मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

भारतीय अभियांत्रिकीचे जनक

डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्म कर्नाटकातील कोलार जिल्ह्यातील चीक्कबल्लापूर तालुक्यातील मुद्देनहल्ली या गावी १५ सप्टेंबर १७८६१ रोजी झाला. त्यांच्या वडलांचे नाव श्रीनिवास शास्त्री व आईचे नाव वेंकचम्मा होते.

डॉ.विश्वेश्वरय्या १८८१ साली बी.ए. उच्च श्रेणीत उत्तीर्ण झाले.पुण्याच्या सायन्स कॉलेजमधून १८८३ मध्ये पदवी परीक्षा ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.त्यानंतर ते मुंबईच्या सार्वजनिक बांधकाम विभागात सहायक अभियंता या पदावर रुजू झाले.

१९८३ साली सिंध प्रांतातील सक्कर या शहराला सिंधू नदीपासून पाणी पुरवण्यासाठी त्यांनी प्रसिद्ध 'सक्कर' बंधाऱ्याची योजना केली.१८९९ मध्ये शेतकऱ्यांसाठी ब्लॉक सिस्टीम शोधून काढली तसेच धरणातील वाया जाणारे पाणी थांबवण्यासाठी स्वयंचलित स्लुईस दरवाजाची रचना केली.
हैद्राबाद येथील 'मुसा' आणि 'ईसा' या नद्यांवर धरण बांधले.तसेच नदीच्या काठावर बाग बनवून पुरापासून शहराचे संवरक्षण केले.
म्हैसूरच्या राज्यांनी त्यांना संस्थांचे मुख्य अभियंता आणि नंतर दिवाण म्हणून नेमले होते.१९९२ साली डॉ.विश्वेश्वरय्या यांनी कावेरी नदीवर कृष्णराजसागर धरणाची योजना आखली.

Bharatha Ratna Mokshagundam VishveshwaraiahImage via Wikipedia



डॉ.विश्वेश्वरय्या यांनी लोकांचे अज्ञान,दारिद्र्य नष्ट ह्वावे यासाठी लढा उभारला आणि यातूनच म्हैसूर विद्यापीठाची निर्मिती झाली.
म्हैसूरमधील The Sandal oil Factory , The Metals Factory,The soap Factory,The crome tyning factory,Bhdravati Aryans and Steel Works हे सारे उद्योग त्यांच्या मेहनतीचे फलित आहेत.
त्यांच्या या कार्याने प्रेरित होऊनच टाटा यांनी टाटा इस्पातच्या सल्लागारपदी नेमणूक केली होती या पदावर त्यांनी १९२७ ते १९५५ पर्यंत काम केले.
बंगलोरमधील दि हिंदुस्तान एअरक्राफ्ट फेक्टरी आणि मुंबईची प्रीमियर हे त्यांच्या कामाचे मूर्त स्वरूप आहे.

देशात अर्थव्यवस्था नियोजन असावे,यावर काम करणारे डॉ.विश्वेश्वरय्या पहिलेच अभियंता होते.त्यांनी या विषयावर 'प्लांड इकोनोमी फॉर इंडिया' हे पुस्तक लिहिले आहे.
व्यापार आणि उद्योगधंदे वाढीसाठी त्यांनी 'बँक ऑफ म्हैसूर' ची स्थापना केली.

डॉ.विश्वेश्वरय्या यांना अनेक विद्यापीठांच्या डी.लिट उपाधी मिळाल्या होत्या.
ब्रिटीश सरकारने त्यांना 'सर' उपाधीने गौरीवलेले तसेच १९५५ साली देशाचे प्रथम राष्ट्रपती डॉ.राजेन्द्रप्रसाद यांनी 'भारतरत्न' उपाधीने सन्मानित केले होते.तसेच त्यांच्या सन्मानार्थ एका टपाल तिकिटाचे प्रकाशन हि करण्यात आले आहे.

देशात तंत्रज्ञानाचा पाया घातल्यामुळेच त्यांचा जन्मदिन १५ सप्टेंबर हा 'अभियंता दिन' म्हणून साजरा केला जातो.



Reblog this post [with Zemanta]

४ टिप्पण्या:

  1. त्या भारतीय अभियांत्रिकीच्या जनकाला मनापासून अभिवादन करतो मी- एक अभियंता

    उत्तर द्याहटवा
  2. माझादेखील श्री विश्वेश्वरय्यांना सलाम...
    पण आज अभियांत्रिकी शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदलाची..एकंदरच शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदलाची गरज असल्याचं माझं मत आहे! कदाचित तीच खरी श्रद्धांजली असेल भारतीय अभियांत्रिकी जनकाला!

    उत्तर द्याहटवा
  3. डॉ.विश्वेश्वरय्या यांना अभिवादन!!!

    उत्तर द्याहटवा