लाखो भक्तांच्या साक्षीने हजोरो वारकरी पंढरीची वाट चालू लागले आहेत.आषाढ म्हंटले कि अवघ्या वारकरी संप्रदाय आणि मराठी जणांना आषाढ वारीचे वेध लागतात.देहू आणि आळंदी हून संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर यांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने निघताच त्यांच्याबरोबर वारकरी आणि भक्तांचा अथांग सागर टाळ-चिपळ्याच्या निनादात,विठूनामाचा जयघोष करीत पंढरीची वाट धरतो.राज्याच्या कानाकोपऱ्यातून नह्वे तर परराज्यातून काय तर परदेशातूनही लोक या वारीत सामील होत असतात.
उण, वारा,पाऊस याची तमा न बाळगता अनेक चढउतार पार करत वारकरी पंढरीची वाट चालत असतो परंतु चालताना चालेला विठूनामाचा जयघोष त्यांना स्वर्गीय सुखाची प्राप्ती करून देत असतो.विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ लागलेल्या वारकर्यांना अशा संकटांची तमा नसते.अशी तळमळ,ओढ,प्रेम,निष्ठा दुसरीकडे क्वचितच पाहण्यास मिळत असावी.
कोणतेही निमंत्रण नाही आग्रह नाही सर्व लोक स्वइच्छेने स्वखुशीने आणि स्वखर्चाने या वारीत सामील होत असतात. एका ध्येयाने इतका मोठा लोकसमूह एकत्र येऊन इच्छित स्थळी सुव्यवस्थितपणे एकमेकांना सहकार्य करत शिस्तीत पोहचतो खरच कमालीची गोष्ट आहे. ना त्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जाऊन व्यवस्थापनाचे धडे घेतलेले असतात न त्यांना कोणी शिकवणारे असते.अबालवृद्ध ,शिक्षित,अडाणी,गरीब,श्रीमंत सर्वच यात सामील होतात.
अशा या पंढरीच्या वारीचा एकदातरी अनुभव घ्यायलाच हवाच :)
वर्षती पाऊसधारा सळसळा, टाळ मृदंग कल्लोळा, विठूनाम गळा, ऐसा अनुभवावा माऊलींचा दिव्य सोहळा!!
उत्तर द्याहटवानमस्कार......!!! खुप दिवसानंतर भेटतो आहोत. हो खरचं एकदा तरी या सोहळयाचा आनंद घ्यावाच......
उत्तर द्याहटवा