मंगळवार, १२ जानेवारी, २०१०

'भारतमाता'ला वाचवायलाच हव !

मराठी अस्मितेचे प्रतिक आणि मराठी चित्रपटांचा एकमेव आधारस्तंभ असलेले 'भारतमाता' चित्रपटगृह केंद्र सरकार आता पाडण्यास निघाले आहे.
The ghost cinemaImage by phill.d via Flickr
मराठी चित्रपटांचे हक्काचे घर असलेले आणि गिरणगावाची शान असलेले 'भारतमाता' चित्रपटगृह खरच वाचवायला हव. यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ कलाकारांनी लढाही उभारला आहे.आणि त्याला साथ देत आहेत गिरणगावातील गिरणी कामगार.
खरतर भारतमाता एक पुरातन वस्तू म्हणून आपल्या सरकारने जतन करायला हवी परंतु येथे तर उलट न्याय मिळत आहे तेच मायबाप सरकार हि वस्तू जमीनदोस्त करायला पुढे सरसावले आहे.
'भारतमाता' हे मुंबईमधील सर्वात जुने चित्रपटगृह आहे आणि तेथे फक्त मराठी चित्रपटच दाखवले जातात.त्याचे नावही असे आहे की ते कोठेही अभिमानाने मिरवता येऊ शकते.या अशा गोष्टी आपल्या अस्मितेच्या खुणा आहेत आणि त्या आपण जपायला हव्यात.
आज शेकडोंच्या संखेने उत्कृष्ट मराठी चित्रपट तयार होत आहेत.नटरंग,दे धक्का ,मी शिवाजीराजे भोसले बोलतोय अशी कितीतरी उदाहरणे देता येतील.हिंदी चित्रपटांच्या बाहूगर्दीत आपला चित्रपट प्रेक्षकांसमोर कसा जाईल अशी धास्ती आज मराठी सिनेनिर्मात्याना असते.त्यावेळी त्यांना फक्त 'भारतमाता'चा आधार असतो.मराठी चित्रपटांची परंपरा हि हिंदीपेक्षा कधीही वैभवशाली आहे आणि ती टिकवली पाहिजे.केवळ मराठी चित्रपट दाखवणारे चित्रपटगृह आता खूप कमी शिल्लक आहेत.पुण्यातील 'प्रभात' आणि मुंबईमधील 'भारतमाता' हि दोच चित्रपटगृहे फक्त मराठी चित्रपट प्रदर्शित करत असतात.आणि तीच उद्ध्वस्त होत असतील तर मराठी माणसाने पाहिचे कोणाकडे?
'भारतमाता' मराठी चित्रपटांचा श्वास आहे ती एक आपल्या संस्कृतीची ओळख आहे आणि तो ठेवा जपण्यासाठी सर्वांनी समोर आले पाहिजे.मग तो कोणत्याही पक्षाचा,जातीचा,धर्माचा 'मराठी' असूद्यात.
फक्त 'भारतमाता'ला वाचवायलाच हव !
Enhanced by Zemanta

७ टिप्पण्या:

  1. होय .. पण तिकडेच नवीन भव्य 'भारतमाता' बांधायला हरकत नसावी. चांगले २-३ स्क्रीन्स असलेले. बांधता येइल की सहज...

    उत्तर द्याहटवा
  2. @रोहन
    गिरणगावात तेवढे मोठे चित्रपटगृह बांधायला परत जागा मिळेल असे वाटत नाही आणि मिळालीच तर ती घेण्याएवढी ऐपत असेल का ?

    उत्तर द्याहटवा
  3. काल भारतमाता चे मालक राज ठाकरेंना भेटायला गेले होते...खरच वाचायला हव ’भारतमाता’...


    तुम्हाला आणी तुमच्या कुटुंबाला मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!
    तिळगुळ घ्या गोड-गोड बोला……

    उत्तर द्याहटवा
  4. @davbindu
    कोणीही मदत करूद्यात फक्त खरच वाचायला हव ’भारतमाता’...
    तुम्हाला आणी तुमच्या कुटुंबालाहि मकरसंक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा…!!!

    उत्तर द्याहटवा
  5. चांगली बातमी.(कालची)भारतमाता वाचल आहे.मुख्यमंत्र्यानी भारतमाताला भेट देउन तिथे कोणताही दुसरा प्रकल्प राबवला जाणार नाही व हे चित्रपटगॄह मराठी चित्रपटांसाठी राखीव राहील अस प्रतिपादन केल आहे....

    उत्तर द्याहटवा
  6. @दवबिंदू
    अरे वाह
    चांगली बातमी दिलीत :)
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  7. NTC पुन्हा बांधणार 'भारतमाता'
    http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/6389740.cms

    उत्तर द्याहटवा