Image via Wikipedia
घराचा उंबरठा ओलांडण्यास प्रयास पडणार्या शिवाजीराजांनी मोठेपणी आग्रा-ग्वाल्हेरपासून जिंजी-तंजावरपर्यंत घोडदौड केली.'सूर्याचे प्रतिबिंब मला आणून द्या'असे म्हणाऱ्या राजांनी मोठेपणी प्रतीपचंद्र हि मुद्रा शिरावर धरली.दाईला व्याघ्रगर्जना करून दाखवणाऱ्या राजांनी मोठेपणी औरंगजेबाच्या दरबारात सिंहगर्जना करून मुघलांना भयचकित केले.लहानपणी आपल्या सवंगड्याकडून मातीचे दुर्ग बांधणाऱ्या शिवाजी राजांनी मोठेपणी साल्हेर-अहिवंतापासून जिंजी-वेलोरपर्यंत दुर्गांची मोठी शृंखला उभी केली.या अवघ्या पराक्रमाची सुरवात दुर्ग शिवनेरीवर झाली.जुन्नर नजीकचा हा दुर्ग नैसर्गिकरीत्या बुलंद असला तरी ज्या बाजूस टी अभेद्यता नाही,त्या बाजूस सात दरवाजे आणि बुलंद तटबंदी बांधून बेलाग करण्यात आला आहे.शिवनेरी या दुर्गाभोवती आणि परिसरात अनेक लेणी आहेत.
शिवनेरी या दुर्गातच ७८ विहार आणि ३ चैत्यगृह आहेत.पाण्याची ६० कुंडे आहेत.३ लेणी अपूर्ण आहेत.काही लेणी २ हजार वर्षापासूनची आहेत.तेथे कोरलेल्या ९ शिलालेखांवरून त्या लेण्यांचे प्राचीनत्व लक्षात येते.
कशी कोरली हि लेणी?कोणती हत्यारे वापरली त्या कलाकारांनी ? कोरून काढलेला दगड कोठे टाकला?कलाकार अंधारात कसे काम करत असतील?आज पुरावे नाहीत;पण अंदाज बांधता येतात.प्रकाश परावर्तीत करूनच हे काम करण्यात आले असावे;पण प्रकाशाचे परावर्तन कसे केले असावे?त्यावेळी आरसे होते का ?किंवा पाण्यावरून प्रकाश परावर्तीत करून हे लेणीचे काम केले असावे का?
शिवनेरीवर पाण्याच्या ४०-५० तरी टाक्या आहेत.काही विशाल आहेत.पाण्याचा मजबूत साठ या दुर्गावर होता.काही टाक्या बांधीव आहेत,तर काही दगडात कोरलेल्या आहेत.बाष्पीभवनाने पाणी निघून जाते म्हणून शिवनेरीच्या काही टाक्या कातळात कोरल्या आहेत.त्यावर दगडाचे छत कोरले आहे.आत पाणी स्वछच,नितळ आणि गार आहे.शिव्नेरीवरची गंगा-जमना हि टाकी अभ्यासण्यासारखी आहे.
असा हा शिवनेरी दुर्ग,जिथे शिवाजी महाराजांचा जन्म झाला,तो त्यांच्या ताब्यात कधीही नव्हता.
थोडं लहान झालंय पोस्ट. अजुन माहीती चालली असती ..
उत्तर द्याहटवा@kayvatelte
उत्तर द्याहटवाहो मलाही वाटले तसे परंतु थोड्या शब्दात सर्व माहिती देण्याचा प्रयत्न केलाय.
धन्यवाद
mala tar hi mahiti aajach kalali
उत्तर द्याहटवाchoti ka hoi na.. dnyandan mahtvach ..
dhanyawaad vikram...
@amol
उत्तर द्याहटवाधन्यवाद अमोलसाहेब
tula kay bolu aata mi????????kahi shabda thevale aahes ka te vichar andhi swatala...
उत्तर द्याहटवाare ha anonymous mhanje mi re jayesh.
उत्तर द्याहटवाhi.........
उत्तर द्याहटवाthax for detail information of this fort
उत्तर द्याहटवाMala mahity chhoti ka hoina pan chhan vatly
उत्तर द्याहटवाJANARDHAN KADAM
उत्तर द्याहटवाjay shivray
उत्तर द्याहटवा