रविवार, ४ जुलै, २०१०

पाऊसाच्या आठवणी ....

  गेल्या  १०-१५ दिवसापासून  पावसाने जोरदार हजेरी लावली आहे.मस्त पाऊस पडत आहे.कोणाला पावसात चिंब भिजायला आवडते तर कोणाला  घरात बसून पावसाचा आनंद घेण्यात मजा येते.पाऊस म्हंटले कि गरम भजी आणि गरम गरम चहा हा आपला आवडता मेनू.प्रत्येकाचा पाऊस साजरा ?? करण्याचा प्रकार वेगवेगळा असतो.काही जुन्या आठवणी असतात काही मित्रांबरोबरच्या किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीच्या सहवासाच्या अशाच काही खास आठवणी आपण आपल्या मराठी ब्लॉग विश्वातील मित्र आणि वाचकांबरोबर शेअर केल्या तर ?. कशी वाटते कल्पना ????
 प्रत्येकाच्या मनाच्या तिजोरीत पावसाळ्याच्या आठवणी ह्या साठ्लेल्याच असतात चला तर हा आठवणींचा कप्पा आपल्या हौसी वाचकांसाठी खाली करूयात :)
(कृपया वाचकांनी आपल्या आठवणी प्रतिक्रियेच्या रुपात शेअर कराव्यात हि विनंती )

६ टिप्पण्या:

 1. अनुभव तसे फारसे चांगले नाही पण पाऊस मलासुद्धा आवडतो, खुप आवडतो... सन २००८ च्या याच पावसाच्या कालखंडात इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतेवेळी उडालेली तारांबळ, भिजलेले ओरिजिनल्स, सलग ३ दिवस भिजत जाणं व घरी परततांना देखील भिजणं हे त्यावेळचे अनुभव... आत्ता काही आठवड्यांपूर्वी सेमिस्टर संपतांना देखील अवकाळी पावसाने ज्या फाइल सबमिट करायच्या होत्या, त्याच भिजवण्याचा पराक्रम केला होता, असो...

  तुम्हां लोकांसारखा जोडीदारासमवेत पाऊसाचा स्वच्छंदपणे आनंद लुटण्याचा अनुभव अजुनतरी माझ्यासारख्या कम-नशिबी कार्ट्याला आलेला नाहिये, तुम्हा लोकांचे असले सॉलिड अनुभव वाचूनच "पॉट" भरण्यातच मी आनंद मिळवतो!

  पावसाळा आलाय, मजा करा...!!!

  उत्तर द्याहटवा
 2. पाऊस सर्वांना हवाहवासा वाटतो मात्र तो जास्त झाला की वैताग येतो
  त्यामुळे मी आताशी पावसाची तुलना हलवाई तळत असलेल्या जिलबीशी करतो.जिलबी तळतांना खुप खावीशी वाटते मात्र प्लेट मध्ये आली की, एखाद दुसरीच खाल्ली जाते.

  उत्तर द्याहटवा
 3. विक्रम, तो फोटो लावला त्यापद्धतीने पाऊस अजुन साजरा करायचाय.. तोवर मित्रमंडळींमध्ये साजरा केलेला पाउसच आठवतोय... (काय करणार?) ;-)

  दोन अठवड्यापुर्वीच सिंहगडावर काही ब्लॉगर्समंडळींसोबत गडद धुकं, जोराचा थंड वारा आणि पावसाच्या हलक्या शिडकाव्यात खाल्लेली कांदाभजी आणि थंड ताक मात्र जरूर आठवते...

  उत्तर द्याहटवा
 4. @विशल्या
  हा हा भारीच अनुभव आहेत कि तुझे म्हणजे पाऊस आला कि तुझी तारांबळ उडवून जातो तर ;)
  आणि काही खास आठवणी असल्यातर तू थोडेच शेअर करणार आहेस होय रे
  बाकी अजून लोकांच्या प्रतिक्रिया आल्या नाहीत पाहू कोण काय अनुभव सांगतात ते

  उत्तर द्याहटवा
 5. @ नागेश
  स्वागत आपल
  काही प्रमाणात तुम्ही बोलता ते सत्य आहे कोणतीही गोष्ट अति झाली कि वैताग येतोच
  परंतु पाऊस जो आनंद देतो तो हलवाई च्या जीलेबित नाही बर का हा हा

  उत्तर द्याहटवा
 6. @ आनंद
  काय सांगतोयस अजून तसा अनुभव नाही ;)
  आणि सिंहगडवरील ताक एकदम झकास बर का
  एकंदरीत पाऊसाचा आनंद घेत ब्लॉगर्समंडळींसोबत मजा केलीस तर :)

  उत्तर द्याहटवा