Image via Wikipedia
न दुर्ग दुर्गामित्येव मन्यते जनः।
तस्य दुर्गमता सैव यत्प्रभुस्तसय दुर्गम:॥
(दुर्गाला केवळ दुर्ग म्हणून दुर्गम मानीत नाहीत,तर त्युंच स्वामी दुर्गम असणे हीच त्याची दुर्गमता होय.)
प्रभुणा दुर्गम दुर्ग प्रभूदुर्गण दुर्गम:।
अदुर्गमत्वादुगभयोव्रीद्वीषेन्नेव दुर्गम:॥
(प्रभूमुळे दुर्ग दुर्गम होतो व दुर्गामुळे प्रभू,दोघांच्याही अभावी शत्रूच दुर्गम होतो )
संतती यानि दुर्गाणि
तानी सर्वाणि सर्वथा।
यथा सदुर्गमणि स्युस्तथा
सद्योविर्धायताम॥
(तुमचे जे दुर्ग आहेत ते ज्यायोगे सर्वस्वी अत्यंत दुर्गम होतील असे ताबोडतोब करा )
शिवाजी राजांनी दुर्ग दुर्गम केले.१६७२ मध्ये रोह्याहून राजापूरला गेलेल्या अबेबार्थलोमी कैरे नावाच्या एका फ्रेंच माणसाने शिवाजीमहाराजांबद्दल लिहिले आहे.
'त्यांनी त्या मुलखाच्या भूगोलाचा अभ्यास केला आहे.इथले झाड आणि झुडुपही त्यांना माहित आहे.यांनी या भागाचे नकाशे काढले आहेत.दुर्ग बांधणीची कला त्यांनी अवगत करून घेतली आहे.'
शिवाजीमहाराजांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला तेंव्हा तो परत बांधावयास काढला. पौंडेचारीच्या फ्रेंचांनी आपला वकील जिंजीला पाठवला होता.या वकिलाने लिहिले आहे.'शिवाजी राजांनी जिंजीचा किल्ला जिंकून घेतला आहे.आणि बरेचसे जुने बांधकाम पाडून नवीन सुरु केले आहे.बुरुज अशा विवक्षित ठिकाणी बांधले आहेत कि,हे बांधकाम कोणी भारतीयाने केल्यापेक्षा युरोपियाने केल्यासारखे वाटते.'
महाराष्ट्रातही अतिप्राचीन दुर्ग आहेत.प्रामुख्याने नाला सोपारा ते पैठण या मार्गावरील हडसर उर्फ पर्वतगड,चांवड किंवा जुंड वा प्रसन्नगड,जीवधनगड आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जिथे जन्म झाला तो जुन्नर जवळील शिवनेरी हे दुर्ग फार प्राचीन आहेत,जीवधन,चांवड वैगेरे किल्ल्याच्या दगडात कोरलेल्या पायरया,हडसर येथील कड्यावरील खिळे,मेख ठोकून केलेली वाट व दगडातच कोरलेले भव्य प्रवेशद्वार आणि शिवनेरीभोवती कोरलेली लेणी गडाच्या प्राचीनतेची साक्ष देतात.गडांचा अभ्यास करताना गडांवर असलेली पाण्याची दगडात कोरलेली टाकी गडावर असलेल्या पनिसाठ्याविषयी माहिती देतात.जिथे पाणीसाठा मुबलक असेल,त्या गडाला विशेस महत्व असे.कारण,सैन्यासाठी ते फार उपयुक्त ठरते.
इ.स. सहाव्या शतकात लिहिलेल्या बृहतसंहितेत 'दुक्राग्रलम' म्हणजेच 'जिवंत पाण्याच्या झऱ्याचे संशोधन' या विषयावर दिलेल्या तपशिलावरून या बाबतीत कसे शोध,किती व कशी कशी प्रगती केली,याविषयीचे चित्र पहावयास मिळते.याप्रकारनावर नंतर १२०० वर्षात बर्याच टीका लिहिल्या गेल्या.त्यात थोड्या अधिक तपशिलाची भर पडली असली तरी बृहतसंहितेत असलेली मुलतत्वे अनुभवाने पटल्याची ग्वाही दिली आहे.या प्रकरणाच्या १२५ श्लोकात वृक्षांच्या वाढीवरून,कीटकांच्या अस्तीतवावरून,जमिनीच्या किंवा खडकाच्या रंगरूपावरून अथवा गुणधर्मावरून पाणी शोधण्याचा मार्ग सांगितला आहे.पाण्याचा हा शोध गिरीदुर्गांसाठी फारच उपयोगी ठरला.मुळातले दुर्गम गिरिदुर्ग पाण्याच्या सोयीमुळे अजूनच दुर्गम झाले.याचे एक उदाहरण म्हणजे सिंहगड.येथे सुमारे तीन लाख पर्यटक दरवर्षी येतात.बहुतेक सर्व देवटाक्याचे पाणी पितात.एवढा प्रचंड उपसा असूनही आजही हे देव टाक्या कोरडे पडलेल्या नाहीत.
याउलट कर्नाल्याचे उदाहरण देता येते.कर्नाळा किल्ल्यावर डोंगरात एक खोदीव टाकी आहे.त्यात पाण्यावर हवेचा दाब पडणार नाही,अशी त्या टाकीची पातळी ठेवली होती.पण एकदा टाकीच्या बाहेरील भिंतीवर वीज पडून त्यात पोकळी निर्माण झाल्याने बारमाही,सतत तुडुंब भरून राहणारे टाके पूर्णतः कोरडे पडले.पाण्याच्या झऱ्यांच्या अस्तित्वाचे तत्व सांगताना वराह मिहीर लिहितो'डोंगर,दरया,जमीन,वा दगड असो,सर्वत्र कमी अधिक झरे वाहणाऱ्या शिरा पृथ्वीत असू शकतात आणि त्या जाणण्याची साधने,निसर्गातील उत्पत्ती,स्थिती आणि लायातच दृष्टिगोचर करून घेता येतात.
अशा प्रकारे छत्रपती शिवाजीमहाराजांबद्दल त्यांच्या शाम्तेबद्दल,दूरदृष्टीबद्दल,वास्तुशास्त्र
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा