बुधवार, ३० डिसेंबर, २००९

मुलींनो,जरा जपून

Om GirlImage by DistortedSmile via Flickr

कालच्या जेसिका ते रुचिका या पोस्टवरून आणि त्यावरील अपर्णाच्या अभिप्रायावरून असा प्रश्न पडला कि आजच्या जमान्यात आपण जी महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहत आहोत त्यात कमीत कमी स्त्री तरी सुरक्षित आहे का ? जी कोणाची तरी आई,बहिण,मुलगी,बायको,प्रेयसी असते.
एका सामान्य विद्यार्थिनीला अजाणत्या वयात विनयभंगासारख्या किळसवाण्या घटनेला सामोरे जावे लागले कि काय होते हे रुचिकाच्या घटनेमुळे पहायला मिळाले. या घटनेने सामाजिक जाण राखून असणार्या सभ्य आणि सुशिक्षित समाजाला हादरवून टाकले.वयाने,हुद्द्याने कितीही मोठ्या असलेल्या व्यक्तीचे पाय घसरू शकतात आणि त्यातून एखाद्या निष्पाप जीवाचा घात होऊ शकतो हे त्यामुळे लक्षात आले.रुचीकाला आणि तिच्या परिवाराला अत्यंत दुर्दैवी परिस्थितीतून जावे लागले.अशी परिस्थिती यापुढे कोणावरही येऊ नये यासाठी ठोस पावले उचलणे आता अत्यंत आवश्यक ठरणार आहे.
रुचीकाच्या वाट्याला जे काही आले ते कोणत्याही मुलीच्या वाट्याला कधीही आणि कोठेही येऊ शकते.हि वस्तुस्थिती आहे आणि ती अशा मुलींच्या पालकांना अस्वस्थ करणारी आहे.यावर उपाय काय????
यापासून मुला मुलीना सतत सावध करणे आणि असा प्रसंग आपल्यावर आलाच तर त्याचा प्रतिकार कसा करावा याचे प्रशिक्षण देणे हाच यावर उपाय असू शकतो.
मुलामुलींना लैंगिक शिक्षण द्यावे वैगेरे बोलले जाते पण ती जबाबदारी शाळांची आहे आणि हे शिक्षण शिक्षकांनीच दिले पाहिजे असे म्हणून हि जबाबदारी त्यांच्यावर ढकलली जाते. तरीही लैंगिक शिक्षण देऊन हि समस्या सुटेल का?
मुला मुलींवर असा प्रसंग आलाच तर त्याचा मुकाबला कसा करावा,याबाबत कोणाकडे कशी तक्रार करावी याची माहिती त्यांना असली पाहिजे.याबाबत त्यांच्या पाठीशी कोणीतरी उभे राहिले पाहिजे.मुलांचा लैंगिक छळ मोठ्या प्रमाणात होतात हे सरकार जाणते परंतु तरीही त्यावर ते ठोस उपाय शोधात नाही या गोष्टीची चीड येते.
अशा पिडीत मुलामुलींनी आपली तक्रार आई-वडिलांच्या कानी घालावी असे कितीही बोलले जात असले तरीही अजून तरी आपल्या कुटुंबव्यवस्थेत तेवढा मोकळापणा आलेला नाही.त्यामुळे अशा गोष्टींवर काय उपाय असावा ????

Reblog this post [with Zemanta]

९ टिप्पण्या:

  1. विक्रम, हे सगळं तू म्हणतोस ते कितीही खरं असलं तरी तुझ्या मागच्या पोस्टमध्ये जसा घटनाक्रम आहे ते पाहिलं तर भिती याची वाटते की कायद्याचे रक्षकच जर कायद्याचे भक्षक होणार असतील आणि राजकारणी अशा लोकांची पाठराखण करणार असतील तर यावर मग सर्वसामान्य पिडितांनी कुठं जायचं....स्त्रीदाक्षिण्य वगैरे तर जाऊदे कुठलाही सर्वसामान्य अशा कायदेचक्रात अडकला की संपलाच; जसं रुचिकाच्या कुटुंबीयांचं झालंय....
    मुलींनी मात्र कुठल्याही लैंगिक प्रकरणात आपण अडकू नये म्हणून खबरदारी घ्यायला हवी आणि त्यासाठी स्वसंरक्षणाचे शिक्षण...

    उत्तर द्याहटवा
  2. @अपर्णा
    आपण म्हणत आहात ते खर आहे रक्षकच भक्षक झाल्यवर काय करायचे ?
    परंतु या घटनेत उशिरा का होईना तिला न्याय मिळाला परंतु त्याला न्याय म्हणावा का असा प्रश्न पडतोच ?

    रुचीकाच्या कुटुंबाला जसा त्रास सहन करावा लागला तसा बाकीच्यांना होऊ नये हीच तर माझी अपेक्षा आहे पण यावर उपाय काय हेच तर सुचत नाही :(

    उत्तर द्याहटवा
  3. bhiti ha ekch upay ,bhitich yagoshti thambvu shkte

    manase , shivsena yana mhanav asha veli kara na tumhi ji maramari karaychi aahe.

    karan sarkar peksha lok yana ghabartat

    उत्तर द्याहटवा
  4. @राहुल
    हा कोणताही एक पक्ष करू शकतो का ? किंवा त्यांना असे ह्वावे असे वाटत असावे असे तुम्हाला वाटते का ?
    मला तसे वाटत नाही
    अशा गोष्टी घडू नयेत त्यासाठी प्रत्येकाने आपआपल्या परीने योगदान द्यायला हवे असे मला वाटते.

    उत्तर द्याहटवा
  5. तुझा लेख वाचला, पटला. स्व-संरक्षण गरजच आहे. पण हे राक्षस का निर्माण होतात ह्याचाही विचार करायला हवा नं? सिनेमामध्ये अश्लील दृश्य कोण देतं? जाहीरातींमध्ये, टी.व्हीवर स्वतःच्या शरीराचे प्रदर्शन कोण मांडतं? कॉलेजांमध्ये लो व्हेस्ट जिन्स, बेली-बट्न्स चे सर्रास प्रदर्शन, लो-नेक टी-शर्ट्स चे वाढते प्रमाणं, वाढता स्वैराचार याबद्दलचे काय?

    असं नाही वाटतं हे फारच वाढले आहे म्हणुन? टाळी एका हाताने नाही वाजत मित्रा. मला वाटतं तुझ्या पोस्टच्या शिर्षकाचा विचार दोन्ही बाजुने व्हायला हवा

    उत्तर द्याहटवा
  6. @अनिकेत

    तुम्ही बोलत आहात ते काही अंशी खरेही आहे.ताली एका हाताने वाजत नाही हे हि मान्य परंतु

    रुचिका सारख्या प्रकरणात त्या बालवयातील मुलीचा काय व किती दोष ?

    उत्तर द्याहटवा
  7. नैतिकता अन् नीतीमूल्य यांचा अंगीकार व्हायला हवा. . हाच उपाय आहे. . अस मला तरी वाटत!!!

    उत्तर द्याहटवा