मंगळवार, २९ डिसेंबर, २००९

लिंगाणा... रायगडचा पहारेकरी

लिंगाणा हा रायगडचा उपदुर्ग आहे.माणगड,सोनगड,महिन्द्रगड,लिंगाणा,कोकणदिवा हे दुर्ग रायगडाकडे जाणारया घाटवाटांवर पहारे देतात.कावळ्या,बोचेघोळ,निसनी,बोराटा,सिंगापूर,फडताड,शेवत्या,मढ्या अशी घाटांची नवे आहेत.या वाटांवरून सह्याद्रीवरून खाली कोकणात उतरता येते.बोराट्याच्या नाळेलगत लिंगाण्याचा डोंगर आहे.आकाशात उंच गेलेला शिवलींगासारखा सुळका हा प्रस्तरारोहन करणार्यांसाठी मोठे आव्हान आहे.महाराष्ट्रातील युवकांनी ते आव्हान पेललेही आहे.,
मोहरी नावाच्या सह्याद्री माथ्यावरील गावातून बोराट्याची नाळ जवळ आहे.हि नाळ
Fort Raigad http://www.madforclicks.Image via Wikipedia
अवघड आहे.इथून जवळच असणार्या रायलिंगहून लिंगान्याच दर्शन घेतलं,तर त्याचा थरार काय आहे याची कल्पना येईल.सिंगापूर या नाळेन जाण सोप आहे.लिंगाण्यावर जायचं तर लींगणमाचीला जायचं.जननी आणि सोमजाईच दर्शन घ्यायचं आणि मग लिंगाण्याकडे निघायचं.
घासार्यावरून जात असताना काही चौक्यांच्या खुणा ध्यानात यावयास लागतात.उजवीकडे पाण्याचे टाके.मग वाट कड्याच्या टोकावरून जाते.इथे खालून येणारी पायरया ढासळलेली वाट आहे.उजव्या बाजूस १५-२० फुटांचा कडा आहे.तिथ एक उंबराचे झाड कडा फोडून बाहेर आल आहे.त्याचाच आधार घेऊन कडा पार करायचा.इथून वर गेल्यावर मग लिंगाण्याच्या त्या उंचावत गेलेल्या शिखराचा तळ आहे.त्याच्या पोटात एक गुहा आहे.हिलाच सदर म्हणतात.एक प्रवेशद्वार आणि चार खिडक्या.त्या गुहेला लागुनच एक धान्य कोठार.पलीकडे जीभीचा पहारा.तिथून माची पसरत गेली आहे.
या अशा अवघड दुर्गावर स्वराज्याच्या वैर्यांना कैदेत ठेवत असत.वर अतिअवघड असा वाट नसलेला सुळका आणि खाली घसरड्या वाटा.इथे कैद्यांना ठेवल्यावर त्यांच्या मनावर या अवघड स्थितीचा परिणाम होत असे.इथले कैदी खचुअन जात असत.पळून-जाण्याचा विचारही त्यांच्या मनात येत नसे.
इथे कैदी ठेवण्याची कल्पना कोणाच्या डोक्यात आली माहिती नाही;परंतु ज्याच्या डोक्यात आली त्याचे डोके चांगलेच सुपीक असले पाहिजे.मानसिकदृष्ट्या खचवून टाकणारे असे हे स्थानआहे.
Enhanced by Zemanta

७ टिप्पण्या:

  1. खुप माहितीपूर्ण आणि रोमांचकारी लेख आहे. एवढ्या दुर्गम जागी कैद्यांना ठेवण्याचा विचार ज्याच्या डोक्यात आला असेल, तो व्यक्ती खरंच खुप चतुर असला पाहिजे. "नाळ" म्हणजे काय? हा शब्द अजुन अपरिचित वाटतो. रायगड बघायला आल्यानंतर लिंगाणा तसेच तुम्ही सांगितलेली ऐतिहासिक स्थळे पूर्ण बघाविच लागणार, फक्त तिथे जाण्याचा योग असावा. ते उंबराचे झाड मात्र नेहमी स्मरणात राहील.

    जय भवानी!

    - विशल्या!

    उत्तर द्याहटवा
  2. लिंगाणा नेहमीच ट्रेकर्सना आव्हान देणारा ठरला आहे. शिवलिंगाशी साधर्म्य असल्यामुळे कदाचित हे नाव पडले असावे.
    मुर्खानंदच्या या पोस्टवर त्याची अधिक माहिती आहे! [नावावर जाऊ नका... सॉलिड लिहलय त्यानं!]

    उत्तर द्याहटवा
  3. @विशल्या!
    नाळ म्हणजे चिंचोळी वाट असे असावे.
    एकदा नक्की भेट दे तुला आवडेल बघ

    उत्तर द्याहटवा
  4. @भुंगा

    धन्यवाद साहेब
    अभिप्राय आणि लिंक दोन्हीबद्दल :)

    उत्तर द्याहटवा
  5. नाळ म्हणजे चिंचोळी वाटच असणार. ते जे ’जैत रे जैत’ चित्रपटातील गीत आहे - ’लिंगोबाचा डोंगुर आभाळी गेला’ ते ह्या लिंगाणा उपदुर्गावरच आहे का?

    उत्तर द्याहटवा
  6. बोराट्याच्या नाळीतुन लिंगाण्याला आम्ही पण दोन वेळा जाऊन आलो मस्त अनुभव होता तो "राजगड ते रायगड."
    सुपर ट्रेक जीवनात एकदा तरी करावा.....!

    उत्तर द्याहटवा