शुक्रवार, २ जुलै, २०१०

मनोज तिरोडकर ...नाम तो सुना होगा

मनोज तिरोडकर वय वर्ष ४५ एक अस्सल मराठी माणूस.भारताचा भावी सर्वात श्रीमंत उद्योगपती.एकूण संपत्ती ५७० दशलक्ष डॉलर .तिरोडकर यांचे  नाव ऐकले नाही असा माणूस किमान नेटवर तरी भेटणे आता मुश्कील झाले आहे .तिरोडकर यांच्या GTL इन्फ्रा या कंपनीने अनिल अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनीला ताब्यात घेतले आहे आणि हा व्यवहार साधारण ५० हजार कोटी रुपयांच्या घरात असेल.  फोर्बच्या भारतीय श्रीमंतांच्या यादीत हा मराठी माणूस सध्या ८४ व्या क्रमांकावर आहे.नाही आपल्या मराठी माणसाला असल्या यादीत नाव यायची सवय नाही आणि वाचायचीही.बाकी दुबईस्थित दातार यांच्याबद्दल ऐकून आणि वाचून होतो ते मराठी असले तरी सध्या आपल्या देशात नाहीत .
 तर असे हे मनोज तिरोडकर हे एक पुणेकर आहेत.(हे वाचून सर्व पुणेकरांची कॉलर ताठ होणार यात वाद नाही ;) ) तिरोडकर  यांच्याबद्दल काही दिवसांपूर्वी सकाळमध्ये वाचण्यात आले होते तेंव्हापासून त्यांच्याबद्दल एक आकर्षण निर्माण झाले होते नंतर AIRCEL बरोबरच्या कराराची बातमी आली  आणि त्यानंतर थेट रिलायंसची बातमी आली आणि सर्व जगाचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले, नेहमीप्रमाणे आपल्या मिडीयाने याला जास्त महत्व दिले नाही परंतु तिरोडकर मराठी असल्याने IBN लोकमत या वाहिनीने त्यांची मुलाखत घेतली ती पाहण्याचा योग आला.तिरोडकर यांच्या बोलण्यातून  अस्सल मराठीपण जाणवत होते.उगाच दिखावा म्हणून इंग्रजी व हिंदी भाषेचा वापर नाही.किंवा केल्याला कामगिरीचा गर्व नाही.सर्व प्रश्नांना समर्पक उत्तरे देत होते.त्यांच्या कंपनीचे सर्व टोवर पुढील ३ वर्षात  हरित म्हणजे इको फ्रेंडली करण्याचा त्यांनी बोलून दाखवलेला मानस खरच वाखण्याजोगा होता आणि त्यामागील सामाजिक बांधिलकीची जाण हि दिसून येत होती.
 मनोज तिरोडकर यांचे वडील  शिपिंग व्यवसायमध्ये होते.वडिलांच्या कंपनीत काम करता करता तिरोडकर यांनी १९८७ मध्ये स्वताची GLOBEL TELECOM हि कंपनी सुरु केली.आज ती जगातील सर्वात मोठी टेलिकॉम टोवर कंपनी आहे.( कंपनीच्या नावात GLOBEL हा शब्द त्यांनी का वापरला असावा याचा प्रत्यय आला असेलच )  तसेच ते पहिले भारतीय उद्योगपती आहेत ज्यांना  “World Young Business Achiever Award 2000” हा पुरस्कार मिळाला आहे.
 तर अशा या मराठी माणसाबद्दल मिडिया जरी दोन हाथ लांब असला तरी आपल्या मराठी ब्लॉग विश्वाने मागे का राहायचे? म्हणून हा प्रपंच बाकी मराठी असल्याचा अभिमान तर असणारच न राव :)
मनोज तिरोडकर यांची अशीच प्रगती होत राहो आणि हा मराठी माणसाचा झेंडा देशातच नव्हे तर विदेशातही शानसे फडकत राहो हीच शुभेच्छा .
जय हिंद
जय महाराष्ट्र
जय तिरोडकर

९ टिप्पण्या:

  1. एका मराठी माणसाची हि घोडदौड वाचून खूप आनंद झाला.

    उत्तर द्याहटवा
  2. वा उत्तम माहिती..मागे मी ह्यांचा इंटरव्यू बघितला होता पण नाव माहीत नव्हता, एका मराठमोळ्या उद्योगपतीला हार्दिक शुभेच्छा !!!

    उत्तर द्याहटवा
  3. @ सुहास
    लोकमतवरची मुलाखत खरच जबरदस्त झाली नेत वर सर्च करून मिळतेय का पहा

    उत्तर द्याहटवा
  4. मानल राव...अंबानीला खिशात टाकल...:)
    मराठमोळ्या उद्योगपतीला हार्दिक शुभेच्छा !!!

    उत्तर द्याहटवा
  5. भन्नाट, लेखाबद्दल खुप धन्यवाद :)

    उत्तर द्याहटवा