शनिवार, ३ जुलै, २०१०

कोबाद... 'गांधी'????


मणि रत्नम यांचा 'रावण' प्रदर्शित होण्यापूर्वी वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत राहिला.सर्वानाच वाटत होते कि अभिषेक बच्चन हा रामायणातील रावणाची भूमिका साकारत असावा परंतु नंतर त्याची भूमिका माओवादी नेता कोबाद गांधी याच्या जीवनावर आधारित आहे असे ऐकण्यात आले.त्याबद्दल बऱ्याच वृत्तपत्रातहि वाचण्यात आले.त्यावेळी कोण हा कोबाद गांधी याची उस्तुकता निर्माण झाली कारण आतापर्यंत आपण फक्त महात्मा गांधीबद्दल जाणत होतो जास्तीत जास्त इंदिरा गांधी,राजीव गांधी मग हा नवीन गांधी कोण असा प्रश्न मनात घर करून बसला आणि थोडेसे त्याच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला तर खूपच धक्कादायक गोष्टी समोर आल्या.  नक्षलवादी, माओवादी म्हंटले कि सहसा दुर्गम भागातील गोरगरीब आणि त्यांची सरकार विरोधी चळवळ असेच चित्र सहसा आपल्या डोळ्यासमोर येते परंतु कोबाद गांधीचे तसे नाही तो एक सुशिक्षित आणि श्रीमंत घरातील होता अशी माहिती उजेडात आली.
 कोबाद गांधी याचा जन्म मुंबईतला त्याचे वडील GLAXO  या कंपनीत उच्चपदस्थ अधिकारी होते.जन्मापासूनच सोन्याचा चमचा तोंडात घेऊन आलेल्या या कोबाद गांधीचे वरळी सिफेजला अलिशान घर आहे.त्याचे प्राथमिक शिक्षण DOON स्कूल मध्ये झाले ज्या ठिकाणी संजय गांधी त्याचे वर्गमित्र होते.त्यानंतर त्याने  St. Xavier's कॉलेजमध्ये आपले  उर्वरित शिक्षण पूर्ण केले.तसेच त्याने CA ची पदवी लंडन येथून घेतली.आता या सर्व गोष्टी काही सामान्य लोकांच्या बस कि बात नाही हे लक्षात आले असेलच.
 लंडन येथे शिक्षण घेत असतानाच त्याचा राजकारणाशी संबंध आला आणि तो डाव्या विचारसरणीच्या लोकांच्या संपर्कात आला.मुंबईला परत आल्यानंतर  तो आपल्या पत्नीसह नागपूरला स्थायिक झाला.पत्नी अनुराधा हि उच्चशिक्षित मानसशास्त्राची प्राध्यापक होती.नागपूरला जाऊन त्यांनी गोरगरीब,महिला यांच्या न्यायहक्कांसाठी लढा देण्याचे ठरवले होते आणि त्यातूनच ते नक्षलवादाकडे वळले.
कोबाद गांधी यांच्यावर कोंडापल्ली  सीथारामैः  याचा प्रभाव होता ज्यांना त्यांची चळवळ तामिळनाडू आणि महाराष्ट्र इथे वाढवायची होती.८० च्या दशकानंतर तो  टी. नागी रेड्डी यांच्या बरोबर काम करू लागला .कोबाद गांधीला २००९ मध्ये दिल्ली  येथे उपचार चालू असताना अटक करण्यात आली.
कोबाद गांधी ह्याने माओवादी चळवळ ग्रामीण भागातून शहरी भागात आणली तसेच त्याने या चळवळीला आधुनिक रूपही दिले नवनवीन तंत्रज्ञान नक्षलवादी चळवळीत  आणण्यात कोबाद गांधीचा मोठा वाटा आहे.
हि माहिती नेटवरून गोळा केल्यावर मला खरच खूप धक्का बसला अशी सुशिक्षित माणसेहि अशा कारवायांत कशी काय अडकली जातात नक्की काय परिस्थिती त्यांना यात ओढत असेल असे प्रश्न मनात येऊन गेले.आज दंतेवाडा सारखे प्रकार घडले कि त्यामागे अशाच सुशिक्षित कुरकर्माचे डोके असणार  याची जाण होते आणि तळपायाची आग मस्तकात जाते.
आपल्या देशात एक महात्मा 'गांधी' होऊन गेले जे अहिंसेची शिकवण देत होते आणि हे आजचे 'गांधी' ज्यांना अहिंसा म्हणजे काय हेच माहिती नसावे.

७ टिप्पण्या:

  1. 'रावण' राम गोपाल वर्मांचा नाहीये.. मनिरत्नमचा आहे....

    उत्तर द्याहटवा
  2. खुप छान विक्रम. पण एक सांगू का सुशिक्षित माणसे का अडकली जातात म्हणतोस, कदाचित ज्या गोष्टिंपासून आपण सर्वदा अनभिज्ञ असतो त्या त्यांच्या समोर आल्या असतिल. असो.

    उत्तर द्याहटवा
  3. @सौरभ
    तू बोलत आहे ते काही प्रमाणात पटत रे पण आजचा नक्षलवाद हा न्यायहक्कांचा राहिला आहे असे वाटत नाही.

    उत्तर द्याहटवा
  4. चोरट्या खाणी चालविणाऱ्यानी सांभाळलेल्या खाजगी सैन्याची मदत घेऊन सत्तेवर आलेल्यानी या सैन्याला माओवादी हे नाव दिलेले असून ते गरिबांचे तारणहार असल्याची अफवा उठविली आहे.

    उत्तर द्याहटवा
  5. ब्रह्मवाक्य सांगतो.. 'गांधी' आडनावातच सगळी घाण आहे. ते ज्याच्या नावापुढे लागतं तो कसाही विचित्र वागायला लागतो आणि वागू शकतो (आणि अर्थातच तरीही त्याचं कोणीही काहीही वाकडं करू शकत नाही आपल्या देशात !!!)

    उत्तर द्याहटवा
  6. "अशी सुशिक्षित माणसेहि अशा कारवायांत कशी काय अडकली जातात"

    कोबाद गांधींची छान ओळख दिली आहे. पण आपले वरील वाक्य असे दाखवते, की नक्षलवादाला आपण फारच अंडरएस्टिमेट करत आहात. किरकोळ हिंसक कारवायांपुरता नक्षलवाद सीमित नाहीये. कोबाद गांधींसारखे अनेक उच्चशिक्षित लोकच यांचे नेते आहेत. हे जे किशनजी, गणपती असले नक्षल लीडर आपण ऐकत असतो, ते आपल्याच आजूबाजूला काही प्रतिष्ठित पद/ स्थान सांभाळून शहरांत रहात असतात. त्या ली फाकच्या फॅंटमप्रमाणे ही मंडळी बुरखे पांघरून नक्षलवादाचे नेतृत्त्व करत असतात. कोबाद गांधीच्या निमित्ताने हे सत्य आपण सर्वांनी infer करायला हवे.

    उत्तर द्याहटवा