सोमवार, ११ जानेवारी, २०१०

डॉ. कोटणीस एक 'सच्चा मित्र'

१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले.त्यावेळी चीनने पंडित नेहरूंना पत्र पाठवून वैद्यकीय मदत मागितली होती. सप्टेंबर १९३८ मध्ये डॉक्टरांचे पथक तिकडे रवाना झाले.त्यात डॉ.कोटणीस होते.त्यांनी चीनी सैन्याची मनोभावे सेवा केली.त्यामुळे कृतज्ञ चीनी जनतेने नुकतेच त्यांची 'सच्चा मित्र' म्हणून निवड केली.चीनमध्ये त्यांचे भव्य स्मारकही बांधण्यात आले आहे.
नुकताच चायना रेडियोने ६० व्या प्रजासत्ताक सोहळ्यानिम्मित चीनमध्ये उल्लेख्न्नीय कामगिरी करून चीनी जनतेला मदत करणाऱ्या गेल्या शतकातील १० आंतरराष्ट्रीय व्यक्तींची निवड करण्यात आली.त्यात आपल्या देशातील सुपुत्र डॉ. द्वारकानाथ कोटणीस यांचा चीनचा 'सच्चा मित्र' म्हणून निवड झाली.
चायना रेडियोने घेतलेल्या पोलमध्ये ५६ लाख चीनी जनतेने भाग घेऊन आम्ही डॉ.कोटणी यांचे ऋणी आहोत,अशी पोलद्वारे भावना व्यक्त केली.
१९३७ मध्ये जपानने चीनवर आक्रमण केले.त्यावेळी नाईलाज म्हणून सामान्य चीनी जनता आणि सैनिक जपान्विरोधात लढत होते.त्यांची केविलवाणी अवस्था पाहून जर्मनीची युद्ध वार्ताहर अग्नेस स्मेडले हिने नेहरुंना पत्र पाठवून चीनी सैनिकांच्या लोकांच्या शुश्रुसेसाठी हिंदुस्तानी वैद्यकीय पथक पाठवण्याची विनंती केली होती.त्या विनंतीला मान देऊन डॉक्टरांचे एक पथक सप्टेंबर १९३८ रोजी चीनला पाठवले.त्या पथकात डॉ.कोटणीस होते.
डॉ.कोटणीस हे मूळचे सोलापूरचे.त्यांचे वडील एका गिरणीत साधे कारकून होते.त्यांनी कर्ज काढून आपल्या मुलाला M B B S केले.त्याच्या शिक्षणासाठी आपण काढलेल्या कर्जाची फेड करून आपल्याला सुखाचे दिवस दाखवील,या आशेवर जगणाऱ्या वडिलांना जेंव्हा आपला मुलगा वैद्यकीय पथकाबरोबर चीनला गेल्याची बातमी कळली तेंव्हा त्यांनी वैतागून 'आत्महत्त्या'केली.
डॉ.कोटणीसाना हे वृत्त कळताच ते कमालीचे दुख्खी झाले,तरीसुद्धा त्यांनी घेतलेले कार्य तडीस नेले.कोटणीस ज्या फौजेबरोबर होते ती फौज लीन्चुई या ठिकाणी असताना १३ दिवसांची घनघोर लढाई झाली.तेथील मुख्य जबाबदारी डॉ.कोटणीस आणि डॉ.बसू यांच्यावर होती.त्या पथकातील काहीजन थंडी सहन झाल्याने मायदेशी परत आले होते.परंतु ते दोघे तेथून परतले नाहीत.१३ दिवसांच्या लढाईत त्यांनी हजारो चीनी सैनिकांवर उपचार केले.त्या काही अवघड शस्त्रक्रिया हि होत्या.औषधांचा अपुरा पुरवठा,खाण्याची आबाळ,जपानी बॉम्बचा वर्षाव अशा परिस्थित डॉ.कोटणीस आपली जबाबदारी निभावत होते.
याचदरम्यान त्यांनी कुओचींग लान या चीनी नर्सबरोबर लग्न केले.ते उत्तम चीनी बोलू लागले.जखमी सैनिकांच्या देखभालीसाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.अतिश्रम,कुपोषण,दुषित हवामान यामुळे त्यांची तबियत खालावत गेली.त्यातून त्यांना फेफरे येऊ लगले.तरीही ते थोडे बरे वाटले कि रुग्णांची सेवा करत.खेड्यातील लोक्तर त्यांना देवदूत मानू लागले.
अखेर एका खेड्यात त्यांचा मृत्यू झाला.तो दिवस होता डिसेंबर १९४२.चीनमध्ये त्यांचे भव्य स्मारक असून आंतरराष्ट्रीय बंधुत्वाच्या भावनेचे प्रतिक असणार्या डॉ.कोटणीस यांच्या जीवनाची कथा व्ही.शांताराम यांनी अजरामर केली.त्यांनी काढलेला 'डॉ.कोटणीस कि अमरकहाणी' हा चित्रपट केवळ हिंदुस्तानात नव्हेतर जगभर गाजला आहे.
परंतु अशा एका 'सच्चा मित्र' असलेल्या माणसाचे स्मारक आपल्या देशात नसावे हि दुर्दैवाची गोष्ट आहे.
(यातील माहिती काही वृत्तपत्रातून घेतली आहे)

१५ टिप्पण्या:

  1. एवढी भारताने चीनला मदत करूनही.... आता असलेल्या परिस्थितीला "पालथ्या घड्यावर पाणी" असे म्हणावे लागेल.... काय करणार दुर्दैव आपल..

    उत्तर द्याहटवा
  2. सापाला दूध पाजल्याने तो दंश करणे विसरत नाही हे मी सर्प मित्र असुनही बोलतो..चीन कडून आपण फ़क्त पठित खंजीर खुपसून घेऊ शकतो आणखी कही नाही..anyways, this is an amazing article vikram.. jayesh

    उत्तर द्याहटवा
  3. @chaitainya n Jayesh

    सध्याच्या चीनच्या वागणुकीवरून तुमचे मत रास्त आहे परंतु डॉ. कोटणीस यांचे कार्य खरच महान आहे आणि त्याचा चीनने योग्य तो सन्मान केला आहे असे मला वाटते.

    उत्तर द्याहटवा
  4. कोटणीस यांच्या कार्याबद्दल मी बोलत नव्हतो. कोटणीस यांचे कार्य अतिशय महान आहे. मला म्हणायचे होते कि आपण त्यांना जपानी आक्रमानावेळी मदत केली आणि त्यांनी आपल्याला त्याचाच प्रसाद म्हणून अशी वागणूक दिली.

    उत्तर द्याहटवा
  5. मस्त माहिती विक्रम.. आधी कुठेतरी वाचलेले स्मरते पण लक्ष्यात नाही. भारतीय जनता नाही तर किमान चिनी जनतेने तरी त्यांचे ऋण लक्ष्यात ठेवले हेच नशीब...

    उत्तर द्याहटवा
  6. डॉ. कोटणीस यानी यलो फीवर अर्थात पीत ज्वरावर औषध शोधून काढले.आजही बोटी वर किंवा आफ्रिकेत जाण्यापुर्वी ही लस प्रत्येकाला घ्यावी लागते. डॉ कोटनीस की अमर कहानी नावाचा एक चित्रपट पण त्यांच्यावर निघाला होता.
    विक्रम जी , उत्तम माहितीपूर्ण लेख. धन्यवाद.

    उत्तर द्याहटवा
  7. Why Neheru ? It was 1937...(10 years before the independance).
    Under what authority did Neheru send the medics to China?

    उत्तर द्याहटवा
  8. @रोहन
    धन्यवाद

    @संजय
    माहितीबद्दल धन्यवाद मला त्या लासिबद्दल खरच काही माहिती नव्हते.
    हो तो चित्रपट व्ही.शांताराम यांनी बनवला होता.मी त्याची माहिती लेखामध्ये दिली आहे .

    उत्तर द्याहटवा
  9. @Anonymous
    नेहरुंना जेंव्हा अशी विनंती करण्यात आली तेंव्हा त्यांनी 'भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेस' तर्फे हे वैद्यकीय पथक पाठीवले होते.

    उत्तर द्याहटवा
  10. डॉ. कोटणीस यानी जे काम केल ते माणुसकीचा नात्यन केल. परंतु चीनी लोकांनी पुढील काही वर्षात याची चागलीच परत फेड केली . चीनी आक्रमणा नंतर प. नेहरूचे डोळे उघडले. ( खर म्हणजे जर भावना बाजूला सारून खरा भारतीय इतिहास वाचला कि लक्षत येत कि भारतियांच दूरदैव की पहिला पंतप्रधान एवढा बावळट व कसलीच दूरदुर्ष्टी नसलेला होता.) प. नेहरूनी त्या वेळी केलाला घोड चुका भारत आजही भोगत आहे .

    उत्तर द्याहटवा
  11. पूर्वीही वाचलं होतं त्यांच्याबद्दल..
    पण तू मस्त लिहिलंयस! छान वाटलं वाचून! अशी ध्येयवेडी माणसं पाहूनच माणसाच्या वेगळेपणाबद्दल अभिमान वाटतो!

    उत्तर द्याहटवा
  12. @ राजन आणि प्रोफेट
    धन्यवाद प्रतिसादाबद्दल :)

    उत्तर द्याहटवा
  13. नमस्कार विक्रम , खुपच छान झालाय तुमचा लेख. आवडला.
    मी ही याच विषयावर आज एक लेख लिहीला आहे.बघा एक नजर मारून....

    चिन्यांचा आवडता भारतीय मित्र and a bridge forever….

    सस्नेह,

    विशाल

    उत्तर द्याहटवा
  14. @ vishal
    अरे मस्त लिहिले आहे विस्तृत माहिती आहे माझ्या लेखापेक्षाही
    खूप आवडला तुमचा लेख :)
    Thnx for link

    उत्तर द्याहटवा