिल्याच वर्षी राज ठाकरयान्नी संपूर्ण महाराष्ट्र पिंजुन काढला होता. हे फोटो मिरज येथील दर्ग्यातिल आहेत. त्यांना तेथील मुस्लिम भंधावान्नी खुप आग्रह केला अणि राज मुस्लिम धर्मियांचे श्रधास्थान म्हणुन तिथे दर्शनासाठी गेले होते. प्रत्येक धर्माला प्रत्येक जटिल त्यांचे श्रधास्थान आहे अन्नी कुन्यच्याही श्रधास्थानाला अपमानित करून नाही चालणार. मिरज येथील दर्ग्यात मी मुस्लिम भंध्वांच्या अग्रहखातर गेलो होतो हे त्यांनी त्यांच्या भाष्नान्त सुद्धा म्हटले आहे. लोक याचा काय अर्थ काढतील याची मला परवा नाही. असे उद्गार भाष्नान्त म्हटले गेले होते. महाराष्ट्र बदलायचा असेल तर जो महाराष्ट्रावर प्रेम करतो अश्या सर्व घटकांना घेवुन चालावेच लागेल. त्याशिवाय महाराष्ट्राची प्रगति होने कठिन.

    आणि राहिली गोष्ट सेनेची तर आधी सेनेचा अभ्यास करावा मग उद्धव ठाकरे यांनी काय केले आणि बालासहेबंनी काय केले असे भाष्य करावे.
    शिवसेनेची खरी सुरुवात ही ठाणे या बाले किल्ल्यातुन झाली अणि मग शिवसेना सर्व मुंबई पासून ते संपूर्ण महाराष्ट्रात अणि इतर राज्यात पसरली.
    आज ठाणे येथे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाइक, एकनाथ शिंदे असताना ४ महिन्यात एक कुविख्यात मुस्लिम गुंड शिवसेनेत प्रवेश करतो, त्याला ठाण्यात पटकन विभागप्रमुख हे पद दिले जाते. इतके वर्ष गट प्रमुख , शाखा प्रमुख अणि इतर पदांवर राबनारया शिव्सैनिकन्ना बाजूला सारुन ह्या हाफिज़ बलूच ह्या मुस्लिम गुंडाला पद दिले जाते त्याला मान-सन्मान दिला जातो. क़ा तर त्याच्याकडे असलेला ब्लैक पैसा ह्या कारणाने. ह्यां हाफिज़ बलूच ने मिरारोड़ येथील ५००० मुस्लिम मतदार शिवसेनेत आणली. पुण्यात झालेल्या बोम्ब ब्लास्ट मध्ये ह्याचे नाव यादीत आले होते. ह्याला सोडवायला शिवसेनेचे आमदार प्रताप सर नाइक आणि एकनाथ शिंदे गेले होते. क़ा तर हा म्हणे शिवसैनिक.

    आता तुम्हीच विचार करा हा हाफिज़ बल्लोच शिवसेना वाढवायला आला आहे क़ा? शिवसेना संपवायला तुमचीच विचार करा?
    आणि ह्याच्या पदाला मात्रोश्री वरून सम्मति मिलाली आहे. मग हे कसले आहे राजकारण हिंदूंच्या नावाने.

    विचार करा, अणि जागे व्हा?

    ह्या ४ वर्षात राज ठाकरे आल्यामुले किती फरक पडतोय हे सुद्धा प्रत्येकाने विचार करावा. राज्यसरकार पासून ते प्रत्येक पक्षाला आता मराठीचे पेव फुटले आहे. भाजपा सारखा पक्ष सुद्धा आता मराठीचे गोडवे गायला लागला आहे. ह्याला फ़क्त राज ठाकरेच सवर्श्वी आहे. आणि मराठी चे गुणगान सिनेमांमध्ये सुद्धा दिसायला लागले आहे. मराठीची आता गलचेप करून चालणार नाही हे आता राज्य सरकार पासून इतर राजकीय नेत्यांना कलुन चुकले आहे.

    उत्तर द्याहटवा
  12. @ विशेष
    @ सागर
    @ अमित
    धन्यवाद आपला अभिप्राय नोंदवल्याबद्दल

    उत्तर द्याहटवा
  13. @ विनोदकुमार
    मी कोण या फोटोचा अर्थ लावणारा ?
    प्रत्येक जन आपआपल्या कुवतीनुसार अर्थ लावेल हो
    तुम्हीच म्हणत आहात कि 'राज साहेब असले फोटो क़िवा लांगुलचालन टाळतात हे सगळ्यानांच माहित आहे ।'
    मग हे काय आहे ????

    उत्तर द्याहटवा
  14. @ आनंद आणि दवबिंदू
    चला कोणाच्यातरी अपेक्षा पूर्ण झाल्या यामुळे हेही नसे थोडके :)
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  15. @ अजित
    कोण बेताल वक्तव्य करताय राव उगाच का राग धरता मनात
    जे बेताल वागत आहेत त्यांच्याबद्दल सहानभूती आणि जे खर आहे त्याबद्दल राग हे बरोबर नाही :)

    मनसे मध्ये मुस्लीम आहेत मान्य शिवसेनेतही आहेत हेही मान्य अजून बाकी सर्व पक्ष्यातहि आहेत हे हि मान्य
    काही चांगले आहेत काही वाईट आहेत हे हि मान्य पण
    कॉंग्रेस,राष्ट्रवादी,भाजप यासारखे टोप्या घालून आपण धर्मनिरपेक्ष आहोत याचा दिखावा करायची काय गरज होती ? कि आम्हीही त्यांच्याप्रमाणेच आहोत हे दाखवायची घाई झाली होती ?

    मराठीसाठी राजसाहेबांनी आवाज उठवला हे कोण नाकारत आहे इथे ?

    पण ते आपल्याच शब्दावर ठाम राहिले नाहीत हे तरी मान्य करा कि राव
    यावर माझ एकाच मत आहे 'लाचारीचा हिरवा टिळा कपाळी लावणाऱ्याला स्वाभिमानाचा भगवा कधीच पेलणार नाही '
    जय हिंद
    जय महाराष्ट्र !

    उत्तर द्याहटवा
  16. @विक्रम, अजितची प्रतिक्रिया वाचल्यावर असे समजते कि जर हे फोटो मनसे स्थापनेवेळी केलेल्या महाराष्ट्र दौऱ्यातील मिरज दर्ग्यातले असतिल तर त्यांनी (राज ठाकरेंनी) केलेले विधान हे त्यानंतरचे आहे ज्यात त्यांनी ह्याबाबत खुलासा केला आहे. नंतरचे असते तर तुमचा रोष समजु शकतो.
    शिवाय तुम्ही एक गल्लत करत आहात. राज ठाकरे "मराठी"साठी लढा देत आहेत, कोणत्या "धर्मा"साठी नाही. मराठी मधे सर्वधर्मिय, सर्वभाषिय लोक येतात. परप्रांतियांविरुद्ध लढणे आणि परभाषिय/परधर्मियांविरुद्ध लढणे ह्यांमधे जमिनास्मानाचा फरक आहे.
    तुम्ही हे फोटो कधीचे आहेत ह्याबाबत खुलासा करावा.
    सध्यातरी तुमच्या लेखाबाबत असहमत, क्षमस्व...

    उत्तर द्याहटवा
  17. @सौरभ
    राज मराठी साठी लढा देत आहेत हे मलाही मान्य आहे त्यांचा पक्ष त्यांना धर्मनिरपेक्ष ठेवायचा आहे हे हि मान्य
    परंतु आपण धर्मनिरपेक्ष आहोत हे दाखवण्यासाठी काँग्रेसवाले जसे डोक्यावर टोप्या घालून हसऱ्या पोज देत असतात इफ्तारच्यावेळी तसा दिखावा करण्याची काय गरज होती ?
    कि मी आणि तेही सारखेच आहोत असे दाखवायचे आहे ?

    मी एक हिंदुप्रेमी माणूस आहे मला असे टोप्या घालून मिरवणारे नेते दिसले कि त्यांची दया येते मतांसाठी किती हि लाचारी
    राज असे काही करतील असे वाटत नव्हते मला

    स्वधर्माभिमान नसनारेच अशा गोष्टीनाचे समर्थन करू शकतात असे मला वाटते
    उद्या वेळ आलीतर तुम्ही अशी टोपी घालून फोटो काढून घेणार का ?
    आणि तसे केले तर मलाही पाठवा
    आणखी एक
    हा फोटो ज्याचा आहे तोच याबाबत खुलासा करू शकतो कि हा कधीच आहे ते आणि असा का काढला ते
    बाकीच्यांच्या आणि माझ्या सांगण्याला काही किंमत नाही

    त्यांनी स्वताच याच्याबद्दल बोलावे

    धन्यवाद
    जय हिंद
    जय महाराष्ट्र !

    उत्तर द्याहटवा
  18. खुप मस्त लेख लिहला आहे आवडला खुप मस्त लेख लिहला आहे आवडला

    उत्तर द्याहटवा
  19. raj thakre kadun hi apeksha navti. pan tyani maharashtra chya Bhalysathi aani Hindu lokansathi Changle Kam Karawe.

    उत्तर द्याहटवा
  20. jar ka raj thacheray na maharashtrat yenare parprantiya che londhe avaryache aahet tar tyhani phakt uttar pradesh va bihar var tika karu naye aaj mitish kiti tari sankhene marwadi aani jain lok aaj maharastrachya kanakopryat shirlet va tyanchi dadagiri hi tevdich vadtey. mumbait tar pramukhyane dakshin mumbai tar tyanchach rajya chalu aahe ya var pan tyhani lkshya ghalve.

    उत्तर द्याहटवा
  21. हिंदू एकतेला घातक राजकारण राज ठाकरे करत आहेत. आणि म्हणूनच पर्यायाने देशविभाजनाचे राजकारण होत आहे. हिंदूंनी हिंदूंची टाळकी फोडायची. आणि इथे 'ते मराठी मुसलमान आहेत वगैरे' समर्थन करणार्यांची कीव करावीशी वाटते. मुसलमान मानतो का स्वतःला? जगभरातला मुसलमान 'इस्लाम खतरे में ही म्हटल्यावर एक होतो'..आणि आम्ही मात्र दाक्षिणात्य आणि उत्तर भारतीय हिंदूंची टाळकी फोडण्यात मर्दुमकी दाखवणार. आज न उद्या जनतेला हा दिखावा कळल्याशिवाय राहणार नाही. भ्रमनिरास तर होणारच आहे. या विषयावर अधिक वाचा- www.vikramwalawalkar.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  22. विक्रम, एका अर्थी राजसाहेब बोलल्या वचनाला जगतायत...ते स्वत: नही टोपी घालत आहेत...मराठी माणसाला/हिंदुत्वाला "टोपी" घालताहेत.
    टोप्या लावण्याचाच तर धंदा आहे. !!!!

    उत्तर द्याहटवा
  23. http://fakebalthakre.wordpress.com/2010/03/15/why-i-am-doing-hands-up-in-my-dp-and-other-faqs/

    ha blog paha.
    Kashi tar udavili aahe shivsena vicharanchi. Tumhi aata shant basa kunihi uthun tumhala shahanpana shikwat aahe. shivsena sampli aahe itkach tyacha arth aahe

    उत्तर द्याहटवा