मंगळवार, १५ सप्टेंबर, २००९

5 star लोकप्रतिनिधी

आज भारतामधील सामान्य जनता गरिबी महागाई दुष्काळ यांनी होरपळत असताना
याच देशातील गांधीजींच्या विचाराचा वारसा सांगणाऱ्या कॉंग्रेस पक्षातील मंत्री जनतेच्याच पैशावर मजा मारत आहेत.
यावरून असे दिसून येते कि गांधींचे विचार फक्त सांगायला आहेत आचरणात आणायला नाहीत असे त्यांचे मत आहे.

‘संधी मिळाली तर महात्मा गांधी यांच्याबरोबर भोजन घ्यायला आवडले असते ’ असे वक्तव्य अमेरिकाचे अध्यक्ष बराक ओबामा यांनी नुकतेच केले
त्याचवेळी गांधीजींच्या देशात त्यांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या पक्षातील मंत्री पंचतारांकित हॉटेलमध्ये ४० हजार रुपये प्रतिदिन भाडे मोजून जनतेच्या पैश्यावर ऐश करतानाचे

Five Star Hotel in San SalvadorImage via Wikipedia

वृत्त आले
या नेत्यांना लाज कशी वाटत नाही ?
अमेरिकेसारख्या देशाच्या अध्यक्षाला गांधींच्या साधेपणाचे विचार पटत असताना त्यांच्याच देशात मात्र त्यांच्या विचारणा हरताळ फासण्याचे काम सध्या चालू आहे आणि यात लोकप्रतिनिधी आघाडीवर आहेत
परराष्ट्रमंत्री एस म कृष्णा आणि त्याच खात्याचे राज्यमंत्री शशी थरूर यांनी जनतेच्या पैस्यावर झोडलेल्या शाहीपाहुणचाराची सध्या चर्चा जोरात आहे.
त्यांची कानउघाडणी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी यांनी केल्यानंतर त्यांनी हॉटेल सोडण्याची तयारी दाखवली.
या सर्वांनी आतापर्यंत ३ कोटी ७८ लाख रुपये एवढ्या जनतेच्या पैस्याचा चुराडा ऐषारामासाठी केला आहे
यांनी हॉटेल सोडली असली तरी अजूनही काही खासदार जनतेच्या पैस्यावर हॉटेलमध्ये मुक्काम ठोकून आहेत
अजूनहि जुन्या खासदारांनी आपली निवस्थाने मोकळी केली नसल्याने तसेच सोडलेल्या निवस्थानांची डागडुजी करायची आहे हि करणे देवून काही खासदार सध्या हॉटेल मुक्कामी आहेत.

आज देशातील सामान्य जनता वेगवेगळ्या प्रश्नाशी झगडत असताना त्यांना २ वेळचे नीट खायला मिळत नसताना त्यांच्या लोकप्रतिनिधींची राहणी कशी असावी असा प्रश्न यावेळी पडतो.
आपल्या देशाच्या संस्कृतीत साधी राहणी आणि उच्च विचार याला महत्व आहे पण आपल्या लोकप्रतिनिधीमध्ये नेमके याच्या उलटे आहे त्यांचे म्हणजे उच्च राहणी आणि दिवाळखोर विचार असे आहे.

गांधीजी स्वता आयुष्यभर लज्जारक्षणा एवढे वस्त्र वापरात त्यांनी सर्व सुखसुविधांचा त्याग केला होता ते म्हणत कि देशातील सामान्य जनतेला अंगभर वस्त्र मिळत नसेल तर मला अंगभर वस्त्र घालण्याचा अधिकार नाही.
आजच्या लोकप्रतिनिधींकडून एवढी अपेक्षा नाही आणि फक्त वस्त्रांचे अनुकरण केले म्हणून विचारांचे अनुकरण होते असे काही नाही.
आज देशातील सामान्य जनता विविध समस्याने ग्रस्त असताना जनतेच्या मुलभूत गरजाहि पूर्ण होत नसताना जनतेच्या पैस्यावर आपण असा शाहीपाहुणचार झोडला पाहिजे का? याचा विचार या पुढार्यानी करायला हवा होता
आता काहीजण आम्ही स्वताच्या पैस्यावर हॉटेलमध्ये राहिलो होतो असे सांगण्याचा प्रयन्त करत आहेत पण लोकप्रतिनिधींचे राहणीमान कसे असावे याचे काही संकेत आहेत कि नाहीत कि यांनी सर्व संकेत धाब्यावर बसवले आहेत आता ?
दहशतवादी हल्ला झालेला असतानाहि कपडे बदलण्यात धन्यता मानणाऱ्या केंद्रीय गृहमंत्री पाटील यांच्या सारखीच सर्व लोकप्रतिनिधींची मानसिकता झाली आहे ?

कामाचा भाग म्हणून सोयीसुविधांचा गरजेपुरता वापर करण्यास कोणाचाच विरोध असणार नाही परंतु सरकारी खर्चाने मिळणाऱ्या सुविधांचा वाट्टेल तसा वापर करणे कितपत योग्य आहे ?

महात्मा गांधी तसेच माजी पंत्रप्रधान लाल बहादूर शास्त्री यांनी साधेपणालाच महत्व दिले होते याचा आदर्श आपले आजचे लोकप्रतिनिधी कधी घेणार ?

प्रणव मुखर्जी यांनी केलेल्या साधेपणाच्या आवाहनाला स्वताला शेतकऱ्यांचे कैवारी आणि सामान्य जनतेचा प्रतिनिधी म्हणवून घेणाऱ्या शरद पवारांनी हि विरोध करावा हि आश्चर्याची गोष्ट आहे.

आजचे लोकप्रतिनिधी सुखसोयीना महत्व देताना दिसतात तसेच ते सुरक्षा व्यवस्थेला हि प्रतिष्ठा म्हणून समजतात अशाच गोष्टींचा ताण आज पोलीस दलावर येताना दिसत आहे आणि जेथे गरज आहे तेथे सुरक्षा देण्यास ते कमी पडत आहेत.

आज लोकप्रतिनिधी हे आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत हे विसरून गेले असून स्वताला ते राजे एखादे संस्थानिक समजू लागले आहेत अशा लोकांना वेळीच धडा शिकवायला हवा.

आज केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कानउघाडणी केल्यावर यांनी 5 star हॉटेलचा त्याग केला असला तरी यापुढे जनतेच्या पैस्यांवर हे लोक कशावरून मजा मारणार नाहीत ???????????

जय हिंद
जय महाराष्ट्र


Reblog this post [with Zemanta]

५ टिप्पण्या:

  1. छान लिहिले आहेस !

    तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर कॉंग्रेसवाले साधेपणाचा "दिखावा" करत आहेत !

    जमल्यास हा लेख पण वाचा - http://economictimes.indiatimes.com/Opinion/The-great-austerity-race/articleshow/5016393.cms

    उत्तर द्याहटवा
  2. Youth Wins...

    धन्यवाद प्रतिसादाबद्दल

    ते दिखाऊपणा करत आहेत असे जरी धरून चाललो तरी उपक्रम चांगला आहे सर्व पक्ष्यांच्या लोकप्रतीनिधिनी हा पायंडा पाडला पाहिजे असे मला वाटते

    उत्तर द्याहटवा
  3. vikram chan lihta ya peksha khara ani spasht lihta avadla mala

    उत्तर द्याहटवा
  4. विक्रम दादा खरेच अतिशय मार्मिक लिखाण.व्वाह!

    उत्तर द्याहटवा