सोमवार, २५ जानेवारी, २०१०

पद्मदुर्ग.... शिवरायांची सागरी दौड

सिद्याच्या जंजिर्याला शह देण्यासाठी शिवप्रभूनी पद्मदुर्गाची उभारणी केली.जंजिर्याचा दुर्ग इ. सन १५६७ ते १५७२ या दरम्यान बांधला गेला.आधी निजामशाही आणि नंतर मुघल यांच्या आधीन असणारया सिद्द्यानी या बळकट,कुबल दुर्गाच अजिंक्यत्व कायम राखल.मराठ्यांनी वारंवार हल्ले चढवूनही त्यांना जंजिरा घेता आला नाही.

जझीरा म्हणजे बेट.'जंजिरा' हा त्याचा मराठी अपभ्रंश पाण्यातील बेटावरील दुर्गासाठी वापरला जातो.जंजिर्याचे नाव आहे 'माहरुबा'. माह म्हणजे चंद्र आणि रुबा म्हणजे चतकोर! मुरुड जवळच्या बेटावरील हा दुर्ग एकवीस बुरुजांनी बंदिस्त केला आहे.काही बुरुज प्रचंड आहेत.या बुरुजांवरच्या अनेक मोठ्या तोफांनी जंजीरयाच अभेद्यत्व कायम ठेवलं होत.शिवाजीमहाराजांनी कोकणपट्टीवरील अनेक दुर्ग ताब्यात आणून आणि
Janjira fortImage via Wikipedia
स्वराज्याच आरमार तयार करून सिद्याच्या कोकणातील अत्याचारांना मोठाच आळा घातला होता;पण जंजिरा आपल्या ताब्यात आणण्यास मात्र त्यांना यश आल नाही.
शेवटी जंजीरयावर दबाव रहावा म्हणून त्याच्यापासून दूर समुद्रात असणारया एका छोट्या बेटावर शिवप्रभूनी एक दुर्ग बांधावयास काढला.मुरूडच्या किनार्यावरून हे बेट दिसते.त्याचे नाव आहे कांसा.या कांसा बेटावर मराठी स्थपती दुर्ग उभारणीच काम करू लागले.सिद्दी या बेटावर हल्ले चढवतील म्हणून दर्यासारंग आणि दौलतखान यांना आरमार घेऊन बेटाच्या मदतीला पाठविण्यात आले.शिवप्रभूनी हा दुर्ग बांधला.
पुढे हा सिद्द्यानी जिंकून घेतला.त्या पद्म्दुर्गाचा मूळचा काही भाग पडून सिद्द्यानी त्यावर त्यांच्या शैलीतील बांधकाम केले.मराठी आणि सिद्दी यांच्या बांधकाम शैलीतील फरक पद्म्दुर्गावर लगेचच कळून येतो.पद्मदुर्गाचे मग वैशिष्ट्य काय आहे?
जंजिरा आणि पद्मदुर्गावर एक गंमत पहावयास मिळते.येथे दगड चुन्यात बसवले आहेत आणि चुन्याचे थरही जाड आहेत. या दोन्ही दुर्गांवर एक गोष्ट पहावयास मिळते ती म्हणजे सागराच्या लाटांच्या मारामुळे बरयाच ठिकाणी तटबुरुजांचे दगड झिजले आहेत.झिजून वीत दोन विती आत गेले आहेत;पण त्यांना जखडून ठेवणारे चुन्याचे थर मात्र तसेच आहेत.ते काही झिजलेले दिसत नाहीत.पूर्वी चुना उत्तमरीत्या मळून,तो ठराविक वेळातच वापरात असत.त्यामुळे चुन्याचे पकडीचे गुण वाढत असत.चुण्यावर हवामानाचा आणि लाटांचा मोठा परिणाम झालेला दिसत नाही.आज चार-पाचशे वर्षे तरी चुना तसाच टिकूनआहे.
Enhanced by Zemanta

२० टिप्पण्या:

  1. शिवरायांनी सिद्दीला चहुबाजूंनी स्थानबद्ध केले होते. जमीनीवरील सर्व भाग मराठ्यांच्या ताब्यात होताच. पण सिद्दी हा समुद्रीमार्गे मुंबईला इंग्रज आणि गोव्याला पोर्तुगीझ आश्रयाला जाई. तेंव्हा त्याची हे बाजु तोड़ण्यासाठी राजांनी पद्मदुर्ग आणि खांदेरी हे २ जलदुर्ग उभे केले. ह्या दोन्ही जलदुर्गांची कहाणी मोठी रोचक आहे... :)

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. the king shivaji maharaj alwaye try to winn thins fort but unfourtuantelly they was not successful deu less poewr of nevi
      Raj Ghadage.

      हटवा
    2. If winning cost of janjira is more our valuable soldier death .not acceptable then king shivaji maharaja decision was better to build another fort

      हटवा
  2. I would like to know more information about Khnaderi-Underi forts near Thal. Please also let me know anything is written in books about them.
    Mangesh Nabar

    उत्तर द्याहटवा
  3. लहान मुलांना दुसरिकडे फिरायला नेन्या एवजी मी नेहमिच त्यांना गड-किल्ले दाखवत असतो... ह्या फेब्रुवारित आम्ही मुरुड-जरिरयाला जात आहोत, पद्मदुर्ग, उंडेरी ला कसे जायचे ते कळेल काय?... जंजिर्या प्रमाने तिकडे जान्याची सोय आहे काय?.

    उत्तर द्याहटवा
  4. @mannab
    @साळसूद पाचोळा
    खांदेरी- उंदेरीसाठी आलिबागहून जाण्यासाठी बसची सोय आहे. आलिबाग हून १५-२० किमी अंतर आहे.
    तसेच तुम्ही किहीम बीचला भेट देऊ शकता तेथे घरगुती राहण्याची उत्तम सोय आहे.
    धन्यवाद

    उत्तर द्याहटवा
  5. एक अत्यंत महत्वाचे ... खांदेरी- उंदेरीसाठी असेच जाता येत नाही. हा भाग 'मुंबई पोर्ट ट्रस्ट'च्या अधीपत्याखाली आहे. तेंव्हा रितसर परवानगी घेउन जावे लागते. चौकशी करून जाणे.

    उत्तर द्याहटवा
  6. "The Great Maratha" Marathyanchya jo nadi lagla to sampla....

    उत्तर द्याहटवा
  7. छत्रपती शिवाजीम्हाराज्याचे कार्य फार मोठे आहे .त्यांचा नाद करायचा नाही हिंदवी स्वराज निर्माण व्हावे हि त्यांची फार मोठी इच्छा होती .ती त्यांनी पूर्ण करून समस्त हिंदू समाजाला योग्य दिशा दिली ;म्हणूनच ते हिंदुस्तानावर्ती राज्य करू शकले

    उत्तर द्याहटवा
  8. छत्रपती शिवाजीम्हाराज्याचे कार्य फार मोठे आहे .त्यांचा नाद करायचा नाही हिंदवी स्वराज निर्माण व्हावे हि त्यांची फार मोठी इच्छा होती .ती त्यांनी पूर्ण करून समस्त हिंदू समाजाला योग्य दिशा दिली ;म्हणूनच ते हिंदुस्तानावर्ती राज्य करू शकले

    उत्तर द्याहटवा
  9. २०१४ वर्ष माह जानेवारी, जंजीरा किल्ला ला चालू आसनर्या बोट सेवे बाबत;
    प्रवश्यांकडूंन गाइड म्हनून ३०० रुपये घेऊन सुधा किल्लया बाबत अपूरी माहिती देतात. व कील्याचे काही भाग न दाखवताच बोटित परत जन्यासठी घाई केली जाते.
    पर्यटकनी टिकिट कढुन स्वतः किल्ला फिरून यावे. परत जाता सामयी कोनतिहि बोट वापरता येते.
    मराठी इतिहास प्रेमी...

    उत्तर द्याहटवा
  10. छ़ संभाजी राजेनी सुदधा जंजीरा जींकणया पृयतन केला होता हे विसरू नये

    उत्तर द्याहटवा
  11. MALA KASA FORT LA VISIT KARYCHI AHE PAN .... PAN TY FORT LA VISIT KARTA YETE KI NH HE MAHIT NH PLZ KAHI MAHIT ASLYS KALVA

    उत्तर द्याहटवा