Image via Wikipedia
जेम्स डग्लस नावाच्या इंग्रजाने 'तोरणा'किल्ल्याबद्दल म्हंटले आहे,'सिंहगड हि सिंहाची गुहा असेल,तर तोरणा हे गरुडाचे घरटे आहे.'अशा प्रकारे गडकोट किल्ल्याबद्दल आपली मते प्रदर्शित केली आहे.मुल्ला नस्त्रती नावाच्या विजापुरी कवीने 'तोरणा'किल्ल्याबद्दल लिहिले आहे,'शिवाजी राजांचाच एक अवघड गड होता,उंचीने तो आकाशापेक्षा श्रेष्ठ होता.दूरस्थ पाहणार्याला त्याची विशालता पाहून असे वाटे कि,पृथ्वी डोक्यावर घेऊन जणू आकाश उभे आहे.वसंत ॠतू गडावर नुसता मुसमुसत असतो.असे वाटते कि हवेत दुसरेच जग वसलेले आहे.गडावरील प्रत्येक गल्लीत पाण्याचा उत्तम प्रकारचा कालवा वाहत आहे.प्रत्येक ठिकाणी मिस्त्र-इजिप्त सारखी संपन्नता आहे.प्रत्येक ठिकाणी नील नदीचा प्रवाह वाहत आहे.स्वर्गातून इंद्र उतरून अधूनमधून याच गडावर राहून आपली सुख कालक्रमणा करीत असावा.'
अशा प्रकारचे दुर्गवैभव हे महाराष्ट्रात विपुल प्रमाणात आहे व त्याची वैशिष्टे पाहिलीच पाहिजेत.साल्हेरच्या शैलकडा आणि खडकात कोरलेल्या जिन्यांच्या वाटा,देवगिरीच्या खंदक आणि अंधारी,अलंगची टाकी,धोडपची फोडलेली माची,हष्रची दगडांत कोरलेली वाट,अंकाई ची लेणी,हडसरचे दगडात कोरलेले दरवाजे,शिवनेरीचे सात दरवाजे,राजगडच्या माच्या व बालेकिल्ला.रायगडचे टकमक टोक,जंजीरयाचा अभेद्य बुरुज,विजयदुर्गची तिहेरी तटबंदी,लोहगडचा गेट-वे म्हणजे द्वारमंडळ आणि खंदक,परंड्याच्या तोफा,औशातील जमिनीखालच्या विहीर,पन्हाळ्यावरील कोठारे,कंधारची जीभी अशी अनेक किल्ल्यावरची वेगळी वैशिष्टे अभ्यासून पहावीत.
दुर्ग दुर्गम करावयाचे अनेक प्रकार पाहण्यात येतात.दगड वापरून दुर्ग बळकट करतातच,पण दगड काढून नह्वे; तर दगड अदृश्य करूनसुद्धा दुर्ग अभेद्य केल्याची उदाहरणे आहेत.
राजगडचे उदाहरण द्यायचे झाले,तर राजगडच्या तीन माच्या आणि अभेद्य बालेकिल्ल्याला लागलेला एकून दगड अंदाजे २० दशलक्ष टन आहे.एवढा दगड कोठून आणला,त्याच्या खुणाही तेथे नाहीत.दगडाची खाणही जवळ आढळत नाही.पाण्याच्या टाक्यातून जर दगड काढला असे म्हणावे, तर तेथून काढलेला एकून दगड अंदाजे ३ लक्ष टन एवढाच भरेल,मग उरलेला १७ लक्ष टन दगड कोठून आणला असेल?प्रश्न अनुत्तरीतच राहतो.
दुसरे उदाहरण आहे दगड काढू टाकून दुर्ग बळकट करण्याचे.खर तर हे थोड चमत्कारिकच वाटते;पण याचे उत्तम उदाहरण म्हणजे देवगिरी.येथे दगड काढून टाकून दुर्ग बळकट केल्याचे आढळून येते.संभाजीनगर जवळ देवगिरीचा ह डोंगर आहे.किमान अंदाजे ८० लाख टन दगड डोंगरातून काढून टाकलेला आहे.खंदकाच्या तळापासून वरपर्यंत छिन्नी लावलेली उंची ५० मीटर तरी नक्कीच आहे.ऐन खंदक हि १०ते१२ मीटर खोल आहेत.या खंदकातून वर गेल्यावर पुन्हा दगड काढून एक चक्राकार वाट केलेली आहे.या वाटेला 'अंधारी'असे म्हणतात.देवगिरी दुर्गच्या खोदकामाला राष्ट्रकुंतानि सुरवात केली असावी.वेरुळच्या लेण्यांच्या खोदकामाच्या वेळेस हे खोदकाम झाले असावे.'अंधारी'चे प्रवेशद्वार त्याला साक्ष आहे.एवढ्या मोठ्या प्रमाणात दगड काढून दुर्ग अभेद्य केल्याचे हे एक अपूर्व उदाहरण आहे.
तिसरे उदाहरण म्हणजे दगड अदृश्य केल्याचे आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्तरेला वाघोटन नदीच्या मुखाशी 'विजयदुर्ग' हा किल्ला आहे.तीन बाजूला पाणी आणि एका बाजूला खुश्की असे त्याचे स्वरूप आहे.एका ठिकाणी तीन,तर एका ठिकाणी चार तटबंद्या बांधून दुर्ग बळकट केला आहे.
१९९१ मध्ये गोव्याची 'नॅशनल इंस्तिट्यूट ऑफ अशिनाग्राफी' आणि 'वेस्टर्न नेव्हल कमांड' यांनी एक संयुक्त मोहीम राबवली होती.पाणबुडे पाण्यात उतरवून त्यांनी अभ्यास केला.तेथे १२२ मीटर लांब व ७ मीटर रुंद आणि ३ ते ४ मीटर उंच अशी भिंत आढळून आली.प्रचंड आकाराच्या शिळांचा वापर तेथे त्या भिंतीसाठी केल्याचे आढळले.हि भिंत वरून दिसत नाही.म्हणजेच दगड अदृश्य आहे.१७२० च्या आसपास काही इंग्रजी जहाजे या भिंतीला आदळून फुटली.गोव्याच्या पोर्तुगीजांना इथे समुद्रात काहीतरी बांधकाम आहे याची कल्पना होती.दुर्ग अभेद्य करण्याचे हे अजोड उदाहरण आहे;पण ते अदृश्य आहे,अशी अनेक वैशिष्टे आपल्याला दुर्गकोटांच्या बाबत आढळून येतील.
या व अशा अनेक गोष्टींचा आपापल्या परीने वेगवेगळ्या इतिहास संशोधकांनी अभ्यास केला आहे.अनेक वैशिष्टे निदर्शनास आणून दिलेली आहेत.मात्र,यांची सांगड विज्ञान युगात घालणे महत्वाचे वाटते.
इतिहासकारांनी हि दुर्गांसंबंधी अभ्यास केला आहे.त्यासंबंधी सापडलेले अनेक दाखले अभ्यासलेले आहेत.दुर्ग्कोत बांधताना त्यांची वैशिष्टे काय,कोट बळकट करताना घेतलेली काळजी व रचना,नैसर्गिक वैशिष्टे,यासबंधी अनेक संशोधकांनी आपली मते वेगवेगळ्या स्वरुपात मांडलेली आहेत.
श्री.प्र. के.घाणेकर यांनी गडांची दुर्गमता व गडावर कसे जावे,काय काळजी घ्यावी,फुले व विविध वनस्पती कुठे व कशा आढळतात यासंदर्भात अभ्यासपूर्ण लेख व पुस्तके प्रकाशित केलेली आहेत.त्याचप्रमाणे श्री.दांडेकर यांनी गोष्टीरूपात शिवसामर्थ्य,तेथील लोक,गडकिल्ले,यासंदर्भात तसेच स्वता पायी फिरून आलेले अनुभव व अनेक किल्ल्याची उत्कृष्ट छायाचित्रे उपलब्ध करून दिली आहेत.गावात छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या फौजेत असलेले लोक यांच्या संदर्भात अनेक आख्यायिका जिवंतपणे लोकांसमोर मांडल्याआहेत.
प्र. के. घाणेकरांची बरीच पुस्तके "सह्याद्रिच्या" बाबतीत प्रसिद्ध आहेत, पैकीच एक - "साद सह्याद्रिची - भटकंती किल्ल्य्यांची" जे मी वाचतो. लेख मस्त आहे!
उत्तर द्याहटवाSundar Lekh Aahe... Shabdrachna Changali Keli aahe.. Sandarbh Hi Chan Ghetale Aahet
उत्तर द्याहटवाभुंगा
उत्तर द्याहटवाधन्यवाद
मलाही ते पुस्तक वाचायचे आहे ऐकून आहे घाणेकरांच्या पुस्तकाबद्दल
@अमोल
धन्यवाद साहेब
nice article...dandekar vachtoy..ghanekar vachayache ahet
उत्तर द्याहटवाvikram yaar tu gr8 aahes...what a detailed description this is..really awesome..hats off to u..jayesh
उत्तर द्याहटवास्मित आणि जयू
उत्तर द्याहटवाधन्यवाद
खुपच उपयुक्त माहीती. धन्यवाद...!!
उत्तर द्याहटवा