गुरुवार, १ जुलै, २०१०

महागाई, बंद आणि असंवेदनशील सामान्य माणूस


केंद्र सरकारने काही दिवसापूर्वी पेट्रोल,डीझेल,रॉकेल इ. वस्तूंची भाववाढ केली.त्यामुळे महागाईचा भडका उडणार अश्या प्रतिक्रिया यायला लागल्या.रिक्षाभाडे  वाढले सुद्धा.वेगवेगळी आंदोलने  आणि मोर्चे निघत असल्याच्या बातम्या येत आहेत, आता तर भाजप आणि विरोधी पक्षांनी या निर्णयाच्या विरोधात भारत बंदची हाक दिली आहे.त्याला कसा प्रतिसाद भेटेल माहिती नाही. परंतु एक गोष्ट यात लक्षात घेतली का ज्या सामान्य माणसाचे या महागाईने कंबरडे मोडले आहे असे बोलले जात आहे त्या सामान्य माणसाला खरच या गोष्टींचा फरक पडला आहे ? त्यांच्यात याबद्दल चीड किंवा उद्रेकाची भावना जाणवते  आहे का ? तर उत्तर नाही असेच आहे कोणालाहि याचा फरक पडला आहे असे वाटत नाही कोठेही सामान्य माणूस या विरोधात चवताळून उठला आहे असे दिसून आले नाही.
 राजकीय पक्ष,वृतपत्रे आणि प्रसारमाध्यमे जेवढ्या बोंबा मारत आहेत तेवढा आवाज सामान्य माणूस नक्कीच मारत नाही.आंदोलने करणारे राजकीय पक्ष आणि हसत हसत घोषणा देत फोटो देणारे आंदोलक,टी.व्ही.समोर  मुलखाती देणारे नेते आणि त्यांचे दिसणारे कार्यकर्ते यांना सोडल्यास बाकी कोणाला या महागाईचा फटका बसलाय असे दिसत नाही.जेवढ्या बातम्या आणि त्यावर पेपरमध्ये अग्रलेख आले आणि त्यातून सामान्य माणसाना चटके बसत आहे असे सांगण्यात आले त्या सामान्य माणसाला चटका बसला आहे का ? नाही कारण चटका बसल्यावर माणूस झटका देतो,चवताळून उठतो,शिव्या घालतो पण असे कोठे दिसून आले नाही.
 मग असा प्रश्न पडतो कि खरच हि महागाई सामान्य माणसाचे कंबरडे मोडणारी आहे का ?आणि असेल तर सामान्य माणसे अशी शांत  ,बधीर का ?
आजकाल सामान्य माणूस  असंवेदनशील झाल्यासारखा  वाटत आहे.त्यांना स्वतावर होणाऱ्या अन्यायाची चीड येत नाही.त्यांच्याकडून कोणतीही उस्फुर्त प्रतिक्रिया येताना दिसत नाही.मग ती महागाई  असो वा महिलांवर झालेले अन्याय असोत,बलत्कार,दंगली असोत  सामान्य माणसाला याचे काही सोईरसुतक राहिले आहे असे वाटत नाही.सरकार तर असंवेदनशील आहेच हे दंतेवाडा आणि काश्मीर यासारख्या घटनांवरून दिसून येतच आहे पण सामान्य माणसे हि अशीच वागू लागलीतर अशा गोष्टीना कोण आळा  घालणार?
पूर्वीच्या काळी अशी परिस्थिती नाह्वती त्यावेळी लोकांकडून सामान्य माणसांकडून अशा गोष्टींच्या विरोधात प्रक्षोभ उठायचा आंदोलने ह्वायची आणि त्याची दखल  सरकारला घ्यावी लागायची आता अशी दखल घेण्याजोगी प्रतिक्रिया सामान्य माणसांकडून येत नाही.याचे कारण काय असावे ?
कि खरच आता सामान्य माणसे असंवेदनशील झाली आहेत????

७ टिप्पण्या:

  1. सामान्य माणसाने विरोध करायचाच असेल, तर आठवड्यातून १ दिवस तरी, दुचाकी/चार-चाकी न वापरता सार्वजनिक वाहतूक वापरावी. किंवा चालत अथवा सायकल ने जावे. ह्यातून त्या दिवशी पेट्रोल-डिझेल ची विक्री कमी होऊन पेट्रोल कम्पन्यांची उलाढाल कमी होईल, उत्पन्न कमी होईल. त्यातून सरकारला लक्षात येईल की दर आवाक्यात ठेवले तरच ह्या कम्पन्या चालू शकतात.

    दुसरं सार्वजनिक वाहतूकीवर ताण पडल्याने ते सुधारण्याचं काम सुद्धा सरकारला करावं लागेल.

    पण हे करताना होणारे थोडे तरी हाल सोसायला आपण तयार आहोत का?

    उत्तर द्याहटवा
  2. इकडे मरायला सुद्धा वेळ नाही अशी परिस्थती आहे लोकांची... विरोध करायला कुठून असणार... जे येतंय ते भोगत आहेत बिचारे...

    उत्तर द्याहटवा
  3. होय, असंवेदनशील होत आहे... कारण आधी घसाफोड करून कधी उपयोग झाला नाही... मग करणार तरी काय.

    भोपाळकेसचा निकाल हा सर्वात धक्कादाई होता.. आता तर सगळ्यातून विश्वासच उडालायं

    उत्तर द्याहटवा
  4. @ विनय
    कल्पना तर चांगली आहे परंतु सुखवस्तूच्या मागे लागलेल्या आजच्या जमान्यात हे शक्य होईल असे वाटते का ?

    उत्तर द्याहटवा
  5. @ रोहन
    सरकार मायबाप थोडे थोडे करून मारतच आहे कि म्हणजे सामान्य लोक रोजच मरण सहन करत आहेत
    आणि त्यामुळेच ते बधीर झाले असावेत.

    उत्तर द्याहटवा
  6. @ आनंद
    सामान्य लोकांकडून उस्फुर्त प्रतिक्रिया आली तर सरकार नक्कीच त्याची दाखल घेते रे पण आजकाल तशी ती येत नाही
    बाकी भोपाल निकालाने खरच अस्वस्थ केलाय सर्वाना :(

    उत्तर द्याहटवा
  7. सब्सिडी देण्याने ना देणाऱ्याचा फायदा होतो ना घेणाऱ्याचा याची जाणीव झाल्याने लोक शांत असावेत

    उत्तर द्याहटवा